
Ladki Bahin Yojana Form Online Apply 2024 -मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. या योजने करिता आवश्यक असणारी कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया तसेच अर्ज करण्याकरिता आवश्यक असणारे हमीपत्र डाऊनलोड करण्याची लिंक याबद्दल सर्व माहिती दिलेली आहे.
Ladki Bahin Yojana Form Online Apply आवश्यक कागदपत्रे
- लाभार्थी महिलेकडे त्यांचे आधार कार्ड असणे बंधनकारक आहे.
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला अथवा केशरी किंवा पिवळे राशन कार्ड आवश्यक आहे. (या सर्वा पैकी एक)
- सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या कुटुंबप्रमुखांचे वार्षिक उत्पन्नाचा दाखला.(राशन कार्ड नसेल तर)
- राष्ट्रीयकृत बँकेचे चालू पासबुक आधारशी लिंक असणे आवश्यक.
- लाभार्थीचे पासपोर्ट साईज फोटो.
- सदर योजनेच्या अटी आणि शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र आवश्यक आहे.
इत्यादी कागदपत्रे अर्ज करण्याकरिता महिलांकडे असणे आवश्यक आहे. Ladki Bahin Yojana Form Online Apply
अर्ज सुरू होण्याची तारीख
या योजनेत सहभाग घेण्याकरिता लाभार्थ्यांना
दिनांक 1 जुलै 2024 पासून अर्ज करण्याकरिता सुरुवात करण्यात आली आहे व
अंतिम दिनांक ऑगस्ट 2024 हा असेल.
अर्ज सुरुवात | 1 जुलै 2024 |
अंतिम दिनांक | ऑगस्ट 2024 |
अधिक माहितीसाठी जीआर GR पाहू शकता
अर्ज प्रक्रिया
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे सुरू झालेले आहे. तरी आपण माझी लाडकी बहिण या योजनेसाठी घरी बसल्या देखील अर्ज दाखल करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता. ऑनलाइन पद्धतीने आणि घरी बसल्या अर्ज करण्याकरिता खाली दिलेल्या प्रमाणे सर्व माहिती व्यवस्थित रित्या वाचून आणि दिलेल्या माहितीचा योग्यरित्या वापर करून तुम्ही सोप्या पद्धतीने अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.
- माझी लाडकी बहीण या योजने करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज साठी सर्वप्रथम तुम्हाला नारीशक्ती दूत हे मोबाईल ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईल वरती गुगल प्ले स्टोअर ने डाउनलोड करून घ्यावे लागेल. नारीशक्ती दूत या ॲप्लिकेशनची लिंक सुद्धा खाली दिलेली आहे त्या लिंक वरनं तुम्ही एप्लीकेशन डाउनलोड करू शकता. Ladki Bahin Yojana Form Online Apply

वरती दिलेल्या एप्लीकेशनच्या लिंक च्या सहाय्याने तुम्ही एप्लीकेशन डाउनलोड करून घ्या. एप्लीकेशन डाउनलोड केल्यानंतर आपल्यासमोर वरती दिल्याप्रमाणे एंटर मोबाईल नंबर (Enter Mobile Number) असे ऑप्शन दिसेल, त्यामध्ये तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक टाकून ओटीपी च्या साह्याने एप्लीकेशन लॉगिन करून घ्यावे.
लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर प्रोफाइल अपूर्ण आहे असे एक पेज दिसेल त्या मध्ये आपली माहिती भरा या ऑप्शनला क्लिक करून तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती भरून घ्यावी.
वैयक्तिक माहिती भरत असताना तुम्हाला तुमचे पूर्ण नाव आधार प्रमाणे टाकून घ्यावे आणि जर तुमच्याकडे तुमचा ईमेल आयडी उपलब्ध असेल तर ईमेल आयडी टाकून घ्या. तसेच जिल्हा आणि तालुका निवडा, त्यानंतर आपल्यासमोर नारीशक्ती चा प्रकार निवडा जसे की,
सामान्य महिला हे ऑप्शन जर तुम्ही वैयक्तिकरित्या तुम्ही स्वतःचे अर्ज करीत असाल तरच निवडावे.
तसेच
- बचत गट अध्यक्ष,
- बचत गट सदस्य,
- बचत गट सचिव,
- समूह संसाधन व्यक्ती (सीआरपी),
- गृहिणी
- अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस
- ग्रामसेवक
- वार्ड अधिकारी आणि
- सेतू सुविधा चालक. हे सर्व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये महिलांचे अर्ज दाखल करू शकतात.
सर्व माहिती भरून झाल्यानंतर अपडेट करा या ऑप्शन वरती क्लिक करून आपली सर्व माहिती अपडेट करून घ्यावी.

तसेच माहिती अपडेट केल्यानंतर आपल्यासमोर आपली प्रोफाईल ओपन होईल त्यामध्ये आपले नाव मोबाईल नंबर आणि नारीशक्ती प्रकार हे सर्व माहिती व्यवस्थित रित्या तपासून घ्यावी आणि जर काही त्रुटी असेल किंवा चुकली असेल तर तुम्ही प्रोफाइल अपडेट करा या ऑप्शनचा उपयोग करून आपली प्रोफाइल अपडेट करू शकता.
सर्व माहिती झाल्यानंतर तुम्हाला माझी लाडकी बहीण या योजनेकरिता हमीपत्र आणि योजना पीडीएफ अर्ज डाऊनलोड करण्यासाठी योजना या पर्यायावरती क्लिक करून आपल्यासमोर खाली दिलेल्या फोटो प्रमाणे पेज ओपन होईल त्यामधील हमीपत्र डाऊनलोड करून घ्या आणि हमीपत्र व्यवस्थित रित्या भरून आपल्या मोबाईल मध्ये स्कॅन करून ठेवा.

