Free Shilai Machine Yojana 2024-भारत सरकार यांनी महिलांसाठी मोफत शिलाई मशीन योजने ची सुरुवात केली आहे.ग्रामीण भागामध्ये बऱ्याच महिला शिलाई काम करतात ज्या फक्त शिलाई कामावरती अवलंबून आहेत अशा महिलासाठी Pm विश्वकर्मा योजने अंतर्गत 15000 रुपयाचे लाभ भेटू शेकते.
जर तुम्ही शिलाई काम करत असाल तर यामध्ये तुम्हाला लाभ घेता येतो.जर तुम्हाला या योजनेचा फायदा घेयचा असेल तर हि माहिती सेव्ह करून ठेवा.
Free Shilai Machine Yojana 2024 पात्रता :-
- PM विश्वकर्मा मोफत शिलाई मशीनसाठी फक्त महिलाच नव्हे तर पुरुषांनाही या योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम नागरिकांचे वार्षिक उत्पन्न हे 1लाख 80 हजार रुपयांपेक्षा जास्त नसले पाहिजे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे नाव हे बीपीएल सूची मध्ये असले पाहिजे.
- हि योजना फक्त भारतीयानसाठीच आहे.
- अर्जदार एकतर कुशल कारागीर किंवा कारागीर असणे आवश्यक आहे.
- वय १८ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.
- या योजनेमध्ये महिला आणि विधवा महिला यांना प्राधान्य दिले आहे.
Free Shilai Machine Yojana उद्देश –
- अनेक महिला कामगार व विविध जातींतील गरीब कामगार हे शासणाच्या अनेक आर्थिक योजनेपासून आत्तापर्यंत वंचित आहेत तर त्यांना त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी व रोजगार निर्माण करण्यासाठी या योजने ची सुरुवात झालेली आहे.
- PM विश्वकर्मा योजने अंतर्गत अशा सर्व कामगार्रांना ज्यांच्या कडे प्रशिक्षण घेण्यासाठी पैसे नाहीत त्यांना या योजने अंतर्गत फ्री मध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. व प्रमाणपत्र व ओळखपत्र देखील दिले जाणार आहे.
PM विश्वकर्मा योजने अंतर्गत फ्री शिलाई मशीन साठी 15000 रुपये अनुदान दिले जाणार आहे.
PM Vishvkarma मोफत शिलाई मशीन योजनेचा जर लाभ घेयचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला Official Website वरती online अर्ज दाखल करावा लागतो.
या योजनेमध्ये फक्त शिलाई मशीनच नव्हे तर आणखी १८ प्रकारची कामे करणारे कामगार यामध्ये अर्ज करू शकतात.
या योजने मध्ये लोहार, सुतार, कुंभार,पांचाळ व अशा १४० हून अधिक जातींना लाभ मिळणार आहे.या योजने अंतर्गत लाभधारकांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार मिळावा या साठी सुरुवातीच्या वर्षी 100000 (एक लाख रु ) कमी व्याज दारावर कर्ज दिले जाते जेणे करून ते आपला व्यवसायामध्ये वाढ करून देशाच्या विकासासाठी हातभार लाऊ शकतील व रोजगार हि निर्माण करू शकतील.
या योजने मार्फत प्रशिक्षण घेतल्या नंतर त्यांना प्रशिक्षण प्रमाणपत्र व एक ओळख प्रमाणपत्र देखील दिले जाईल जेणे करून या कामगाराना एक नवीन ओळख प्राप्त होईल.
या प्रशिक्षणामध्ये दररोज ५०० रुपयाप्रमाणे पैसे देखील दिले जातील व कामगारांना/ लाभार्थींना व्यवसायाची टूल कीट (TOOL KIT) खरेदी करण्यासाठी प्रत्यकी १५००० देखील अनुदानाच्या स्वरुपात दिले जाणार आहेत.
या योजनेअंतर्गत, ₹ 300000 चे कर्ज 5% व्याजा च्या वार्षिक दराने दिले जाते, ज्यामध्ये पहिल्या टप्प्यात ₹ 100000 चे कर्ज दिले जाते आणि दुसऱ्या टप्प्यात ₹ 200000 चे कर्ज दिले जाते.
बचत गटातील महिलांनी याचा 100 % लाभ घ्यावा.
हे देखील वाचा : अण्णाभाऊ साठे कर्ज योजना 2024
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा लाभ कोणाला मिळणार?
