Ration Card New Update 2024 : राशन कार्ड धारकांना तांदूळ व गहू सोबत भेटणार या 35 वस्तू.

Ration Card New Update 2024
Ration Card New Update 2024

Ration Card New Update 2024-राशन कार्ड किंवा शिधापत्रिका हा एक अधिकृत दस्तावेज आहे जे की भारत सरकार ने जारी केला आहे. शिधापत्रिकेच्या साह्याने किंवा मदतीने पात्र कुटुंब हे राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा 2013 नुसार अनुदानित दराने अन्नधान्य खरेदी करू शकतात.

भारतातील मोठ्या लोकसंख्ये समोर उभी असलेली गरिबी आणि कुपोषण ही एक दीर्घकालीन आणि मोठी समस्या आहे आणि याच समस्येतून बाहेर पडण्यासाठी भारत सरकार हे नागरिकांसाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना आणत आहेत त्यापैकी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे रेशन कार्ड /शिधापत्रिका योजना.

कमी उत्पन्न असलेले नागरिक व दारिद्र्य रेषेखालील नागरिक यांना परवडणाऱ्या किमतीत अन्नधान्य आणि ग्रह उपयोगी वस्तू शासनामार्फत कमी दरामध्ये मिळू शकतात.

Ration Card New Update 2024, रेशन कार्ड योजनेमध्ये झालेले नवीन बदल

अनेक वर्षानंतर केंद्र सरकारने रेशन कार्ड योजनेत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आतापर्यंत राशन कार्ड धारकांना गहू आणि तांदूळ या गोष्टी भेटत होत्या परंतु यानंतर राशन कार्ड धारकांना गहू आणि तांदळा सोबतच आणखीन 35 नवीन वस्तूंचा यामध्ये समावेश केला जाणार आहे.

या वस्तूंमध्ये साबण, साखर, मीठ व तेल इत्यादी ग्रह उपयोगी वस्तू यामध्ये असतील. या बदलामुळे गरीब कुटुंबाला त्यांच्या मूलभूत व दैनंदिन गरजा भागवण्यासाठी मदत होणार आहे.

रेशन कार्ड योजनेमुळे गरीब आणि कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना या योजनेमुळे मोठी मदत मिळते. या योजनेद्वारे अन्नधान्य आणि ग्रह उपयोगी वस्तू या परवडणाऱ्या किमतीत या कुटुंबांना मिळतात. दारिद्र रेषेखालील लोकांना याची मदत होईल आणि बेरोजगारी व दारिद्र्यामुळे होणाऱ्या पोषण अभावातून बाहेर पडण्यास याची मदत होईल.

हे देखील वाचा : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना.

राशन कार्ड चे प्रकार

शिधापत्रिका किंवा राशन कार्ड याचे साधारणपणे चार प्रकार आहेत व या चार राशन कार्ड ची ओळख ही त्यांच्या रंगानुसार होते

  • बीपीएल  कार्ड
  • केशरी रेशन कार्ड
  • पांढरे राशन कार्ड
  • पिवळ्या रंगाचे रेशन कार्ड

ही राशन कार्ड कुटुंबांच्या उत्पन्न गटानुसार,मिळकत किंवा कमाईनुसार राशन कार्ड वाटप केले जाते.

पिवळे रेशन कार्ड

या रंगाच्या रेशन कार्ड मुळे लाभार्थ्यांना जन वितरण दुकानांमधून गहू आणि तांदूळ कमी किमतीत मिळतात, सध्या या कार्डमध्ये काही बदलाव करण्यात आले आहे या राशन कार्ड लाभार्थी मध्ये कुटुंबातील ज्येष्ठ महिलेचे नाव हे कुटुंबांच्या प्रमुख म्हणून समाविष्ट केले आहे.

