PM Kisan Tractor Yojana 2024:ट्रॅक्टर अनुदान योजना.

PM Kisan Tractor Yojana
PM Kisan Tractor Yojana

PM Kisan Tractor Yojana 2024

PM Kisan Tractor Yojana उद्देश

  • राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना 2024 द्वारे शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करून अधिक नफा कमवता यावा यासाठी या योजनेद्वारे उपकरणे खरेदी करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाते.
  • शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे
  • विभागनिहाय पीक रचनेनुसार आवश्यक असलेली व पूर्व तपासणी केलेली दर्जेदार प्रतीची कृषी अवजारे खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून देणे.
  • शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुरूप व मागणीप्रमाणे कृषी यंत्रसामग्री किंवा अवजारे उत्पादने अनुदानावर उपलब्ध करून देणे.
  • कृषी उत्पादक प्रक्रियेत अद्ययावत यंत्रसामग्रीच्या वापरासाठी प्रोत्साहित करणे.

ट्रॅक्टर अनुदान योजना मिळणारे अनुदान

  • शासन निर्णयाप्रमाणे घोषित केल्यानुसार ट्रॅक्टर साठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक आणि महिला लाभार्थींना किमतीच्या 50% किंवा रुपये 1 लाख 25 हजार यापैकी कमी असेल ते आणि इतर लाभार्थ्यांना किमतीच्या 40% किंवा रुपये एक लाख यापैकी कमी असेल ते याप्रमाणे अनुदान अनुदेय राहील.
  • इतर अवजारासाठी कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाच्या केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या उच्चतम मर्यादा किंवा संबंधित अवजाराचे किमतीची निर्धारित टक्केवारी यापैकी कमी असेल ते यानुसार अनुदान देय राहील.
  • अर्ज केल्यानंतर महाडीबीटी पोर्टलवर निवड झालेल्या अवजारासाठी कमाल अनुदान मर्यादा दर्शविण्यात येत असते परंतु मोका तपासणीचे वेळी संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांनी प्रत्यक्ष देवकाचे आधारे अनुदानाची गणना करून शिफारस केली जाते.
  • महाडीबीटी पोर्टल वर निवड झालेल्या अवजाराचे संदर्भात कमी किंवा जास्त क्षमतेच्या त्याच अवजाराची खरेदी करण्यास शेतकऱ्यांना मुभा राहील तथापि जास्त क्षमतेच्या आजारासाठी अनुदान मर्यादा ही मूळ निवड झालेल्या अवजारा प्रमाणेच राहील आणि कमी क्षमतेच्या अवजारासाठी अनुदानाची गणना ही प्रत्यक्ष खरेदी केलेला अवजाराचे क्षमतेनुसारच करावे.
  • तसेच ट्रॅक्टर किंवा पावर टिलर चरित अवजाराच्या बाबतीत महाडीबीटी पोर्टलवर निवड झालेली HP श्रेणी विचारात न घेता संबंधित अवजाराच्या तपासणी अहवालामध्ये दर्शविल्यानुसार आवश्यक असलेली HP क्षमता विचारात घ्यावी व त्याप्रमाणे अनुदानाची परिगणना करावी. एकाच अवजारासाठी वेगवेगळ्या एचपी श्रेणी मधून वेगवेगळे अनुदान जाणार नाही याची दक्षता घ्यावी.

राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत विविध कृषी अवजारांसाठी मिळणारे अनुदान सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा…..

पात्रता

  • शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे बंधनकारक आहे.
  • तसेच सातबारा उतारा व आठ उतारा असावा.
  • फक्त एकच अवजारासाठी अनुदान देय राहील म्हणजे ट्रॅक्टर किंवा यंत्र अवजार.
  • लाभार्थ्यांनी जातीचा दाखला सादर करणे बंधन कारक आहे. (अर्ज कास्ट मधून केला असेल तर.)
  • शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न दीड लाखाच्या आत असावे.
  • उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधन कारक आहे.
  • शेतकऱ्याच्या नावावर जमीन धारणा 0.40 हे. ते 6 हे. च्य्या आत असणे बंधन कारक आहे.
  • शेतकऱ्यांनी एखाद्या घटकासाठी/अवजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/अवजारासाठी पुढील दहा वर्ष अर्ज करता येणार नाही परंतु इतर अवजारासाठी अर्ज करता येईल.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

  • सर्वप्रथम शेतकऱ्यांकडे आधार कार्ड असले पाहिजे.
  • बँकेचे पासबुक
  • पॅन कार्ड
  • कास्ट सर्टिफिकेट/ जातीचे प्रमाणपत्र.
  • चालू सातबारा
  • 8a उतारा
  • उत्पन प्रमाणपत्र
  • अपंग असल्यास प्रमाणपत्र
  • खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
  • पूर्वसंमती पत्र.

