राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियाना अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर बी-बियाणाचे वाटप 2024 MahaDBT Biyane Vitaran
सन 2007-2008 पासून राज्यांमध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. सन 2014 – 15 पासून 12 व्या पंचवार्षिक योजनेसाठीच्या मार्गदर्शक सूचनानुसार या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. 11 व्या पंचवार्षिक योजनेतील अभियानाचा आढावा घेत बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये सदर अभियाना अंतर्गत भात, गहू, कडधान्य व भरड धान्य या पिकांचा या अभियानामध्ये समावेश करण्यात आला आहे. 2018 – 19 पासून केंद्र शासनाने पूर्वीच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान भरडधान्य अभियानात बदल करून दोन स्वतंत्र अभी आणि राबविण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान ह- भरड धान्य अंतर्गत मका पीकसाठी व राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान – पौष्टिक त्रण धान्य अंतर्गत ज्वारी, बाजरी व राखी या पिकांसाठी स्वतंत्र अव्ययाने सुरू केले आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान उद्देश
- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (NFSM) चे उद्दिष्ट देशाच्या त्या जिल्ह्यांमध्ये शाश्वत पद्धतीने क्षेत्राचा विस्तार करून आणि उत्पादकता वाढवून विशिष्ट पिकांचे उत्पादन वाढवणे हा आहे.
- या अभियानांतर्गत ज्या गावांमध्ये धानाचे उत्पादन कमी असले तरी पाणी उपलब्ध आहे अशा गावांमध्ये प्रकल्प आधारित कार्यक्रम राबवले जातात. या कार्यक्रमांद्वारे शेतकऱ्यांना SRI पद्धतीचा वापर करून भात उत्पादन वाढवण्यासाठी प्रात्यक्षिक आणि तांत्रिक मार्गदर्शन केले जाते.
- या मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना पीक प्रतिक्षा, प्रमाणित बियाणे, पीक पद्धतीवर आधारित प्रशिक्षण, सूक्ष्म रूटस्टॉक, सेंद्रिय खते आणि इतर वस्तू पुरवल्या जातात.
मिळणारे अनुदान
- या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे वितरण, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन (सूक्ष्म मूलद्रव्य), एकात्मिक कीड व्यवस्थापन (पीक संरक्षण औषधे व जैविक घटक, तणनाशके) वैयक्तिक शेततळे, पंपसंच, पाईप, तसेच विविध कृषी अवजारे या बाबींनी या योजनेअंतर्गत विविध प्रकारे अनुदान देण्यात येतात.
- या योजनेअंतर्गत अन्नधान्य, बी बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना 50 % तसेच 100% पर्यंत अनुदान दिले जाते.
- या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या विविध बी बियाणांसाठी मिळणारे अनुदान पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.
अनुदानाची पीडीएफ पाहण्यासाठी क्लिक करा.
योजने अंतर्गत मिळणारे बी-बियाणे
या योजनेअंतर्गत केंद्र शासनाने हाय जिल्हे निवडलेले आहे त्याप्रमाणे बी बियाणांची वाटप केले जाते. जसे की,
- ज्वारी
- बाजरी
- रागी
- कापूस
- ऊस
- गहू
- भात
असे विविध प्रकारचे बी बियाणे या योजनेअंतर्गत अनुदानावरती वाटप केले जाते.
पात्रता
केंद्र शासनाने पीक निहाय निवडलेले जिल्हे खालील प्रमाणे आहेत
- पौष्टीक तृणधान्ये (न्युट्री सिरीयल) – ज्वारी, बाजरी, रागी (एकूण २६ जिल्हे)
अ) ज्वारी –
- नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती व यवतमाळ (एकूण २३ जिल्हे)
ब) बाजरी
- नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, बीड, जालना व उस्मानाबाद (एकूण ११ जिल्हे)
क) रागी
- नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, ठाणे (पालघर सह), रायगड व रत्नागिरी. (एकूण ७ जिल्हे)
ड) कापूस:
- (अमरावती विभाग) – बुलढाणा,अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ.
- (नागपूर विभाग) – वर्धा,नागपूर,चंद्रपूर.
इ) ऊस :
- (औरंगाबाद विभाग) – औरंगाबाद, जालना, बीड.
- (लातूर विभाग) – लातूर,उस्मानाबाद,नांदेड,परभणी,हिंगोली.
या जिल्ह्या प्रमाणे शेतकरी दिलेल्या पिकांच्या बी बियाणासाठी अर्ज करू शकतात व योजने अंतर्गत अनुदानाचा फायदा मिळउ शकतात.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
- सर्वप्रथम शेतकऱ्यांकडे आधार कार्ड असले पाहिजे.
- बँकेचे पासबुक
- पॅन कार्ड
- कास्ट सर्टिफिकेट ( SC व ST शेतकऱ्यांकरिता)
- चालू सातबारा
- 8a उतारा
- उत्पन प्रमाणपत्र
- Self Declaration
वरील सर्व कागदपत्र व्यवस्तीत रित्या स्कॅन (Scan) करून अर्जा सोबत अपलोड करून घ्यावीत.
अर्ज प्रक्रिया
- जर तुमच्याकडे लॅपटॉप किंवा PC असेल तर आपण या योजनेसाठी घरबसल्या अर्ज करू शकता.जर नसेल तर जवळील CSC सेंटर ला भेट देऊन अर्ज करू शकता.
