Sanjay Gandhi niradhar Yojana 2024 : राज्य शासन व केंद्रशासन हे निराधार व्यक्तींसाठी सातत्याने वेगवेगळ्या योजना राबवत असते. राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील आणि देशातील निराधार व्यक्तींना अनेक योजना चालू आहेत. केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या माध्यमातून नेहमी देशातील जनतेसाठी विविध योजना राबवल्या जात असतात, त्यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे संजय गांधी निराधार योजना होय.
संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून गरजू व्यक्तींना आर्थिक सहाय्य मिळते त्यामुळे त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी त्यांना मदत होते. या योजनेच्या माध्यमातून राज्य शासनामार्फत पात्र निराधार लाभार्थ्यांना 1500 रुपये आर्थिक सहाय्य म्हणून पुरविले जाते.
संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी कोण?
- आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची विधवा पत्नी या योजनेचा लाभ घेऊ शकते.
- तसेच घटस्फोटीत स्त्रिया व दुर्लक्षित असलेल्या महिला देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- अनाथ मुले, देवदासी, घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या महिला पात्र आहेत.
- कुष्ठरोग, कर्करोग, क्षय रोग यासारख्या आजारातील पुरुष व महिला.
- तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची पत्नी देखील या योजनेत सहभागी होऊ शकते.
संजय गांधी निराधार योजना अंतर्गत मिळणारे लाभ
- Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024 अंतर्गत प्रत्येक पात्र लाभार्थी व्यक्तींना दरमहा 1500 /- रुपयांचे आर्थिक लाभ/ अनुदान दिले जात आहे.
- या योजनेच्या सहाय्याने निराधार व्यक्तींना आर्थिक मदतीसाठी दुसऱ्या वरती अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.
- तसेच निराधार व्यक्तींचा आर्थिक व सामाजिक विकास होण्यास देखील मदत होईल व आत्मनिर्भर जीवन जगता येईल.
संजय गांधी निराधार योजनेसाठी आवश्यक कागदपत्र
- लाभार्थी चे आधार कार्ड.
- राशन कार्ड
- मतदान ओळखपत्र
- उत्पन्नाचा दाखला. 21000 रू
- रहिवासी दाखला.
- लाभार्थीचे फोटो
- पॅन कार्ड
संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज प्रक्रिया 2024
संजय गांधी निराधार योजनेसाठी आपण ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतो
Sanjay Gandhi Niradhar Yojana ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने आपण अर्ज दाखल करू शकतो त्यासाठी अर्जदार व्यक्तीला सर्वप्रथम संजय गांधी निराधार योजना च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल, त्यापुढे तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड बनवून घ्यावा लागेल.
अर्जदाराने आपला युजर आयडी आणि पासवर्ड बनवून झाल्यानंतर पुन्हा अधिकृत वेबसाईट वरती येऊन तुमचे पेज लॉगिन करून घ्यावे.
लॉगिन केल्यानंतर आपल्यासमोर होम पेज ओपन होईल वरती दिल्याप्रमाणे सर्च ऑप्शन मध्ये संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजना टाकून सर्च करून घ्या.
त्यानंतर social justice department चे पेज ओपन होईल त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना सिलेक्ट करून घ्या.
सिलेक्ट केल्यानंतर आवश्यक कागदपत्रे चे पेज ओपन होईल त्यामध्ये वरती दिल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे असल्याची खात्री करून घ्या. आणि पेजचा शेवटी येऊन Continue या ऑप्शनला क्लिक करून अर्ज करण्यास सुरुवात करा.
सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर अर्जदाराची जन्मतारीख व अर्जदार बीपीएल मध्ये आहे का हे विचार तर त्याला असेल तर होय क्लिक करून घ्या.
त्यानंतर अर्जदाराची आवश्यक अशी माहिती विचारली जाईल जसे की अर्जदाराचा आधार क्रमांक, अर्जदाराचा आधार क्रमांक टाकून आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती ओटीपी पाठवला जाईल त्या ओटीपी ने आधार Verification करून घ्या.
त्यानंतर अर्जदाराचे नाव, वडीलाचे नाव, अर्जदाराचा पत्ता आणि निराधाराचा प्रकार जसे की,
- विकलांग
- गंभीर आजाराचा प्रकार
- महिला
- आत्महत्येचा बळी ठरलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील सदस्य.
- अनाथ बालक व
- तृतीयपंथी.
यापैकी आपण ज्या कॅटेगिरी मध्ये असाल ती कॅटेगिरी निवडून घ्यावी. आणि अर्जदाराची जात निवडून घ्या.
जर अर्जदार गंभीर आजाराचा प्रकार या कॅटेगिरी मध्ये मोडत असेल तर त्यामध्ये तुम्हाला आजाराचा प्रकार टाकावा लागेल जसे की,
- क्षयरोग
- मानसिक आजार
- कर्करोग
- एड्स
- कुष्ठरोग
- पक्षघात
- सिकल सेल किंवा
- सार्वजनिक आरोग्य विभागाने निश्चित केलेले दुर्धर आजार
यापैकी आपण ज्या आजारामध्ये मोडता ते सिलेक्ट करून घ्यावे.
त्यानंतर आपले बँक खाते क्रमांक किंवा माहिती टाकून घ्या. अशा पद्धतीने विचारलेली आवश्यक माहिती या पोर्टल वरती भरून घ्यावी, आणि वरती दिल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे व्यवस्थितरीत्या स्कॅन करून अपलोड करून घ्यावे. व अशा पद्धतीने आपण संजय गांधी निराधार योजने साठी अर्ज करू शकता.
भरलेल्या अर्जाची पावती आणि वरील प्रमाणे सर्व कागदपत्र अर्ज सोबत जोडून आपल्या तहसील कार्यालयात जमा करून घ्यावी, व पुढील काही दिवसात आपला अर्ज पडताळणी झाल्या नंतर आपण या योजनेस पात्र व्हाल आणि दरमहा 1500 रुपये पेन्शन चा लाभ घेऊ शकाल.
शासनाची अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संजय गांधी निराधार योजना माहिती | येथे क्लिक करा |
संजय गांधी निराधार योजनेचा PDF फॉर्म | येथे क्लिक करा |
अधिक माहिती साठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये add व्हा | येथे क्लिक करा |
निराधार योजनेतील लाभार्थीना हे काम करणे बंधनकारक
राज्य शासनाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना पत्र पाठवले आहेत, वयक्तिक लाभाच्या योजनेतील लाभार्थ्यांच्या आधार कार्ड सोबत संलग्न करणे यावरती कारवाई 100 % पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तसेच Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024 व श्रावण बाळ सेवानिवृत्ती योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण डीबीटी पोर्टल द्वारे करण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे.
लाभार्थी व्यक्तींनी आपली कागदपत्रे व्यवस्थित जमा करून घ्यायचे आहेत, काही जिल्ह्यांमध्ये कागदपत्रांची सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे ते खालील प्रमाणे पहा.
1. आधार कार्ड
2. मोबाईल क्रमांक
3. हयातीचा दाखला (स्वघोशनापत्र असेल तरी चालेल)
4. उत्पन्नाचे प्रमाणपत्र
5. राशन कार्ड
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024 व श्रावण बाळ सेवा निवृत्ती योजना ज्यांना लागू आहे, अशा नागरिकांनी ज्यांना कागदपत्रे मागितले आहेत त्यांनीही वरील कागदपत्रे तुमच्या जवळील तहसील ऑफिसमध्ये किंवा गावातील तलाठी कार्जयालया मध्ये जमा करायचे आहेत. व ज्या ठिकाणी तुमची बँक असेल त्या बँकेत जाऊन तुमच्या आधार कार्ड डीबीटीला म्हणजेच NPCI ला लिंक करून घ्यायचे आहे. त्यानंतर तुमची अनुदानाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात DBT ने जमा केली जाणार आहे.
- Remaker ai Face Swap free 2024. सिर्फ एक क्लिक मे किसी भी फोटो मे अपना फोटो लगाये फ्री मे.
- jee mains 2024 Application Process And Last Date.
- Pocra Yojana Maharashtra 2024 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा योजना
- Voter id Download मतदान कार्ड डाउनलोड महाराष्ट्र 2024
- Voter id Important Update 2024. मतदान करत असताना काळजी घ्या नाहीतर गुन्हा दाखल होणार