वरील सर्व कागदपत्र व्यवस्तीत रित्या स्कॅन (Scan) करून अर्जा सोबत अपलोड करून घ्यावीत.

लाभार्थी निवडीनंतर करावयाची कार्यपद्धती

लाभार्थीची निवड पूर्ण झाल्यानंतर सदर लाभार्थ्यास पुढील अटी व शर्ती मान्य करण्याचे अधीन राहून तालुका कृषी अधिकारी हे पूर्वसंमती प्रदान करतात.

  • स्थापन करावयाच्या अवजारे बँकेद्वारे शेती व्यवसायाशी निगडित कामे करणे बंधनकारक राहील. इतर प्रकारच्या व्यापारी किंवा व्यवसायासाठी या सुविधेचा लाभ घेता येणार नाही.
  • संबंधित अर्जदाराकडे कृषी यांत्रिकीकरण सेवा सुविधा पुरविण्यासाठी आवश्यक अनुभव, प्रशिक्षित, अनुभवी व पुरेसे मनुष्यबळ असणे बंधनकारक राहील. तसेच सदर यंत्रसामग्री व उपकरणे सुरक्षित व सुस्थितीत ठेवण्यासाठी आवश्यक जागा व शेडची व्यवस्था असणे बंधनकारक राहील.
  • लाभधारकाने कृषी यांत्रिकीकरण सेवा सुविधा शेतकऱ्यांना पुरविल्याबाबत आवश्यक अभिलेख ठेवणे व त्याचा नियमित अहवाल सादर करणे बंधनकारक राहील. तसेच याबाबत तपासणीच्या वेळी सर्व यंत्रसामग्री किंवा उपकरणे व अभिलेख ठेवणे व त्याचा नियमित अहवाल सादर करणे बंधनकारक राहील. तसेच याबाबत तपासणीच्या वेळी सर्व यंत्रसामग्री व उपकरणे व अभिलेख सादर करणे बंधनकारक राहील.
  • सदर यंत्रसामुग्री व उपकरणे यांची आवश्यकतेनुसार परिवहन विभागाकडे नोंदणी, विमा, कर भरण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित लाभधारकांची राहील.
  • २५ लाखावरील खरेदीचा कृषी अवजारे बँकेच्या अनुदानासाठी प्रस्ताव बँक कर्ज प्रकरणाद्वारे सादर करणे आवश्यक असेल.

या योजनेतून खालील दिलेल्या कृषि यंत्र / अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येईल:

1)ट्रॅक्टर
२) पॉवर टिलर
३) ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे
४) बैल चलित यंत्र/अवजारे
५) मनुष्य चलित यंत्र/अवजारे
६) प्रक्रिया संच
७) काढणी पश्च्यात तंत्रज्ञान
८) फलोत्पादन यंत्र/अवजारे
९) वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
१०) स्वयं चलित यंत्रे

