Thibak Sinchan Yojana 2024: महाराष्ट्र सरकार द्वारे महाडीबीटी हे पोर्टल पात्र शेतकऱ्यांसाठी विविध सरकारी योजना आणि अनुदानांचे वितरण करण्यासाठी बनविलेले एक महत्त्वपूर्ण ऑनलाईन मंच आहे. महाडीबीटी शेतकरी योजना या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे व तसेच शेतकऱ्यांसाठी शेतीमध्ये लागणाऱ्या विविध साधनसामुग्री खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना लागणारा खर्च कमी व्हावा यासाठी या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना 80 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते.
केंद्रशासन असो किंवा महाराष्ट्र शासन हे शेतकऱ्यांसाठी नेहमीच नवीन नवीन योजना आणत असते. अशीच एक नाविन्यपूर्ण व महत्त्वपूर्ण योजना जिचे नाव महाडीबीटी शेतकरी योजना या योजनेअंतर्गत ठिबक सिंचन व तुषार सिंचन अनुदान 2024 ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन खरेदी करण्यासाठी शासनामार्फत 80 टक्के सबसिडी दिली जाणार आहे. Thibak Sinchan Yojana 2024.
Thibak Sinchan Yojana 2024 उद्देश
- पाण्याची बचत होते व झाडांची वाढ जलद गतीने होण्यास मदत होते.
- ठिबक सिंचनाचा वापर तुम्ही विविध प्रकारच्या शेतीसाठी करू शकता.
- या योजनेमुळे सर्वात जास्त फायदा हा दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना होणार आहे, कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन घेता येईल.
महाराष्ट्र मध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस तुरळक प्रमाणामध्ये पडताना आपल्याला दिसतो त्यामुळे दुष्काळ, नापिकी आणि बाजारभावामध्ये घट अशा विविध कारणामुळे शेतकरी वर्गाची आर्थिक स्थिती मंदावलेली आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत एक पर्याय म्हणून ठिबक सिंचन व तुषार सिंचन या योजनेमार्फत पाण्याची बचत करून पाणी थेट पिकांच्या मुळापर्यंत पोहोचावी व पाण्याची बचत व्हावी याकरिता ठिबक सिंचन व तुषार सिंचन 2024 ही योजना महाराष्ट्र शासनामार्फत राबवली जात आहे. त्यामुळे अशा सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा ज्यांना पाण्याची कमतरता आहे व या योजनेमार्फत 80 टक्के अनुदानचा फायदा देखील घेऊ शकता. Thibak Sinchan Yojana 2024
हे देखील वाचा : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना.
ठिबक सिंचन योजना फायदे
पाणी हे सर्व सजीव सृष्टीसाठी मूलभूत स्त्रोत आहे. म्हणून जेव्हा कृषी विस्तार प्रकल्प हाती घेतले जातात तेव्हा ते नैसर्गिक जलस्त्रोतांच्या जवळ असते अशा प्रकारे पाण्याचा वापर एकांना सिंचन करण्यासाठी केला जातो. विविध प्रकारच्या सिंचनाचे फायदे जाणून घेऊया
- ठिबक सिंचन योजनेचा वापर केल्याने उत्पादनात 20 ते 200 % पर्यंत वाढ होते.
- ठिबक सिंचन चा वापर केल्याने पिकांना पाणी समान प्रमाणात दिल्याने पिकाची वाढ सारखीच जोमदार व जलदरीतीने होत राहते.
- या सिंचन पद्धतीचा वापर केल्यामुळे 30 ते 80% पाण्याची बचत होते.
तसेच ठिबक सिंचनाचा वापर केल्यामुळे त्याच्या फायद्याप्रमाणे काही तोटेही आहे तेही जाणून घेऊ.
ठिबक सिंचन योजना तोटे
- जर ठिबक सिंचन वापरायचे असेल तर सिंचनासाठी स्वच्छ व कचरा मुक्त पाणी वापरणे आवश्यक आहे.
- ठिबक सिंचनाचा वापर करताना शेतीच्या अंतर मशागतीला याचा अर्थ निर्माण होऊ शकतो.
- ठिबक सिंचनाची उंदीर प्राण्यांपासून याची काळजी घ्यावी लागते.
- तसेच प्रकाशाच्या उष्णतेमुळे नळ्या लवचिक होऊ शकतात व कालांतराने खराब होऊ शकतात.
