Mukhyamantri Vayoshri Yojana Apply 2024- येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा आढावा घेत असताना महाराष्ट्र सरकारने राज्यातील गोरगरिबांसाठी, स्त्रियांकरिता, शेतकऱ्यांकरिता तसेच विद्यार्थ्यांकरिता नवनवीन योजनांचा अवलंब करीत आहे. याच धरतीवरती राज्य शासनाकडून ज्येष्ठ नागरिकांकरिता एक अत्यंत महत्त्वाची आणि नाविन्यपूर्ण योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता शासन जीआर काढलेला आहे. या योजनेचा लाभ वयोवृद्ध/ ज्येष्ठ नागरिकांना दिला जाणारा. तर आजच्या या लेखांमध्ये आपण मुख्यमंत्री वयोश्री योजनेबद्दल पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज पद्धत याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.
Mukhyamantri Vayoshri Yojana नेमकी काय आहे?
मुख्यमंत्री वयोश्री योजना ही एक ज्येष्ठ नागरिकांकरिता अत्यंत महत्त्वाची आणि लाभदायक योजना आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील प्रौढ व्यक्तींना 3000/- रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपये हे प्रत्येक महिन्याला दिले जाणार की, एकदाच दिले जाणार याबद्दल अद्याप काही सांगता येणार नाही परंतु नागरिकांना 3000 हजार रुपयांचा लाभ हा दिला जाणार आहे. Mukhyamantri Vayoshri Yojana 2024.
हे नक्की वाचा : अशी करा ई पिक पाहणी घरबसल्या संपूर्ण माहिती
मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ.
मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 3000 रुपये दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम ही खालील प्रकारे देण्यात येण्याची शक्यता आहे किंवा याच पद्धतीने ज्येष्ठ नागरिकांना या रकमेचे वितरण होणार आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत ज्या नागरिकांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त आहेत अशा नागरिकांना अनेक शारीरिक आजार किंवा अनेक त्रासांना सामोरे जावे लागत असते. जसे की,
- प्रौढ व्यक्तींमध्ये ऐकू न येणे,
- न दिसणे,
विविध आजार जसे की,
- शुगर, बी पी.
- गुडघ्यांचा त्रास
- कमरेचा त्रास.
अशा विविध आजारांना किंवा त्रासांना ज्येष्ठ नागरिकांना सामोरे जावे लागते. असे बरेच व्यक्ती आहे ज्यांना त्यांच्या आजावरती उपचार करण्याकरिता पैसे नसतात. त्यांची आर्थिक परिस्थिती पाहता महाराष्ट्र शासनाने त्यांच्या या प्रश्नांवरती आर्थिक लाभ म्हणून त्यांना खालील उपकरणे विनामूल्य दिले जाणार आहेत. जसे की,
- श्रवण यंत्र
- चष्मा
- शुगर आणि बी पी तपासणी यंत्र
- फोल्डिंग वॉकर
- कमोड खुर्ची
- सर्वाइकल कॉलर
- लंबर व गुडघा बेल्ट
- ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर.
अशा प्रकारची विविध उपकरणे या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकाना दिले जाणार आहेत. Mukhyamantri Vayoshri Yojana 2024.
हे नक्की वाचा : क्रॉप इन्शुरन्स प्रक्रिया असा करा पिक विमा क्लेम.
Mukhyamantri Vayoshri Yojana आवश्यक कागदपत्रे.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्या करिता अर्जदारकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.
- अर्जदाराचे आधार कार्ड.
- मतदान ओळखपत्र.
- पासपोर्ट आकाराचे फोटो.
- बँकेचे पासबुक.
- मुख्यमंत्री वयोश्री योजना आवेदन अर्ज.
- मुख्यमंत्री वयोश्री योजना अर्जाचा नमुना.
- स्वयं घोषणापत्र 01
- स्वयं घोषणापत्र 02
- आरोग्य प्रमाणपत्र (आवश्यक).
वितरित करण्यात येणारी रक्कम.
राज्य शासनामार्फत 100% अर्थ सहाय्य या योजणे करिता देण्यात येणार आहे. म्हणजेच 3000 रुपये एवढी रक्कम.
तसेच या योजनेचा दिला जाणार लाभ हा DBT च्या माध्यमातून थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये दिला जाईल. Mukhyamantri Vayoshri Yojana 2024.
मिळणारा लाभ | 3000 रुपये |
लाभार्थी | प्रौढ व्यक्ती |
महिलान करिता Private Whatsapp ग्रुप | येथे जॉईन करा |
मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत प्रौढ व्यक्ती ची सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत लाभार्थ्यांची तपासणी देखील करण्यात येईल.
या योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता राज्यामध्ये विविध यंत्रणा अंतर्गत ही योजना राबवली जाईल जसे की, ग्रामीण भागाकरिता जिल्हाधिकारी व शहरी भागाकरिता आयुक्त, महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करून या योजनेवर देखरेख करण्यात येईल.
जिल्हास्तरीय लेवल वरती जिल्हाधिकारी हे या योजनेचे मुख्य अध्यक्ष असतील तसेच सहअध्यक्ष म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांची नेमणूक करण्यात आली तसेच सदस्य आणि सदस्य सचिव हे देखील या समिती मध्ये असतील. Mukhyamantri Vayoshri Yojana 2024.
हे नक्की वाचा : मुख्यमंत्री योजना दुत भरती 2024 असा करा अर्ज
मुख्यमंत्री वयोश्री योजने करिता प्रस्तावित खर्च
- या योजने करिता थेट लाभ वितरण खर्च हा 15 लाख लाभार्थी यांना देण्याचे शासनाने ठरविले आहे आणि प्रति लाभार्थी अर्जदार यांना रुपये 3000 प्रमाणे रक्कम देण्यात येईल.
- या योजनेअंतर्गत वितरित करणारे निधी हे पात्र लाभार्थ्यांच्या वैयक्तिक आदर्श संलग्न असलेल्या बँकेच्या बचत खात्यात एक वेळ एकर कमी रुपये 3000 च्या मर्यादित ऑनलाइन पद्धतीने थेट लाभ हस्तांतरित करण्यात येईल.
लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष
या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जदाराने खालील पात्रतेचे निकष सविस्तर वाचून घ्यावे जसे की,
- सर्वप्रथम लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- तसेच अर्जदाराचे वय हे 65 वर्ष किंवा त्याच्यावर अधिक असले पाहिजे.
- म्हणजेच ज्या नागरिकांनी दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत वयाची 65 वर्ष पूर्ण केली असती असे नागरिक या योजनेस पात्र ठरतील. मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024.
अर्ज प्रक्रिया.
दिनांक 6 फेब्रुवारी 2024 च्या शासन निर्णयाप्रमाणे मुख्यमंत्री वयोश्री योजने मध्ये अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन ठेवलेली होती परंतु, महाराष्ट्र शासनाच्या नवीन शासन निर्णयाप्रमाणे अर्जदारांकडून अर्ज ही फक्त ऑफलाइन पद्धतीने मागविण्यात येणार असून, ही अर्ज प्रक्रिया खालील पद्धतीने पूर्ण करण्यात येईल तरी खालील माहिती व्यवस्थित रित्या वाचून घ्या.
मुख्यमंत्री वयोश्री योजने मध्ये अर्ज करण्याकरिता तुम्हाला सर्वप्रथम मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत आवेदन पत्र डाऊनलोड करावे लागेल. आवेदन पत्राची लिंक खाली दिलेली आहे याच्या साह्याने तुम्ही आवेदन पत्र प्रिंट करून अर्ज करू शकता. मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024.
वरील आवेदन पत्र डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये अर्जदाराची विविध माहिती विचारली जाईल ती व्यवस्थित रित्या आणि काळजीपूर्वक भरून घ्या. या आवेदन पत्रामध्ये एक हमीपत्र देखील दिलेली आहे ज्यामध्ये की या आवेदन पत्रामध्ये नमूद केलेली माहिती तुमच्या माहितीनुसार खरी आहे. तसेच या योजनेच्या विविध अटी आणि शर्ती या पूर्णपणे वाचलेल्या असून मला त्या अवगत झालेल्या आहेत असे या आवेदन पत्रामध्ये नमूद केलेले आहे.
तसेच ही माहिती चुकीची आढळल्यास शासन निर्णय याप्रमाणे होणाऱ्या कार्यवाही मी स्वतः म्हणजेच अर्जदार जबाबदार राहील याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि या योजनेअंतर्गत लागू असलेले नियम व अटींचे मी पालन करेल अशी मी हमी देतो याकरिता हे हमीपत्र आहे.
