Ayushman Bharat Card Apply आयुष्मान भारत योजना 2024.

Ayushman Bharat Card Apply

Ayushman Bharat Card Apply 2024 –देशातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांसाठी भारत सरकार द्वारे आयुष्यमान भारत योजना राबविण्यात आलेली आहे. देशातील गरीब नागरिकांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची व नाविन्यपूर्ण योजना सरकारकडून करण्यात आलेली आहे.

Table of Contents


आयुष्मान योजनेचा लाभ कोणकोण घेऊ शकतात? आयुष्मान भारत योजना पात्रता-

आयुष्मान योजना का लाभ कौन ले सकता है?

  • आयुष्यमान भारत योजना ही देशातील अशा सर्व लोकांना आरोग्य सेवा सुरक्षा कवच प्रदान करते, ज्यांचे वार्षिक उत्पन्न अतिशय कमी आहे.
  • तसेच या योजनेचा लाभ गरीब आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या नागरिकांना दिला जातो.
  • नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी भारत सरकारने काही नियम व अटी ठेवलेल्या आहेत. या नियमानुसार ज्या कुटुंबांच्या घराच्या भिंती व छताची बांधणी कच्च्या स्वरूपात आहे, अशा ग्रामीण भागातील कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येईल.
  • तसेच आदिवासी एस सी/एसटी, रोजंदारी करणारे मजूर, भूमिहीन नागरीक, दिव्यांग व्यक्ती अशा नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेच्या योजनेमध्ये सहभागी केले जात आहे.
  • आयुष्यमान भारत योजनेमध्ये 2024 च्या अगोदर फक्त ठराविक नागरिकांनाच या योजनेचा लाभ घेता येत होता. आता नव्याने यामध्ये जर नागरिकांकडे पांढरे राशन कार्ड असेल तरीही ते या योजनेसाठी नोंदणी करू शकतात.
  • या अगोदर आशा वर्कर्स या योजनेमध्ये पात्र नव्हत्या, परंतु नवीन सूचनानुसार आशा वर्कर्स सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सरकारी किंवा सूचीबद्ध केलेल्या खाजगी रुग्णालया अंतर्गत उपचारासाठी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत सुविधा पुरविली जाते.Ayushman Bharat Card Apply 2024.

हे नक्की वाचा: पी एम किसान योजनेचा 17 वा हप्ता तारीख

सर्व नागरिक आयुष्मान भारत कार्ड काढू शकतील

  • सद्य स्थिती मध्ये फक्त ठराविक नागरिकांनाच या योजने चा लाभ घेता येत होता. परंतु आता मिळालेल्या नवीन सूचनेनुसार जे नागरिक राशन कार्ड धारक आहेत त्या सर्वांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  • त्याकरिता नागरिकांनी जवळील csc सेंटर वरती जाऊन अर्ज करू शकता किंवा जर स्वतः करत असाल तर खाली दिलेल्या नोंदणी प्रक्रियेचा व्यवस्थितरीत्या वापर करून अर्ज करू शकता.
  • अर्ज करत असताना Sub Scheme या पर्यायावरती येऊन तेथे White Ration Card पांढरे राशन कार्ड Select करून त्यामध्ये आपला राशन कार्ड क्रमांक टाकावा आणि सांगितल्या पद्धतीने नोंदणी करून आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता.

आयुष्यमान भारत योजने अंतर्गत कोण कोणत्या आजारांवर मिळतील मोफत उपचार?

आयुष्यमान भारत योजने अंतर्गत जारी करण्यात आलेल्या आयुष्मान गोल्डन कार्डचा माध्यमातून जुन्या तसेच नव्या अशा सर्व आजारावरती आता नागरिकांना मोफत उपचार मिळत आहे.

आयुष्यमान भारत योजनेमध्ये कॅन्सर सारख्या गंभीर आजारा व्यतिरिक्त अधिक दीड हजाराहून आजारांचाही नव्याने यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

भारतीय नागरी या योजनेच्या माध्यमातून 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेऊ शकतात. Ayushman Bharat Card Apply 2024.

