Pm Drone Yojana Apply Online 2024– प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान ड्रोन योजना सुरुवात केलेली असून याचा मुख्य उद्देश हा की भारतीय शेतकऱ्यांना आधुनिकी शेती करण्यास प्रोत्साहन देणे हा आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी करण्याकरिता शासनामार्फत आर्थिक मदत देखील दिली जाणार आहे.
पीएम ड्रोन या योजनेअंतर्गत भारतीय शेतकऱ्यांना आधुनिकीकरणाचा उपयोग करून शेती करत असताना शेतीमध्ये खत आणि फवारणी करिता उपयोग होईल.
Pm Drone Yojana Apply अनुदानाची रक्कम
पी एम किसान ड्रोन या योजनेअंतर्गत विविध वर्गातील आणि विविध विभागातील शेतकऱ्यांना कृषी उद्देशांसाठी ड्रोन खरेदी करण्याकरिता वेगवेगळ्या रकमेची तरतूद केलेली आहे जसे की,
- कास्ट कॅटेगिरी नुसार SC, ST या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 5 लाख रुपये किंवा 50% यापैकी जे जास्त असेल ते अनुदान रूपात दिले जाईल.
- अल्पभूधारक शेतकरी महिला आणि ईशान्य राज्यातील शेतकऱ्यांना देखील 5 लाख रुपये किंवा 50% पेक्षा जास्त जी रक्कम जास्त असेल ती रक्कम अनुदानाच्या रूपांमध्ये दिली जाईल.
- इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना 4 लाख रुपये किंवा 40% यापैकी जी रक्कम जास्त असेल ती रक्कम अनुदानाच्या रूपामध्ये दिली जाईल.
- शेतकरी उत्पादक संघटना म्हणजेच FPO याकरिता 75 टक्के पर्यंत अनुदान दिले जाईल
हे नक्की वाचा : ई श्रम कार्ड केवायसी प्रक्रिया 2024
किसान ड्रोन योजना आवश्यक कागदपत्रे
या योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता शेतकऱ्यांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे जसे की,
- शेतकऱ्यांचे आधार कार्ड
- राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
- चालू सातबारा
- आठ अ उतारा
- कास्ट सर्टिफिकेट (लाभार्थी शेतकरी जर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती या प्रवर्गामध्ये मोडत असेल तर आवश्यक)
- उत्पन्न प्रमाणपत्र (अनुसूचित जाती आणि जमाती या प्रवर्गातील लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे, उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे आपला अर्ज मंजूर झाल्यानंतर लागेल अर्ज करत असताना उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही)
- पॅन कार्ड (असेल तर )
- अपंग प्रमाणपत्र (शेतकरी दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करत असेल तर आवश्यक)
आधिकारिक वेबसाइट | येथे क्लिक करा |
महिलांसाठी Private Group | येथे क्लिक करा |
हेल्पलाइन नं. | 022-61316429 |
किसान ड्रोन योजना नोंदणी प्रक्रिया
या योजनेसाठी शेतकरी वर्ग घरबसल्या आपल्या मोबाईलच्या सहाय्याने किंवा लॅपटॉपच्या सहाय्याने स्वतः अर्ज करू शकतात तेही अगदी सोप्या पद्धतीने.
खाली दिलेली माहिती व्यवस्थित रित्या वाचून घ्या आणि सांगितलेल्या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या. या योजनेसाठी अर्ज करण्याकरिता सर्वप्रथम शासनाचा अधिकृत वेबसाईट वरती यावे लागेल. वेबसाईट ची लिंक खालील टेबला क्लिक करून तुम्ही अधिकृत वेबसाईट वरती येऊ शकाल.
- वरील लिंक वरती आल्यानंतर तुम्हाला अर्जदार लोगिन चे ऑप्शन दिसेल. जर आपण या योजनेअंतर्गत अगोदर अर्ज केला असेल तर या ऑप्शनच्या सहाय्याने तुम्ही लॉगिन करून घेऊ शकता.
- लॉगिन करण्या करिता आपल्यासमोर दोन ऑप्शन दिसतील जसे की, वापरकरता आयडी आणि आधार क्रमांक यापैकी कोणत्याही एका च्या सहाय्याने तुम्ही अर्जदार लॉगिन करू शकता.