वरील प्रमाणे सर्व माहिती भरून झाल्यानंतर आता तुम्हाला लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करता येईल.
अर्ज करण्याकरिता सर्वप्रथम खाली दिलेल्या फोटो प्रमाणे एक नंबरच्या ऑप्शन म्हणजे नारीशक्ती दूत या ऑप्शन वरती क्लिक करून घ्या त्यानंतर आपल्यासमोर खाली दिलेल्या प्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असे एक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून घ्यावे.
या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज ओपन होईल त्यामध्ये विचारलेल्या पद्धतीने सर्व माहिती व्यवस्थितरित्या आणि अचूक पद्धतीने काळजीपूर्वक दाखल करून घ्यावी.
अर्ज करत असताना खालील बाबी काळजीपूर्वक टाकून घ्यावे जसे की,
- अर्जदार म्हणजेच महिलेचे नाव हे त्यांच्या आधार कार्ड वरील नावाप्रमाणे असणे बंधनकारक आहे.
- त्यानंतर महिलेच्या पतीचे नाव, महिलेची जन्मतारीख ही आधार प्रमाणे असावी. तसेच महिलेचे वय पात्रतेप्रमाणे 21 वर्षे ते 65 वर्ष च्या दरम्यान असावे.
- त्यानंतर महिलेचा पत्ता देखील आधार प्रमाणे असावा.
- अर्ज करत असताना महिलेचा चालू मोबाईल नंबर देण्यात यावा जेणेकरून अर्ज प्रिंट करत असताना त्या मोबाईल वरती ओटीपी पाठवला जातो आणि त्यानंतरच आपला अर्ज दाखल होतो आणि आपल्याला अर्जाची पावती मिळते.
- तसेच महिला शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत आहेत का? असे विचारले जाईल त्यामध्ये जर तुम्ही तर कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल तर येस करावे अन्यथा नाही सिलेक्ट करून पुढे जावे.
- महिलांची विवाहित स्थिती सिलेक्ट करावी लागेल जसे की विवाहित/विधवा/निराधार किंवा घटस्फोटीत असेल तर असे सिलेक्ट करून घ्या.
हे नक्की वाचा: रब्बी पिक विमा 2023 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा आपले नाव तपासा.
- त्यानंतर अत्यंत महत्त्वाचे म्हणजे की, महिलेच्या बँक खात्याचा तपशील अत्यंत काळजीपूर्वक आणि बिनचूक टाकावे लागेल जसे की बँक के चे नाव, बँक पासबुक प्रमाणे लाभार्थ्याचे नाव, बँकेचा आयएफसी कोड आणि बँक खाते क्रमांक ही सर्व माहिती काळजीपूर्वक टाकून द्या.
- बँकेचा तपशील टाकल्यानंतर तुम्हाला तुमचे बँक खाते आधार सीडिंग झालेले आहे की नाही विचारेल त्याला येस करून घ्या.
- महिलेचे बँक खाते आधारशी सीडिंग झालेले आहे की नाही हे चेक करण्याकरिता तुम्हाला आधारच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन महिलेचे आधार लॉगिन करून घ्यावे लागेल आणि त्यामध्ये आधार बँक सिडीग असे ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचे बँक खाते आधारशी मॅपिंग झालेले आहे की नाही याचे करू शकता आणि जर झालेला असेल तर कोणत्या बँकापैकी लिंक आहे हे पण तुम्हाला तेथे दाखवले जाईल.
- बँकेचा तपशील टाकून झाल्यानंतर आता तुम्हाला आवश्यक ते कागदपत्र जोडून घ्यावे लागेल.
- कागदपत्रे जोडत असताना सर्व कागदपत्रे जसे की, महिलेचे आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, बँकेचे पासबुक आणि हमीपत्र सर्व कागदपत्रे मोबाईल मध्ये व्यवस्थित रित्या स्कॅन करून घ्या आणि विचारलेल्या पद्धतीने आवश्यक त्याचा की अपलोड करून द्या.
- कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर तुम्हाला महिलेचा फोटो विचारला जाईल त्यामध्ये जर महिला समोर असेल तर Live फोटो घ्यावा किंवा आपल्या मोबाईल मध्ये पासपोर्ट फोटो अपलोड करा.
सर्व माहिती भरून झाल्यानंतर शेवटी आपण भरलेल्या अर्जाची माहिती एकदा चेक करून घ्या आणि सबमिट करा.
त्यानंतर आपण केलेल्या अर्जाची पावती जपून ठेवा.

या योजनेबद्दल अधिक माहिती करिता जसे कि, अर्ज केल्या नंतर पुढील प्रक्रिया– अर्ज कोठे जमा करावा आणि अशाच नव-नवीन योजनेबद्दल अधिक माहिती करिता आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.
हा ग्रुप private ग्रुप असल्यामुळे आपला नंबर फक्त ग्रुप admin लाच दिसेल तरी निश्चिंत ग्रुप join करा.
- E pik Pahani 2025 Last date शेतकरी स्तरावरील ई-पिक पाहणीसाठी मुदतवाढ 🌾
- Nano Banana Trend 2025: The Viral 3D Figurine Craze
- Namo Shetkari Yojana 7 th installment Date नमो शेतकरी महासन्मान निधी योजना – ७ वा हप्ता या दिवशी जमा होणार नमो शेतकरी योजना
- Bandhkam Kamgar Scholership Yojana 2025 बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना लाभ
- Bandhkam Kamgar Pension Yojana 2025 बांधकाम कामगारांना मिळणार 12,000 रुपयांची पेन्शन
Mu.po.warni ta sirur kasar dist.beed