Mukhymantri Tirth Darshan Yojana 2024 – महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जात असून महाराष्ट्र मध्ये सर्वाधिक महाल संत महात्मे तसेच धर्मगुरू होऊन गेलेले आहेत. ज्यांच्या की विचारांचा प्रसार आणि विस्तार हा आपण महाराष्ट्र राज्याची सीमा ओलांडून सर्व भारतामध्ये तसेच भारताबाहेरील राज्यांमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतो. परंतु आपल्या राज्यातील बऱ्याचशा नागरिकांचे स्वप्न असते की, जीवनात येऊन एकदा तरी तीर्थ स्थळांचे दर्शन घ्यावे.
आपल्या हिंदू धर्मामध्ये चारधाम यात्रा, माता वैष्णोदेवी यात्रा, अमरनाथ यात्रा तसेच इतर धर्मियांची देखील मोठी मोठी तीर्थस्थळे आहे ज्या ठिकाणी आयुष्यामध्ये एकदा तरी जाण्याचा लाभ मिळावा असे बहुतांश जेष्ठ नागरिकांचे स्वप्न असते परंतु आर्थिक परिस्थितीच्या अभावामुळे आणि विविध कारणामुळे नागरिक यांचे स्वप्न अपूर्ण राहते.
चारधाम यात्रा करणे, जीवनात येऊन कधीतरी तीर्थक्षेत्र यात्रा करणे अशी सुप्त इच्छा हिंदू धर्मियांची असते. आर्थिक परिस्थितीमुळे तसेच पुरेशी माहिती च्या अभावामुळे ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही.
ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न पूर्ण व्हावे याकरिता महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण योजनेची सुरुवात करण्यास मंजुरी दिली आहे तिचे नाव, “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024“असे या योजनेचे नाव आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना च्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ मोठे तीर्थस्थळांना जाऊन मनशांती करण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. Mukhymantri Tirth Darshan Yojana 2024.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना चे उद्दिष्ट
महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देने हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
या योजने अंतर्गत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना देव दर्शनाकरिता मोफत प्रवास,मोफत निवास आणि प्रवासादरम्यान मोफत भोजन या सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे. Mukhymantri Tirth Darshan Yojana 2024.
हे नक्की वाचा : मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024
योजनेचे लाभार्थी कोण ? पात्रता
या योजनेचा लाभ घेण्या करिता नागरिकांना खालील पात्र अहर्ता पूर्ण कराव्या लागतील जसे कि,
- सर्व प्रथम नागरिक हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे बंधन कारक आहे.
- लाभार्थी नागरिकांची वयोमर्यादा कमीत कमी 60 वर्ष असावी आणि त्यापेक्षा अधिक.
- तसेच अर्जदार यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असावे. Mukhymantri Tirth Darshan Yojana 2024.
योजनेचा लाभ कोण घेऊ शकत नाही ? (अपात्रता)
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.
- ज्या कुटुंबातील व्यक्ती आयकर भरत असतील ते या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.
- ज्या कुटुंबातील व्यक्ती शासकीय नौकारदार आहेत ते देखील या योजनेस अपात्र आहेत.
- तसेच असे कुटुंब ज्यांच्या घरामध्ये चार चाकी वाहन असेल (शेतकरी वर्गाकरिता ट्रॅक्टर हे वगळण्यात आलेले आहे) ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे व्यक्ती या योजनेअंतर्गत देव दर्शनासाठी जाणार असतील ते शारीरिक दृष्ट्या तसेच मानसिक दृष्ट्या सक्षम असावेत आणि ते कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त असू नये जेणेकरून त्यांच्या या आजारामुळे दुसऱ्या प्रवासांना याचा त्रास होईल असे प्रवासी देखील या योजनेस पात्र ठरणार नाहीत. Mukhymantri Tirth Darshan Yojana 2024.
