Annabhau Sathe karj Yojana 2024- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने स्थापन करण्यात आलेले हे एक मातंग समाजासाठी लेखणीतून सामाजिक प्रगतीला खऱ्या अर्थाने प्रेरणा देणारे महामंडळ आहे. ही महाराष्ट्र शासनाने मातंग समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मातंग समाजातील व्यक्तींना कर्ज, शिष्यवृत्ती, आणि आर्थिक सहाय्य पुरवून त्यांना स्वावलंबी बनवण्याचे कार्य करते.
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत कोणकोणत्या जातीमधील तरुणांना या योजनेचा लाभ मिळणार आहे?
अण्णाभाऊ साठे यांचे योगदान लक्षात घेऊन हे महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. या मंडळाचे उद्दिष्ट म्हणजे गरजू व्यक्तींना योग्य आर्थिक आधार प्रदान करणे. मातंग समाजातील विविध उपजातींना या योजनेचा लाभ मिळू शकतो, जसे की:
- मातंग
- गारुडी
- मदारी
- मडगी /मडीगा
- मागणी मंग
- मंग महाशी
- मिनी मेडिंग
- डंखनी मांग
- राधे मांग
- मंग गारुडी
इत्यादी पोट जातीमधील तरुणांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ योजना मातंग समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक, आणि सामाजिक उन्नतीसाठी कार्यरत आहे. कर्ज योजना
हे नक्की वाचा : अशी करा ई पिक पाहणी घरबसल्या 2024.
Annabhau Sathe karj Yojana काय आहे?
ही योजना महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्य रेषेखालील मातंग आणि तत्सम समुदायांचे जीवनमान उंचवण्यासाठी त्यांना त्यांच्या शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक विकासात मदत करण्यासाठी त्यांना सन्मानाने स्थान देण्याच्या उद्देशाने या महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे.
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. जी की मातंग समाजासाठी आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना देण्यासाठी राबवण्यात येते समाजातील वंचित आणि गरजू नागरिकांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी या योजनेअंतर्गत विविध योजना राबवल्या जातात. Annabhau Sathe karj Yojana 2024
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Whatsapp ग्रुप ला जॉईन करा | येथे क्लिक करा |
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ योजनेअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या योजना
- विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजना (SCA)
- बीज भांडवल योजना (Margin Money)
- शिष्यवृत्ती योजना (Scholership Schemes)
- National scheduled caste finance and development corporation scheme (NSFDC)
या सर्व योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊया.कर्ज योजना
हे देखील वाचा :वसंतराव नाईक बिनव्याजी कर्ज योजना 2024
1. विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजना (SCA)
अनुदान योजना
विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजना या अंतर्गत प्रकल्प मर्यादा ही 50 हजार रुपये पर्यंत गुंतवणूक असलेल्या कर्ज प्रकरणात अनुदान देण्यात येते.
या अंतर्गत प्रकल्प खर्चाचा 50% किंवा दहा हजार यापैकी जे कमी असेल ते अनुदान विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजनेअंतर्गत देण्यात येते. Annabhau Sathe karj Yojana 2024
बँक कर्ज–
अनुदानाची रक्कम वगळून बाकीची सर्व रक्कम ही बँकेचे कर्ज असते. तसेच या कर्जावरती बँकेच्या दराप्रमाणे व्याज आकारणी होत असते.
कर्जाची परतफेड ही 36 ते 60 मासिक हफत्याची असते. कर्ज योजना
प्रशिक्षण योजना (ट्रेनिंग स्कीम)
खाजगी आणि शासनमान्य तांत्रिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना प्रशिक्षणार्थी देण्यात येतात.
प्रशिक्षणाचा कालावधी हा 6 ते 12 महिन्याचा राहतो. Annabhau Sathe karj Yojana 2024
हे देखील वाचा : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना विध्यार्थ्यांना मिळणार वार्षिक 60,000/- रुपये
संस्थेची फीस
- संगणक प्रशिक्षणासाठी प्रति प्रशिक्षणार्थीसाठी एकूण प्रशिक्षण कालावधी करिता 3500 रुपये.
- व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षणाच्या एकूण कालावधीची फीस 2500 रुपये.
- ब्युटी पार्लर प्रशिक्षणाच्या एकूण कालावधीची फीस 3500 रुपये फिस राहील. कर्ज योजना
फी व्यतिरिक्त विद्यावेतन
प्रशिक्षणार्थी जर राहत असलेल्या ठिकाणीच प्रशिक्षण घेत असेल तर त्यास प्रति महा 150 रुपये.
तसेच महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या आणि प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थीस 250 रुपये.
प्रशिक्षणार्थी राहत असलेल्या खेड्यात किंवा शहरा व्यतिरिक्त अन्य खेड्यात किंवा शहरात प्रशिक्षण घेत असल्यास प्रतिमहा 300 रुपये. कर्ज योजना
2. बीज भांडवल योजना (margin money)
प्रकल्प मर्यादा
बीज भांडवल या योजनेअंतर्गत दिली जाणारी प्रकल्प मर्यादा ही 50,001 ते 7,00000 रुपये पर्यंत राहील.
बँक कर्ज –
बीज भांडवल योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कर्ज रक्कम म्हणजेच 50001 ते 700000 च्या रकमेवर 10000 रुपये अनुदानित रक्कम वगळता उर्वरित सर्व रक्कम ही खालील प्रमाणे विभागली गेलेली आहे-
- अर्जदाराचा सहभाग हा 5% राहील
- महामंडळाचे कर्ज 20% (अनुदानित 10,000 रुपया सहित)
- 75 टक्के बँकेचे कर्ज.
