
Sheli Mendhi Palan Yojana 2024 – महाराष्ट्र राज्यातील धनगर आणि तत्सम समाजातील सुमारे 1 लाख मेंढी पाला कडून शेळी मेंढी पालन हा व्यवसाय केला जातो. मेंढी पालन करणारा समाज हा आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेला असून मेंढीपालनाकरिता आवश्यक असणाऱ्या चाऱ्याच्या शोधामध्ये विविध ऋतूंमध्ये विविध ठिकाणी भटकंती करून मेंढी पालन करत असतो.
राज्यातील मेंढी पालन व्यवसायामध्ये होणारी घट, या व्यवसायामध्ये घट होण्याचे कारणे यावरती उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने शेळी मेंढी पालन या योजनेची सुरुवात केली आहे. ही योजना धनगर समाजातील नागरिकांकरिता एक अत्यंत महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण अशी योजना शासनात मार्फत सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत या समाजातील मेंढी पालन व्यवसायाला चालना मिळणार आहे. आजच्या या लेखामध्ये आपण शेळी मेंढी पालन या योजने करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करावा, या योजने करिता आवश्यक असणारे कागदपत्रे, पात्रता आणि निवड प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
हे नक्की वाचा : फवारणी पंप साठी अर्ज केला असेल तर हे काम करा
शेळी मेंढी पालन योजनेची वैशिष्ट्ये
- महाराष्ट्र शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या शेळी मेंढी पालन या योजनेकरिता पशुसंवर्धन विभागा मार्फत अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
- केंद्र शासन तसेच महाराष्ट्र शासन यांच्या विविध योजने प्रमाणेच या योजने मध्ये पात्र आणि लाभार्थ्यांना या योजरचा लाभ हा थेट DBT च्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
या योजनेचे लाभार्थी कोण ?
शेळी मेंढी पालन योजना 2024 या योजनेकरीता खालील लाभार्थी पात्र असून फक्त याच नागरिकांना लाभ देण्यात येईल जसे की,
- अर्जदार हा भटक्या-जमाती (भ-जक) प्रवर्गातील असावा. याच प्रवर्गातील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
- योजनेचा लाभ या प्रवर्गातील अशा सर्व नागरिकांना दिला जाईल ज्यांच्याकडे स्वतःची शेतजमीन असेल किंवा नसेल.
दिले जाणारे प्राधान्य
शेळी मेंढी पालन या योजनेअंतर्गत ज्या नागरिकांनी पशुपालन प्रशिक्षण प्राप्त केलेले असेल अशा नागरिकांना शेळीपालन अनुदान या योजनेअंतर्गत अगोदर प्राधान्य दिले जाईल.
तसेच दारिद्र्यरेषेतील नागरिक किंवा कुटुंब.
सुशिक्षित बेरोजगार
महिला बचत गटातील लाभार्थी
आवश्यक कागदपत्रे
- सर्वप्रथम अर्जदाराचे आधार कार्ड
- राशन कार्ड
- चालू मोबाईल क्रमांक
- ई-मेल आयडी (असेल तर )
- एक पासपोर्ट साईज फोटो
- जातीचे प्रमाणपत्र (आवश्यक)
- 712 8a (जमीन असेल तर)
- राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
Sheli Mendhi Palan Yojana Online Application Process अर्ज प्रक्रिया
शेळी मेंढी पालन या योजनेकरिता खालील दोन पद्धतीच्या सहाय्याने तुम्ही अर्ज करू शकता जसे की,
- ऑफलाइन पद्धतीने
- ऑनलाइन पद्धतीने
ऑफलाइन पद्धतीने
शेळी मेंढी पालन या योजनेकरिता ज्या नागरिकांना मोबाईल हाताळता येत नाही अशा नागरिकांनी ऑफलाइन अर्ज पद्धतीचा वापर करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम खाली लिंक मध्ये दिलेला अर्जाचा नमुना व्यवस्थित रित्या प्रिंट आऊट काढून घ्यावा लागेल व त्यामध्ये विचारलेली आवश्यक ती माहिती काळजीपूर्वक भरून घ्या आणि वरील सांगितलेल्या पद्धतीने आवश्यक ती सर्व कागदपत्रे या अर्जासोबत जोडून हा अर्ज आपल्या पंचायत समितीमध्ये दाखल करून घ्यावा.
ऑनलाइन पद्धतीने
राज्य शेळी मेंढी पालन या योजनेमध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून घ्या.
पशुसंवर्धन या विभागाच्या अधिकृत वेबसाईटला आल्यानंतर आपल्यासमोर खालील दाखवलेल्या पद्धतीने एक पेज ओपन होईल जसे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र मेंढी व शेळी पालन विकास महामंडळ.
या वेबसाईट वरती आल्यानंतर नवीन अर्जासाठी नोंदणी करा म्हणून एक ऑप्शन दिसेल त्यावर ती क्लिक करा. त्यानंतर आपल्यासमोर या योजनेअंतर्गत अर्ज करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या बाबी बाबत सूचना खाली दिलेल्या फोटो प्रमाणे दिल्या जातील त्या व्यवस्थित रित्या वाचून नंतरच अर्ज करण्यास सुरुवात करा.
- नवीन अर्जदार नोंदणी करा या पर्यायाला क्लिक करून घ्या त्यानंतर आपल्यासमोर अर्जदाराची वैयक्तिक माहिती भरा म्हणून एक पेज ओपन होईल त्यामध्ये अर्जदार हा वैयक्तिक अर्जदार आहे की बचत गट किंवा FPO अंतर्गत अर्ज करत आहे याबाबत निवडून द्या.
- वैयक्तिक अर्जदार निवडल्यानंतर अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने खालील महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्याव्यात म्हणून काही बाबी खालील फोटोमध्ये दिलेल्या आहेत त्या देखील व्यवस्थित रित्या वाचून घ्या.