नियम

  • पिवळे राशन कार्ड मिळवण्याकरिता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 150000 रुपयांपेक्षा जास्त नसावे.
  • कुटुंबातील कोणतेही सदस्य डॉक्टर किंवा वकील असू नये
  • तसेच कोणतेही सदस्य व्यावसायिक कर, विक्रीकर किंवा आयकर भरणारा नसला पाहिजे.
  • कुटुंबाकडे टेलिफोन असू नये
  • कुटुंबाकडे चार चाकी वाहन असू नये
  • तसेच कुटुंबातील सर्व व्यक्तींनी जिरायत जमीन एकूण दोन हेक्टर किंवा एक हेक्टर हंगामी बागायती जमीन किंवा अर्धा हेक्टर बागायती जमीन ठेवू नये. (दुष्काळग्रस्त भागांमध्ये दुप्पट)

केशरी रेशन कार्ड

हे रेशन कार्ड ज्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न दारिद्र्यरेषेपेक्षा जास्त आहे अशा कुटुंबांना दिले जाते. ज्यांचे एकूण उत्पन्न वर्षाकाठी 15 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे अशा कुटुंब धारकाला या कार्डचा लाभ घेता येतो.

नियम

  • वार्षिक उत्पन्न हे 15000 रुपयांपेक्षा जास्त आणि 1 लाखाहून कमी असले पाहिजे.
  • कुटुंबातील कोणत्याही सदस्यांकडे चार चाकी वाहन असू नये (टॅक्सी सोडता)
  • तसेच कुटुंबाकडे चार हेक्टर किंवा जास्त सिंचनाखाली जमीन असू नये.

बीपीएल कार्ड

दारिद्र रेषेच्या खालील येणाऱ्या लोकांनाही कार्ड दिले जाते. ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही त्यांना या कार्डच्या माध्यमातून सरकार तर्फे दर महिना तीन रुपये दराने 35 किलो तांदूळ दिले जाते याच्यासोबतच ग्राहकांना गहू, साखर, मीठ, रॉकेल देखील मिळते. या कार्डच्या माध्यमातून ग्राहकांना बँकेकडून कमी व्याज दराने कर्ज देखील दिले जाते.

पांढरे रेशन कार्ड

च्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख किंवा त्याच्याहून अधिक आहे व कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीकडे चार चाकी वाहन आहे तसेच एकूण चार हेक्टर पेक्षा जास्त सिंचनाखाली असलेली जमीन असल्यास तो पांढरा रेशन कार्ड घेण्यास पात्र आहे.

सरकारकडून दिल्या गेलेल्या काही सवलती

  • सर्व बीडी कामगार तसेच पारधी व कोल्हाटी समुदायांना तात्पुरत्या आधारावरती बीपीएल राशन कार्ड देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे
  • तसेच कापूस गिरणी व साखर कारखाने 2013 च्या अखेरीस बंद पडलेल्या या कारखान्यातील कामगारांना तात्पुरते पिवले रेशन कार्ड दिले आहे .

योग्य कागदपत्रांची पूर्तता न केल्याने अनेकदा बरेच लोक व कुटुंब या योजनेच्या सवलती पासून वंचित राहतात. दूरवर भागांमधील व गावांमधील नागरिकांना या योजनेबद्दल माहिती देखील नसल्याने त्यांना या योजनेचा फायदा देखील मिळत नाही. तसेच राशन कार्ड मिळवण्यासाठी अनेकदा भ्रष्टाचाराला सुद्धा सामोरे जावे लागते अशा विविध समस्यांमुळे राशन कार्ड योजनेचा फायदा हा सर्वसामान्य पर्यंत पोहोचतच नाही.

गरिबी कुपोषण आणि बेरोजगारी सारख्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी रेशन कार्ड योजना एक प्रभावी उपाय ठरत आहे. या योजनेमुळे गरीब कुटुंबांना मदत मिळत असली तरी अद्याप अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

जर एखाद्या कुटुंबाकडे राशन कार्ड नसेल तर त्यांनी लवकरात लवकर राशन कार्ड बनवून घ्यावी त्यासाठी आवश्यक कागदपत्र खाली दिलेल्या आहेत.

आवश्यक कागदपत्र

  • कुटुंब प्रमुखाचे आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • बँकेचे पासबुक
  • मतदान ओळखपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • चालू असलेला मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज तीन फोटो
  • ड्रायव्हिंग लायसन्स (असल्यास)