ठिबक व तुषार सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता, नियम व अटी
- सर्वप्रथम शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- तसेच शेतकऱ्यांकडे पाच हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र नसावे.
- योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांकडे सातबारा उतारा व अट असणे गरजेचे आहे.
- ठिबक सिंचन योजनेसाठी शेतकऱ्यांकडे स्वतःच्या शेतामध्ये बोरवेल किंवा विहीर किंवा शेततळे असणे आवश्यक आहे आणि त्या पाण्याच्या स्त्रोताची नोंद शेतकऱ्यांच्या सातबारा उतारा वरती असणे आवश्यक आहे. जर नोंद नसेल तर तलाठी कार्यालयात जाऊन त्याची नोंद करू शकता. Thibak Sinchan Yojana 2024
Thibak Sinchan Yojana 2024 नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
- सर्वप्रथम शेतकऱ्यांकडे आधार कार्ड असले पाहिजे
- बँकेचे पासबुक
- पॅन कार्ड
- कास्ट सर्टिफिकेट ( SC व ST शेतकऱ्यांकरिता)
- चालू सातबारा
- 8a उतारा
- ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन खरेदी केल्याचे बिल (अर्जदाराची नोंदणी करत असताना याची आवश्यकता नाही, अर्ज मंजूर झाल्यानंतर बिल आवश्यक आहे).
- उत्पन प्रमाणपत्र
ठिबक सिंचन योजना अर्ज प्रक्रिया
- जर तुमच्याकडे लॅपटॉप किंवा PC असेल तर आपण या योजनेसाठी घरबसल्या अर्ज करू शकता.जर नसेल तर जवळील CSC सेंटर ला भेट देऊन अर्ज करू शकता.
- सर्वप्रथम MahaDBT Farmer Scheme या योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. Thibak Sinchan Yojana 2024.
- या योजनेच्या होम पेज वरती आल्या नंतर आपल्या समोर नवीन अर्जदार नोंदणी व अर्जदार लॉगइन असे दोन पर्याय दिसतील.
- जर आपण या योजने अंतर्गत अगोदर नोंदणी केली असेल तर वापरकर्ता आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करू शकता अन्यथा नवीन अर्जदार नोंदणी पर्याया वरती जाऊन नोंदणी करून घ्या.
- नोंदणी करत असताना अर्जदाराचे नाव टाकून घ्यावे नाव हे आधार कार्ड नुसार टाकावे.
- त्यानंतर वापरकर्ता आयडी टाकावा व तुम्हाला वाटेल तसं पासवर्ड टाकून चालू mob नंबर टाकून OTP मिळवा वरती क्लिक करून OTP पडताळून घ्या व नोंदणी करून घ्यावे.Thibak Sinchan Yojana 2024.
- अर्जदार नोंदणी झाल्या नंतर लॉगिन करून घ्यावे लॉग इन केल्यानंतर आधार प्रमाणीकरण करून घ्यावे त्यामध्ये आधार कार्ड क्रमांक टाकून आधार ला लिंक असलेल्या मोबाईल वरती आलेला ओटीपी टाकून आधार व्हेरिफिकेशन करून घ्यावे. ठिबक सिंचन योजना
- आधार वेरिफिकेशन झाल्यानंतर परत अर्जदार लॉगिन करून घ्यावे. लॉगिन केल्यानंतर आपल्यासमोर महाडीबीटी चे मुख्य प्रश्न दिसेल त्यामध्ये वैयक्तिक तपशील या पर्यायाला क्लिक करून विचारली गेली सर्व माहिती व्यवस्थित रित्या टाकून घ्यावी.
- वैयक्तिक तपशील यामध्ये अर्जदाराची वर्गवारी व्यवस्थित रित्या टाकावी व जात प्रमाणपत्र असेल तर होय करावे किंवा नाही करावे त्यानंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न टाकावे व अर्जदारास किंवा शेतकऱ्यास कोणते अपंग असेल तर अपंगाचा प्रकार निवडून घ्यावा. Thibak Sinchan Yojana 2024.
- त्यानंतर अर्जदाराचे बँक खाते क्रमांक व आयएफसी कोड प्रविष्ट करावा जर आपले खाते जनधन असेल तर एस करावे अन्यथा नाही या बटणावर क्लिक करून जतन करून घ्यावे.