या आवेदन पत्रामध्ये अर्ज सोबत जोडावयाची कागदपत्रे जोडलेली आहेत की नाही याची नोंद करण्याकरिता किंवा खात्री करण्याकरिता एक टेबल दिसेल त्यामध्ये त्यांनी सांगितलेली कागदपत्रे यांची नावे आणि दुसऱ्या कॉलम मध्ये ही डॉक्युमेंट्स तुम्ही अर्ज सोबत जोडली आहेत की नाही याबद्दल होय किंवा नाही असे विचारलेले आहे यापैकी तुमच्याकडे जी कोणती डॉक्युमेंट असतील त्यापूढे होय लिहून अर्ज करावा. मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024.
हे नक्की वाचा: बांधकाम कामगार नवीन अर्जदार नोंदणी प्रक्रिया
त्यानंतर या योजनेकरिता करावयाचा अर्जाचा नमुना हा दिलेला आहे त्यामध्ये आवश्यक ती माहिती करून घ्या जसे की,
- अर्जदारांचे संपूर्ण नाव
- लाभार्थ्याचा संपूर्ण पत्ता पिन कोड सहित
- अर्जदाराचे वय किमान 65 वर्ष असणे आवश्यक व जन्मदिनांक. म्हणजेच अर्जदार लाभार्थी या योजनेमध्ये अर्ज करत असेल तर त्याची जन्मतारीख ही 1959 च्या पूर्वीचे असणे आवश्यक आहे.
- तसेच लाभार्थ्याची जात आणि प्रवर्ग
- चालू मोबाईल क्रमांक कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न (जास्तीत जास्त वार्षिक उत्पन्न हे 2 लाखाच्या आत असावे)
- या आवेदन पत्रामध्ये महत्त्वाचे म्हणजे या योजनेअंतर्गत तुम्हाला कोणत्या कारणासाठी 3000 रुपयांची आवश्यकता आहे म्हणजेच कोणते उपकरण किंवा साहित्य घेण्याकरिता तुम्हाला शासनामार्फत आर्थिक मदत हवी आहे त्याबद्दल माहिती भरून घ्या.
- तसेच हे साहित्य खरेदी करण्याकरिता अंदाजीत खर्चाची रक्कम भरावी लागेल.
- तसेच उपकरण किंवा साहित्य बाबतचे दुबार लाभ न घेतलेले स्वयंघोषणा प्रमाणपत्र या अर्जासोबत जोडावे लागणार आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024.
- त्यानंतर अर्जदाराच्या बँकेची भरून घ्या जसे की बँकेचे नाव, शाखा, बँक खाते क्रमांक बँकेचा आयएफसी कोड आणि अर्जदाराचा आधार क्रमांक एवढी माहिती पूर्णपणे भरून झाल्यानंतर सर्वात शेवटी अर्जदाराची स्वाक्षरी आणि पूर्ण नाव टाकून सही करून घ्या.
अशा पद्धतीने तुम्ही मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत तीन हजार रुपयांचा लाभ घेऊ शकता आणि वरील सांगितलेल्या पद्धतीचा व्यवस्थितरीत्या उपयोग करून या योजनेत अर्ज करू शकता. फक्त वरील दिलेले आवेदन पत्र व्यवस्थित रित्या प्रिंट आऊट करा आणि विचारलेली आवश्यक ती माहिती तसेच आवश्यक कागदपत्रे आपल्या आवेदन पत्रासोबत जोडून ही सर्व कागदपत्रे आणि अर्ज आपल्या गावातील ग्रामसेवक यांच्याकडे दाखल करावी लागली किंवा पंचायत समितीमध्ये आपण अर्ज दाखल करू शकता. मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024.
तसेच या अर्जासोबत आरोग्य प्रमाणपत्र देखील जोडावे लागेल या आरोग्य प्रमाणपत्राचा नमुना आपल्याला खालील लिंक मध्ये दाखवलेला आहे या पद्धतीने तुम्ही तुमचा महाराष्ट्र ग्रामीण आरोग्य केंद्रातून या अर्जावरती वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सही आणि शिक्यासहित हा अर्ज दाखल करू शकता.
अशाच नव-नवीन योजनेबद्दल अधिक माहिती करिता आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.
हा ग्रुप Private ग्रुप असल्यामुळे आपला नंबर फक्त ग्रुप admin लाच दिसेल तरी निश्चिंत ग्रुप join करा.
- jee mains 2024 Application Process Application Last Date.
- Pocra Yojana Maharashtra 2024 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा योजना
- Voter id Download मतदान कार्ड डाउनलोड महाराष्ट्र 2024
- Voter id Important Update 2024. मतदान करत असताना काळजी घ्या नाहीतर गुन्हा दाखल होणार
- Passport Application Process 2024.पासपोर्ट सेवा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया