
Pm Kisan Yojana 17th installment 2024:– पी एम किसान योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने व तसेच राज्य शासनाने विविध योजना सुरू केले आहे त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत ही केंद्र शासनाच्या माध्यमातून दिले जाते. या योजने बद्दल संपूर्ण माहिती आपल्याला या लेखाच्या माध्यमातून मिळेल.
PM Kisan Yojana 2024 उद्दिष्ट
PM Kisan या योजनेअंतर्गत केंद्रशासनामार्फत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळून देणे आणि त्यांच्या आर्थिक परिस्थिती मध्ये शेतकऱ्यांना मदत व्हावी या साठी केंद्र सरकारने या योजनेची सुरुवात केलेली आहे.
तसेच शेतीपूरक कार्यांसाठी प्रोत्साहन देणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तसेच त्यांच्या कुटुंबांना खर्चाची तरतूद करता येईल आणि त्यांच्या जीवनमानामध्ये सुधारणा देखील करता येईल.
Pm Kisan Yojana 17th installment 2024 पी एम किसान योजनेचा 17 वा हप्ता
पी एम किसान योजनेअंतर्गत मिळणारा पुढील हप्ता हा 18 जून २०२४ रोजि दिला जाणार आहे. गेल्या 16 व्या हप्त्याप्रमाणेच या योजनेचा हाही हप्ता पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये (DBT) डीबीटीच्या मार्फत वर्ग करण्यात येईल.
श्री नरेंद्र मोडी यांनी पंतप्रधान पद स्वीकारताना पहिले काम हे शेतकऱ्यांच्या हितासाठी pm किसान योजनेच्या 17 व्या हफ्त्यासाठी निधी मंजूर करून दिलेला आहे.
पी एम किसान योजनेसाठी पात्रता.
- सर्वप्रथम शेतकरी हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
- तसेच शेतकऱ्यांकडे कमाल दोन हेक्टर जमीन असावी.
- शेतकऱ्याची जमीन ही स्वतःच्या मालकीची असवी.
- कुटुंबातील एकाच लाभार्थ्याला या योजनेचा लाभ घेता येईल.
- शेतकऱ्यांकडे स्वतःचे आधार कार्ड आणि चालू बँक खाते पुस्तक असणे आवश्यक आहे.
हे देखील वाचा : कडबा कुटी अनुदान योजना
PM Kisan Yojana Status Check Process
आता शेतकरी घरबसल्या आपल्या मोबाईल वरून त्यांच्या हप्त्याची स्थिती तपासू शकतात.स्थिती पाहण्यासाठी पी एम किसान ची अधिकृत वेबसाईटला भेट देऊन खालील दिल्याप्रमाणे पायऱ्यांचा व्यवस्थित वापर करून तुम्ही पाहू शकता.
- सर्वप्रथम पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
- या संकेतस्थळावरती आल्यानंतर Know Your Status या ऑप्शनला क्लिक करून घ्यावे.

- त्यानंतर आपल्यासमोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला आपला पीएम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर टाका असे ऑप्शन दिसेल.

- जर आपल्याकडे रजिस्ट्रेशन नंबर उपलब्ध नसेल तर त्याच पेज वरती Know your registration number या ऑप्शनला क्लिक करा.

- या पेज वरती आल्यानंतर तुमच्यासमोर दोन ऑप्शन उपलब्ध होतील जर आपल्या रजिस्ट्रेशन साठी तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर मोबाईल नंबर आणि कॅप्शन टाकून मोबाईल ओटीपी च्या साह्याने तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळू शकता.
- जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही तुमचा आधार नंबरच्या सहाय्याने आधार नंबर टाकून तुमचा रजिस्ट्रेशन नंबर शोधू शकता. रजिस्ट्रेशन नंबर मिळाल्यानंतर परत होम पेज वरती येऊन Know Your Status या ऑप्शन वरती यावे आणि मिळालेल्या रजिस्ट्रेशन नंबरच्या सहाय्याने तुम्ही तुमचे स्टेटस चेक करू शकता.
शेतकऱ्यांना मिळणारी आर्थिक मदत त्यांच्या उत्पन्नात भर घालेल आणि त्यांचा जीवनमान सुधारेल. शेतीपुरक कार्यांसाठी त्यांना चालना मिळेल. परिणामी शेतीप्रधान देशासाठी ही योजना खूपच महत्त्वपूर्ण ठरेल.
पी एम किसान योजनेअंतर्गत मिळणारे हफ्ते
पी एम किसान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6000 रुपये (सहा हजार) रक्कम प्रतिवर्षी तीन समान हप्त्यांमध्ये त्यांच्या खात्यामध्ये वर्ग केली जाते.
प्रत्येक हप्ता हा जवळपास चार महिन्यांच्या अंतराने जारी केले जातात.
पी एम किसान योजना ही केंद्र शासनामार्फत 2019 साली सुरू करण्यात आलेली होती तेव्हापासून आत्तापर्यंत शेतकऱ्यांना एकूण 16 हप्ते दिले गेलेले आहेत.
तसेच शेतकरी येणाऱ्या 17 व्या हफ्त्याची प्रतीक्षा करत आहेत.
शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा
- पी एम किसान योजनेसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करणे, बँक खाते आधार क्रमांक जोडणे या बाबींची पूर्तता योजनेचा सतरावा हप्ता वितरणापूर्वी स्वतः करून घेण्याचे मोठे आवाहन राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना केंद्र शासनामार्फत करण्यात आलेली आहे.
- तरी ज्या शेतकऱ्यांनी त्यांची ई केवायसी केलेली नसेल तसेच आपले बँक खाते आधार क्रमांकाचे संलग्न केले जर नसेल तर त्यांनी 17 वा हप्ता वितरणाच्या अगोदर हे सर्व काम करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेणेकरून आपण या योजनेस पात्र राहाल आणि या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येईल.
- ज्या शेतकऱ्यांना काही हप्ते मिळाले ले आहेत परंतु काही हप्ते मिळणे बाकी आहेत अश्या शेतकऱ्यांनी आपली खाते पोस्ट ऑफिस मध्ये तत्काळ खोलून घ्यावे जेणे करून आपण या योजनेचा लाभ घेऊ शकाल. अन्यथा आपण या योजनेस अपात्र ठराल.
तरी आपल्या संबंधातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेची माहिती देण्यात यावी जेणेकरून तेही या योजनेपासून वंचित राहणार नाही.
- Pradhan Mantri Gramin Awaas Yojana Self Survey प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना (टप्पा 2) सेल्फ सर्वे 2025.
- Bandhkam Kamgar Education Scheme 2025. बांधकाम कामगार शैक्षणिक योजना संपूर्ण माहिती
- sbi clerk mains admit card download link 2025.
- How to Create Free Ghibli Style AI Images Using ChatGPT तुमच्या फोटोंना जिबली style मध्ये बनवा फक्त 2 मिनिटामध्ये.
- Hindu Nav Varsh 2025 हिंदू नव वर्ष