Free JEE NEET Coaching Training for SC Students by BARTI 2024– डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे मंडळाची स्थापना दिनांक 29 डिसेंबर 1978 रोजी मुंबई येथे झालेली आहे. सन 1978 साली स्थापना झाली तेव्हा या योजनेचे नाव हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता विचार पीठ असे या योजनेचे नाव होते, आणि त्यानंतर या योजनेचे पुणे येथे नामकरण झाले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था असे नामांकरण करण्यात आले.Barti Training Program
SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी JEE आणि NEET परीक्षा मोफत प्रशिक्षण
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे अंतर्गत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी जेईई आणि नीट या प्रवेश परीक्षांचे निशुल्क अनिवासी प्रशिक्षण खाजगी प्रशिक्षण केंद्राच्या मार्फत पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, नागपूर आणि लातूर या ठिकाणी प्रत्येकी JEE 100 व NEET 100 एवढ्या जागा करिता प्रशिक्षण राबविण्यात येत आहे.
SC प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांना जे दहावी पास झालेले आहेत त्यांच्यासाठी मेडिकल आणि इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये करिअर बनविण्याची ही खूप मोठी संधी आहे.
तरी पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. Barti Training Program
Free JEE NEET Coaching Training for SC Students by BARTI पात्रता.
- सर्वप्रथम विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थी उमेदवाराकडे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा म्हणजेच एससी (SC) प्रवर्गातील दाखला असणे आवश्यक आहे.
- त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील अधिवास प्रमाणपत्र असावे.
- तसेच विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2024-2025 मध्ये इयत्ता अकरावी विज्ञान शाखेचे शिक्षण घेत असला पाहिजे.
- विद्यार्थ्यांचा कुटुंबांची वार्षिक उत्पन्न 8 लाखापर्यंत असावे. 8 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न मर्यादा असलेला उमेदवारच या प्रशिक्षणासाठी पात्र ठरेल.
- अनाथ आरक्षणाचा लाभ घेण्याकरिता उमेदवाराकडे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थी उमेदवार दिव्यांग असल्यास 40% पेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याचे प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत सादर करणे बंधनकारक राहील. Barti Training Program
हे देखील वाचा : संजय गांधी निराधार योजना 2024
बार्टी पुणे संस्थेचे ध्येय आणि उद्देश
- विविध क्षेत्रामध्ये प्रचलित असलेली सामाजिक समता याविषयी संशोधन करून सामाजिक समता तत्त्व प्रणाली समाजामध्ये जास्तीत जास्त परिणामकारक कशी होईल याबाबत संशोधन करणे.
- संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणून समता विचारपीठ चालू ठेवणे आणि विकास करणे.
- महाराष्ट्रामध्ये योग्य ठिकाणी सामाजिक समता तत्त्व प्रणालीचा अभ्यास करण्यासाठी शाखांची स्थापना करणे.
- संस्थेच्या उद्दिष्टानुसार सुकर प्रशिक्षणक्रम, संमेलन, व्याख्यान, चर्चासत्र, परिसंवाद असे इतर कार्यक्रम आयोजित करण्याचे काम हाती घेणे.
- संस्थेच्या उद्दिष्टांशी संबंधित अशी पुस्तके, नियतकालिके आणि संशोधनात्मक निबंध प्रकाशित करणे.
- संस्थेच्या उद्दिष्टानुसार प्रस्थापित झालेल्या मान्यताप्राप्त संस्था आणि संघटना यांच्याशी सहकार्य करणे तसेच त्यांच्याशी समन्वय साधने आणि त्यांना त्यांच्या कार्यामध्ये प्रोत्साहन देणे.
- पैसा आणि निधी जमा करण्यासाठी आवाहन आणि आवेदन पत्र काढणे.
- समाजाची पुन्हा शरण उद्दिष्टानुसार परितोषिके, पुरस्कार, शिष्यवृत्ती, विद्या वेतन यांना मान्यता देणे आणि त्या प्रदान करण्यात.
- सामाजिक समता या विषयाशी निगडित असे व्यावसायिक ज्ञान आणि तसेच अशा विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी तरुण व्यक्तींना सुविधा उपलब्ध करून देणे व त्यांच्या ज्ञानामध्ये समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून सर्वांगीण वाढ होईल असे प्रशिक्षण देणे. Free JEE NEET Coaching Training for SC Students by BARTI 2024.
विशेष आरक्षण
महिला 30%, दिव्यांग (PWD) 5%, अनाथ 1%, वंचित 5% (वाल्मिकी व तत्सम जाती-होणार, बेरड, मातंग, मांग, माधवी इ. करिता) जागा आरक्षित आहेत. Free JEE NEET Coaching Training for SC Students by BARTI 2024.
हे देखील वाचा : बाबासाहेब आंबेडकर विहीर अनुदान योजना
विद्यार्थी निवड प्रक्रिया
- प्रशिक्षणातील सर्व जागांसाठी प्राधान्याने इयत्ता दहावीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता निहाय उमेदवारांची निवड केली जाईल.
- यामध्ये सर्व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या अधिकृत वेबसाईट वरती अर्ज मागविण्यात येत आहेत.
- अर्ज प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांची दहावीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता तपासून विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.
प्रशिक्षणाच्या अटी आणि शर्ती
- ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 राहील.
- या प्रशिक्षणा अंतर्गत प्रशिक्षण कालावधी हा 24 महिन्यांचा राहील.
- निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना पुस्तक संचाकरिता प्रति विद्यार्थी 5000 रुपये एवढी रक्कम अदा करण्यात येईल.
- निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना प्रशिक्षणा दरम्यान 75% टक्के पेक्षा जास्त कालावधीसाठी उपस्थित राहिल्यास त्या विद्यार्थ्यांना दरमहा 6000 रुपये एवढे विद्यावेतन देण्यात येईल.
- या योजनेबाबत किंवा प्रशिक्षणाबाबत विद्यार्थ्यांना किंवा पालकांना काही वाद अथवा धोरणात्मक पेच प्रसंग निर्माण झाल्यास याबाबतचे अंतिम सर्व अधिकार मा. महासंचालक, बार्टी व शासनास राहतील.
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचा पात्र उमेदवारांसाठी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, लातूर व नागपूर या ठिकाणी जेईई आणि नीट प्रवेश परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज मागविणे बाबत जाहिरात, ही जाहिरात भारतीय अंतर्गत 13 जून 2024 रोजी काढण्यात आलेली आहे. Free JEE NEET Coaching Training for SC Students by BARTI 2024.
तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे मार्फत जेईई आणि नीट परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबविल्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. याबाबतची जाहिरात भारतीय संकेतस्थळावरती दिनांक 13 जून 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली असून विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी लिंक देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर लिंक मध्ये प्रशिक्षणासाठी अर्ज सादर करताना प्रशिक्षणाचे ठिकाण विद्यार्थ्यांना दाखल करावे लागते तसेच प्रशिक्षण केंद्राची निवड करणे हे आवश्यक आहे.
प्रशिक्षण केंद्राचे ठिकाण, प्रशिक्षण केंद्राचे नाव व प्रशिक्षण केंद्र पत्ता मंडळामार्फत देण्यात आलेला आहे. त्याबद्दल माहिती करिता खालील पीडीएफ पाहून घ्या. SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी JEE आणि NEET परीक्षा मोफत प्रशिक्षण.
विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करत असताना वरील दिलेल्या प्रमाणे नमूद प्रशिक्षण केंद्राची पाहणी करून प्रशिक्षण केंद्र निवडावे. प्रशिक्षणासाठी गुणवत्तेनुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज सादर करताना निवडलेल्या प्रशिक्षण केंद्रमार्फतच प्रशिक्षण देण्यात येईल तसेच निवड झाल्यानंतर कोणत्याही सबबीवर प्रशिक्षण केंद्र विद्यार्थ्यांना बदलून देण्यात येणार नाही अशी सक्त सूचना सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना पार्टी पुणे अंतर्गत करण्यात आलेली आहे.Barti Training Program
अर्ज प्रक्रिया
- अर्ज करण्याकरिता सर्वप्रथम संस्थेने दिलेल्या अधिकृत वेबसाईट वरती यावे लागेल.
- संस्थेचा अधिकृत वेबसाईट वरती आल्यानंतर समोर आपल्याला स्टुडन्ट बेसिक डिटेल्स (student basic details) असे ऑप्शन दिसेल. यामध्ये तुम्हाला ट्रेनिंग चे टाईप म्हणजे प्रकार विचारले जाईल जसे की तुम्ही जेईई (JEE) प्रशिक्षणासाठी अर्ज करणार आहात की नीट (NEET) च्या प्रशिक्षणाकरिता तशी माहिती टाकून घ्या.
- त्यानंतर विद्यार्थ्यांचे नाव विचारले जाईल, विद्यार्थ्यांचे नाव हे विद्यार्थ्याच्या टीसी प्रमाणे असणे आवश्यक आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांची जन्मतारीख अचूक टाकून घ्यावी.
- विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक टाकून झाल्यानंतर आपण शेड्युल कास्ट एससी (SC) मध्ये मोडता का असे विचारले जाईल तर त्यामध्ये YES Select करून घ्यावे. आणि त्यानंतर category चा प्रकार निवडून घ्या. आणि रहिवासी पत्ता माहिती टाका.Barti Training Program
- सर्व माहिती भरून झाल्यानंतर NEXT या ऑप्शनला क्लिक करून घ्यावे. आणि त्यामध्ये आपले Education Qualification बद्दल विचारलेली सर्व आवश्यक माहिती टाकून घ्यावी.
- आणि शेवटी तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करा हा ऑप्शन दिसेल त्यामध्ये आपली सर्व कागदपत्रे व्यवस्थितरीत्या स्कॅन करून अपलोड करून घ्या. आणि अर्ज दाखल करावा.
अशा पद्धतीने तुम्ही स्वतः घरबसल्या तुमच्या मोबाईलचा वापर करून या योजनेचा फायदा घेऊ शकता. अर्ज दाखल केल्यानंतर अर्ज दाखल केल्याची पावती व्यवस्थितरीत्या प्रिंट करून घ्या. आणि ही माहिती आपल्या जवळील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील. SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी JEE आणि NEET परीक्षा मोफत प्रशिक्षण
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 13 जून 2024 पासून संस्थेने दिलेल्या अधिकृत वेबसाईट वरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू आहेत तरी अर्ज दाखल करून घ्यावे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 राहील.
- Agri Stack Registration Farmer ID 2025 असे बनवा शेतकरी ओळखपत्र शेतकरी आयडी
- Pik Vima New Update 2024 पिक विमा घोटाळा चौकशी
- Anudan E kyc Process अतिवृष्टी अनुदान ई केवायसी प्रक्रिया 2024
- Ladki bahin yojana status check maharashtra 2024 लाडकी बहिण योजना स्थिती
- Favarni pump Yojana Application Process 2024 मोफत फवारणी पंप योजना अर्ज करा घर बसल्या