Magel Tyala Saur Status Check Payment Option मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अर्ज मंजूर असे पहा पेमेंट स्टेटस

Magel Tyala Saur Status 2024– मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत ज्या शेतकरी वर्गाने सप्टेंबर महिन्या पासून ऑक्टोबर या महिन्यांमध्ये अर्ज केलेले असतील अशा सर्व शेतकऱ्यांना पेमेंट ऑप्शन आलेले आहे.

तरी मुख्यमंत्री मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत सौर पंपासाठी कशा पद्धतीने पेमेंट भरणा करावा याबद्दल सर्व माहिती आपण पाहणार आहोत.

Magel Tyala Saur योजनेबद्दल महत्वाचे अपडेट

मुख्यमंत्री मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना सोनार पंपाच्या बाबतीत पैसे भरण्या करण्याकरिता एसएमएस आलेले असतील किंवा ज्या शेतकऱ्यांनी याबद्दल ऑनलाईन आपल्या अर्जाची स्थिती पाहिली आहे.

अशा शेतकऱ्यांनी सोलर पंप ची पेमेंट करण्याकरिता काही करू नये कारण तुम्ही पैसे भरणार करताय ते पैसे पोर्टल वरती अपडेट होण्यास खूप वेळ लागत आहे.

हे नक्की वाचा : मागेल त्याला सौर कृषी पंप असा करा अर्ज 

मुख्यमंत्री मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेचे पोर्टल सद्यस्थितीमध्ये अपडेट होणे चालू आहे तरी शेतकऱ्यांनी पेमेंट करण्यास घाई करू नये.

Magel Tyala Saur Status
Magel Tyala Saur Status

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अर्ज स्थिती असे पहा

मुख्यमंत्री मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेमध्ये आपण केलेल्या अर्जाची स्थिती पाहण्याकरिता खालील दिलेल्या पद्धतीचा व्यवस्थितरित्या वापर करून तुम्ही स्वतः माहिती तपासून शकता

  • मुख्यमंत्री मागेल त्याला सौर कृषी पंप अर्जाची स्थिती पाहण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
  • शासनाच्या वरील लिंक वरती आल्यानंतर आपल्यासमोर खालील दिलेल्या पद्धतीने एक पेज ओपन होईल, त्यामध्ये Magel Tyala saur krushi pump Yojana. या नावाने एक ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वरती क्लिक करा.
  • या ऑप्शन वरती आल्यानंतर परत आपल्यासमोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये बेनिफिशरी सर्विस (Beneficiary Service) या पर्यायांमध्ये जावे
Application Current StatusClick Here
Application Make PaymentClick Here
  • या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर खालील टॅब ओपन होईल त्यामध्ये बेनिफिशरी आयडी म्हणजे आपण अर्ज केल्यानंतर जो पावती क्रमांक मिळालेला आहे तो पावती क्रमांक येथे टाकून सर्च करा.

सर्च च्या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या अर्जाची सर्व माहिती खाली दिसेल जसे की,

  • शेतकऱ्याचे नाव.
  • मोबाईल नंबर
  • आधार क्रमांक
  • कास्ट कॅटेगिरी आणि
  • सौर पंप कॅपॅसिटी

वरील सर्व माहिती बरोबर असल्याचे खात्री करा आणि त्यानंतरच खाली दिलेल्या प्रोसिड टू पेमेंट वरती क्लिक करून अर्जाची पेमेंट करू शकता.

या ऑप्शन वरती आल्यानंतर आपल्या अर्जाची पूर्ण कोटेशन आपल्यासमोर दिसते, कोटेशन ची रक्कम चेक करून घ्या आणि फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे कंडिशन मान्य करून पे (Pay Now) या बटनाला क्लिक करा.

तसेच पेमेंट करण्याकरिता विविध पेमेंट मेथड आपल्यासमोर दिसतील त्यापैकी आपल्याकडे जो पेमेंटचा सोर्स असेल त्या पद्धतीने आपण पेमेंट करू शकता.

अशा पद्धतीने आपण वरील सांगितलेल्या पद्धतीचा व्यवस्थित रित्या वापर करून अगदी सोप्या पद्धतीने मुख्यमंत्री मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेमध्ये आपल्या अर्जाची पेमेंट करू शकता.

सद्य परिस्थितीमध्ये पेमेंट करणे टाळावे कारण आपली पेमेंट शासनाचे पोर्टल वरती काम चालू असल्यामुळे पेमेंट स्टेटस अपलोड होत नाही.

वेबसाईट व्यवस्थित रित्या सुरू झाल्यानंतर आपल्याला याच पेज वरती कळविण्यात येईल.

अशाच नव-नवीन योजनेबद्दल अधिक माहिती करिता आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.

हा ग्रुप Private ग्रुप असल्यामुळे आपला नंबर फक्त ग्रुप admin लाच दिसेल तरी निश्चिंत ग्रुप join करा.

1 thought on “Magel Tyala Saur Status Check Payment Option मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अर्ज मंजूर असे पहा पेमेंट स्टेटस”

Leave a Comment