10th Class Result Date Maharashtra-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या नि कालाची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी यासंदर्भातील घोषणा परिपत्रकाद्वारे केली आहे. त्यानुसार येत्या सोमवारी म्हणजेच 27 मे म्हणजेच उद्या दुपारी ठीक एक वाजता ऑनलाईन पद्धतीने दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांची निकालाबाबतची उत्सुकता आता संपुष्टात येणार आहे. बारावीचा निकाल 21 मे रोजी जाहीर करण्यात आला होता. त्याच दिवशी दहावीचा निकाल 27 मे रोजी जाहीर होणार असल्याची चर्चा होती.
10th Class Result Date 2024
दहावी ला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या
महाराष्ट्र राज्ज्या मध्ये 2023-2024 या साली दहावीच्या परीक्षेसाठी 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे लागले आहे. दहावीच्या निकालावर विद्यार्थ्यांच्या भविष्याची भावी वाटचाली अवलंबून असल्यामुळे दहावीच्या परीक्षेला विशेष महत्त्व दिले जाते.
विद्यार्थी दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाईन पद्धतीने आपला निकाल खाली दिलेल्या लिंक च्या सहाय्याने स्वतः मोबाईल मध्ये पाहू शकतात.
या संकेतस्थळाच्या सहाय्याने पहा 10th Exam रिझल्ट
विद्यार्थी मित्रांनो दहावीच्या परीक्षेचा निकाल हा खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवरून तुम्हाला पाहता येईल.
- http://mahresult.nic.in/
- http://sscresult.mkcl.org/
- http://results.digilocker.gov.in/
- http://www.tv9marathi.com/
दहावीनंतर पुढील प्रवेशाची प्रक्रिया सुरू होणार-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उद्या 27 मेला निकाल जाहीर केल्यानंतर दहावी नंतरच्या प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धतीने प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. दहावीचा निकाल झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी लगेचच अर्ज करावा लागणार आहे.
निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे कॉलेज आणि विषय निवडी बरोबरच भविष्यातील करिअरची दिशा ठरवावी लागणार आहे. तसेच अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना योग्य निर्णय घेणे ही गरजेचे असते, त्यामुळे सर्व पुढील प्रक्रिया ही आता दहावीच्या निकालानंतरच किंवा मिळणाऱ्या गुणवत्तेवर विद्यार्थ्यांची पुढील वाटचाल सुरू असेल.