त्यानंतर आपल्यासमोर अर्जदाराची वैयक्तिक माहिती याबाबत एक पेज ओपन होईल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थितरीत्या आणि काळजीपूर्वक भरून घ्या जसे की,
- अर्जदाराचे नाव
- अर्जदाराचा आधार क्रमांक
- चालू मोबाईल नंबर
- दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करत असेल तर दिव्यांगाचा प्रकार आणि अर्ज मंजूर झाल्यानंतर दिव्यांग प्रमाणपत्र आवश्यक असेल.
- अर्जदाराचा पत्ता
- बँकेचा तपशील
- अर्जदाराची कौटुंबिक माहिती (अर्जदाराने एकूण कुटुंब संख्येतून स्वतःचे नाव वगळून इतर सदस्यांची नावे हे राशन कार्ड नुसार भरून घ्यावीत)
वरील सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरून झाल्यानंतर नियम व अटी अर्जदाराला मान्य आहे या वरती टिक करून समाविष्ट करा या पर्यायाला क्लिक करा आणि आपला अर्ज जतन करा.

सबमिट करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर परत एकदा आपल्यासमोर काही महत्त्वाच्या बाबी दाखवल्या जातील त्या वाचून घ्या आणि त्यानंतर आपली वैयक्तिक माहिती सेव होईल आणि योजना निवडा म्हणून एक पेज ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला या योजना अंतर्गत ज्या घटकाकरिता अर्ज करायचा असेल त्या योजनेस सिलेक्ट करून घ्या. जसे की,
- राजे यशवंतराव होळकर या योजनेअंतर्गत कायमस्वरूपी एका ठिकाणी राहून मेंढी पालन करण्याकरिता पायाभूत सोयी सुविधे सह 20 मेंढ्या आणि 1 नर असे 75 % अनुदानास वाटप करणे.
- भूमिहीन नागरिका करिता अर्ध बंधिस्थ किंवा बांधिस्थ मेंढी पालन करण्याकरिता किमान 1 गुंठा जमीन खरेदी करण्याकरिता किंवा 30 वर्षाकरिता जमीन भाडे करारा वरती घेण्याकरिता 50000 रुपयाच्या मर्यादेत 75 टक्के अनुदान देणे.
अशाप्रकारे या योजनेअंतर्गत विविध 18 प्रकारच्या घटकाकरिता अर्जदार अर्ज करू शकतो त्यापैकी आवश्यक त्या योजना निवडून घ्या.
योजना निवडल्यानंतर योजनेबद्दल अधिक माहिती खाली दिलेल्या प्रमाणे भरून घ्या. जसे की,
- अर्जदाराकडे सद्यस्थितीत मेंढ्या आहेत की नाही तरी याला होय करून सद्यस्थितीत असणाऱ्या मेंढ्यांची संख्या निवडून घ्या.

वरील सर्व माहिती व्यवस्थित रित्या करून झाल्यानंतर शेवटी अर्ज जतन करा होईल.
अशा प्रकारे तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने व्यवस्थित रित्या स्वतः घरबसल्या आणि तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरून एकदम सोप्या पद्धतीने शेळी मेंढी पालन या योजने करिता अर्ज करू शकता व या योजनेअंतर्गत 75 टक्के अनुदानाचा लाभ घेऊ शकता.
अशाच नव-नवीन योजनेबद्दल अधिक माहिती करिता आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.
हा ग्रुप Private ग्रुप असल्यामुळे आपला नंबर फक्त ग्रुप admin लाच दिसेल तरी निश्चिंत ग्रुप join करा.
- Divyang Scooter Yojana 2026 | Free Scooter for Disabled दिव्यांग स्कूटर योजना | अस्थिव्यंगांसाठी मोफत स्कूटर
- Ayushman Card Vay Vandana Card 2026: 70+ वयोवृद्धांसाठी ₹5 लाख मोफत उपचार योजना आयुष्मान कार्ड / वय वंदना कार्ड
- Ladki Bahin Yojana December 1500 Payment Good News : लाडकी बहिण योजना खुशखबर: डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात
- Ujwala Gas Yojana 3.0 उज्वला गॅस योजना अर्ज प्रक्रिया 2026
- Crop Loan 2026 New Update शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा : पीक व शेती कर्जावर मुद्रांक शुल्क पूर्णतः माफ
मला प्रकरण करायचे आहे
अर्ज कंसा करावा मेंढी व शेळी पालनसाठी
https://www.mahamesh.org/ या लिंक वर अर्ज करा
शेळीपालन अणूदान अर्ज दाखल करायचा आहे
शेळी
पालन
अणूदान अर्ज
I’m really inspired along with your writing skills and also with the layout in your blog.
Is that this a paid subject or did you customize it yourself?
Either way stay up the nice high quality writing, it’s rare to see a nice weblog like this
one today. TikTok Algorithm!