Pandan Shiv Raste 2025 – शेतात जाण्यासाठी रस्ता असणे हा शेतकऱ्यांचा हक्क मानला जातो. ज्या भूमापन क्रमांकाच्या शेतात जाण्यासाठी रस्ता मिळवयाचा आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी माहिती काळजीपूर्वक वाचावी..
महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पादनामध्ये वाढ करण्याकरिता महायुती सरकार ने शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.
Pandan Shiv Raste Yojana 👇
महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी महायुती सरकार आता शेतकऱ्यांना मोफत पाणंद रस्ते बांधून देणार आहे.
या योजनेअंतर्गत विशेष म्हणजे पानंदरस्ते आणि शिव रस्ते यांची मोजणी सरकारी पैशांमधूनच होणारा असून शेतकऱ्यांमध्ये भांडणे होऊ नये याकरिता पोलीस संरक्षणाचा खर्च सुद्धा सरकार च्या माध्यमातून होणार आहे.
हे देखील वाचा :- असे पहा अनुदान खात्यात जमा झाले की नाही.
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकरी आणि शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणारे या उपक्रमाविषयी माहिती दिली असून, यावेळी ती म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासाला प्राधान्य दिले आहे.
याच धर्तीवर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कृषी उत्पन्नावर भर दिलेला आहे. परंतु, अद्यापही बहुतांश शेतकऱ्यांना स्वतःच्याच शेतामध्ये जाण्याकरिता चांगला रस्ता नाही.
शेतीमध्ये जाण्यासाठी रस्त्याची व्यवस्था नसल्या कारणामुळेच रोजगार आणि कृषी उत्पन्न वर याचा वाईट परिणाम होत असल्याचे दिसून येते.
महाराष्ट्र राज्य हे एक कृषीप्रधान राज्य असून शेती व्यवसायास अशा विविध कारणामुळे अडथळे निर्माण होत असून याचा एक वाईट परिणाम शेती व्यवसायावर होत आहे आणि याच कारणामुळे शेतीकडे दुर्लक्ष देखील होण्यास सुरुवात झालेली आहे.
अशा विविध कारणामुळे शेतीकडे होणारे दुर्लक्ष आणि शेती व्यवसायात चालना मिळाली याकरिता महाराष्ट्र राज्य वारंवार शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी करत असते याच धरतीवरती शेतात जाण्याकरिता शिवरस्ते किंवा पानंद रस्ते आता मोफत आणि शासकीय बंदोबस्तामध्ये मिळणार आहेत.
पाणंद आणि शिव रस्ते बाबत सध्या योजना आहे परंतु अशा प्रकारच्या रस्ते बांधणीवरून शेतकऱ्यांमध्ये भांडणे होत असल्यामुळे काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता पाणंद आणि शिव रस्त्यांची बांधणी होऊ शकली नाही.
तसेच रस्ते उभारणीसाठी शेतकऱ्यांना खर्च देखील येत होता. ही अडचण दूर करण्यासाठीच महायुती सरकारने आता मागेल त्याला पानंदरस्ते देण्याचा निर्णय घेतला आहे.
यासोबतच रस्ते मोजणी आणि पोलीस संरक्षण खर्च देखील सरकारचा असणार आहे.
ज्या शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी रस्त्याची अडचण आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज आपल्या तहसील कार्यालयामध्ये दाखल करावेत.
ही योजना शेतकऱ्यांसाठी पूर्णतः निशुल्क असून मोफत पांदण रस्ते किंवा शिव रस्ते शेतकऱ्यांना तयार करून मिळणार आहे.
तरी राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा पुरेपूर पद्धतीने फायदा करून घ्यावा.
शेत रस्ता मिळविण्यासाठी अर्ज कसा करावा ?
