![](https://mahayojana.in/wp-content/uploads/2024/05/2.png)
Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana 2024-ही योजना सण 2018-2019 पासून राज्यात नव्याने सुरू केलेली एक नाविन्यपूर्ण तसेच महत्त्वपूर्ण योजना शेतकऱ्यांसाठी राबवली गेली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे लाभार्थी किंवा शेतकरी फळबाग लागवड या बाबीचा लाभ घेऊ शकत नाही अशा सर्व शेतकरी व लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार आहे. ही योजना शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत राबवली जात आहे.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा उद्देश
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या माध्यमातून पीक आणि पशुधन याबरोबरच सहभागीच्या रूपाने शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा उत्पादनात वाढ करण्यास आणि उत्पन्न दुप्पट करण्यास मदत होणार आहे.
- तसेच पीक रचनेत बदल घडवून आणणे.
- प्रक्रिया उद्योगांसाठी आवश्यक कच्चामालाच्या उत्पादनात वाढ करणे.
योजनेचे स्वरूप/घटक
- या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना 100% टक्के अनुदान दिले जाणार आहे.
- कोकण विभाग वगळता ठिबक सिंचन संच बसविणे बंधनकारक आहे.
- या योजनेचा लाभ कोकण विभागासाठी कमाल दहा हेक्टर तर उर्वरित महाराष्ट्रासाठी कमाल सहा हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत आहे.
- या योजनेअंतर्गत आंबा, काजू, पेरू, चिकू, डाळिंब, सिताफळ, कागदी लिंबू, नारळ, चिंच, अंजीर, आवळा, कोकम, फणस, जांभूळ, संत्रा व मोसंबी अशा 16 बहुवार्षिक फळ पिकांची आवश्यकतेनुसार कलमे किंवा रोपण द्वारे लागवड करण्यास मान्यता आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती
- सर्वप्रथम शेतकरी हा भारतीय नागरिक असावा.
- या योजनेचा लाभ केवळ वैयक्तिक शेतकऱ्यांनाच घेता येईल संस्थापक लाभार्थ्यांना लाभ घेता येणार नाही. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असणाऱ्या लाभार्थी व्यतिरिक्त इतर लाभार्थ्यांना या योजनेतून लाभ घेता येईल.
- महाराष्ट्र मध्ये कमाल सहा हेक्टर पर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येईल. सदर शेतकऱ्यांना त्यांच्या इच्छेनुसार एकापेक्षा जास्त फळ पिके लागवडी करतात देखील पात्र राहतील.
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीचा लाभ यापूर्वी घेतला असल्यास लाभ क्षेत्र वगळून इतर क्षेत्राकरिता अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल.
- या योजनेंतर्गत लाभार्थ्याची निवड करताना ज्यांची उपजीविका पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे, अशा शेतकऱ्यांची प्राधान्याने निवड करण्यात येईल. तसेच, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी, महिला शेतकरी, दिव्यांग शेतकरी यांना प्राधान्य देण्यात येईल.
फळ झाड लागवडीसाठी मुदत
या योजनेअंतर्गत फळबाग लागवडीचा कालावधी हा प्रतिवर्षी एक मे ते 30 नोव्हेंबर पर्यंत राहील. या योजनेत सहभाग घेण्यासाठी अर्ज सादर करणे बंधनकारक राहील.
लाभार्थी निवड प्रक्रिया
इच्छुक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज करावा. लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास अर्जाची तालुकानिहाय सोडत पद्धतीने निवड उपविभागीय कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी संयुक्तपणे करतील. लक्षांकाप्रमाणे अर्ज प्राप्त न झाल्यास जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्या मार्फत पुन्हा जाहिरात देण्यात येईल.
तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी
- आपण सादर केलेल्या अर्चना पूर्वसंमती दिल्यानंतर कृषी सहाय्यक यांच्यामार्फत सात दिवसात अंदाजपत्रक तयार होते.
