SSC स्टाफ सिलेक्शन 2024
SSC स्टाफ सिलेक्शन आयोगाने दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी SSC CHSL भरती 2024 ची अधिसूचना जारी केली आहे.
ही भरती एकूण 3712 रिक्त जागांसाठी अधिसूचना काढलेली आहे. त्यामुळे बारावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे त्यांनी या जागेसाठी पात्रता मी कशाला नुसार अर्ज दाखल करावे. या रिक्त जागांसाठी आपण 8 एप्रिल 2024 ते साथ मे 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्ज दाखल करणे सध्या चालू आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशन 2024 नोटिफिकेशन ची वाट पाहणारे उमेदवार ऑनलाईन अर्ज दिलेली लिंक वापरून अर्ज दाखल करू शकतात. या लेखांमध्ये आपण या रिक्त जागांसाठी पात्रता निकष, निवड प्रक्रिया व वेतनश्रेणी याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
पदाचे नाव – Combined Higher Secondary Level Exam.
जाहिरात तारीख – 08/04/2024.
रिक्त जागा – 3712.
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.
एसएससी स्टाफ सिलेक्शन 2024 अंतर्गत रिक्त जागांचा तपशील
भारत सरकारचे विविध मंत्रालय, विभाग, कार्यालयांसाठी विभागीय लिपिक, सहाय्यक आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर अशा विविध पदांसाठी उमेदवारांची भरती करण्यासाठी निवड प्रक्रिया आयोगामार्फत दरवर्षीप्रमाणे SSC CHSL स्पर्धा परीक्षा घेतली जाते.
रिक्त जागांचा तपशील खाली प्रमाण आहे
- Lower divisional clerk (LDC)/junior Secretariat assistant (JSA)
- Data Entry Operator (DEO)
- Data Entry Operator Grade A
एकून जागा 3712
वय मर्यादा (एक ऑगस्ट 2024 रोजी)
02/08/2024 रोजी आणि 01/08/2024 नंतर जन्मलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
- SC/ST 05 वर्ष सूट
- OBC. 03 वर्ष सूट
- अपंग व्यक्ती. 10 वर्ष सूट
अर्ज शुल्क
अर्जदारांनी आठ मे 2024 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज शुल्क ऑनलाईन भरणे आवश्यक आहे.UPI, नेट बँकिंग किंवा डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा एसबीआय चलन तयार करून शाखेमध्ये रोख स्वरूपामध्ये आपण फीस भरणा करू शकता.
- महिला /SC/ST/PWD/ESM. विनाशुल्क
- इतर. 100 रु.
निवड प्रक्रिया
- Computer Based examination (tier 1)
- Descriptive paper (tier 2)
अर्ज करण्याची पद्धत अर्ज कसा करावा
स्टाफ सिलेक्शन कमिशन रिक्त जागांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येतील.
उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल व ऑनलाईन अर्ज करावा लागेल अर्ज करण्यासाठी खालील स्टेप चा वापर करून तुम्ही सहजरित्या अर्ज दाखल करू शकता.
- सर्वप्रथम SSC च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. www.ssc.gov.in
- मुख्य प्रश्नावरती आल्यानंतर अर्जदार नोंदणी करा यावरती क्लिक करून नोंदणी करून घ्यावी. जर आपण स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत या पूर्वी कधी अर्ज केला असेल तर लॉगिन आयडी आणि पासवर्ड चा वापर करून Candidate लॉगिन करून घ्यावे.
- अर्जदार नोंदणी करत असताना अर्जदाराने त्यांचा चालू ईमेल आयडी आणि पासवर्ड वापरून स्वतःची नोंदणी करून घेणे आवश्यक आहे.
- नोंदणी केल्यानंतर उमेदवार त्यांचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉगिन करू शकतो जरी यापूर्वी नोंदणी केले असेल तर लॉगिन करून थेट अर्ज सुद्धा करू शकता.
- लॉगिन केल्यानंतर आपल्यासमोर अर्जासाठी आवश्यक असलेली माहिती विचारली जाईल ती योग्यरीत्या अचूकपणे भरले आवश्यक आहे व सर्व माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करावा एकदा फॉर्म भरल्यानंतर त्यामध्ये कोणतेही बदल करता येत नाहीत.
- अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवाराने त्यांच्या अर्जाची शुल्क भरून घ्यावी शुल्क हे ऑनलाईन किंवा ऑफलाईन चलनाच्या सहाय्याने बँकेच्या कामकाजाच्या वेळेमध्ये आपण भरू शकता.
- ऑनलाइन पेमेंट करत असताना पेमेंट सूचना काळजीपूर्वक वाचून घ्यावे आणि UPI, नेट बँकिंग किंवा डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा एसबीआय चलन तयार करून शाखेमध्ये रोख स्वरूपामध्ये आपण फीस भरणा करू शकतो.
- ऑनलाइन फीस भरल्यानंतर भरलेल्या अर्जाची पावती जपून ठेवा.
वेतन श्रेणी
उमेदवारांना त्यांच्या पोस्टिंग नुसार वेतन मिळेल.
- LDC/JSA 19900 ते 63200.
- DEO (Level 4-5) 25500 ते 81100(Level 4) 29200 ते 92300 (Level 5).
- DEO (Grade A). 25500 ते 81100.