nafed Soyabin Kharedi Registration 2024. सोयाबीन खरेदी नोंदणी प्रक्रिया

nafed Soyabin Kharedi Registration 2024-शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सोयाबीन नोंदणी केल्यानंतरच शेतकऱ्यांना शासनामार्फत हमी भावाने त्यांची सोयाबीन खरेदी केली जाणार आहे.

नाफेड अंतर्गत E-समृद्धी पोर्टलवरून शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदीची नोंदणी करण्याची सुविधा प्राप्त करून देण्यात आलेली आहे. आजच्या लेखामध्ये आपण नाफेड अंतर्गत E-समृद्धी पोर्टलवरून सोयाबीन खरेदी करिता नोंदणी कशी करावी आणि या बद्दल अधिक माहिती घेणार आहोत.

nafed Soyabin Kharedi आवश्यक कागदपत्र

  • शेतकऱ्यांचे आधार कार्ड
  • राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
  • चालू सातबारा (सोयाबीन पेरा असणे आवश्यक)

मिळणारा हमी भाव

nafed अंतर्गत सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना 4892 रुपये हमी भाव दिला जाणार आहे.

nafed Soyabin Kharedi Registration
nafed Soyabin Kharedi Registration

नियम व अटी

या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना लाभ घेयचा असेल तर खालील बाबी असणे आवश्यक आहेत जसे की,

  • सर्व प्रथम नोंदणी करत असताना शेतकऱ्यांच्या 712 उताऱ्यावर्ती सोयाबीन पिकाची नोंद असणे आवश्यक आहे.(पिकाची नोंद नसेल तर आपला अर्ज रद्द करण्यात येईल.) nafed Soyabin Kharedi Registration 2024.

हे नक्की वाचा : रब्बी पिक विमा भरा घरबसल्या

सोयाबीन खरेदी नोंदणी प्रक्रिया.

नाफेड या अंतर्गत E- समृद्धी पोर्टल वरती नोंदणी कशी करावी याबद्दल काही व्यवस्थितपणे माहिती दिलेली आहे याच्या साह्याने तुम्ही स्वतः घरबसल्या नोंदणी करून आपली सोयाबीन विक्री हमीभावाने करू शकतात.

  • नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी नोंदणी करण्याकरिता सर्वप्रथम आपल्याला शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती यावे लागेल. या वेबसाईटची लिंक खाली दिलेली आहे याच्या साह्याने तुम्ही नोंदणी करू शकता. सोयाबीन खरेदी नोंदणी प्रक्रिया 2024.

वरील वेबसाईट वरती आल्यानंतर आपल्यासमोर खालील प्रमाणे एक पेज ओपन होईल त्यामध्ये रजिस्टर नाऊ (Register Now) या ऑप्शन वर क्लिक करा.

रजिस्टर या ऑप्शनच्या सहाय्याने नवीन शेतकरी नोंदणी करता येईल.

त्यानंतर आपल्यासमोर E समृद्धी पोर्टल चे पेज ओपन होईल त्यामध्ये दोन ऑप्शन आहेत जसे की,

  • फार्मर रजिस्ट्रेशन (farmer registration)
  • एजन्सी रजिस्ट्रेशन (Agency registration)

या दोन्ही ऑप्शन पैकी फार्मर रजिस्ट्रेशन हा पर्याय निवडून घ्या. nafed Soyabin Kharedi Registration 2024

फार्मर रजिस्ट्रेशन या पर्यायावर ती आल्यानंतर शेतकरी नोंदणी करिता एक पेज ओपन होईल त्यामध्ये तुमचा चालू मोबाईल क्रमांक आणि दिलेल्या कॅपच्या कोड टाकून ओटीपी च्या सहाय्याने आपला युजर आयडी आणि पासवर्ड तयार करून घ्या. nafed Soyabin Kharedi Registration 2024

nafed Soyabin Kharedi Registration
nafed Soyabin Kharedi Registration

ओटीपी पडताळणी झाल्यानंतर तुम्ही नाफेड E समृद्धीच्या मुख्य पृष्ठावर याल. येथे विचारले गेलेली सर्व आवश्यक ती माहिती काळजीपूर्वक भरून घ्या जसे की,

  • शेतकऱ्याचे नाव.
  • शेतकऱ्याचा आधार क्रमांक.
  • राज्य, जिल्हा
  • तालुका आणि गाव.

