
Ration Card E kyc Process 2025– राशन कार्ड केवायसी घरबसल्या करण्याकरिता दिलेली माहिती व्यवस्थित रित्या वाचून तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने ही प्रक्रिया करू शकता.
Ration Card E kyc Process राशन कार्ड केवायसी प्रक्रिया
राशन कार्ड केवायसी (Know Your Customer) प्रक्रिया, सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) अंतर्गत राशन कार्ड धारकांची माहिती सत्यापित आणि अद्यतनित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या प्रक्रियेमुळे खात्री केली जाते की राशन कार्ड धारक योग्य आणि पात्र आहेत, त्यामुळे त्यांना सरकारी योजनांचा फायदा मिळतो आणि सुलभ दरात राशन मिळवता येते. केवायसी प्रक्रिया वापरून सरकार राशन कार्ड धारकांची माहिती सुरक्षित ठेवते आणि योग्य लोकांपर्यंत सर्व शासकीय योजना पोहोचवते.
हे देखील वाचा :- असे पहा अनुदान खात्यात जमा झाले की नाही.
राशन कार्ड केवायसी प्रक्रियाचे उद्दिष्ट
- सत्यापन आणि पारदर्शिता: केवायसी प्रक्रियेचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे राशन कार्ड धारकांची ओळख आणि माहिती सत्यापित करणे. यामुळे योग्य लोकांना फायद्याचा वितरण सुनिश्चित होतं.
- भ्रष्टाचाराची प्रतिबंध: राशन वितरण प्रणालीमध्ये भ्रष्ट्राचार आणि अनियमिततेला थांबवण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वपूर्ण आहे. केवायसी प्रक्रियेमुळे फर्जी राशन कार्ड धारकांची ओळख होते आणि त्यांना प्रणालीतून बाहेर टाकलं जातं.
- डेटा अद्यतन आणि शुद्धता: राशन कार्ड धारकांची माहिती वेळोवेळी अद्यतनित केली जाते, ज्यामुळे राशन वितरण अधिक सुसंगत आणि अचूक होतं. यामुळे डेटा शुद्ध आणि योग्य राहतो.
- सरकारी योजनांचा योग्य लाभ: केवायसी प्रक्रियेचा दुसरा उद्दिष्ट म्हणजे सर्व पात्र व्यक्तींना सरकारी योजनांचा योग्य लाभ मिळवण्याची हमी देणं. त्यामुळे गरजू लोकांना अधिक फायदा होतो.
कुटुंबातील कोणाची केवायसी करावी ?
कुटुंबातील सर्वच व्यक्तींची केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे.
राशन कार्ड केवायसी प्रक्रिया कशी केली जाते?
- आवश्यक कागदपत्रांची तयारी: राशन कार्ड केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रांची तयारी करणे महत्त्वाचे आहे. यात खालील कागदपत्रांचा समावेश होतो:
- आधार कार्ड
- आधार लिंक मोबईल नंबर
- ऑनलाइन अर्ज प्रक्रिया :
राशन कार्ड केवायसी घरबसल्या करण्याकरिता दिलेली माहिती व्यवस्थित रित्या वाचून तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने ही प्रक्रिया करू शकता जसे की,
- राशन कार्ड इ केवायसी करण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला आपल्या मोबाईलच्या प्लेस्टोर वरून दोन एप्लीकेशन डाउनलोड करावे लागेल जिचे नाव आहे मेरा KYC app.
- तसेच आणखी एक एप्लीकेशन आधार फेस आयडी ही देखील एप्लीकेशन डाउनलोड करावे लागेल.
- या एप्लीकेशन ची लिंक खालील दिलेली आहे या लिंकच्या सहाय्याने तुम्ही मेरा केवायसी एप्लीकेशन डाउनलोड करू शकता.
मेरा केवायसी ॲप डाऊनलोड करण्याकरिता येथे क्लिक करा.
आधार फेस आयडी एप्लीकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
वरील एप्लीकेशन डाउनलोड झाल्यानंतर ॲप ओपन करा.