हे नक्की वाचा : अशी करा ई पिक पाहणी घरबसल्या संपूर्ण माहिती
सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे व्यक्ती या योजनेअंतर्गत देव दर्शनासाठी जाणार असतील ते शारीरिक दृष्ट्या तसेच मानसिक दृष्ट्या सक्षम असावेत आणि ते कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त असू नये जेणेकरून त्यांच्या या आजारामुळे दुसऱ्या प्रवासांना याचा त्रास होईल असे प्रवासी देखील या योजनेस पात्र ठरणार नाहीत. ठराविक आजारांचे नावे खाली दिलेली आहे जसे की,
- हृदयाशी संबंधित श्वसन रोग
- टी बी
- करोनरी अपुरे पणा
- कोरोनारी थ्रोंबोसिस
- शारीरिक आजार आणि
- संसर्गजन्य कुष्ठरोग जर व्यक्ती अशा रोगांपासून त्रस्त असतील तर ते या योजनेस अपात्र ठरतील.
तसेच ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जासोबत शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने त्यांच्या पूर्ण आरोग्य तपासणी केलेली आणि निरोगी असल्याचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे तरच तो व्यक्ती योजनेस पात्र ठरेल. वैद्यकीय अधिकाऱ्याकडून प्रमाणपत्र घेत असताना हे प्रमाणपत्र जास्तीत जास्त प्रवासाच्या तारखेपासून पंधरा दिवसाच्या आतील असावे तरच ते ग्राह्य धरले जाईल.
या योजनेचा लाभ घेण्याकरिता गेल्या वर्षी अशा बरेच नागरिकांनी अर्ज केले होते आणि ते या योजनेस निवडले देखील गेले होते परंतु काही कारणास्तव ते प्रवासासाठी केलेले नाही तर असे प्रवासी किंवा जेष्ठ नागरिक किंवा माजी ज्येष्ठ प्रवासी या योजनेस पात्र नसतील. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024.
हे नक्की वाचा : क्रॉप इन्शुरन्स प्रक्रिया असा करा पिक विमा क्लेम.
योजनेचा लाभ घेण्याकरिता आवश्यक कागदपत्रे
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन या योजनेचा लाभ घेण्याकरिता ज्येष्ठ नागरिकांकडे किंवा अर्जदारांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहेत, जसे की,
- सर्वप्रथम ऑनलाइन पद्धतीने अर्ज केलेल्या अर्जाची पावती.
- ज्येष्ठ नागरिकांचे आधार कार्ड किंवा राशन कार्ड
- महाराष्ट्र राज्याचे आधीवास प्रमाणपत्र (नसेल तर, शाळा सोडण्याचा दाखला, जन्म प्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र किंवा राशन कार्ड या चार पैकी कोणतीही एक ग्राह्य धरले जाईल.)
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र (2.5 लाखाच्या आत असणे आवश्यक आहे)
- जर उत्पन्नाचे प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असावे.
- वैद्यकीय प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- चालू मोबाईल क्रमांक आणि
- हमीपत्र.
इत्यादी आवश्यक ते कागदपत्रे दिलेल्या अर्जासोबत जोडावी लागते. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024.
हे नक्की वाचा : मुख्यमंत्री वयोश्री योजना वयोवृद्ध नागरिकांना मिळणार 3000 रुपये 2024
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अर्ज प्रक्रिया
मुख्यमंत्री देवदर्शन किंवा तीर्थ दर्शन या योजनेकरिता पात्र लाभार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत.
पात्र लाभार्थी खालील पद्धतीचा वापर करून त्यांचे अर्ज दाखल करू शकतो जसे की,
- मोबाईल ॲप द्वारे
- शासनाच्या अधिकृत पोर्टलच्या सहाय्याने
- सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
पात्र लाभार्थ्यांनी वरील पद्धतीच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावे लागतील जर लाभार्थ्यांना ऑनलाइन अर्ज सादर करता येत नसेल तर त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा आहे सुविधा सेतू केंद्र मध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन या योजनेमध्ये अर्ज प्रक्रिया ही पूर्णतः विनामूल्य राहणार असून याकरिता कोणताही शुल्क आकारला जाणार नाही.