इत्यादी माहिती भरल्यानंतर शेवटी पिकाची नावे दिसतील त्यापैकी सोयाबीन हे पीक निवडा आणि सेव बटनावरती क्लिक करा. nafed Soyabin Kharedi Registration 2024

nafed Soyabin Kharedi Registration
nafed Soyabin Kharedi Registration

अशी सर्व माहिती भरून झाल्यानंतर डाव्या बाजूला रजिस्टर (Register) नावाचे एक ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करा आणि नंतर अधिक माहिती विचारली जाईल जसे की,

  • Basic details
  • Bank details.
  • Land details (शेती विषयी माहिती).

Basic Details-

या टॅब मध्ये शेतकऱ्याची बेसिक डिटेल्स व्यवस्थित रित्या भरून घ्या. व शेतकर्याचे आधार कार्ड अपलोड करून माहिती SAVE करा. सोयाबीन खरेदी नोंदणी प्रक्रिया 2024.

Bank Details-

या पर्यायांमध्ये शेतकऱ्याचा बँकेचा तपशील भरून घ्या जसे की,

  • बँक खाते धारकाचे नाव,
  • बँकेचा आयएफसी कोड
  • बँकेचे नाव आणि
  • खाते नंबर.

सर्व डिटेल्स भरून झाल्यानंतर राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक अपलोड करून घ्या. आणि सबमिट बटनावरती क्लिक करून आपली माहिती जतन करा. सोयाबीन खरेदी नोंदणी प्रक्रिया 2024.

Land Details-

लँड डिटेल्स या पर्यायांमध्ये शेतकऱ्याच्या जमिनीचा तपशील द्यावा लागेल जसे की, आपली जमीन कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तालुका, गाव निवडून घ्या.

जमिनीचा गट क्रमांक,खाते क्रमांक निवडल्या नंतर गटामध्ये असणारी जमिनी बद्दल माहिती दिसेल ती पडताळून घ्या.

जमिनीचा 712 उतारा pdf स्वरूपात अपलोड करा आणि शेवटी (Submit) सबमिट करा.

अशा पद्धतीने आपली शेतकरी माहिती भरून होईल. सोयाबीन खरेदी नोंदणी प्रक्रिया 2024.

Scheme Selection

सर्व माहिती भरून झाल्यानंतर Scheme Selection करा. त्यासाठी या पेज वरती Scheme Selection चे एक ऑप्शन दिसेल ते निवडा.

हे ऑप्शन सिलेक्ट केल्या नंतर खालील पेज दिसेल त्यामध्ये दाखवल्या पद्धतीने 2 नंबर ची scheme निवडून घ्या.

अशा पद्धतीने सर्व माहिती भरून झाल्या नंतर तुम्हाला आपल्या अर्जाबद्दल एक पावती निघेल हि पावती व्यवस्तीत रित्या प्रिंट करून घ्या पावती चा नमुना खाली दिलेला आहे. सोयाबीन खरेदी नोंदणी प्रक्रिया 2024.

राज्यात एकूण 200 खरेदी केंद्र सुरू होणार आहेत. यामध्ये नाफेडची 146 आणि एनसीसीएफची 60 खरेदी केंद्र आहेत. या केंद्रांवर तालुका स्तरावर सोयाबीन खरेदीची प्रक्रिया होणार आहे.

या योजने बद्दल पुढील माहिती तुम्हाला येथे पाहायला मिळेल.

अशाच नव-नवीन योजनेबद्दल अधिक माहिती करिता आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.

हा ग्रुप Private ग्रुप असल्यामुळे आपला नंबर फक्त ग्रुप admin लाच दिसेल तरी निश्चिंत ग्रुप join करा.

Leave a Comment