- सर्वप्रथम MahaDBT Farmer Scheme या योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
- या योजनेच्या होम पेज वरती आल्या नंतर आपल्या समोर नवीन अर्जदार नोंदणी व अर्जदार लॉगइन असे दोन पर्याय दिसतील.
- जर आपण या योजने अंतर्गत अगोदर नोंदणी केली असेल तर वापरकर्ता आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करू शकता अन्यथा नवीन अर्जदार नोंदणी पर्याया वरती जाऊन नोंदणी करून घ्या.
- नोंदणी करत असताना अर्जदाराचे नाव टाकून घ्यावे नाव हे आधार कार्ड नुसार टाकावे.
- त्यानंतर वापरकर्ता आयडी टाकावा व तुम्हाला वाटेल तसं पासवर्ड टाकून चालू mob नंबर टाकून OTP मिळवा वरती क्लिक करून OTP पडताळून घ्या व नोंदणी करून घ्यावे.
- अर्जदार नोंदणी झाल्या नंतर लॉगिन करून घ्यावे लॉग इन केल्यानंतर आधार प्रमाणीकरण करून घ्यावे त्यामध्ये आधार कार्ड क्रमांक टाकून आधार ला लिंक असलेल्या मोबाईल वरती आलेला ओटीपी टाकून आधार व्हेरिफिकेशन करून घ्यावे.
- आधार वेरिफिकेशन झाल्यानंतर परत अर्जदार लॉगिन करून घ्यावे. लॉगिन केल्यानंतर आपल्यासमोर महाडीबीटी चे मुख्य प्रश्न दिसेल त्यामध्ये वैयक्तिक तपशील या पर्यायाला क्लिक करून विचारली गेली सर्व माहिती व्यवस्थित रित्या टाकून घ्यावी.
- वैयक्तिक तपशील यामध्ये अर्जदाराची वर्गवारी व्यवस्थित रित्या टाकावी व जात प्रमाणपत्र असेल तर होय करावे किंवा नाही करावे त्यानंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न टाकावे व अर्जदारास किंवा शेतकऱ्यास कोणते अपंग असेल तर अपंगाचा प्रकार निवडून घ्यावा.
- त्यानंतर अर्जदाराचे बँक खाते क्रमांक व आयएफसी कोड प्रविष्ट करावा जर आपले खाते जनधन असेल तर एस करावे अन्यथा नाही या बटणावर क्लिक करून जतन करून घ्यावे.
- वैयक्तिक तपशील माहिती भरल्यानंतर पुढील टॅब ओपन करावा व त्यामध्ये शेतकऱ्याचा कायमचा पत्ता व पत्र व्यवहाराचा पत्ता व्यवस्थित टाका व नंतर शेतजमिनीचा तपशील हा पर्याय ओपन होईल त्यामध्ये शेतकऱ्याच्या जमिनीबद्दल माहिती टाकून द्यावी जसे की कोणत्या जिल्ह्यामध्ये जमील आहे त्यानंतर तालुका व गाव एवढी माहिती टाकल्यानंतर आपल्या 8a उतारा वरती 8a चा खाते क्रमांक असतो तो टाकून घ्यावा व त्यानंतर शेतकऱ्याच्या नावावरती एकूण किती जमीन आहे ते हेक्टर आणि आर च्या स्वरूपामध्ये टाकून घ्यावे.
- जर शेतकऱ्याच्या नावावरती एकापेक्षा अधिक गटांमध्ये जमीन असेल तर सेपरेट सेपरेट सर्वे क्रमांक किंवा गट क्रमांक टाकून त्या गटामधील क्षेत्र हेक्टर आर या प्रमाणामध्ये टाकून घ्यावे व माहिती जतन करून घ्यावी.
- जर शेतकऱ्यांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत शासनाने जमीन वाटप केलेली असेल तर वाईट करावे अन्यथा नाही या ऑप्शनवर क्लिक करून जमिनीचा तपशील जतन करून घ्यावा.
- त्यानंतर होम पेज वरती यावे व अर्ज करा ऑप्शनला क्लिक केल्यानंतर बियाणे, औषधे व खते पर्यायावरती निवडून घ्यावे.
- विचारल्या पद्धतीने सर्व माहिती प्रविष्ट करून द्यावी व सर्व माहिती टाकून झाल्यानंतर जतन करावे.
अर्ज शुल्क
अर्ज शुल्क:- अर्ज सादर करतेवेळी शेतकऱ्यांनी रु. २०/- शुल्क व रु. ३.६०/- जी.एस.टी. मिळून एकूण रु.२३.६०/- शुल्क ऑनलाईन भरावा लागणार आहे.
अशा पद्धतीने वरील पायऱ्यांचा व्यवस्थितरित्या वापर करून सहज रित्या फळबाग योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता व अनुदान मिळऊ शकता.
तुमचे फॉर्म सबमिट झाल्यानंतर 25 ते 30 दिवसाच्या नंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम थेट डीबीटी/ DBT च्या मार्फत मिळून जाईल. तरी या योजनेचा सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा व गरजूवंता पर्यंत ही माहिती शेअर करा.
धन्यवाद !