Mukhymantri Yojana Dut मुख्यमंत्री योजना दुत 2024.

Mukhymantri Yojana Dut
Mukhymantri Yojana Dut

Mukhymantri Yojana Dut Bharti 2024 – महाराष्ट्र शासन व केंद्रशासन यांच्यामार्फत शेतकरी व राज्यातील नागरिकांकरिता विविध योजना राबवत असते जेणेकरून देशातील नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून त्यांचे आर्थिक जीवनमान सुधारण्यासाठी व तसेच त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये बदल घडवून आणण्या करिता मदत होत असते.

देशातील असा बराच भाग आहे जसा की, ग्रामीण भाग ज्या ठिकाणी शासकीय योजनांची माहिती देखील पोहोचू शकत नाही. आणि अशा भागातील नागरिक हे या विविध शासनाच्या योजना पासून वंचित राहतात. या नागरिकांना शासकीय योजना बद्दल माहिती देखील मिळत नाही. तर अशा बऱ्याच समस्या करिता महाराष्ट्र शासनाने माध्यमातून एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि एक नाविन्यपूर्ण योजनेची सुरुवात करण्यास मंजुरी मिळालेली आहे जिचे नाव मुख्यमंत्री योजना दुत असे आहे.

Mukhymantri Yojana Dut थोडक्यात माहिती

मुख्यमंत्री योजना दुत या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार, प्रसिद्धी करणे व तसेच त्या योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्री योजना दुत कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे.
तर या योजनेअंतर्गत कशा पद्धतीने लाभ दिला जाईल, या योजने करिता कशा पद्धतीने अर्ज करावा, याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. मुख्यमंत्री योजना दुत.

हे नक्की वाचा : अशी करा ई पिक पाहणी घरबसल्या संपूर्ण माहिती

मुख्यमंत्री योजना दुत चे उद्दिष्ट

मुख्यमंत्री योजना दूत या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार करणे हा आहे.
तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रसिद्धी करणे आणि त्यांचा लाभ हा जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत कसा पोहोचविला जाईल याकरिता मुख्यमंत्री योजना दूध थेट ग्रामस्थांना पर्यंत नेमले जाणार आहेत.

रिक्त पदे

महाराष्ट्र शासनामार्फत मुख्यमंत्री योजना योजना दुत या अंतर्गत एकूण 50000 योजना दुत निवडण्याकरिता सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यास मान्यता देणे आलेली आहे.
या योजनेबद्दल अधिक माहिती करिता आपण जीआर पाहू शकता. जी आर पाहण्याकरिता खालील लिंक वरती क्लिक करा. मुख्यमंत्री योजना दुत.

आवश्यक कागदपत्रे

  • मुख्यमंत्री योजना दूत या योजने करिता विहित नमुन्यातील ऑनलाईन पद्धतीने केलेला अर्ज.
  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • पदवी उत्तीर्ण असल्याबाबतचे पुरावे दाखले किंवा प्रमाणपत्र
  • आधीवास प्रमाणपत्र
  • राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
  • अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो
  • हमीपत्र (ऑनलाइन अर्ज सोबत असलेले हमीपत्र)
  • पात्रतेचे निवड निकष सर्वप्रथम अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
  • अर्जदाराचे वय हे 18 ते 35 या वयोगटातील असावे
  • लाभार्थी अर्जदारास संगणकी ज्ञान असणे आवश्यक असेल
  • लाभार्थी उमेदवाराकडे त्याचा चालू मोबाईल नंबर असणे आवश्यक
  • अर्जदाराकडे स्वतःचे आधार कार्ड असावे आणि त्याच्या नावाचे बँक खाते आधारशी संलग्न असावे.मुख्यमंत्री योजना दुत.

हे नक्की वाचा : खरीप अनुदान 2023 अर्ज प्रक्रिया आणि सहमती पत्र

मुख्यमंत्री योजना दुतांची निवड प्रक्रिया

सर्वप्रथम पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याकरिता लिंक खाली दिली आहे तिच्या सहाय्याने तुम्ही मुख्यमंत्री योजना दुत पदाकरिता अर्ज करू शकता.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारणे सध्य स्थितीमध्ये चालू झालेले नाहीत तरी लवकरच अर्ज भरणे सुरुवात होईल.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज केल्यानंतर उमेदवारांच्या नोंदणीची आणि रक्त अर्जांच्या चरणीचे प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात द्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थामार्फत ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करण्यात येईल.

उमेदवारांची नेमणूक आणि छाननी ही वरील दिलेल्या योजनेचा पात्रता निकषावरून करण्यात येईल.

ऑनलाइन पद्धतीने प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादी ही राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येईल.

त्यानंतर जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांचा समन्वयाने प्राप्त अर्जांची संबंधित उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करतील.

या पडताळणीमध्ये उमेदवारांची शैक्षणिक माहिती आणि वयोमर्यादे विषयक ओरिजनल कागदपत्रे तपासली जातील.

