Free Tab Yojana 2024 – महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती – विमुक्त जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांना येत्या 2026 च्या JEE/NEET/MHT-CET करिता परीक्षेची पूर्व प्रशिक्षण हे ऑनलाइन पद्धतीने महा ज्योती अंतर्गत देण्यात येणार आहे. त्याकरिता महा ज्योती नागपूर अंतर्गत अशा सर्व विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत जे सीईटी/नीट/जेईई 2026 च्या परीक्षेची तयारी करत आहेत.
ऑनलाइन प्रशिक्षणासाठी महा ज्योती नागपूर अंतर्गत वरील जमातीतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत टॅब आणि 6 GB/Day इंटरनेट डाटा विद्यार्थ्यांना दररोज देणार आहेत. Free Tab Yojana 2024
या योजने करिता पात्रता
- सर्वप्रथम विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा किंवा असावी.
- मोफत टॅब योजनेमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी दोघांनाही या योजनेचा लाभ घेता येईल.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी हा इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा किंवा असावा तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा तरच तो या योजनेस पात्र ठरेल.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे जो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी सन 2024 मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेला असेल तोच विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असेल.
- मोफत टॅब योजने करिता विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. तसेच याबाबतची सर्व कागदपत्रे स्पष्ट आणि व्यवस्थितरित्या आपण भरत असलेल्या अर्जासोबत दाखल करणे बंधनकारक आहे.
- तसेच या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची निवड ही त्यांनी 10 वी च्या परीक्षेमध्ये मिळविलेल्या टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येणार आहे.
- विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे हे विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या त्यांच्या आधार कार्ड वरील पत्त्यानुसार ठरविला जाईल.
- या योजनेमध्ये इयत्ता 10 वी मध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांकरिता 70 टक्के किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता 60 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे.
हे देखील वाचा : SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी JEE आणि NEET परीक्षा मोफत प्रशिक्षण
अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे
- सर्वप्रथम विद्यार्थ्यांकडे स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. (आधार कार्डची समोरची बाजू आणि मागची बाजू सहित)
- विद्यार्थ्याचे जातीचे प्रमाणपत्र (cast certificate)
- रहिवासी प्रमाणपत्र (Domicile certificate)
- वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र. (Valid Non creamy layer certificate)
- दहावी मार्कशीट. (SSC Marksheet)
- विज्ञान शाखेत प्रवेशी घेतलेली पावती किंवा दाखला. (कॉलेजमधील बोनाफाईड सर्टिफिकेट)
- दिव्यांग प्रमाणपत्र.(विद्यार्थी दिव्यांग असेल तर)
- अनाथ प्रमाणपत्र.
वरील सर्व कागदपत्रे विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यापूर्वी व्यवस्थितरीत्या स्कॅन करून घ्यावी.
अर्ज करण्याकरिता अंतिम दिनांक | 10 जुलै 2024 |
आरक्षण
मोफत टॅब योजने अंतर्गत सामाजिक प्रवर्ग आणि समांतर आरक्षण खालील प्रमाणे-
अ क्र. | सामाजिक प्रवर्ग | टक्केवारी |
1 | इतर मागास वर्ग (OBC) | 59 % |
2 | भटक्या जमाती ब (NT-B) | 8 % |
3 | भटक्या जमाती क (NT-C) | 11 % |
4 | भटक्या जमाती ड (NT-D) | 6 % |
5 | विशेष मागास प्रवर्ग (SBC) | 6 % |
6 | विरधीसूचती जमाती- अ (VJ-A) | 10 % |
समांतर आरक्षण
- दिव्यांगा करिता 4 % जागा आरक्षित राहतील.
- प्रवर्गनिहाय महिलांकरिता 30% जागा आरक्षित आहेत.
- अनाथ विद्यार्थ्यांकरिता 1% जागा आरक्षित आहे.
Free Tab Yojana अर्ज प्रक्रिया
महाज्योती नागपूर अंतर्गत मोफत टॅब या योजने करिता पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी विद्यार्थ्यांना फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज अंतिम मुदतीच्या आत दाखल करता येणार आहेत.
विद्यार्थ्यांना अर्ज करण्याकरिता सर्वप्रथम महाज्योती च्या मुख्य वेबसाईट/अधिकृत वेबसाईट वरती यावे लागेल.
