
Mukhymantri Tirth Darshan Yojana Apply Online 2024- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना हि एक वयोवृद्ध नागरिकांकरिता महाराष्ट्र शासना मार्फत सुरु करण्यात आलेली एक अत्यंत महत्व पूर्ण आणि एक नाविन्य पूर्ण अशी योजना आहे. या योजने विषयी आपण संपूर्ण माहिती या अगोदर च्या पोस्ट मध्ये सविस्तर दिलेली आहे.त्या मध्ये आपण अधिक माहिती घेऊ शकतो.खाली दिलेल्या लिंक च्या सहाय्याने आपण अधिक माहिती घेऊ शकता.
आजच्या या लेख मध्ये आपण मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना २०२४ करिता अर्ज कसा करावा, आवश्यक कागदपत्र आणि अर्ज कोठे दाखल करावा या बद्दल सर्व माहिती पाहणार आहोत.
Mukhymantri Tirth Darshan Yojana नोंदणी प्रक्रिया
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने मध्ये नोंदणी करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्जाचा नमुना खालील लिंक मध्ये दिलेला आहे तो प्रिंट करून घ्या आणि विचारलेल्या पद्धतीने आवश्यक ती माहिती भरून आपला अर्ज दाखल करा.
आवश्यक कागदपत्रे
- सर्वप्रथम ऑनलाइन पद्धतीने अर्ज केलेल्या अर्जाची पावती.
- ज्येष्ठ नागरिकांचे आधार कार्ड किंवा राशन कार्ड
- महाराष्ट्र राज्याचे आधीवास प्रमाणपत्र (नसेल तर, शाळा सोडण्याचा दाखला, जन्म प्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र किंवा राशन कार्ड या चार पैकी कोणतीही एक ग्राह्य धरले जाईल.)
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र (2.5 लाखाच्या आत असणे आवश्यक आहे)
- जर उत्पन्नाचे प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असावे.
- वैद्यकीय प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- चालू मोबाईल क्रमांक आणि
- हमीपत्र (अर्ज नमुन्य मध्ये हमीपत्र दिलेले आहे.)
हे नक्की वाचा : मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024
नोंदणी प्रक्रिया
सर्व प्रथम वरील अर्जाचा नमुना प्रिंट करून घ्यावा लागेल आणि त्या मध्ये विचारलेली आवश्यक ती सर्व माहिती काळजीपूर्वक भरून घ्या जसे कि,
- हा अर्ज तुम्हाला मा. अध्यक्ष, उप अध्यक्ष किंवा मा सदस्य सचिव जे कि जिल्हा स्तरीय समिती नियोजित केलेली आहे त्यांच्या कडे हा अर्ज दाखल करायचा आहे.
तसेच अर्जदाराचे व्यक्तीक तपशील जसे कि,
- अर्जदाराचे नाव,
- अर्जदाराचा संपूर्ण पत्ता,
- जन्मतारीख
- आधार क्रमांक,
- जवळच्या नातेवाईकांचे नाव, त्यांच्याशी असणारे नाते, त्यांचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक.
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न. (अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख पर्यंत असणे आवश्यक आहे तसेच हे उत्पन्न सक्षम प्राधिकारी यांचा सही शिक्याचा असावा.)
हे नक्की वाचा : अशी करा ई पिक पाहणी घरबसल्या संपूर्ण माहिती
त्यानंतर या योजनेअंतर्गत काही नियम आणि अटी दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित रित्या काळजीपूर्वक वाचून त्यासमोर होय किंवा नाही असे क्लिक करून घ्यावे लागेल.
तसेच काही
अर्जदाराने मान्य करण्यासाठी काही अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत त्या देखील अर्जदारांनी या अर्ज सोबत मान्य करणे आवश्यक आहे.
या अर्जा सोबत अर्जदाराचे हमीपत्र तसेच अर्ज सोबत जोडली जाणारी आवश्यक ती कागदपत्रांची यादी आणि ते कागदपत्रे अर्ज सोबत जोडलेली आहेत की नाही याबद्दल माहिती दिलेली आहे ती देखील व्यवस्थित रित्या भरून घ्यावी.
महत्त्वाचे म्हणजे पण अर्ज केलेल्या अर्जाची पोचपावती या अर्जाच्या शेवटी दिलेली आहे ती पोचपावती आपण अर्ज दाखल केल्या नंतर प्राधिकृत अधिकाऱ्याकडून घेणे आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला पुढील प्रक्रिया करिता या पोचपावतीची गरज पडेल.
हे नक्की वाचा : क्रॉप इन्शुरन्स प्रक्रिया असा करा पिक विमा क्लेम.
अर्जा सोबत,
- अर्जदाराचे वैद्यकीय प्रमाणपत्र,
- जवळच्या नातेवाईकांचे प्रमाणपत्र,(या अर्जामध्ये आपल्या जवळच्या नातेवाईका कडून प्रवासासाठी जाणारा अर्जदार हा या नातेवाईकाच्या ओळखीचा असून शासनाने दिलेल्या सर्व अटी आणि शर्तींचे पालन करून या योजने अंतर्गत तीर्थ दर्शन यात्रे करिता प्रवास करण्यासाठी इच्छुक आहे असे हमीपत्र जवळच्या नातेवाईकांकडून दिले जाणार आहे.)
- जीवनसाथी किंवा सहाय्यकाचे देखील वैद्यकीय प्रमाणपत्र आणि हमीपत्र आवश्यक आहे हे देखील या अर्जामध्ये दिलेले आहेत. (हे हमीपत्र जर अर्जदार यांना सहाय्यकाची आवश्यकता असेल तरच आवश्यक आहे.)
अशा पद्धतीने तुम्ही मुख्यमंत्री तीर्थ दर्शन या योजने करिता अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता.
अशाच नव-नवीन योजनेबद्दल अधिक माहिती करिता आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.
हा ग्रुप Private ग्रुप असल्यामुळे आपला नंबर फक्त ग्रुप admin लाच दिसेल तरी निश्चिंत ग्रुप join करा.
- Bandhkam Kamgar Diwali Bonus 5000 Applyication. बांधकाम कामगारांना मिळणार दिवाळी बोनस 5000 रुपये
- Ladki Bahin Yojana eKyc kashi Karavi 2025 अशी करा लाडकी बहीण योजना ई केवायसी फक्त 2 मिनिटात अगदी सोप्या पद्धतीने.
- MahaDBT Tar Kumpan Yojana तार कुंपण योजना 2025 | Subsidy, Documents, Application Process
- PMFME Loan 2025 Process पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)
- E pik Pahani 2025 Last date शेतकरी स्तरावरील ई-पिक पाहणीसाठी मुदतवाढ 🌾