- मंडळ कृषी अधिकारी यांनी पत्रकाची छाननी केल्यानंतर तीन दिवसाच्या आत तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे शिफारसह मंजुरी पत्र पाठवले जाते किंवा पाठवावे लागते.
- एक हेक्टर क्षेत्र पर्यंत फळबाग लागवड अंदाजपत्रकास तालुका कृषी अधिकारी तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देतात.
- तर एक हेक्टर क्षेत्र पेक्षा अधिकच्या क्षेत्रावरील फळबाग लागवड अंदाजपत्रकास उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या मार्फत तांत्रिक व प्रशासकीय मान्यता दिली जाते.
- अंदाजपत्रक प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून एक आठवड्याच्या तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्रदान करते.
- प्रत्येक लाभार्थ्यांच्या जमिनीवरील फळबाग लागवड हा स्वतंत्र प्रकल्प समजण्यात येतो. अशा प्रत्येक प्रकल्पासाठी प्रशासकीय व तांत्रिक मान्यता स्वतंत्रपणे देण्यात येते.
- लागवडीचे अंदाजपत्रके तयार करून त्या सक्षम अधिकाऱ्यांची तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाल्यानंतरच लाभार्थ्याने फळबागेची लागवड करावी.
हे देखील वाचा : कडबा कुटी अनुदान योजना
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड
- सातबारा आठ
- पॅन कार्ड
- कास्ट प्रमाणपत्र (SC /ST करिता)
- राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
- उत्पन्न प्रमाणपत्र
योजने अंतर्गत समाविष्ट फळबाग पिके
- आंबा,
- डाळींब,
- काजू,
- पेरू,
- सीताफळ
- आवळा,
- चिंच,
- जांभूळ,
- कोकम,
- फणस,
- कागदी लिंबू,
- नारळ,
- चिकू,
- संत्रा,
- मोसंबी व
- अंजीर.
या सर्व फळबाग पिकांकरिता आपण अर्ज करू शकतो व या योजनेच्या माध्यमातून १००% अनुदान मिळउ शकता.
अर्ज प्रक्रिया
- जर तुमच्याकडे लॅपटॉप किंवा PC असेल तर आपण या योजनेसाठी घरबसल्या अर्ज करू शकता.जर नसेल तर जवळील CSC सेंटर ला भेट देऊन अर्ज करू शकता.
- सर्वप्रथम MahaDBT Farmer Scheme या योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
- या योजनेच्या होम पेज वरती आल्या नंतर आपल्या समोर नवीन अर्जदार नोंदणी व अर्जदार लॉगइन असे दोन पर्याय दिसतील.
- जर आपण या योजने अंतर्गत अगोदर नोंदणी केली असेल तर वापरकर्ता आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करू शकता अन्यथा नवीन अर्जदार नोंदणी पर्याया वरती जाऊन नोंदणी करून घ्या.
- नोंदणी करत असताना अर्जदाराचे नाव टाकून घ्यावे नाव हे आधार कार्ड नुसार टाकावे.
- त्यानंतर वापरकर्ता आयडी टाकावा व तुम्हाला वाटेल तसं पासवर्ड टाकून चालू mob नंबर टाकून OTP मिळवा वरती क्लिक करून OTP पडताळून घ्या व नोंदणी करून घ्यावे.
- अर्जदार नोंदणी झाल्या नंतर लॉगिन करून घ्यावे लॉग इन केल्यानंतर आधार प्रमाणीकरण करून घ्यावे त्यामध्ये आधार कार्ड क्रमांक टाकून आधार ला लिंक असलेल्या मोबाईल वरती आलेला ओटीपी टाकून आधार व्हेरिफिकेशन करून घ्यावे.
- आधार वेरिफिकेशन झाल्यानंतर परत अर्जदार लॉगिन करून घ्यावे. लॉगिन केल्यानंतर आपल्यासमोर महाडीबीटी चे मुख्य प्रश्न दिसेल त्यामध्ये वैयक्तिक तपशील या पर्यायाला क्लिक करून विचारली गेली सर्व माहिती व्यवस्थित रित्या टाकून घ्यावी.