वरती दिलेल्या अधिकृत वेबसाईट वरती आल्यानंतर आपल्यासमोर महाज्योती मुख्य पेज ओपन होईल त्यामध्ये नोटीस बोर्ड (notice board) हे ऑप्शन दिसेल त्यामध्ये Application for JEE/NEET/MHT-CET batch 2026 Training हे ऑप्शन सापडून त्यावरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
जर हे ऑप्शन सापडल्यास अडचण येत असेल तर खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज करण्याच्या पेज वरती जाऊन अर्ज करू शकता.
लिंक वरती आल्यानंतर आपल्यासमोर ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पेज ओपन होईल त्यामध्ये विचारलेल्या पद्धतीने आवश्यक ती माहिती व्यवस्थितरीत्या भरून तुम्ही मोफत टॅब योजना करिता अर्ज करू शकता.
जर आपणास अर्ज करण्याकरिता काही अडचणी येत असेल तर तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करून संपर्क करू शकता. आमचा ग्रुप हा प्रायव्हेट ग्रुप असल्यामुळे आपला मोबाईल नंबर हा फक्त ग्रुप ॲडमिनलाच दिसेल त्यामुळे तुम्ही निश्चित ग्रुप जॉईन करू शकता.
मोफत टॅब योजना करिता अटी आणि शर्ती
- विद्यार्थ्यांना अर्ज करण्याकरिता अंतिम दिनांक 10 जुलै 2024 आहे.
- महा ज्योती नागपूर अंतर्गत मोफत टॅब योजना 2024 ही पूर्णतः ऑनलाइन पद्धतीने असून जर विद्यार्थ्यांनी पोस्टाने किंवा ईमेल द्वारे अर्ज पाठवले तर अशा अर्जांचा विचार केला जाणार नाही आणि ते अर्ज अपात्र ठरतील.
- या योजनेची जाहिरात रद्द करणे, अंतिम मुदत वाढविणे, अर्जंट नाकारणे व स्वीकारणे तसेच निवडीची पद्धती बदलणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महा ज्योती यांचे अधीन राहतील.
- कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती जर चुकीची किंवा दोष पूर्व आणि दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येईल.
जर विद्यार्थ्यांना अर्ज करत असताना अर्ज प्रक्रियेमध्ये जर काही अडचण असेल किंवा योजनेबद्दल काही तक्रार असेल तर त्यांनी अशा अडचणीच्या वेळेस केवळ महाज्योतीच्या कॉल सेंटर वरती संपर्क करू शकता. Free Tab Yojana 2024
संपर्क क्रमांक- 0712-2870120/21
E-Mail Id- mahajyotimpsc21@gmail.com
महा ज्योती बद्दल थोडक्यात माहिती
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारार्थ कार्याचा वसा चालविण्याकरिता तसेच त्यांच्या विचारातला सुशिक्षित समाज निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकासासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची म्हणजेच महाज्योती ची स्थापना शासन निर्णय दिनांक 8 ऑगस्ट 2019 अन्वये केली आहे.
कौशल्य विकास प्रशिक्षण तसेच रोजगार, स्वयंरोजगार, औद्योगिक घटकांची उभारणी व विकास यासाठी क्षमता निर्मित करणे, विविध सर्वेक्षण आणि संशोधन करून एक डाटा बँक तसेच ग्रंथालय आणि ज्ञान बँक विविध क्षेत्रातील अभ्यास व समन्वय मंडळ स्थापन करणे आणि त्यांची देखरेख करणे हे या मंडळा अंतर्गत केली जाते.
महा ज्योती अंतर्गत महाराष्ट्रातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात समान संधी प्राप्त व्हावी आणि याच हेतूने पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण, JEE/NEET/MHT – CET, MPSC तसेच UPSC यांसारख्या स्पर्धात्मक परीक्षांचे प्रशिक्षण देण्यात येते.
त्याच पद्धतीने उमेदवारांना रोजगाराची संधी मिळावी याकरिता कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात देखील येतो तसेच विविध संशोधन कार्याला प्रोत्साहन मिळावे याकरिता पीएचडी व एम.फिल करणाऱ्या उमेदवारांना अधीछात्रवृती देखील प्रदान करण्यात येते. Free Tab Yojana 2024
अशाच नवनवीन शासकीय योजनांविषयी, शेतकरी योजना बद्दल तसेच नवीन भरती बद्दल अपडेट करिता आमच्या पेज ला join करा.
- jee mains 2024 Application Process And Last Date.
- Pocra Yojana Maharashtra 2024 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा योजना
- Voter id Download मतदान कार्ड डाउनलोड महाराष्ट्र 2024
- Voter id Important Update 2024. मतदान करत असताना काळजी घ्या नाहीतर गुन्हा दाखल होणार
- Passport Application Process 2024.पासपोर्ट सेवा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
Tab