Majhi Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024

Majhi Ladki Bahin Yojana
Majhi Ladki Bahin Yojana

Majhi Ladki Bahin Yojana 2024 – महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या पोस्टमध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच त्यांचे आरोग्य आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यास नव्याने मान्यता दिलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिलांना 1500 रुपये प्रत्येक महिन्याला आर्थिक सहाय्य म्हणून दिले जाणार आहे.

माझी लाडकी बहीण योजना पात्रता

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी खालील पात्रता पाहून घ्या

  • सर्वप्रथम महिलाही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • ही योजना फक्त महिलांकरिता असेल.
  • राज्यातील विवाहित, विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटीत तसेच निराधार महिला या योजनेस पात्र राहतील व त्यांना या योजनेचा लाभ देखील घेता येईल.
  • या योजनेत सहभागी होण्याकरिता महिलांना किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व जास्तीत जास्त वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ घेता येईल.
  • योजनेचा लाभ घेण्याकरिता महिलांकडे अर्ज करण्यासाठी बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • तसेच लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. Majhi Ladki Bahin Yojana

योजनेचा लाभ घेण्याकरिता आवश्यक कागदपत्रे

  • लाभार्थी महिलेकडे त्यांचे आधार कार्ड असणे बंधनकारक आहे.
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला अथवा केशरी किंवा पिवळे राशन कार्ड आवश्यक आहे. (या सर्वा पैकी एक)
  • सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या कुटुंबप्रमुखांचे वार्षिक उत्पन्नाचा दाखला.(राशन कार्ड नसेल तर)
  • राष्ट्रीयकृत बँकेचे चालू पासबुक आधारशी लिंक असणे आवश्यक.
  • लाभार्थीचे पासपोर्ट साईज फोटो.
  • सदर योजनेच्या अटी आणि शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र आवश्यक आहे.

इत्यादी कागदपत्रे अर्ज करण्याकरिता महिलांकडे असणे आवश्यक आहे. Majhi Ladki Bahin Yojana

अर्ज सुरू होण्याची तारीख

या योजनेत सहभाग घेण्याकरिता लाभार्थ्यांना

दिनांक 1 जुलै 2024 पासून अर्ज करण्याकरिता सुरुवात करण्यात येणार आहे व

अंतिम दिनांक ऑगस्ट 2024 हा असेल.

अर्ज सुरुवात1 जुलै 2024
अंतिम दिनांकऑगस्ट 2024

अधिक माहितीसाठी जीआर GR पाहू शकता

अधिक माहितीसाठी जीआर GR पाहू शकता येथे पहा
महिलांसाठी Private GroupJoin Free

मिळणारा लाभ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अंतर्गत प्रत्येक पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यात दरमहा रुपये 1500/- ही रक्कम दिली जाणार आहे.

तसेच राज्य/केंद्र शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रुपये 1500/-पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे महिलेस देण्यात येईल.

या योजनेद्वारे महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश

  • महाराष्ट्र राज्यातील महिलांना व तसेच मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.
  • तसेच महाराष्ट्र राज्यातील महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवणे.
  • महिलांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे.
  • महाराष्ट्र राज्यातील महिलांना तसेच मुलींना सशक्ति करनास चालना निर्माण करून देणे.
  • महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषक स्थितीत सुधारणा करणे.

हे नक्की वाचा: विधवा पेन्शन योजना 2024.

Majhi Ladki Bahin Yojana स्वरूप

महिलांनी त्यांच्या वयाच्या पात्रता कालावधीमध्ये प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण केला जाणार आहे म्हणजेच पीएम किसान योजने प्रमाणे थेट डीबीटी ( DBT-Direct Benefit Transfer) च्या माध्यमातून महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. दरमहा 1500 रुपये एवढी रक्कम जमा करण्यात येईल.

तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या इतर आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे जर 1500 पेक्षा कमी लाभ महिला घेत असेल तर यांच्या फरकाची रक्कम सुद्धा या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल.योजनेचा लाभ कोण घेऊ शकत नाही. Majhi Ladki Bahin Yojana

योजनेचा लाभ कोण घेऊ शकत नाही? अपात्रता

लाभार्थींच्या कुटुंबातील जर व्यक्ती आयकर भरणा करत असतील तर अपात्र ठरेल.

महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये 1500/- पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर अशा महिला देखील या योजनेस अपात्र ठरतील.

ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत. परंतु बाह्य यंत्रणा द्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.

जर लाभार्थ्यांचा कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार असेल तर अपात्र असेल.

ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेर जमीन आहे असे कुटुंब देखील अपात्र आहेत.

ज्यांच्याकडे चार चाकी वाहने (ट्रॅक्टर वगळता) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत अशांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

या योजनेमध्ये पात्रता आणि अपात्रता निकषांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येऊ शकते.

तरी सर्व लाभार्थ्यांनी किंवा इच्छुक अर्जदारांनी या योजनेची पात्रता आणि अपात्रता व्यवस्थितरीत्या पाहून या योजनेस अर्ज करावे. Majhi Ladki Bahin Yojana 2024

लाभार्थी निवड प्रक्रिया

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता ही अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्य सेविका/सेतू सुविधा केंद्र/ग्रामपंचायत कार्यालय/ग्रामसेवक/वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाइन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज हा सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा लागणार आहे.

या योजनेच्या कामकाजावरती सक्षम अधिकारी यांचे लक्ष राहील.

अर्ज प्रक्रिया

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम लाभार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक आहे.

ऑनलाइन अर्ज हे 1 जुलै 2024 पासून शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती मागविण्यात येणार आहेत.

  • पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येतील.
  • ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा ही सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध आहे.
  • ऑनलाइन भरलेला फॉर्म हा अंगणवाडी केंद्रात/बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय/सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी पोच पावती देखील दिली जाईल.
  • अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य असेल.
  • अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असे जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ही केवायसी (E KYC) करता येईल. त्याकरिता महिलेने खालील माहिती सोबत घेऊन येणे आवश्यक असेल.
  • कुटुंबाची पूर्ण ओळखपत्र (रेशन कार्ड)
  • स्वतःचे आधार कार्ड. Majhi Ladki Bahin Yojana
  • लाभार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर सर्वप्रथम तात्पुरत्या यादीचे प्रकाशन करण्यात येईल.
  • तात्पुरती यादी प्रकाशित झाल्यानंतर अंतिम यादीचे प्रकाशन करण्यात येईल.
  • पात्र अंतिम यादीतील महिला मृत्यू झाल्यास सदर महिलेचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल.
  • अंतिम यादी प्रकाशित झाल्यानंतर लाभार्थ्यांना थेट डीबीटीचा माध्यमातून रक्कम अदा करण्यात येईल.

या योजनेबद्दल अधिक माहिती करिता आणि अशाच नव-नवीन योजनेबद्दल अधिक माहिती करिता आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा. हा ग्रुप private ग्रुप असल्यामुळे आपला नंबर फक्त ग्रुप admin लाच दिसेल तरी निश्चिंत ग्रुप join करा.

2 thoughts on “Majhi Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024”

Leave a Comment

× Whatsapp ग्रुप जॉईन करा 👉