आणि त्यानंतर पात्र उमेदवारांनी बरोबर सहा महिन्याचा करार केला जाईल तसेच हा करा कोणत्याही कारणास्तव वाढविला जाणार नाही.

हे नक्की वाचा : लाडका भाऊ योजना अर्ज प्रक्रिया

पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी झाल्यानंतर जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार यांच्यामार्फत निवड यादी प्रकाशित केली जाईल.

जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त म्हणजेच कौशल्य विकास रोजगार आणि जिल्हाधिकारी यांनी अधिकृत केलेला प्रतिनिधी हा त्यांचा समन्वयाने संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत साठी 1 आणि शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी 1 या प्रमाणामध्ये उमेदवारांना योजनातूत म्हणून रुजू करतील आणि त्यांना पाठविले जाईल.

महत्त्वाची टीप

मुख्यमंत्री योजना दुत या कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना सोपविण्यात येणारे कामकाज ही शासकीय सेवा किंवा कामकाज म्हणून समजण्यात येणार नाही. सबब या नेमणुकीच्या आधारे भविष्यामध्ये कोणत्याही शासकीय सेवेत नियुक्तीचे मागणे अथवा हक्क सांगितला जाणार नाही याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या उमेदवारांकडून घेण्यात येणार आहे. आणि या कार्यक्रमांतर्गत पुढे चालून उमेदवारांना शासकीय क्षेत्रामध्ये कोणतेही सवलत दिली जाणार नाही असे हमीपत्र नियुक्ती दरम्यान उमेदवारांकडून घेतले जाणार आहे.

हे नक्की वाचा :  ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना OBC विद्यार्थ्यांना मिळणार 60,000/- रुपये तत्काळ अर्ज करा

दिले जाणारे वेतन

मुख्यमंत्री योजना दुत यांना प्रतिमाह 10000 रुपये मानधन दिले जाणार आहे.

निवड झालेल्या योजना दुत ने करावयाची कामे

वरील पात्रता निकशाच्या आधारे निवड झालेल्या उमेदवारांना खालील दिल्याप्रमाणे कामे करणे बंधनकारक असेल जसे की,

  • सर्वप्रथम योजना दुत हे संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कामध्ये राहून जिल्ह्यातील विविध योजनांची माहिती मिळवतील.
  • विविध योजनांची माहिती मिळविल्यानंतर समक्ष प्रशिक्षित अशा योजना दूतांनी निवडून दिलेल्या ठिकाणी जाऊन त्यांना ठरवून दिलेली काम पार पाडणे त्यांच्यावरती बंधनकारक असेल.
  • महाराष्ट्र शासनाचा विविध योजनांची माहिती ही ग्रामपातळी वरील घरोघरी माहिती होईल यासाठी सतत प्रयत्न करतील.
  • तसेच योजना दूत हे राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्रामपातळीवरील यंत्रणांशी समन्वय साधून त्यांना काम पार पाडावे लागेल.
योजनेचे नावमुख्यमंत्री योजना दुत कार्यशाळा 2024
लाभार्थीराज्यातील युवा वर्ग
उद्देशशासनाच्या विविध योजनांचा प्रचार, प्रसिद्धी करणे
वेतन10000/- प्रतिमाह संभावित
योजना कोणी सुरू केलीमहाराष्ट्र शासन
अधिकृत वेबसाईटयेथे पहा
महिलांसाठी Private GroupJoin Free
  • योजनादूत यांच्यामार्फत दररोज पार पडलेला कामांचा तपशील त्यांना दिलेल्या विहित नमुन्यात भरून विहित नमुना अहवाल तयार करून तो त्यांना ऑनलाईन पद्धतीने अपलोड करणे आवश्यक आहे.
  • योजना दुत हे त्यांचे काम पार पाडत असताना त्यांना या दरम्यान गैरवर्तन करता येणार नाही, तसेच त्यांना सोपविलेल्या जबाबदारीचा स्वतःचा स्वार्थासाठी किंवा नियमा बाह्य कामासाठी त्यांना उपयोग करता येऊ शकणार नाही.
  • जर योजना दुता कडून असे गैरवर्तन आढळून आल्यास त्यांच्यासोबत करण्यात आलेला करा हा संपुष्टात आणण्यात येईल आणि त्यांना या जबाबदारीतून मुक्त करण्यात देखील येईल.
  • तसेच योजना दूत हा अनधिकृतरित्या गैरहजर राहीला किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्याला देण्यात येणारे मानधन हे अनुदेय राहणार नाही.

अशाच नव-नवीन योजनेबद्दल अधिक माहिती करिता आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.

हा ग्रुप Private ग्रुप असल्यामुळे आपला नंबर फक्त ग्रुप admin लाच दिसेल तरी निश्चिंत ग्रुप join करा.

Leave a Comment

× Whatsapp ग्रुप जॉईन करा 👉