राशन कार्ड मुळे होणारे फायदे

  • गरीब कुटुबांना परवडणाऱ्या किमतीत अन्नधान्य मिळणे शक्य झाले आहे.
  • रेशन कार्ड ओळखीचा पुरावा तसेच पत्त्याचा पुरावा म्हणून काम करते.
  • रेशन कार्ड मुख्यतः अनुदानित खाद्यपदार्थ व इंधन खरेदी करताना वापरतात.
  • जर तुम्हाला परवाना हवा असेल तर राशन कार्ड हा एक वैध पुरावा आहे.
  • एलपीजीच्या नवीन कनेक्शन साठी रेशन कार्ड आवश्यक आहे.
  • मूलभूत गृहउपयोगी वस्तू सवलतीच्या दरामध्ये मिळतील
  • दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मदत होईल.
  • बेरोजगारी आणि दरिद्र्यामुळे होणाऱ्या पोषण अभावातून बाहेर पडण्यास मदत मिळेल.
  • आता नवीन पद्धतीचे कार्ड आलेले आहे ज्याचं नाव डिजिटल राशन कार्ड असे आहे.

डिजिटल रेशन कार्ड Digital Ration Card 2024

  • रेशन कार्ड चे नाव बदलून आता डिजिटल रेशन कार्ड केले आहे आणि त्यात बरेच बदलाव देखील केलेले आहेत. नवीन डिजिटल रेशन कार्ड आता एटीएम कार्ड सारखे दिसणार आहे. ज्यामध्ये एक छोटीशी देखील मिळेल.
  • या कार्डमधील कुटुंबातील प्रमुख पुरुषाचे नाव काढून टाकले जात आहे आणि त्या जागी कुटुंबातील महिलेचे नाव टाकले जाणार आहे. हे असे की आता रेशन कार्ड वरील पुरुषांऐवजी त्या महिलेचे नाव हे नेहमीसाठी असेल.
  • डिजिटल रेशन कार्ड हे आधारशी लिंक केले जाईल.
  • डिजिटल रेशन कार्ड आता नेहमीसाठी डिझाईन केलेले आहे त्याची मर्यादा संपणार नाही या आधी पाच वर्षे झाले की आपल्याला कार्ड रिन्यू करावी लागायचे पण आता याची आवश्यकता पडणार नाही.

डिजिटल राशन कार्ड चे फायदे

  • रेशन दुकानात होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यास मदत होईल.
  • कुटुंब प्रमुखाने अंगठा दिल्या वरच रेशन मिळेल.
  • म्हणजे ही प्रक्रिया पूर्णपणे बायोमेट्रिक पद्धतीने होणार आहे ज्यामध्ये दुकानदारांकडून फसवणुकीचा प्रश्न उद्भवणार नाही.

राशन कार्ड 2024 नवीन नोंदणी साठी पात्रता.

  • जर कोणी विवाहित असेल तर त्याला परिवारातील राशन कार्ड मध्ये नाव नोंदवणे गरजेचे आहे.
  • जर घरी नवजात बालकांनी जन्म घेतला असेल तर त्याचे राशन कार्ड मध्ये नाव नोंदवले गरजेचे आहे.

नवीन नोंदणीसाठी ऑनलाइन फॉर्म भरता येईल त्यासाठी mahafood.gov.in या संकेतस्थळावरती भेट देऊन नवीन राशन कार्ड साठी अर्ज करता येईल.

राशन कार्ड बद्दल हे माहीत असणे आवश्यक आहे

  • महाराष्ट्रातील कोणत्याही राशन कार्ड धारकाला राज्यातील कोणत्याही दुकानातून धान्य घेण्याचा अधिकार आहे. त्यासाठी पत्ता बदलण्याची काहीही गरज नाही.
  • रेशन मशीनवर अंगठा ठेवल्यानंतर घेतलेल्या रेशींची व दिलेल्या पैशाची पावती येते. ती पावती रेशन कार्ड धारकास देणे बंधनकारक आहे. दुकानदार पावती देत नसेल तर रेशन दुकानातील पुस्तकात नोंद करता येते.
  • रेशन कार्ड स्वतःकडे ठेवायचा व रद्द करण्याचा अधिकार रेशन दुकानदाराला नाही.
  • रेशन दुकान साप्ताहिक सुट्टी व्यतिरिक्त सकाळी चार तास व संध्याकाळी चार तास निश्चित उघडे असायला हवे.
  • रेशन दुकानात लोकांना स्पष्टपणे वाचता येईल असे माहिती फलक लावणे आवश्यक आहे त्यावर दुकानाची वेळ दुकान क्रमांक फोन नंबर इत्यादी माहिती असणे आवश्यक आहे.

Leave a Comment

× Whatsapp ग्रुप जॉईन करा 👉