ही एप्लीकेशन ओपन केल्यानंतर आपल्याला वरील दिलेल्या पद्धतीने एक पेज ओपन होईल त्यामध्ये आपले राज्य निवडून घ्यावे.
- राज्य निवडल्यानंतर व्हेरिफाय लोकेशन (Verify Location) या बटनाला क्लिक करा व पुढे जा.
हे देखील वाचा :- असे बनवा शेतकरी ओळखपत्र शेतकरी आयडी
- पुढे आल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करावा लागेल. आधार प्रविष्ट केल्यानंतर गेट ओटीपी या बटनाला क्लिक करा.
- तुमच्या आधार लिंक मोबाईल वरती ओटीपी आल्यानंतर तो प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

- वरील प्रक्रिया व्यवस्थितरीत्या केल्यानंतर आणि ओटीपी वेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्यासमोर तुमची सर्व माहिती दिसेल.
आलेली माहिती एक वेळेस चेक करून घ्यावे आणि फेस इ केवायसी Face EKyc वरती क्लिक करावे.

- Face eKyc वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर कन्सेंट Consent येतिल त्याला एक्सेप्ट करून घ्या.
- त्यानंतर face authentication advisories तुम्हाला दिसतील त्या देखील व्यवस्थित रित्या वाचून घ्या आणि प्रोसीड करा.

- प्रोसीड बटणावर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलचा कॅमेरा ओपन होईल.
- कॅमेरा ओपन झाल्यानंतर आपलाच चेहरा मोबाईल वरील दिलेल्या गोल सर्कल मध्ये व्यवस्थितरित्या आला पाहिजे असा मोबाईल पकडावा व व्यवस्थित रित्या चेहरा आल्यानंतर आपले डोळे बंद चालू करावे.
हे देखील वाचा :- मागेल त्याला मोफत पाणंद शिव रस्ते योजना 2025
- फेस ऑथेंटीकेशन व्यवस्थित रित्या झाल्यानंतर तुम्हाला खालील दिलेल्या पद्धतीने एक मेसेज येईल ज्यामध्ये तुमची राशन कार्ड इ केवायसी प्रक्रिया सक्सेस झालेले दिसेल.

अशा पद्धतीने तुम्ही स्वतः घर बसल्या अगदी सोप्या पद्धतीने राशन कार्ड ची ई केवायसी कुठेही न जाता तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने करू शकता.
Ration card E Kyc Status राशन कार्ड ई केवायसी स्थिती अशी तपासा.
वरील दिलेल्या पद्धतीने तुम्ही राशन कार्ड ची ई केवायसी करू शकता परंतु तुमची राशन कार्ड केवायसी झालेली आहे की नाही हे तपासण्याकरिता तुम्हाला परत एकदा फ्रेश मध्ये एप्लीकेशन ओपन करावे लागेल.
- एप्लीकेशन ओपन केल्यानंतर राज्य निवडून घ्यावे.

लोकेशन निवडल्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका आणि ओटीपी च्या सहाय्याने वेरिफिकेशन करून घ्या.
ओटीपी वेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्यासमोर तुमची माहिती ओपन होईल त्यामध्ये वरील दिलेल्या फोटो प्रमाणे ई केवायसी स्टेटस Ekyc Status या पर्यायामध्ये
जर तुमची केवायसी झालेली असेल तर Y म्हणून दिसेल
जर तुमची केवायसी झालेले नसेल तर ई केवायसी करण्याचा पर्याय निवडावा.
अशा पद्धतीने तुम्ही स्वतः कुठेही न जाता तुमच्या मोबाईलवरून राशन कार्ड ई केवायसी करू शकता.
निष्कर्ष
राशन कार्ड केवायसी प्रक्रिया हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे जे सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये पारदर्शिता, सत्यता आणि कार्यक्षमतेला प्रोत्साहन देते. या प्रक्रियेमुळे नागरिकांना योग्य व पात्र असल्यासच राशन मिळतं आणि त्यांना सरकारी योजनांचा योग्य लाभ मिळवता येतो. त्यामुळे राशन कार्ड धारकांनी केवायसी प्रक्रिया योग्य वेळी पूर्ण केली पाहिजे, जेणेकरून ते सुलभपणे राशन आणि इतर सरकारी लाभ घेऊ शकतात.
वरील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला जॉईन करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन योजनेची माहिती सर्वात अगोदर येथे पाहायला मिळेल.