- वैयक्तिक तपशील यामध्ये अर्जदाराची वर्गवारी व्यवस्थित रित्या टाकावी व जात प्रमाणपत्र असेल तर होय करावे किंवा नाही करावे त्यानंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न टाकावे व अर्जदारास किंवा शेतकऱ्यास कोणते अपंग असेल तर अपंगाचा प्रकार निवडून घ्यावा.
- त्यानंतर अर्जदाराचे बँक खाते क्रमांक व आयएफसी कोड प्रविष्ट करावा जर आपले खाते जनधन असेल तर एस करावे अन्यथा नाही या बटणावर क्लिक करून जतन करून घ्यावे.
- वैयक्तिक तपशील माहिती भरल्यानंतर पुढील टॅब ओपन करावा व त्यामध्ये शेतकऱ्याचा कायमचा पत्ता व पत्र व्यवहाराचा पत्ता व्यवस्थित टाका व नंतर शेतजमिनीचा तपशील हा पर्याय ओपन होईल त्यामध्ये शेतकऱ्याच्या जमिनीबद्दल माहिती टाकून द्यावी जसे की कोणत्या जिल्ह्यामध्ये जमील आहे त्यानंतर तालुका व गाव एवढी माहिती टाकल्यानंतर आपल्या 8a उतारा वरती 8a चा खाते क्रमांक असतो तो टाकून घ्यावा व त्यानंतर शेतकऱ्याच्या नावावरती एकूण किती जमीन आहे ते हेक्टर आणि आर च्या स्वरूपामध्ये टाकून घ्यावे.
- जर शेतकऱ्याच्या नावावरती एकापेक्षा अधिक गटांमध्ये जमीन असेल तर सेपरेट सेपरेट सर्वे क्रमांक किंवा गट क्रमांक टाकून त्या गटामधील क्षेत्र हेक्टर आर या प्रमाणामध्ये टाकून घ्यावे व माहिती जतन करून घ्यावी.
- जर शेतकऱ्यांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत शासनाने जमीन वाटप केलेली असेल तर वाईट करावे अन्यथा नाही या ऑप्शनवर क्लिक करून जमिनीचा तपशील जतन करून घ्यावा.
- त्यानंतर होम पेज वरती यावे व अर्ज करा ऑप्शनला क्लिक केल्यानंतर फलटपादन पर्यायावरती निवडून घ्यावे. व विचारल्या पद्धतीने सर्व माहिती प्रविष्ट करून द्यावी व सर्व माहिती टाकून झाल्यानंतर जतन करावे.
![भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड](https://mahayojana.in/wp-content/uploads/2024/05/147-1024x576.png)
अर्ज शुल्क
अर्ज शुल्क:- अर्ज सादर करतेवेळी शेतकऱ्यांनी रु. २०/- शुल्क व रु. ३.६०/- जी.एस.टी. मिळून एकूण रु.२३.६०/- शुल्क ऑनलाईन भरावा लागणार आहे.
अशा पद्धतीने वरील पायऱ्यांचा व्यवस्थितरित्या वापर करून सहज रित्या फळबाग योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता व १००% अनुदान मिळऊ शकता.
तुमचे फॉर्म सबमिट झाल्यानंतर 25 ते 30 दिवसाच्या नंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम थेट डीबीटी/ DBT च्या मार्फत मिळून जाईल. तरी या योजनेचा सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा व गरजूवंता पर्यंत ही माहिती शेअर करा.
👇👇👇👇👇👇👇👇
- Agri Stack Registration Farmer ID 2025 असे बनवा शेतकरी ओळखपत्र शेतकरी आयडी
- Pik Vima New Update 2024 पिक विमा घोटाळा चौकशी
- Anudan E kyc Process अतिवृष्टी अनुदान ई केवायसी प्रक्रिया 2024
- Ladki bahin yojana status check maharashtra 2024 लाडकी बहिण योजना स्थिती
- Favarni pump Yojana Application Process 2024 मोफत फवारणी पंप योजना अर्ज करा घर बसल्या