Rabbi Pik Vima Application Process 2024 -प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम ही 2016 पासून राज्यांमध्ये राबविण्यात आलेली एक शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण योजना आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2024 करिता अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालेली असून पुढील पद्धतीने आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता.
Rabbi Pik Vima आवश्यक कागदपत्र
- सर्वप्रथम शेतकऱ्यांकडे त्यांचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
- चालू बँकेचे खाते पुस्तक
- सातबारा
- 8अ उतारा
- पिक पेरा
- भाडे पत्रक (जर भाडे करार केलेला असेल तर)
इत्यादी कागदपत्रे अर्ज करताना सोबत असावी. Rabbi Pik Vima 2024.
👉पिक पेरा रब्बी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा👈
रब्बी विमा रद्द होण्याची कारणे
- जर अर्जदारांनी मृत शेतकऱ्यांच्या नावे जर विमा काढला असेल तर तो शासनाच्या प्रस्तावा अंतर्गत रद्द केला जाईल.
- जर शेतकरी भाडे कराराने शेती वापरत असेल तर त्याला भाडेकरार पत्र आपल्या विमा अर्जासोबत सादर करणे बंधनकारक आहे जर भाडे करार पत्र जोडले नाहीत तर आपला अर्ज ना मंजूर होऊ शकतो. रब्बी पिक विमा
पिकाचे नाव | शेवट तारीख |
ज्वारी | 30 नोव्हेंबर . |
हरभरा व गहु | 15 डिसेंबर. |
तसेच जर शेतकऱ्यांचे बँक पासबुक प्रिंटेड नसेल तर पासबुक वरती
- शेतकऱ्याचे नाव (As Per Adhar)
- बँकेचा आय एफ एस सी (IFSC) कोड आणि
- बँकेचा सही आणि शिक्का व्यवस्थितरित्या असावा, जर असेल तर तुमचा अर्ज ना मंजूर होईल. Rabbi Pik Vima 2024.
Rabbi Pik Vima Application Process अर्ज प्रक्रिया
प्रधानमंत्री पिक विमा योजना या अंतर्गत रब्बी हंगामातील पिकाचा विमा काढण्याकरिता तुम्ही स्वतः घरबसल्या सांगितलेल्या पद्धतीने अर्ज करू शकता.
रब्बी पिक विमा काढण्याकरिता शेतकऱ्यांना सर्वप्रथम खालील दिलेल्या शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
वरील वेबसाईट वरती आल्यानंतर आपल्यासमोर खालील दिलेल्या पद्धतीने एकटेच ओपन होईल त्यामध्ये, फार्मर कॉर्नर (Farmer Corner) म्हणून एक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा. Rabbi Pik Vima 2024.

फॉर्मल कॉर्नर या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर खाली दिलेल्या पद्धतीने एक पेज ओपन होईल त्यामध्ये,
- Login For Farmer (लॉगिन फॉर फार्मर)
- Guest Farmer
असे दोन पर्याय दिसतील त्यापैकी एक नंबरचा पर्याय वरती म्हणजे लॉगिन फॉर फार्मर या पर्यावरण क्लिक करून पुढे जा.
त्यानंतर शेतकऱ्याचा आधार क्रमांक आणि कॅपचा कोड टाकून रिक्वेस्ट फॉर ओटीपी (Request For OTP) ने ओटीपी पाठवा आणि ओटीपी ची पडदाळणी करून घ्या. रब्बी पिक विमा 2024.

शेतकरी वेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला खालील एक पेज ओपन होईल त्यामध्ये आपण केलेल्या या अगोदरही वर्षांमध्ये जेवढ्या काही अर्जाच्या पॉलिसी असतील त्याची माहिती दिसेल.
रब्बी पिक विमा या योजनेमध्ये अर्ज करण्याकरिता अप्लाय फॉर इन्शुरन्स (Apply For Insurance) या पर्यायावर क्लिक करा. रब्बी पिक विमा 2024.

त्यानंतर आपल्यासमोर रब्बी पिक विमा करिता अर्ज उपलब्ध होईल ज्यामध्ये,
- वैयक्तिक आणि रहिवासी माहिती
- बँक डिटेल्स
- क्रॉप डिटेल्स (पिकाची माहिती)
अशी सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरावी लागेल.
- वैयक्तिक आणि रहिवासी माहिती– या पर्याया मध्ये शेतकऱ्याचे नाव आधार कार्ड प्रमाणे, बँक पासबुक प्रमाणे नाव, मो नंबर, कास्ट कॅटेगरी इत्यादी. रब्बी पिक विमा 2024.






पिक विमा भरण्याची केंद्र
शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा अर्ज दाखल करण्यासाठी त्यांना त्यांच्या जवळील सीएससी केंद्र मध्ये जाऊन अर्ज करू शकता किंवा आपल्या जवळील बँकेमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही अर्ज करून पिक विमा उतरवू शकता.
तसेच तुम्ही तुमचा स्वतः घरी बसून तुमचा मोबाईलचा सहाय्याने देखील पिक विमा करिता अर्ज करू शकता आणि प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ देखील घेऊ शकता. रब्बी पिक विमा 2024.
अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या प्रधानमंत्री रब्बी पिक विमा 2024 करिता घरबसल्या आणि सांगितलेल्या पद्धतीने व्यवस्थितरित्या अर्ज करू शकता.
जर तुम्हाला अर्ज करण्याकरिता काही अडचण येत असेल तर तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करून माहिती घेऊ शकता किंवा आपल्या जवळील सीएससी (CSC) सेंटरला भेट देऊन आपण आपला पिक विमा अर्ज करू शकता. रब्बी पिक विमा 2024.
पिक विमा भरल्यानंतर ई पीक पाहणी का करावी, कधी करावी आणि कशी करावी याबद्दल पूर्ण माहिती अपडेट करिता आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
तसेच पिक विमा भरल्यानंतर आपल्या पिकाची झालेली नुकसान करिता ऑनलाइन तक्रार कशी नोंदणी करावी अशा सर्व अपडेट करिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
- Pradhan Mantri Gramin Awaas Yojana Self Survey प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना (टप्पा 2) सेल्फ सर्वे 2025.
- Bandhkam Kamgar Education Scheme 2025. बांधकाम कामगार शैक्षणिक योजना संपूर्ण माहिती
- sbi clerk mains admit card download link 2025.
- How to Create Free Ghibli Style AI Images Using ChatGPT तुमच्या फोटोंना जिबली style मध्ये बनवा फक्त 2 मिनिटामध्ये.
- Hindu Nav Varsh 2025 हिंदू नव वर्ष