👉👉👉आयुष्यमान भारत योजने अंतर्गत मोफत दवाखान्याची यादी येथे पहा 👈👈👈

आयुष्यमान भारत योजनेचे फायदे

  • ही जगातील सर्वात मोठी वैद्यकीय विमा योजना आहे जी भारत सरकारद्वारे वित्तपुरवठा केली जाते. भारताचे यात उपचार खर्च, खोलीचे शुल्क, डॉक्टरांचे शुल्क, ऑपरेशन थिएटर, आयसीयू, निदान सेवा, सर्जन शुल्क इत्यादींसह जवळपास 1,393 प्रक्रियांचा समावेश आहे.
  • कव्हरेज रक्कम 5 लाख रुपयांपर्यंत आहे.
  • दुय्यम आणि तृतीयक काळजी हॉस्पिटलायझेशन दोन्ही समाविष्ट आहे.
  • 3 दिवसांचे प्री-हॉस्पिटल कव्हर 3 दिवसांसाठी आणि पोस्ट-हॉस्पिटल कव्हर 15 दिवसांसाठी आहे ज्यात औषधे आणि निदान समाविष्ट आहे.
  • भारतातील खाजगी आणि सार्वजनिक पॅनेल हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलायझेशन कव्हर लाभार्थ्यांना कॅशलेस हॉस्पिटलायझेशन कव्हर ऑफर केले जाते.
  • त्यात पहिल्या दिवसापासून अस्तित्वात असलेल्या आजारांचा समावेश होतो.
  • या योजनेत वय, कौटुंबिक आकार आणि लिंग यावर बंधने घातलेली नाहीत.
  • योजनेचे फायदे पॅन इंडियावर उपलब्ध आहेत; भारतातील कोणत्याही सार्वजनिक किंवा खाजगी रुग्णालयात तुम्ही कॅशलेस उपचार घेऊ शकता. Ayushman Bharat Card Apply 2024.

हे नक्की वाचा: बांधकाम कामगार नवीन अर्जदार नोंदणी

आयुष्मान कार्ड के लिए आवेदन कैसे करें? आयुष्यमान कार्ड नोंदणी प्रक्रिया.

सर्वप्रथम नागरिकांनी आपण या योजनेस पात्र आहोत की नाही हे तपासून घ्यावे. या योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी नागरिक दोन पद्धतीने या योजनेसाठी नोंदणी करू शकतात, जसे की –

  • ऑनलाइन पद्धतीने
  • आशा वर्कर्स च्या माध्यमातून.

Ayushman Bharat Card Apply ऑनलाइन पद्धतीने

या योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या स्वतःच्या मोबाईलवरून नोंदणी करून आयुष्मान कार्ड मिळू शकतात. या योजनेत नोंदणी करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आयुष्मान भारत योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती यावे लागेल. अधिकृत वेबसाईट वरती जाण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा-

वरी दिलेल्या लिंक वरती आल्यानंतर आपल्यासमोर लॉगिन करण्या साठी ऑप्शन दिसेल, त्यामध्ये login as a beneficiary and operator असे दोन ऑप्शन दिसतील. त्यापैकी तुम्ही बेनिफिशरी beneficiary हे ऑप्शन सिलेक्ट करून तुमचा मोबाईल क्रमांक टाकून घ्या आणि मोबाईल ओटीपी सिलेक्ट करून मोबाईल वरती आलेला ओटीपी टाकून लॉगिन करून घ्या.

Ayushman Bharat Card Apply
Ayushman Bharat Card Apply

अर्जदार लोगिन केल्यानंतर तुमच्यासमोर खाली दिल्याप्रमाणे पेज ओपन होईल त्यामध्ये तुमचे राज्य जसे की महाराष्ट्र आणि Sub Scheme दिलेल्या यादीप्रमाणे टाकून घ्या. जसे की

जर तुमच्याकडे केसरी कलरचे रेशन कार्ड असेल तर तुम्ही PMJAY-MJPJAY हे ऑप्शन सिलेक्ट करावे,

जर पांढरे राशन कार्ड धारक असेल तर white ration card सिलेक्ट करा, त्यानंतर तुमचा जिल्हा निवडून search by या अक्षर मध्ये, जर तुमच्याकडे राशन कार्ड असेल तर फॅमिली आयडी सिलेक्ट करून राशन कार्ड क्रमांकाच्या सहाय्याने तुम्ही तुमचे नाव तपासून शकता, तसेच आधार नंबरच्या साहाय्याने देखील तुम्ही नोंदणी करू शकता, आयुष्यमान कार्ड योजनेअंतर्गत मिळालेल्या पीएम लेटर वरील PMJAY ID क्रमांक टाकू शकता. Ayushman Bharat Card Apply 2024.