जर तुम्ही या अगोदर नोंदणी केलेली नसेल तर खालील लिंक ला क्लिक करून नवीन नोंदणी अगदी सोप्या पद्धतीने करू शकता.
शेतकरी नवीन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा
वरती सांगितलेल्या पद्धतीने नवीन अर्जदार नोंदणी केल्यानंतर मुख्य प्रष्ट वरती या त्यानंतर आपल्यासमोर अर्ज करा म्हणून एक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून द्या.
या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर विविध ऑप्शन दिसतील जसे की,
- कृषी यांत्रिकीकरण
- सिंचन साधने व सुविधा
- बियाणे,औषधे व खते
- फलोत्पादन
- अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना. (फक्त SC आणि ST या प्रवर्गासाठी)
- सौर कुंपण.
यापैकी पीएम ड्रोन या योजनेसाठी अर्ज करण्याकरिता कृषी यांत्रिकीकरण या कॅटेगिरी मधून अर्ज करता येईल त्यासाठी कृषी यांत्रिकीकरण या पर्यायावर बाबी निवडा याला क्लिक करा.
आपल्यासमोर खाली दिलेल्या पद्धतीने एक पेज ओपन होईल त्यामध्ये मुख्य घटक या पर्यायावरती भाडे तत्त्वावरील सेवा सुविधा केंद्र हे ऑप्शन निवडावे.
त्यानंतर तपशील मध्ये आपल्यासमोर चार ऑप्शन दिसतील त्यापैकी जर आपण वैयक्तिक शेतकरी म्हणून अर्ज करत असाल तर एक नंबरचे ऑप्शन निवडावे.
जसे की, establishment of CHCs/Hi-Tech hubs by the agriculture graduate. हा पर्याय निवडून घ्या.
जर तुम्ही, शेतकरी उत्पादक संघटना याचा अंतर्गत अर्ज करू इच्छित असाल तर दोन नंबरचे ऑप्शन निवडावे लागेल.
वरील ऑप्शन निवडल्यानंतर आपल्यासमोर यंत्रसामग्री, अवजारे किंवा उपकरणे म्हणून एक ऑप्शन दिसेल त्यामध्ये किसान ड्रोन (लहान व मध्यम) हा पर्याय दिसेल त्याला निवडा.
आणि शेवटी खाली दिलेली अट मान्य करून अर्ज जतन करा या पर्यायावर क्लिक करून घ्या.
अशा पद्धतीने तुम्ही वरील सांगितलेल्या पद्धतीचा व्यवस्थितरीत्या वापर करून स्वतः घरबसल्या प्रधानमंत्री ड्रोन या योजनेसाठी अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकता.
आपली सर्व माहिती व्यवस्तीत रित्या भरून झाल्या नंतर परत एकदा मुख्य प्रष्टावर या आणि अर्ज करा या वरती क्लिक करा. त्यानंतर वरती दिलेल्या फोटो प्रमाणे अर्ज सादर करा या या वरती क्लिक करून आपला अर्ज अंतिम सबमिट होईल. अर्ज सबमिट झाल्या नंतर आपण निवडलेल्या बाबी दिसतील त्या बाबी करिता अर्जाची फीस भूरून घ्या.
अर्जाची फीस २३ रुपये आहे. फीस भरल्या नंतर आपण केलेल्या अर्जाची पावती प्रिंट करून घ्या.
अर्ज केल्या नंतर पुढील सर्व प्रक्रिया या पेज च्या माध्यमातून कळवली जाईल.
अशाच नव-नवीन योजनेबद्दल अधिक माहिती करिता आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.
हा ग्रुप Private ग्रुप असल्यामुळे आपला नंबर फक्त ग्रुप admin लाच दिसेल तरी निश्चिंत ग्रुप join करा.
- Agri Stack Registration Farmer ID 2025 असे बनवा शेतकरी ओळखपत्र शेतकरी आयडी
- Pik Vima New Update 2024 पिक विमा घोटाळा चौकशी
- Anudan E kyc Process अतिवृष्टी अनुदान ई केवायसी प्रक्रिया 2024
- Ladki bahin yojana status check maharashtra 2024 लाडकी बहिण योजना स्थिती
- Favarni pump Yojana Application Process 2024 मोफत फवारणी पंप योजना अर्ज करा घर बसल्या