हे देखील वाचा : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्ज प्रक्रिया
परतफेड –
बीज भांडवल या योजने अंतर्गत कर्जाची परतफेड ही बँकेच्या व्याजासह बँकेकडे करावयाची असून महामंडळाची कर्ज हे दसादशे चार टक्के व्याजासह महामंडळाकडे परत करावे लागनार आहे. अण्णाभाऊ साठे कर्ज योजना..
शिष्यवृत्ती योजना (Scholarship Scheme)
अण्णाभाऊ साठे महामंडळामार्फत विद्यार्थ्यांना देखील शालेय शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती योजना ही दहावी ते पदवीपर्यंत तसेच अभियांत्रिकी आणि वैद्यकीय पदवी करत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता स्कॉलरशिप दिली जाते.
पात्रता –
शालेय शिक्षणाकरिता स्कॉलरशिप चा लाभ घेण्याकरिता मातंग समाजातील 10 दहावी,12 वी , पदवी व पदविका अभियांत्रिकी आणि वैद्यकीय परीक्षेत कमीत कमी 60% किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना जिल्हा निहाय गुणवत्तेच्या आधारावर पात्र केले जाते आणि शिष्यवृत्ती उपलब्ध असलेल्या एकूण रक्कमेपर्यंत एक वेळ बक्षीस म्हणून विद्यार्थ्यांना दिली जाते. अण्णाभाऊ साठे कर्ज योजना..
शिष्यवृत्ती –
- 10 वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना 1000 रुपये
- 12 वी शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना 1,500 रुपये
- पदवी व पदविका शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना 2,000
- वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना 2500 रुपये. कर्ज योजना
हे देखील वाचा :बांधकाम कामगार योजना नवीन नोंदणी 2024
टीप –
लाभार्थ्याने कर्ज प्रस्ताव स्वतः महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात दाखल करावा. त्यासाठी महामंडळाने कोणतेही मध्यस्थ नेमलेले नाहीत.
अण्णाभाऊ साठे कर्ज योजना आवश्यक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- रेशन कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र तहसीलचे
- कोटेशन (ज्या व्यवसायासाठी कर्ज घ्यायचे आहे त्या व्यवसायात साठी)
- पासपोर्ट साईज फोटो.
अण्णाभाऊ साठे कर्ज योजना अर्ज प्रक्रिया
या कर्जासाठी आपण दोन पद्धतीने अप्लाय करू शकतो ते म्हणजे एक ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धतीने
ऑफलाइन पद्धतीने
सर तुम्हाला अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यांच्या मुख्य वेबसाईट वरती जाऊन अर्जाचा नमुना डाऊनलोड करून घ्यावा लागेल अर्ज डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही या अधिकृत वेबसाईटची मदत घेऊ शकता https://www.slasdc.org/ कर्ज योजना
अर्ज डाऊनलोड केल्यानंतर वरील दिलेल्या सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या फॉर्म ला जोडून जिल्हा कार्यालयाच्या ठिकाणी सादर करावेत.
अण्णाभाऊ साठे कर्ज योजना ऑनलाईन अर्ज
अधिकृत वेबसाइट:
- तुम्ही https://www.slasdc.org/ या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाईन अर्ज करू शकता.
- आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करून अर्ज सादर करा व अर्जाची प्रत घ्या. अण्णाभाऊ साठे कर्ज योजना..
अर्ज प्रक्रियेतील टप्पे:
- अर्ज जमा करणे
- अर्जाची छाननी
- पात्रतेची तपासणी
- कर्ज/अनुदान मंजुरी
- कर्ज/अनुदान वितरण
अर्ज प्रक्रियेसाठी लागणारा वेळ:
- अर्ज प्रक्रियेसाठी लागणारा वेळ योजनेनुसार आणि जिल्हा कार्यालयाच्या कार्यक्षमतेनुसार बदलू शकतो.
- सामान्यतः, अर्ज मंजूर होण्यासाठी 15 ते 30 दिवस लागतात. अण्णाभाऊ साठे कर्ज योजना..
वरील सर्व योजना अण्णाभाऊ साठे महामंडळा मार्फत राबविल्या जातात जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल, तर त्वरित अर्ज करा आणि समाजातील इतरांना देखील ही माहिती शेअर करा.
अधिक माहितीसाठी Mahayojana.in वर भेट द्या आणि सरकारी योजनांचा लाभ घ्या. अशाच नव-नवीन योजनेबद्दल अधिक माहिती करिता आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.
हा ग्रुप Private ग्रुप असल्यामुळे आपला नंबर फक्त ग्रुप admin लाच दिसेल तरी निश्चिंत ग्रुप join करा.
- Agri Stack Registration Farmer ID 2025 असे बनवा शेतकरी ओळखपत्र शेतकरी आयडी
- Pik Vima New Update 2024 पिक विमा घोटाळा चौकशी
- Anudan E kyc Process अतिवृष्टी अनुदान ई केवायसी प्रक्रिया 2024
- Ladki bahin yojana status check maharashtra 2024 लाडकी बहिण योजना स्थिती
- Favarni pump Yojana Application Process 2024 मोफत फवारणी पंप योजना अर्ज करा घर बसल्या
मला शेली कराचय
शेली पालन कराया
तुम्हाला देखील भेटेल
ऑनलाईन सुरु करा म्हणजे दलला पासून गोर गरिबाला लाभ मिळेल.
🐐 शेळी पालन करण्यासाठी पाहिजे