Ayushman Bharat Card Apply
Ayushman Bharat Card Apply

जर यापैकी काहीच कागदपत्र नसतील तर तुम्ही तुमचे नाव टाकून अर्ज करू शकता.

आधार नंबर किंवा नाव टाकल्यानंतर आपल्यासमोर कुटुंबातील सर्व व्यक्तींचे नाव दिसतील व नावासमोर ई केवायसी (EKyc) चे ऑप्शन दिसेल त्याला क्लिक करून घ्या आणि विचारलेल्या पद्धतीने सर्व आवश्यक ती माहिती टाकून आणि अर्जदाराचा फोटो अपलोड करून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.

अर्ज दाखल केल्यानंतर जर तुमची केवायसी डिटेल्स 85% पेक्षा जास्त वेरिफाय झाल्यास तुमचे आयुष्यमान कार्ड हे लगेचच तुम्हाला डाऊनलोड करता येईल.

तसेच जर तुमची ई केवायसी डिटेल्स 85% पेक्षा कमी आल्यास तुमचा डेटा अर्ज दाखल केल्यापासून व्हेरिफाय होण्यासाठी कमीत कमी तीन दिवसा च्या आत मध्ये तुमचे आयुष्यमान भारत कार्ड तयार होईल.

वरील सांगितल्याप्रमाणे सर्व माहितीचा व्यवस्थितरित्या वापर करून तुम्ही घरी बसल्या स्वतः तुमच्या मोबाईलवरून आयुष्यमान भारत कार्ड काढू शकता.

जर काही अडचणीत असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता त्यासाठी खालील ग्रुप जॉईन करून घ्या. हा ग्रुप प्रायवेट असल्या मुले आपला मो नंबर फक्त admin लाच दिसेल-

जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येत नसेल तर तुम्ही जवळील सीएससी केंद्रावरती जाऊन अर्ज करू शकता किंवा गावातील आशा वर्कर शी संपर्क करून देखील नोंदणी करू शकता. आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता.


आयुष्मान भारत योजना अपात्रता, आयुष्मान कार्ड कौन नहीं बनवा सकता?

  • जे व्यक्ती सरकारी कर्मचारी आहेत
  • ज्यांचा PF (पफ) काटला जातो
  • जे व्यक्ती संघटीत क्षेत्रामध्ये काम करतात.
  • Tax भरणारे नागरिक

या पैकी कोणतेही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.अपात्र ठरतील. Ayushman Bharat Card Apply 2024.


वार्षिक उत्पन्न मर्यादा, आयुष्मान कार्ड बनवाने के लिए वार्षिक आय कितनी होनी चाहिए?

आयुष्यमान भारत कार्ड बनविण्यासाठी आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न हे 1 लाख रुपयांच्या आत मध्ये असणे आवश्यक आहे. जर उत्पन्न अधिक असेल तर तुम्ही या योजनेस अपात्र ठराल.

जर आपण देखील या योजनेचा लाभ घेतला नसेल तर आपण हि या योजनेची पात्रता तपासून घ्या आणि या योजनेत वारी दिल्या प्रमाणे नोंदणी करून घ्या आणि 5 लाख रुपयापर्यंत वैद्यकीय योजनेचा लाभ घ्या.

तसेच हि माहिती आपल्या जवळील मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की share करा जेणे करून ते देखील याचा लाभ घेऊ शकतील.

तुम्ही आयुष्मान भारत कार्ड साठी नोंदणी केल्यानंतर आयुष्मान भारत कार्ड कसे download करायचे ते आपण पुढील लेख मध्ये पाहू.

Leave a Comment