- शिंपी/ शिलाई कामगार
- लोहार
- सोनार
- मोची
- नाई
- वॉशरमन
- कुंभार
- शिल्पकार
- सुतार
- जपमाळ
- मिस्त्री
- बोट बांधणारे
- शस्त्रे निर्माते
- लॉकस्मिथ
- फिश नेट निर्माते
- हातोडा आणि टूलकिट निर्माता
- टोपली, चटई, झाडू निर्माते
- पारंपारिक बाहुली आणि खेळणी निर्माते
आवश्यक कागदपत्रे :-
१) सर्वप्रथम अर्जदाराकडे त्यांचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे *
(आधार कार्ड हे updated लागते, जसे कि आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असावा व पत्त्या मध्ये वडिलाचे किंवा महिलेसाठी पतीचे नाव असणे आवश्यक आहे )
मोबाईल नंबर लिंक आहे कि नाही हे CHECK करण्यासाठी या लिंक वरती CLICK करा.
या लिंक ला क्लीक करून आधार नंबर व आपला मोब नंबर टाकून चेक करू शकता.
आधार कार्ड वरती पत्त्या मध्ये नाव जोडण्यासाठी ग्रामीण भागामध्ये सहज उपलब्ध असणारे UIDAI ने जारी केलेले Standard Certificate याची एक प्रिंट काढून त्यावरती एक अर्जदाराचा फोटो लाऊन गावातील सरपंचाचा सही आणि शिक्का घेऊन आपण सहज आपल्या मोबाईल वरती जर आधार ला मोबा लिंक असेल तर दुरुस्ती करू शकतो नसेल तर जवळील आधार कार्ड सेंटर वर जाऊन दुरुस्ती करू शकतो.
२) Pan कार्ड (असेल तर)
३) राशन कार्ड *
४) Cast / जातीचे प्रमाणपत्र (असेल तर )
५) बँक पासबुक (राष्ट्रीयकृत बँक, IPPB बँकेचे सोडता). *
६) मोबाईल क्रमांक
७) पासपोर्ट SIZE फोटो
८) वय १८ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.
वरील सर्व कागदपत्र घेऊन तुम्ही जवळील csc सेंटर वरती जाऊन अर्ज करू शकता.
अर्ज कसा करावा
- सर्वप्रथम आपल्याला पीएम विश्वकर्मा योजना च्या मुख्य वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर मुखपृष्ठावर आपल्याला या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सीएससी लॉगिन करून घ्यावे लागेल.
- लॉगिन केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आधारशी मोबाईल नंबर लिंक असलेला मोबाईल नंबर टाकावा लागेल. व त्यानंतर आधार नंबर प्रविष्ट करावा लागेल आणि मोबाईल व आधार नंबर व्हेरिफिकेशन करून घ्यावे लागेल.
- त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये विचारलेली आवश्यक माहिती आपल्याला सादर करावे लागेल जसे की आपले लिंग, कास्ट कॅटेगिरी ओबीसी, SC,ST व ओपन यापैकी निवडावे.
- जर आपण दिव्यांग असाल तर सिलेक्ट करावे अन्यथा नाही म्हणून सिलेक्ट करा.
- तसेच आपला बिजनेस हा त्याच राज्यामध्ये असेल व त्याच जिल्ह्यामध्ये असेल तर yes करावे व पुढे जावे.
- त्यानंतर आपली कॉन्टॅक्ट डिटेल्स भरून घ्यावी.
- आपले pan कार्ड नंबर, रेशन कार्ड नंबर व आपल्या राशन कार्ड वरती असणाऱ्या घरातील सर्व कुटुंबीयांचे आधार नंबर त्यांचे नाव त्यांचे वय व त्यांच्याशी असलेले नाते हे आपल्याला टाकावे लागेल.
- त्यानंतर आपला ऍड्रेस म्हणजे पत्ता व्यवस्थित भरून घ्यावा व जर आधार वरील ऍड्रेस पत्ता जर करंट ऍड्रेस असेल तर एस करून जतन करून घ्यावे.
- त्यानंतर आपल्यापुढे प्रोफेशन म्हणजे ट्रेड त्यामध्ये आपला कामाचा प्रकार टाकावा लागेल त्यामध्ये आपण शिलाई मशीन कामगार/शिंपी हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यावे व जतन करावे.