अर्ज प्रक्रिया

  • जर तुमच्याकडे लॅपटॉप किंवा PC असेल तर आपण या योजनेसाठी घरबसल्या अर्ज करू शकता.जर नसेल तर जवळील CSC सेंटर ला भेट देऊन अर्ज करू शकता.
  • सर्वप्रथम MahaDBT Farmer Scheme या योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
  • या योजनेच्या होम पेज वरती आल्या नंतर आपल्या समोर नवीन अर्जदार नोंदणी व अर्जदार लॉगइन असे दोन पर्याय दिसतील.
  • जर आपण या योजने अंतर्गत अगोदर नोंदणी केली असेल तर वापरकर्ता आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करू शकता अन्यथा नवीन अर्जदार नोंदणी पर्याया वरती जाऊन नोंदणी करून घ्या.
  • नोंदणी करत असताना अर्जदाराचे नाव टाकून घ्यावे नाव हे आधार कार्ड नुसार टाकावे.
  • त्यानंतर वापरकर्ता आयडी टाकावा व तुम्हाला वाटेल तसं पासवर्ड टाकून चालू mob नंबर टाकून OTP मिळवा वरती क्लिक करून OTP पडताळून घ्या व नोंदणी करून घ्यावे.
  • अर्जदार नोंदणी झाल्या नंतर लॉगिन करून घ्यावे लॉग इन केल्यानंतर आधार प्रमाणीकरण करून घ्यावे त्यामध्ये आधार कार्ड क्रमांक टाकून आधार ला लिंक असलेल्या मोबाईल वरती आलेला ओटीपी टाकून आधार व्हेरिफिकेशन करून घ्यावे.
  • आधार वेरिफिकेशन झाल्यानंतर परत अर्जदार लॉगिन करून घ्यावे. लॉगिन केल्यानंतर आपल्यासमोर महाडीबीटी चे मुख्य प्रश्न दिसेल त्यामध्ये वैयक्तिक तपशील या पर्यायाला क्लिक करून विचारली गेली सर्व माहिती व्यवस्थित रित्या टाकून घ्यावी.
  • वैयक्तिक तपशील यामध्ये अर्जदाराची वर्गवारी व्यवस्थित रित्या टाकावी व जात प्रमाणपत्र असेल तर होय करावे किंवा नाही करावे.
  • या योजनेसाठी SC प्रवर्गातील शेतकरी लाभ घेऊ शकतात.त्यासाठी जात प्रमाणपत्र नसेल तर काढून घ्यावे. व नंतर अर्ज करावा.
  • त्यानंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न टाकावे व अर्जदारास किंवा शेतकऱ्यास कोणते अपंग असेल तर अपंगाचा प्रकार निवडून घ्यावा.
  • त्यानंतर अर्जदाराचे बँक खाते क्रमांक व आयएफसी कोड प्रविष्ट करावा जर आपले खाते जनधन असेल तर एस करावे अन्यथा नाही या बटणावर क्लिक करून जतन करून घ्यावे.
  • वैयक्तिक तपशील माहिती भरल्यानंतर पुढील टॅब ओपन करावा व त्यामध्ये शेतकऱ्याचा कायमचा पत्ता व पत्र व्यवहाराचा पत्ता व्यवस्थित टाका व नंतर शेतजमिनीचा तपशील हा पर्याय ओपन होईल त्यामध्ये शेतकऱ्याच्या जमिनीबद्दल माहिती टाकून द्यावी जसे की कोणत्या जिल्ह्यामध्ये जमील आहे त्यानंतर तालुका व गाव एवढी माहिती टाकल्यानंतर आपल्या 8a उतारा वरती 8a चा खाते क्रमांक असतो तो टाकून घ्यावा व त्यानंतर शेतकऱ्याच्या नावावरती एकूण किती जमीन आहे ते हेक्टर आणि आर च्या स्वरूपामध्ये टाकून घ्यावे.
  • जर शेतकऱ्याच्या नावावरती एकापेक्षा अधिक गटांमध्ये जमीन असेल तर सेपरेट सेपरेट सर्वे क्रमांक किंवा गट क्रमांक टाकून त्या गटामधील क्षेत्र हेक्टर आर या प्रमाणामध्ये टाकून घ्यावे व माहिती जतन करून घ्यावी.
  • जर शेतकऱ्यांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत शासनाने जमीन वाटप केलेली असेल तर YES करावे अन्यथा नाही या ऑप्शनवर क्लिक करून जमिनीचा तपशील जतन करून घ्यावा.
  • जतन केल्या नंतर मुख्य पेज वरती आल्या नंतर इतर माहिती प्रविष्ट करा या पर्यायावरती येऊन शेतात असलेल्या सिंचन स्त्रोताचा तपशील दाखल करून घ्यावा, नसेल तर कोणताही स्त्रोत उपलब्ध नाही असे भरून जतन करून घ्यावे.
Tractor Yojana 2024
Tractor Yojana
  • जतन केल्या नंतर परत मुख्य प्रष्टावरती येऊन अर्ज करा या पर्यायावर यावे.
Tractor Yojana
Tractor Yojana
  • त्यानंतर कृषी यांत्रिकीकरण योजना निवडून घ्यावे आणि ट्रॅक्टर योजना हा पर्याय निवडा आणि विचारल्या प्रमाणे सर्व माहिती टाकून घ्या व जतन करा.

अशा पद्धतीने तुम्ही कृषी यांत्रिकीकरण ट्रॅक्टर या योजना साठी अर्ज करू शकता व अनुदानाचा लाभ घेऊ शकता.

अर्ज शुल्क

अर्ज शुल्क:- अर्ज सादर करतेवेळी शेतकऱ्यांनी रु. २०/- शुल्क व रु. ३.६०/- जी.एस.टी. मिळून एकूण रु.२३.६०/- शुल्क ऑनलाईन भरावा लागणार आहे.

अशा पद्धतीने वरील पायऱ्यांचा व्यवस्थितरित्या वापर करून सहज रित्या राज्य कृषी यांत्रिकीकरण ट्रॅक्टर या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता व 50% पर्यंत अनुदान मिळऊ शकता.

तुमचे फॉर्म सबमिट झाल्यानंतर 25 ते 30 दिवसाच्या नंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम थेट डीबीटी/ DBT च्या मार्फत मिळून जाईल. तरी या योजनेचा सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा व गरजूवंता पर्यंत ही माहिती शेअर करा.

धन्यवाद !

Leave a Comment