OBC Karj Yojana, Loan Scheme For OBC व्यवसाय उभारायचाय? कर्जासाठी ओबीसी महामंडळाकडे करा अर्ज!

OBC Karj Yojana 2025 शासकीय योजना : उच्च शिक्षणासाठी १० ते २० लाख रुपयांचे कर्ज

OBC Karj Yojana
OBC Karj Yojana

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत सन २०२२-२३ मध्ये ऑफलाईन थेट कर्ज योजनेत १२० प्रकरणांचे आणि बँकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या २० टक्के बीज भांडवल योजनेसाठी ४७ प्रकरणांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील ओबीसीतील युवक, युवतींना उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी ही योजना अत्यंत फलदायी ठरणार आहे.

नव्याने सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन वैयक्तिक व्याज परतावा योजनेत ११९, गट कर्ज परतावासाठी १३ व शैक्षणिक व्याज परतावा योजनेत ११ प्रकरणांचे उद्दिष्टही जालना येथील महामंडळाला प्राप्त झाले आहे. महामंडळाच्या विविध कर्ज योजनेतून कर्ज घेऊन ओबीसीतील युवक, युवतींना आपले उद्योजक, व्यावसायिक होण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

कर्ज योजनेच्या लाभासाठी अर्ज करतांना आवश्यक कागदपत्रे जसे की जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि होरॉक्स इत्यादी आवश्यक आहेत. लाभार्थी युवक, युवतींना अर्ज सादर करून त्यांना कर्ज मिळवता येईल. निकषात बसणाऱ्या लाभार्थ्यांना तत्काळ कर्जवाटप होईल, अशी माहिती महामंडळाच्या कार्यालयाकडून मिळाली आहे.

हे देखील वाचा :- OBC बिनव्याजी कर्ज योजना.

OBC Karj Yojana बीज भांडवल योजना

२० टक्के बीज भांडवल योजना राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून राबवली जाते. या योजनेत महामंडळ २०%, लाभार्थी ५% आणि बँकेचा ७५% सहभाग असतो. यामुळे उद्योजकांना आर्थिक मदत मिळवून व्यवसाय सुरू करणे सोपे होते.

गट कर्ज योजना

बचत गट, भागीदार संस्थांसाठी गट कर्ज परतावा योजना राबविली जात आहे. या योजनेचा परतफेडीचा कालावधी पाच वर्षांचा आहे. वेळेत हप्ते भरल्यास ओबीसी महामंडळाकडून १२ टक्केपर्यंत व्याज परतावा दिला जातो.

कर्जासाठी वयोमर्यादा:

महामंडळाच्या विविध कर्ज योजनांसाठी १८ ते ५० वयोगटातील नागरिकांना लाभ मिळतो. मात्र, शैक्षणिक कर्जासाठी १७ ते ३० वयाची अट आहे.

थेट कर्ज योजना:

हे कर्ज एक लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहे आणि १८ ते ५५ वर्षे वयोगटातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळतो. यासाठी सिचील क्रेडिट स्कोअर किमान ५०० असावा लागतो आणि वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये असावे लागते.

वैयक्तिक कर्ज योजना:

महामंडळाकडून १८ ते ५० वयोगटातील नागरिकांसाठी वैयक्तिक कर्ज योजना राबवली जात आहे. या योजनेत कर्जाची रक्कम १० लाख रुपयांपर्यंत असू शकते. नियमित हप्ते भरल्यास १२ टक्केपर्यंत व्याज परतावा मिळतो.

शैक्षणिक कर्ज योजना:

देशातील किंवा परदेशातील उच्च शिक्षणासाठी १० ते २० लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. १७ ते ३० वयोगटातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो.

निष्कर्ष:

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत विविध कर्ज योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. या योजनांचा लाभ घेऊन जिल्ह्यातील युवक, युवतींनी व्यवसाय सुरू करावा आणि आपल्या आयुष्याला नवा वळण देण्याची संधी वापरावी.

तुम्ही देखील कर्ज मिळवून तुमचा व्यवसाय सुरू करू इच्छिता का? तर आजच तुमचा अर्ज ओबीसी महामंडळाकडे करा आणि व्यवसाय जगताचा एक भाग व्हा!

Leave a Comment

× Whatsapp ग्रुप जॉईन करा 👉