हे देखील वाचा : कडबा कुटी अनुदान योजना
- वैयक्तिक तपशील माहिती भरल्यानंतर पुढील टॅब ओपन करावा व त्यामध्ये शेतकऱ्याचा कायमचा पत्ता व पत्र व्यवहाराचा पत्ता व्यवस्थित टाका व नंतर शेतजमिनीचा तपशील हा पर्याय ओपन होईल त्यामध्ये शेतकऱ्याच्या जमिनीबद्दल माहिती टाकून द्यावी जसे की कोणत्या जिल्ह्यामध्ये जमील आहे त्यानंतर तालुका व गाव एवढी माहिती टाकल्यानंतर आपल्या 8a उतारा वरती 8a चा खाते क्रमांक असतो तो टाकून घ्यावा व त्यानंतर शेतकऱ्याच्या नावावरती एकूण किती जमीन आहे ते हेक्टर आणि आर च्या स्वरूपामध्ये टाकून घ्यावे.
- जर शेतकऱ्याच्या नावावरती एकापेक्षा अधिक गटांमध्ये जमीन असेल तर सेपरेट सेपरेट सर्वे क्रमांक किंवा गट क्रमांक टाकून त्या गटामधील क्षेत्र हेक्टर आर या प्रमाणामध्ये टाकून घ्यावे व माहिती जतन करून घ्यावी.
- जर शेतकऱ्यांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत शासनाने जमीन वाटप केलेली असेल तर वाईट करावे अन्यथा नाही या ऑप्शनवर क्लिक करून जमिनीचा तपशील जतन करून घ्यावा.
- ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन योजनेसाठी आवश्यक असलेली गोष्ट म्हणजे की आपल्या शेतामध्ये पाण्याचा स्त्रोत असणे आवश्यक आहे आणि त्याची माहिती प्रविष्ट करण्यासाठी इतर माहिती सादर करा हे ऑप्शन डॅशबोर्डच्या डाव्या साईडला दिसेल त्यावरती क्लिक करून घ्यावे.
- क्लिक केल्यानंतर सिंचन स्त्रोत यामध्ये तुमच्याकडे सिंचनाचा जो ही प्रकार असेल तो सिलेक्ट करून घ्यावा जसे की विहीर, कुपनलिका, कालवा किंवा शेततळे निवडावे.
- ही माहिती भरल्यानंतर पिकांचा तपशील सादर करा या पर्यायाला क्लिक करून शेतामध्ये सध्या असलेल्या पिकाची माहिती प्रविष्ट करून घ्यावी व माहिती जतन करावी.Thibak Sinchan Yojana 2024.
- सर्व माहिती भरून झाल्यानंतर मुख्य पृष्ठ या ऑप्शन वरती क्लिक करून डॅशबोर्ड वरील अर्ज करा यावरती क्लिक करून सिंचन साधने व सुविधा यावरती क्लिक करावे आणि विचारलेली सर्व माहिती व्यवस्थितरित्या टाकून अर्ज जतन करावा.
- त्यानंतर सर्वात शेवटची स्टेप म्हणजे आपण केलेल्या अर्जाचा शुल्क/ फीस भरूने यासाठी मुख्य प्रष्टवर आल्या नंतर परत एकदा अर्ज करा या बाबी वरती जाऊन सुरुवातीलाच अर्ज सादर करा याला क्लिक करून घ्यावे आणि त्यानंतर आपला अर्ज आपल्याला समोर दिसेल त्यामध्ये त्याला सिरीयल क्रमांक देऊन शुल्क भरा या ऑप्शनला क्लिक करून अर्जाचा शुल्क भरून घ्यावा. ठिबक सिंचन योजना
अशा पद्धतीने वरील पायऱ्यांचा व्यवस्थितरित्या वापर करून सहज रित्या ठिबक सिंचन योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता व 80% अनुदान मिळऊ शकता.
तुमचे फॉर्म सबमिट झाल्यानंतर 25 ते 30 दिवसाच्या नंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम थेट डीबीटी च्या मार्फत मिळून जाईल. तरी या योजनेचा सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा व गरजूवंता पर्यंत ही माहिती शेअर करा.
- Pocra Yojana Maharashtra 2024 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा योजना
- Voter id Download मतदान कार्ड डाउनलोड महाराष्ट्र 2024
- Voter id Important Update 2024. मतदान करत असताना काळजी घ्या नाहीतर गुन्हा दाखल होणार
- Passport Application Process 2024.पासपोर्ट सेवा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- Google Pay App Personal Loan 2024 गुगल पे वरून मिळवा 1 लाख फक्त पाच मिनिटात.