Crop Insurance Application Process : क्रॉप इन्शुरन्स प्रक्रिया 2024.

Crop Insurance Application Process 2024– प्रधानमंत्री फसल बीमा योजना 2024 करिता आपल्या पिकाचे नुकसान भरपाई करण्याकरिता सर्व शेतकऱ्यांना यापुढे क्रॉप इन्शुरन्स नावाच्या एप्लीकेशन वरती जाऊन आपल्या पिकाचे नुकसान झाल्याबद्दल तक्रार करावी लागणार आहे.

Crop Insurance Application Process

आजच्या या लेखामध्ये आपण प्रधानमंत्री फसल बीमा योजना मध्ये शेतकऱ्यांनी भरलेला पिक विमा क्लेम कसा करावा याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

तर सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोर वरून क्रॉप इन्शुरन्स या नावाची मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यावी लागेल. क्रॉप इन्शुरन्स एप्लीकेशन ची लिंक खाली दिलेली आहे या लिंकच्या सहाय्याने तुम्ही एप्लीकेशन डाउनलोड करू शकता. Crop Insurance Application Process

मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड झाल्यानंतर एप्लीकेशन ओपन करून घ्या. एप्लीकेशन ओपन झाल्यानंतर आपल्यासमोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये विविध ऑप्शन दिसतील जसे की,

  • शेतकरी म्हणून नोंदणी करा
  • पॉलिसी साठी प्रवेश करा
  • नोंदणी शिवाय काम सुरू ठेवा आणि
  • भाषा बदला

हे नक्की वाचा : अशी करा ई पिक पाहणी घरबसल्या 2024.

शेतकरी म्हणून नोंदणी करा

शेतकरी म्हणून नोंदणी करा या पर्यायाचा उपयोग आपल्याला आपण जेव्हा प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत नवीन अर्ज दाखल करायचा असेल तेव्हा तुम्ही शेतकरी म्हणून नोंदणी करा या पर्यायाचा वापर करून अर्ज करू शकता.

पॉलिसी साठी प्रवेश करा

पॉलिसी साठी प्रवेश करा या पर्यायाच्या माध्यमातून आपण या अगोदर भरलेल्या पिक विमा बद्दल माहिती देऊ शकतो आणि सद्यस्थिती तपासू शकतो त्याकरिता आपल्याकडे विमा भरत असताना नोंदणी केलेल्या मोबाईल नंबर ची आवश्यकता असेल. Crop Insurance Application Process

नोंदणी शिवाय काम सुरू ठेवा

शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री पिक विमा क्लेम करण्याकरिता जी विम्याची तक्रार करायची आहे ही तक्रार आपण नोंदणी शिवाय काम सुरू ठेवा या पर्यायाच्या सहाय्याने सहजरित्या करू शकतो.

Crop Insurance
Crop Insurance

क्रॉप इन्शुरन्स क्लेम करण्याकरिता नोंदणी शिवाय काम सुरू ठेवा या पर्यायावर क्लिक करून घ्या. Crop Insurance Application Process

अधिकृत वेबसाईटयेथे पहा
संपर्क क्रमांक011-23381092
महिलान करिता Private Whatsapp ग्रुपयेथे जॉईन करा

या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये विविध ऑप्शन दिसतील जसे की,

  • विमा पॉलिसी ची सद्यस्थिती-या पर्यायाच्या माध्यमातून आपण भरलेल्या विम्याची सद्यस्थिती किंवा स्टेटस पाहू शकतो.
  • विमा हप्त्या बद्दल जाणून घ्या-या पर्यायाच्या माध्यमातून आपल्याला पिक विमा भरण्याकरिता शेतकऱ्यांना भरावयाची असलेली रक्कम तसेच शासनाकडून भरले जाणारी रक्कम याबद्दल माहिती मिळेल, तसेच आपण निवडलेल्या पिकाबद्दल विमा संरक्षित रक्कम किती मिळणार आहे याबद्दल आपल्याला या ठिकाणी माहिती मिळते.
  • शंका समाधान– या पर्यायाच्या माध्यमातून शेतकरी वर्गांना किंवा नागरिकांना प्रधानमंत्री पिक विमा योजना बद्दल काही शंका किंवा प्रश्न असतील तर या ठिकाणी त्या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत त्याबद्दल तुम्ही या ठिकाणी अधिक माहिती घेऊ शकता.
  • मदत केंद्र-या ठिकाणी शेतकरी वर्ग हा पिक विमा कंपनीसोबत काही प्रश्न किंवा तक्रारी  किंवा अडचणी असतील तर त्याकरिता थेट कंपनी सोबत संवाद साधू शकतात, आणि आपल्या शंकांचे निराकरण करू शकतात. याकरिता येथे कंपनीचा दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे.
  • पीक नुकसान – पीक नुकसान याच पर्यायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या झालेल्या पिकाच्या नुकसान बद्दल तक्रार कंपनीकडे करायचे आहे. पिकाची झालेली नुकसान कशा पद्धतीने करायची याबद्दल माहिती आपण घेऊ.

हे नक्की वाचा : मुख्यमंत्री योजना दुत भरती 2024 असा करा अर्ज

पिक विमा क्लेम कसा करावा?

क्रॉप इन्शुरन्स एप्लीकेशन ओपन केल्यानंतर सर्वप्रथम वरती सांगितल्याप्रमाणे नोंदणी शिवाय काम सुरू ठेवा या पर्यायाला क्लिक करून घ्या आणि त्यानंतर पीक नुकसान असे पर्याय आपल्या समोर दिसेल त्या पर्यायाला क्लिक करा.

या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर खाली दिलेल्या पद्धतीने एक पेज ओपन होईल त्यामध्ये दोन पर्याय दिसतील जसे की,

  • पीक नुकसानीची पूर्व सूचना आणि
  • पीक नुकसान सद्य स्थिती

पीक नुकसान सद्यस्थिती

पिक नुकसान सद्यस्थिती या पर्यायाचा माध्यमातून तुम्ही केलेल्या पिक नुकसान भरपाई च्या तक्रारीची स्थिती तपासू शकता. Crop Insurance Application Process

पीक नुकसानीची पूर्व सूचना

आपल्या पिकाच्या झालेल्या नुकसानीची तक्रार करण्याकरिता या पर्यायाचा उपयोग करून आपण तक्रार करू शकतो.

या पर्यायाला क्लिक केल्यानंतर आपल्या सोबत त्यामध्ये तुमचा चालू मोबाईल क्रमांक टाकून घ्या. आणि ओटीपी पाठवा यावर क्लिक करा त्यानंतर मोबाईल क्रमांकावर एक सहा अंकी ओटिपी पाठविला जाईल तो ओटीपी प्रविष्ट करा.

हे नक्की वाचा: बांधकाम कामगार नवीन अर्जदार नोंदणी प्रक्रिया

त्यानंतर आपल्या मोबाईल क्रमांकाची पडताळणी होईल आणि आपल्यासमोर आणखीन एक पेज ओपन होईल त्यामध्ये विविध माहिती विचारली जाईल जसे की,

  • हंगाम-यामध्ये तुम्ही करत असलेल्या पीक विम्याचा हंगाम जसे की खरीप किंवा रब्बी निवडून घ्या. सध्या आपण खरीप पिक विमा बद्दल तक्रार करणार आहोत. त्यामुळे येथे खरीप निवडत आहोत.
  • वर्ष-या ठिकाणी 2024 निवडून घ्या.
  • योजना- या ठिकाणी प्रधानमंत्री फसल विमा योजना हा पर्याय निवडावा.
  • राज्य- येथे महाराष्ट्र आणि 

निवडा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आणखीन एक पेज ओपन होईल त्यामध्ये, पिक विमा बद्दल माहिती विचारत आहे जसे की,

  • नोंदणीचा प्रकार – म्हणजे आपण भरलेला पिक विमा हा कोठे भरलेला आहे जसे की, Csc सेंटर, बँक किंवा वैयक्तिक स्वतः भरलेला आहे असे विचारले जाईल त्या ठिकाणी योग्य ती माहिती भरून घ्या.

त्यानंतर आपण भरलेल्या पीक विमा अर्ज किंवा पॉलिसी क्रमांक आपल्याकडे आहे का असे विचारले जाईल जर आपल्याकडे असेल तर होय करा अन्यथा इतर पर्याय निवडा यावरती क्लिक करू शकता.

अर्ज किंवा पॉलिसी क्रमांक या ठिकाणी आपल्या पावती वरती असलेला पॉलिसी क्रमांक टाकून घ्या आणि यशस्वी या ऑप्शनला क्लिक करा त्यानंतर पण भरलेल्या पॉलिसी बद्दल माहिती ओपन होईल ती माहिती आपलीच आहे का याबद्दल खात्री करून घ्या.

हे नक्की वाचा :  ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना OBC विद्यार्थ्यांना मिळणार 60,000/- रुपये तत्काळ अर्ज करा

तुमचा पॉलिसी क्रमांक टाकल्यानंतर आपल्यासमोर पिक विमा बद्दल सर्व माहिती आपल्याला दिसेल त्यामध्ये,

  • शेतकऱ्याचे नाव
  • शेतकऱ्याचा जिल्हा
  • खाते क्रमांक
  • शेतकऱ्यांनी भरलेली वीमा रक्कम
  • आणि भरलेल्या पिकांचा तपशील सर्व माहिती येथे पाहायला मिळेल सर्व माहिती तुम्ही व्यवस्थित एकदा पडताळून घ्या.

माहिती पडताळून झाल्यानंतर खालच्या बाजूला तुम्ही भरलेल्या पिकाबद्दल माहिती दिसेल त्यापैकी तुम्हाला तुम्ही भरलेल्या पिकापैकी ज्या पिकाची नुकसान झालेली तक्रार कंपनीकडे करायची असेल त्या पिकाला सिलेक्ट करून घ्या.

पीक निवडल्यानंतर विचारले जाईल की, तुमच्या पिकाचे नुकसान कोणत्या कारणाने झालेले आहे जसे की,

  • दुष्काळामुळे
  • अतिवृष्टीमुळे
  • शेतामध्ये अनियंत्रित आग लागल्यामुळे
  • महापूर
  • गारपीट झाल्यामुळे
  • पेस्ट अटॅक
  • नदीच्या प्रवाहामुळे पिकाचे नुकसान झाले असेल तर
  • वारे वादळ झा
  • अवकाळी पाऊस आणि
  • हवेच्या वेगाने आपल्या पिकाचे जर नुकसान झाले असेल तर आपण यापैकी पर्याय निवडू शकता आणि आपल्या झालेल्या पिकाच्या नुकसानी बाबत तक्रार करू शकता. Crop Insurance Application Process

पिकाचे नुकसान झालेल्या घटनेचे प्रकार निवडल्यानंतर आपल्या पिकाची नुकसान कोणत्या तारखेला घडलेली आहे घडलेल्या घटनेचा दिनांक आपल्याला टाकावा लागेल आणि हा दिनांक टाकत असताना आपल्या पिकाची नुकसान ही 72 तासाच्या आत कंपनीकडे दाखल करावी जेणेकरून आपल्या तक्रारीची पुढील प्रक्रिया कंपनीमार्फत होईल.

त्यानंतर

  • घटनेच्या वेळेस पीक वाढीचा टप्पा – या ठिकाणी पिकाची अवस्था टाकावी लागेल जसे की पिक स्टॅंडिंग अवस्थेमध्ये आहे, हार्वेस्टेट आहे किंवा पीक काढून टाकलेले आहे. तयापैकी सद्यस्थितीमध्ये स्टॅंडिंग क्रॉप हा पर्याय निवडा.
  • पिकाच्या नुकसानीची टक्केवारी- या ठिकाणी आपल्या पिकाची किती प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे ते टाका. जसे की, 50% किंवा त्या अधिक.
  • शेरा आणि फोटो व्हिडिओ -या ठिकाणी आपल्या पिकाच्या नुकसानी बद्दल कंपनीला अधिक काही सांगायचे असेल तर शेरा च्या ठिकाणी तुम्ही तुमचे मत लिहू शकता.

हे देखील वाचा : मोफत फवारणी पंप योजना अर्ज करा घर बसल्या

  • पिकाचे फोटो आणि व्हिडिओ या ठिकाणी आपल्या पिकाचे झालेले नुकसानी बद्दल एक फोटो आणि जर उपलब्ध असेल तर व्हिडिओ अपलोड करून घ्या. फोटो आणि व्हिडिओ अपलोड करत असताना पिकाचे नुकसान झालेले आहे असे दिसेल या पद्धतीने फोटो आणि व्हिडिओ अपलोड करा.
  • वरील प्रमाणे सांगितलेली माहिती व्यवस्थितरित्या भरून झाल्यानंतर आपण भरलेली माहिती पुन्हा एकदा पडताळणी करून पहा आणि शेवटी जतन करून घ्या आपली माहिती जतन केल्यानंतर तुम्हाला एक टॉकेट क्रमांक या आयडीच्या माध्यमातून आपण केलेल्या तक्रारीची सद्यस्थिती किंवा स्टेटस चेक करू शकतो.

तर अशा पद्धतीने सर्व शेतकरी वर्ग वरील दिलेल्या पद्धतीचा व्यवस्थितरित्या वापर करून सांगितलेल्या पद्धतीने  आपण भरलेल्या प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत आपल्या पिकाचे जर नुकसान झाले असेल तर विमा क्लेम करू शकता. आणि आपल्या पिकाच्या नुकसानी ची भरपाई कंपनी कडून करू शकता.

तर अशाच विविध माहितीकरिता आणि अपडेट्स करिता तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी नवीन अपडेट्स आणि शेतकरी योजना शासकीय योजना याबद्दल अधिक माहिती मिळेल.

हा ग्रुप Private ग्रुप असल्यामुळे आपला नंबर फक्त ग्रुप admin लाच दिसेल तरी निश्चिंत ग्रुप join करा.

Leave a Comment