शेतात जाण्यासाठी रस्ता असणे हा शेतकऱ्यांचा हक्क मानला जातो. ज्या भूमापन क्रमांकाच्या शेतात जाण्यासाठी रस्ता मिळवयाचा आहे, असा भूमापन क्रमांक ज्या महसूल क्षेत्रात येते त्या तालुक्याच्या तहसीलदाराच्या नावे तहसील कार्यालयात लेखी स्वरूपात अर्ज करावा.
प्रति,
मा. तहसीलदार साहेब,
तहसील कार्यालय, …….. (तहसील कार्यालयाच्या ठिकाणचे नाव लिहावे)
जिल्हा – …….. (जिल्हाचे नाव लिहावे )
विषय:– शेतात शेतीकामासाठी जाण्या येण्यासाठी भूमापन क्रमांकाच्या / गट क्रमांकाच्या बांधावरून कायमस्वरुपी रस्ता मिळणेबाबत.
संदर्भ: – महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १४३ अन्वये, शेतरस्त्या मिळण्यासाठी विनंतीअर्ज.
अर्जदार :- …….. …….. …….. (शेकऱ्याचे संपूर्ण नाव लिहावे), …… ……………. (शेतकऱ्याचा संपूर्ण रहिवाशी पत्ता लिहावा)
महोदय,
वरील विषयास अनुसरून सविनय अर्ज सादर करण्यात येतो कि, मी …….. …….. …….. (शेकऱ्याचे संपूर्ण नाव लिहावे), …… ……………. (शेतकऱ्याचा संपूर्ण रहिवाशी पत्ता लिहावा) येथील रहिवाशी आहे. माझ्या स्वतः च्या मालकीची शेतजमीन भूमापन क्रमांक/ गट क्रमांक / खसरा क्रमांक ……… मौजे ……… पोस्ट …… तालुका …… जिल्हा ……. येथे असून ती तलाठी सज्जा …….. (तलाठी कार्यालयाचे ठिकाण लिहावे ) यांच्या कार्यक्षेत्रात येत आहे. माझ्या सदर शेताच्या चतुःसीमेस अथवा बाजूस खालील प्रमाणे शेतकरी आहेत (कृपया सर्व सातबारा आणि चतुःसीमेचा नकाशा जोडावा).
- पूर्वीकडे (शेतकऱ्याचे नाव) …….. …… …….. भूमापन क्रमांक/ गट क्रमांक / खसरा क्रमांक ……. …..
- पश्चिमेकडील (शेतकऱ्याचे नाव) …….. …… ….. भूमापन क्रमांक/ गट क्रमांक / खसरा क्रमांक …….
- दक्षिणेकडील (शेतकऱ्याचे नाव) …….. …… …….. भूमापन क्रमांक/ गट क्रमांक / खसरा क्रमांक …….
- उत्तरेकडील (शेतकऱ्याचे नाव) …….. …… …….. भूमापन क्रमांक/ गट क्रमांक / खसरा क्रमांक …….
अत: आपणास नम्र विनंती आहे कि, माझ्या मालकीच्या शेतात शेतीकामासाठी जाण्या येण्यासाठी व शेती कामासाठी शेतीऔजारे तसेच शेतमाल बाजापेठेत घेऊन जाण्यासाठी शेत रस्ता उपलब्ध नसल्यमुळे खूप अडचण होत आहे. सदर प्रकरणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १४३ अन्वये, भूमापन क्रमांकाच्या / गट क्रमांक ………… (भूमापन क्रमांकाच्या / गट क्रमांक लिहावा) च्या बांधावरून कायमस्वरुपी शेतरस्त्या मिळणेबाबत योग्य ती कारवाही करण्यात यावी हि नम्र विनंती.
धन्यवाद
कळावे आपला विश्वासू,
(शेतकऱ्याची सही ………….. )
शेतकरी अर्जदाराचे नाव ………………………
संपूर्ण पत्ता …………….
मोबाईल क्रमांक लिहावा ………
(कृपया वरील अर्जासोबत स्वतः चा आणि शेजारील शेतकऱ्यांचे सर्व सातबारे आणि चतुःसीमेचा नकाशा जोडावा)