या योजनेअंतर्गत एखादा प्रवासी निवडला गेला आणि तो प्रवासाला न केल्यास प्रतिक्षा यादीमध्ये व्यक्तींना या तीर्थयात्रेला पाठविले जाईल.
तीर्थयात्रेकरिता फक्त आणि फक्त निवडलेली व्यक्ती जाऊ शकेल. तसेच त्यांच्यासोबत इतर कोणत्याही व्यक्तीला घेऊन जाऊ शकणार नाही.
हे नक्की वाचा: बांधकाम कामगार नवीन अर्जदार नोंदणी प्रक्रिया
या योजनेच्या माध्यमातून जर पती आणि पत्नी या दोघांनीही ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले असतील परंतु दोघांपैकी एकाची निवड या तीर्थयात्रे करिता झाली असेल तर आयुक्त समाज कल्याण कार्यालय पुणे त्यांना किंवा तिला यात्रेवर पाठवण्याचा निर्णय घेऊ शकते.
या योजनेअंतर्गत लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या लाभार्थ्यांना हा प्रवास पूर्णतः विनामूल्य आणि मोफत असून फक्त अशा प्रवासाला प्रवासासाठी नियोजित स्थळावरती स्वतःच्या खर्चाने जावे लागेल आणि त्या पुढील सर्व खर्च हा शासनामार्फत केला जाईल.
- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने करिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तीर्थ दर्शन या योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती आल्यानंतर आपल्यासमोर एक होमपेज ओपन होईल त्या पेज वरती नवीन नोंदणी करा असे ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करा.
- नवीन नोंदणी वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक आवेदन अर्ज ओपन होईल त्यामध्ये विचारलेल्या पद्धतीने आवश्यक ती माहिती भरून घ्या.
- सर्व माहिती भरून झाल्यानंतर आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करा.
- माहिती भरून झाल्यानंतर भरलेल्या अर्जाची एक पोच पावती प्रिंट करून ठेवा.
कोणत्या मार्गाने प्रवास केला जाईल
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन या योजने करिता खालील तो लोक होते तिच्या सहाय्याने पात्र लाभार्थ्यांना तीर्थ दर्शन योजनेचा आनंद लुटता येईल जसे की,
- बसेस.
- रेल्वे
वरील दोन पद्धतीच्या सहाय्याने अर्जदार मुख्यमंत्री तीर्थ दर्शन या योजनेचा आनंद लुटू शकते.
प्रवासादरम्यान होणारा अतिरिक्त खर्च
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन या योजनेचा माध्यमातून प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना याच्या माध्यमातून प्रति व्यक्ती 30,000/- हजार रुपये पर्यंत आर्थिक मदत आणि त्यामध्ये मोफत जेवण राहणे असा सर्व गोष्टी यामध्ये फ्री राहणार आहे.
परंतु कोणत्याही प्रवाशाला त्यांच्या प्रवासादरम्यान देवस्थान आणि विभागाला ठरवून दिले सुविधा व्यतिरिक्त इतर सुविधांचा लाभ जर घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी व्यतिरिक्त आर्थिक भाराची जबाबदारी ही संबंधित प्रवाशांचीच राहील.
अशाच नव-नवीन योजनेबद्दल अधिक माहिती करिता आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.
हा ग्रुप Private ग्रुप असल्यामुळे आपला नंबर फक्त ग्रुप admin लाच दिसेल तरी निश्चिंत ग्रुप join करा.
- Agri Stack Registration Farmer ID 2025 असे बनवा शेतकरी ओळखपत्र शेतकरी आयडी
- Pik Vima New Update 2024 पिक विमा घोटाळा चौकशी
- Anudan E kyc Process अतिवृष्टी अनुदान ई केवायसी प्रक्रिया 2024
- Ladki bahin yojana status check maharashtra 2024 लाडकी बहिण योजना स्थिती
- Favarni pump Yojana Application Process 2024 मोफत फवारणी पंप योजना अर्ज करा घर बसल्या