
Aadhar Card Update– आधार कार्ड हे भारत सरकारद्वारे भारतातील नागरिकांना जारी केलेले ओळखपत्र आहे. त्यावर १२ अंकी अद्वितीय क्रमांक छापलेला आहे जो भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) जारी केला आहे.हा क्रमांक भारतात कुठेही व्यक्तीची ओळख आणि पत्त्याचा पुरावा असेल. आधार कार्ड आता प्रत्येक गोष्टीसाठी अत्यावश्यक बनले आहे. ओळखीसाठी सर्वत्र आधार कार्ड मागितले जाते.
Aadhar Card Update आधार कार्ड अपडेट
- तुम्ही तुमचे आधार कार्ड ऑनलाइन आणि ऑफलाइन अपडेट करू शकता. किंवा हरवलेले आधार कार्ड तुम्ही पूर्णपणे मिळवू शकता. हे डाउनलोड केलेले आधार कार्ड पूर्णपणे वैध असेल.
- ज्या व्यक्तींनी त्यांचा वैध मोबाईल क्रमांक आधारसोबत नोंदवला आहे तेच ते ऑनलाइन अपडेट करू शकतील. ऑनलाइन व्यवहार OTP प्रमाणीकृत असल्याने, आधारसह तुमचा मोबाइल क्रमांक नोंदणीकृत करणे अनिवार्य झाले आहे.
आधार कार्डचे फायदे:-
- आधार क्रमांकामुळे तुम्ही बँकिंग, मोबाईल फोन कनेक्शन आणि सरकारी आणि गैर-सरकारी सेवांच्या सुविधांचा लाभ घेऊ शकाल.
- आधार क्रमांक ही प्रत्येक व्यक्तीची आयुष्यभराची ओळख असते.
- आधार कार्ड हे ऑनलाइन पद्धतीद्वारे परवडणारे आणि सहज पडताळण्यायोग्य आहे.
- सरकारी आणि खाजगी डेटाबेसमधून मोठ्या प्रमाणात डुप्लिकेट आणि बनावट ओळख काढून टाकण्याचा एक अनोखा आणि ठोस प्रयत्न चालू असतो.
- यादृच्छिकपणे व्युत्पन्न केलेली संख्या जी जात, पंथ, धर्म किंवा भौगोलिक क्षेत्र इत्यादींच्या कोणत्याही वर्गीकरणावर आधारित नाही.
आधार कार्ड ची गरज आणि वापर
आधार कार्ड आता प्रत्येक गोष्टीसाठी आवश्यक झाले आहे. ओळखीसाठी सर्वत्र आधार कार्ड मागितले जाते. आधार कार्डचे महत्त्व वाढवत Gov. Of. इंडिया ने मोठे निर्णय घेतले आहेत ज्यामध्ये तुमच्याकडे जर आधार कार्ड नसेल तर काम करणे कठीण होईल.
- जन धन खाते उघडण्यासाठी.
- पासपोर्ट काढण्यासाठी आधार अनिवार्य करण्यात आला आहे.
- एलपीजी सबसिडी मिळवण्यासाठी.
- ट्रेन तिकिटांवर सूट मिळवण्यासाठी.
- मुलांना शाळेत प्रवेश देण्यासाठी.
- डिजिटल जीवन प्रमाणपत्रासाठी आधार आवश्यक आहे.
- आधार कार्डाशिवाय भविष्य निर्वाह निधी मिळणार नाही.
- डिजिटल लॉकरसाठी आधार आवश्यक आहे
- मालमत्ता नोंदणीसाठी ही आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.
- विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्तीही आधार कार्डद्वारे त्यांच्या बँकेत जमा केली जाईल.
- सिम कार्ड खरेदी करण्यासाठी.
- तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्राप्तिकर परतावा जसे की गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज.
- वयाचे प्रमाण
- बँकिंग
- मोबाइल फोन कनेक्शन
- सरकारी आणि गैर-सरकारी सेवांसाठी
- सब्सिडी, लाभ आणि सेवा वितरणासाठी
- प्रोपर्टी रेजिटेरन्ससाठी.
अशा बऱ्याच योजने साठी अपडेटेड आधार कार्ड आवश्यक आहे तर आपण घरबसल्या आधार कार्ड वरील पत्ता दुरुस्ती करू शकतो त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे.
सध्या आपण फक्त आधार कार्ड वरील पत्ता दुरुस्ती करू शकतो. नाव, जन्म तारीख,लिंग बदलणे हे साध्य स्थितीत बंद आह्रे.नाव व जन्म तारीख बदलणे लवकरच सुरु होईल.
आधार अपडेट साठी आवश्यक कागदपत्रे.
- सरपंच किंवा ग्रामसेवक यांचे UIDAI ने जरी केलेले Standard सर्टिफिकेट हे ग्रामीण भागामध्ये आपल्याला सुलभ रित्या उपलब्ध असणारा पुरावा आहे. (Standard सर्टिफिकेट Download करण्यासाठी दिलेल्या लिंक ला क्लीक करा pdf मधील ११ पेज)
- Printed National Bank Passbook
- lite Bill
- Gas Passbook
- Ration Card Or E- Ration Card.
- मतदान ओळखपत्र
या पैकी कोणतेही एक कागदपत्र असेल तरी हि आपण आपले आधार कार्ड घरबसल्या दुरुस्ती करू शकता.
ऑनलाइन अपडेट प्रोसेस
सर्व प्रथम आधार कार्ड दुरुस्ती करण्यासाठी आपल्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. मोबाईल नंबर लिंक असेल तरच आपण आपले आधार कार्ड स्वतः दुरुस्ती करू शकतो. जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर आपण गावातील पोस्टमन शी संपर्क साधून मोबाईल लिंक करू शकता.
- पत्ता बदलण्या साठी सर्व प्रथम UIDAI च्या OFFICIAL वेबसाईट वरती या. व User Login यावरती क्लिक करून घ्या.

- त्यानंतर १२ अंकी आधार कार्ड नंबर टाकून OTP ने login करून घ्या.

- व पुढे Dashboard ओपन होईल त्यामधील Address Update या पर्याया वरती क्लिक करून घ्यावे व विचारलेली आवश्यक माहिती दाखल करून घ्यावी.

- व शेवटी रहिवासी पुरावा व्यवस्तीत रित्या scan करून फक्त PDF फॉरमॅट मध्ये अपलोड करून घ्यावे. व माहिती जतन करावी.
- कागदपत्र जोडल्या नंतर चलन भरण्यासाठी दिसेल त्यामध्ये ५० रुपयाचे चलन भरून पावती जतन करावी व फक्त २४ तासाच्या आत आपले आधार कार्ड उपडेट होईल.
- Maha DBT Farmer Scheme New Update 2025. महा डीबीटी शेतकरी योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती महाराष्ट्र शासन कृषी विभाग
- ABHA Card download Application Process 2025. आभा कार्ड डाउनलोड
- Ladki Bahin Yojana new update 2025. लाडकी बहीण योजना अंगणवाडीसेविका येणार घरी होणार तपासणी
- AP Post Bharti First Merit List 2025. भारतीय डाक विभागाच्या ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीची पहिली मेरिट लिस्ट जाहीर.
- Nashik Arogya Vibhag Bharti 2025. नाशिक आरोग्य विभाग भरती – विविध पदांची भरती