- एवढी माहिती जतन करून पुढे जावे या ऑप्शनवर क्लिक करावे व त्यामध्ये आपल्याला बँकेची माहिती प्रविष्ट करावी लागेल बँकेचे नाव बँकेचा आय पी सी कोड शाखा व आपला बँकेचा खाते नंबर व्यवस्थित भरून घ्यावा.
- एवढी माहिती भरल्यानंतर आपल्याला खर्चाची आवश्यकता आहे का असे विचारले जाईल जर असेल तर एस करून पुढे जावे व किती कर्ज पाहिजे जसे की 50 हजाराच्या पुढे व एक लाखापर्यंत रक्कम भरावी जर आपल्याकडे पूर्वी कोणत्या बँकेचे कर्ज थकीत असेल तर तसे माहिती भरून घ्यावी आणि जर आपण ऑनलाईन सर्व्हिसेस जसे की फोन पे गुगल पे डिजिटल व्यवहारासाठी वापरत असाल तर डिजिटल incentive डिटेल्स मध्ये आपला यूपीआय आयडी प्रविष्ट करा.
- आपल्याला स्किल ट्रेनिंग चे नवीन पेज दिसेल त्यामध्ये सांगितले गेले आहेत की यामध्ये प्रशिक्षण दिले जाईल जसे की बेसिक प्रशिक्षण हे पाच दिवसाचे असेल व ॲडव्हान्स प्रशिक्षण हे जास्तीत जास्त पंधरा दिवसाचे असेल व हे प्रशिक्षण आपण केल्यानंतर कामगारांना पाचशे रुपये रोज प्रमाणे पैसे देखील दिले जाते.
- एवढी माहिती भरल्यानंतर आपल्यासमोर मार्केटिंग सपोर्ट नावाचे एक पेज ओपन होईल त्यामध्ये आपला व्यवसाय बिजनेस वाढवण्यासाठी काही प्रश्न विचारले जातात त्यावरती क्लिक करून माहिती करून घ्यावी जसे की जर 1) आपल्याकडे काही प्रॉडक्ट असतील किंवा आपण ते प्रॉडक्ट बनवत असेल आणि जर हे प्रॉडक्ट आपल्याला ऑनलाइन सेल करायचा असेल तर Yes करून क्लिक करावे. 2) जर आपल्याला पॉलिटी सर्टिफिकेट पाहिजे असेल तर त्यावरती क्लिक करावे अशा प्रकारचे थोडे प्रश्न विचारलेले आहे ते व्यवस्थित रित्या वाचून त्यावरती आवश्यक माहिती भरून घ्यावी.
- व आता शेवटची पेज ओपन होईल त्यामध्ये सेल्फ डिक्लेरेशन ला क्लिक करून आपला अर्ज फायनल सबमिट करायचा आहे व सबमिट केल्यानंतर आपल्या अर्जाची पावती प्रिंट करून घ्यावी किंवा जतन करून ठेवावे.
- व आपला अर्ज परत एकदा चेक करून घ्यावे आणि जर काही अर्जामध्ये त्रुटी असेल तर आपण परत लॉगिन करून आपल्या अर्जामध्ये बदल करू शकतो.
- अशाप्रकारे आपण पीएम विश्वकर्मा योजनेचा फायदा घेऊ शकतो. जर आपण या कामगार कॅटेगरीमध्ये मोडत असाल तर आपण या योजनेचा नक्की फायदा घ्यावा या योजनेमध्ये आपल्याला TOOL KIT घेण्यासाठी अनुदान म्हणून रक्कम पंधरा हजार रुपये भेटणार आहेत. व जर कर्जाची आवश्यकता असेल तर एक लाख रुपये देखील भेटणार आहेत.
- तरी आपण मोफत शिलाई मशीन या योजनेचा लाभ घ्यावा व आपल्या नातेवाईकांना व गरजूना देखील या योजनेची माहिती शेअर करा व माहिती आवडल्यास आमच्या पेजला फॉलो नक्की करा.
👇👇👇👇👇👇👇👇
- jee mains 2024 Application Process And Last Date.
- Pocra Yojana Maharashtra 2024 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा योजना
- Voter id Download मतदान कार्ड डाउनलोड महाराष्ट्र 2024
- Voter id Important Update 2024. मतदान करत असताना काळजी घ्या नाहीतर गुन्हा दाखल होणार
- Passport Application Process 2024.पासपोर्ट सेवा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया