![Savitribai Fule Aadhar Yojana](https://mahayojana.in/wp-content/uploads/2024/07/28.png)
Savitribai Fule Aadhar Yojana 2024– महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग अंतर्गत इतर मागास वर्गीय विद्यार्थ्यांकरिता एक नवीन योजना महाराष्ट्र शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना असे या योजनेचे नाव असून, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ही एक अत्यंत महत्त्वाची आणि एक नाविन्यपूर्ण योजना आहे. या योजनेबद्दल माहिती, तसेच या योजनेचे फायदे आणि विद्यार्थ्यांची पात्रता याबद्दल सर्व माहिती आपण पाहूया.
सावित्रीबाई फुले आधार योजना थोडक्यात माहिती.
सावित्रीबाई फुले आधार योजना या अंतर्गत वस्तीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी अनुदान देण्याकरिता राबविण्यात येणाऱ्या आदिवासी विकास विभागाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम व सामाजिक कल्याण विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार या योजनाच्या धरतीवरती इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेस मंत्रिमंडळाने दिनांक 19 ऑक्टोंबर 2023 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिलेली आहे.
Savitribai Fule Aadhar Yojana अंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणारा लाभ.
सावित्रीबाई फुले आधार योजना 2024 अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना वस्तीगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांकरिता-
निर्वाह भत्ता, स्वाधार, स्वयं अशा विविध प्रकारच्या योजनांमध्ये तसेच यापुढे प्रस्तावित करण्यात येणाऱ्या योजनांमध्ये एक समानता राहावी याकरिता सर्व कष्ट धोरण निश्चित करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.
आदिवासी विकास विभागाची स्वयं योजना व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वाधार योजनेचा धरतीवरती इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति जिल्हा 600 याप्रमाणे एकूण 21,600 एवढ्या विद्यार्थ्यांकरिता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे.
सावित्रीबाई फुले आधार योजना 2024 अंतर्गत विद्यार्थ्यांना
- भोजन
- निवास आणि
- इतर शैक्षणिक सुविधा
स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी खालील प्रमाणे निश्चित केलेल्या नुसार विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम डीबीटीच्या सहाय्याने वितरित करण्यात येणार आहे.
अ.क | खर्चाची बाबी | मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी रक्कम | इतर महसुली विभागीय शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी रक्कम | इतर जिल्ह्याचे ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी रक्कम | तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी रक्कम |
1 | भोजन भत्ता | 32000/- | 28,000/- | 25000/- | 23000/- |
2 | निवास भत्ता | 20000/- | 15000/- | 12000/- | 10000/- |
3 | निर्वाह भत्ता | 8000/- | 8000/- | 6000/- | 5000/- |
प्रती विध्यार्थी ऐकून वार्षिक संभाव्य खर्च | 60,000/- | 51,000/- | 43,000/- | 38,000/- |
सावित्रीबाई फुले आधार योजने अंतकरिता 100 कोटी इतक्या वार्षिक खर्चाची मान्यता देण्यात आलेली आहे.
हे नक्की वाचा : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्ज प्रक्रिया 2024
आवश्यक पात्रता
- सर्वप्रथम विद्यार्थी वस्तीग्रह प्रवेशास पात्र असणे आवश्यक आहे.
- तसेच विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- सक्षम प्राधिक कार्यालय दिलेला इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचा जातीचा दाखला विद्यार्थ्याकडे असणे बंधनकारक आहे.
- दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक यांचे 40% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
- अनाथ प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना महिला व बालकल्याण विभागाकडील सक्षम प्राधिकार्याचे अनाथ प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
- विद्यार्थ्यांचा पालकाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख पेक्षा जास्त नसावे. तसेच केंद्रशासनामार्फत ज्या ज्या वेळी मॅट्रिक इतर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादित वाढ होऊन त्यानुसार या योजनेसाठी पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू राहील.
- सावित्रीबाई फुले आधार योजना या योजनेचा लाभ घेण्याकरिता विद्यार्थ्यांनी स्वतःचा आधार क्रमांक आपले राष्ट्रीयकृत बँक खात्याशी लिंक करणे बंधनकारक आहे.
- विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवासी नसावा.
शासन निर्णय जीआर | येथे पहा |
महिलांसाठी Private Group | Join Free |
आधिकारिक वेबसाइट | mahadbt.maharashtra.gov.in |
हेल्पलाइन नं. | 022-491-50800 |
शैक्षणिक पात्रता
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना चा लाभ घेण्याकरिता विद्यार्थ्यांनी खालील पात्रता धारण करणे आवश्यक आहे-
- लाभार्थी विद्यार्थी बारावी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा.
- व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यास सदर योजनेसाठी अर्ज करताना कमीत कमी 60% किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन असणे आवश्यक आहे.
- या योजनेअंतर्गत एकूण प्रवेश संख्येचा 70 % जागा या व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता असतील आणि 30 % जागा बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता आहेत.
- व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार त्या संबंधित प्रवर्गातून प्रवेश दिला जाईल, तसेच इयत्ता बारावीच्या गुणांच्या टक्केवारीनुसार देखील प्रवेश दिला जाईल.
- निवड झालेला विद्यार्थी हा संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र असेल.
- अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, अखिल भारतीय वैद्यकीय परिषद, भारतीय फार्मसी परिषद, वास्तु कला परिषद, राज्य शासन किंवा तत्सम संस्था इत्यादी मार्फत मान्यताप्राप्त महाविद्यालयात किंवा संस्थेमध्ये व मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांस प्रवेश मिळालेला असेल तरच या योजनेचा लाभ त्या विद्यार्थ्यांना घेता येईल.
- एका शाखेची पदवी किंवा पदवी तर अभ्यासक्रमासाठी जर विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असेल तर पुन्हा त्यांना इतर शाखेच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरिता विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन उपस्थिती किमान 75 टक्के असणे बंधनकारक आहे.
- या योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लावास पात्र राहतील मात्र विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी त्या त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य असेल.
हे नक्की वाचा: Ayushman Bharat Card Apply आयुष्मान भारत योजना 2024.
इतर आवश्यक बाबी
- या योजनेचा लाभ फक्त 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यास देण्यात येईल.
- तसेच एका विद्यार्थ्यास जास्तीत जास्त पाच वर्ष सदर योजनेचा लाभ घेता येईल.(इंजिनिअरिंग किंवा वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी ए क वर्ष अधिक म्हणजेच 6 वर्षाचा कालावधी राहील)
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे वय हे जास्तीत जास्त 30 वर्ष च्या आत असावे.
- जर शिक्षणात खंड पडला असेल तर असा विद्यार्थी देखील सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत लाभास पात्र असेल परंतु वयाची अट किंवा वयोमर्यादेपेक्षा अधिक वयाचा विद्यार्थी न सावा.
- शिक्षण चालू असताना जर पात्र विद्यार्थी आणि उत्तीर्ण झालास तर अनुत्तीर्ण कालावधीमध्ये योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार नाही. उत्तीर्ण झाल्यानंतर असा विद्यार्थी लाभास पुढे पात्र ग्राह्य धरला जाईल.
- सदरील योजनेचा लाभ विद्यार्थ्यास पाच वर्षाचा कालावधी पुरताच घेता येतो याचा विचार करता उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण असे दोन्ही कालावधीची गणना करून विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
हे नक्की वाचा : Free Tab Yojana for OBC Students By Mahajyoti मोफत टॅब योजना 2024
योजनेअंतर्गत निश्चित केलेले आरक्षण
सामाजिक प्रवर्ग | सदर योजने अंतर्गत दिले जाणारे आरक्षण |
इतर मागास प्रवर्ग | 59 |
विमुक्त जाती व भटक्या जमाती | 34 |
विशेष मागास प्रवर्ग | 6 |
अनाथ | 1 |
एकुण | 100 |
या योजनेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 4 टक्के समांतर आरक्षण किंवा शासन वेळोवेळी निर्धारित करेल त्याप्रमाणे दिव्यांग व्यक्तींकरिता आरक्षण देण्यात येईल.
तसेच महिलांसाठी 30 टक्के समांतर आरक्षण आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- विद्यार्थी भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र असणे आवश्यक आहे. (नोटरी)
- स्वयंघोषणा पत्र (जसे की विद्यार्थ्यांनी दिलेली माहिती खरी आणि अचूक आहे)
- कोणत्याही शासकीय वस्तीगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतची शपथपत्र.
- भाड्याने राहत असल्याबाबतचे भाडे चिठ्ठी व भाडे करार पत्र किंवा करारनामा.
- महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा.
अनुदानाचे वितरण प्रणाली
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वार्षिकी दिले जाणारे लाभ याबद्दल सर्व माहिती खालील प्रमाणे आहे.
हप्ता | त्रेमासिक कालावधी | रक्कम जमा करण्याचा कालावधी |
पहिला हप्ता | जून ते ऑगस्ट दरम्यान. | ज्या दिवशी विद्यार्थ्याचा/विद्यार्थिनीचा ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मंजूर होईल, त्यानंतर सात दिवसांमध्ये. |
दुसरा हप्ता | सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान. | ऑगस्ट चा दुसरा आठवडा |
तिसरा हप्ता | डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यात | नोव्हेंबर चा दुसरा आठवडा |
चौथा हप्ता | मार्च ते मे महिन्यादरम्यान | फेब्रुवारी चा दुसरा आठवडा. |
अर्ज प्रक्रिया
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024 या योजने मध्ये विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी OFFLINE पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहेत.
योजनेकिरता करावयाचा अर्जाचा नमुना डाऊनलोड करा
वरील अर्जाचा नमुना व्यवस्तीत रित्या भरून आपल्या जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयामध्ये आपला अर्ज दाखल करावा लागणार आहे,
अर्ज दाखल केल्या नंतर आपल्या अर्जाचे Verification झाल्या नंतर विध्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम DBT च्या माध्यमातून वर्ग केली जाईल.
अशाच नव-नवीन योजनेबद्दल अधिक माहिती करिता आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.
हा ग्रुप private ग्रुप असल्यामुळे आपला नंबर फक्त ग्रुप admin लाच दिसेल तरी निश्चिंत ग्रुप join करा.
- Agri Stack Registration Farmer ID 2025 असे बनवा शेतकरी ओळखपत्र शेतकरी आयडी
- Pik Vima New Update 2024 पिक विमा घोटाळा चौकशी
- Anudan E kyc Process अतिवृष्टी अनुदान ई केवायसी प्रक्रिया 2024
- Ladki bahin yojana status check maharashtra 2024 लाडकी बहिण योजना स्थिती
- Favarni pump Yojana Application Process 2024 मोफत फवारणी पंप योजना अर्ज करा घर बसल्या