Ladki Bahin Yojana 6 installment New Update लाडकी बहिण योजना नवीन बदल

Ladki Bahin Yojana 2024- लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात येणार आहेत. या नियमानुसार जर महिलांच्या कुटुंबामध्ये या पाच बाबी असतील तर अशा महिलांना या योजनेचा   पुढील लाभ घेता येणार नाही. आजच्या या लेखांमध्ये आपण लाडकी बहीण योजनेमध्ये झालेल्या नवीन बदलाबद्दल अधिक माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत.

लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा मुख्य हेतू असा होता की या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, महिलांच्या पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच महिलांचे आरोग्य आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने दिनांक 28 जून 2024 च्या शासनमान्य निर्णयाप्रमाणे या योजनेस मान्यता दिली. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिना 1500 रुपये डीबीटी च्या मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत.

माझी लाडकी बहीण योजना पात्रता

  • सर्वप्रथम महिलाही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • महिलांना किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व जास्तीत जास्त वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ घेता येईल.
  • राज्यातील विवाहित, विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटीत तसेच निराधार महिला या योजनेस पात्र राहतील व त्यांना या योजनेचा लाभ देखील घेता येईल.
  • लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. Majhi Ladki Bahin Yojana

हे नक्की वाचा : लाडकी बहिण योजनेचे स्टेटस कसे चेक करावे ?

योजनेचा लाभ कोण घेऊ शकत नाही? अपात्रता

  • लाभार्थींच्या कुटुंबातील जर व्यक्ती आयकर भरणा करत असतील तर अपात्र ठरेल.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत. परंतु बाह्य यंत्रणा द्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.
  • जर लाभार्थ्यांचा कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार असेल तर अपात्र असेल.
  • महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये 1500/- पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर अशा महिला देखील या योजनेस अपात्र ठरतील.
  • ज्यांच्याकडे चार चाकी वाहने (ट्रॅक्टर वगळता) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत अशांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेर जमीन आहे असे कुटुंब देखील अपात्र आहेत.

हे नक्की वाचा : मोबईल च्या सहाय्याने पैसे कमवायचे असतील तर येथे क्लिक करा

या योजनेमध्ये पात्रता आणि अपात्रता निकषांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येऊ शकते.

सर्व महिलांनी वरील पात्रता आणि अपात्रतेचे कारणे याबद्दल सविस्तर माहिती पाहून घ्या आणि अशाच माहिती करिता आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता.

व्हाट्सअप ग्रुप हा प्रायव्हेट असल्यामुळे आपला नंबर फक्त आणि फक्त ग्रुप ॲडमिनलाच दिसेल इतर कोणालाही दिसणार नाही म्हणून निश्चित ग्रुप जॉईन करू शकता.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्ज प्रक्रिया

Leave a Comment

× Whatsapp ग्रुप जॉईन करा 👉