Bandhkam Kamgar Yojana Registration Process: बांधकाम कामगार नवीन अर्जदार नोंदणीस सुरुवात 2024.

Bandhkam Kamgar Yojana 2024: राज्यातील बांधकाम कामगारांचा तसेच त्यांच्या कुटुंबाचा सामाजिक तसेच आर्थिक विकास व्हावा व त्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी सतत प्रयत्नशील असते. आणि त्यासाठीच राज्य शासनाने महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजना कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. ज्यामध्ये विविध कामगार कल्याण योजना ची सुरुवात करण्यात आलेली आहे.

बांधकाम कामगार मंडळाची स्थापना कधी झाली?

राज्यातील बांधकाम कामगारांच्या  सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाने 1 मे 2011 रोजी कामगारांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना केली.

या बांधकाम कामगार मंडळामार्फत विविध क्षेत्रातील बांधकाम काम करायची नोंद केली जाते तसेच त्यांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व तसेच आरोग्य विषयक सुविधा पुरविल्या जातात व अनेक योजनांचा लाभ देखील दिला जातो.

बांधकाम कामगार नवीन नोंदणी कधी सुरुवात होणार?Bandhkam Kamgar New Registration Start Date

बांधकाम कामगार नवीन नोंदणी 10 जून 2024 म्हणजेच आज पासून मंडळाच्या अधिकृत वेबसाईट वरती ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करण्यास सुरुवात  झाली आहे.

बांधकाम कामगार योजना उद्देश आणि उद्दिष्टे

  • महाराष्ट्रातील नोंदणी असलेल्या सर्व बांधकाम कामगार च्या हिताच्या विविध योजना राबवणे आणि कामगारांच्या कुटुंबीयांच्या कल्याणाच्या योजना राबवून सक्षम बनवणे. उच्च शिक्षणाची स्वप्न साकार करणे व त्यांचा आर्थिक विकास करणे होय.
  • कामगारांना या योजनेमार्फत हक्काचे घर मिळवून देणे.
  • महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजना चा मुख्य उद्देश हा की विविध योजनांद्वारे इमारत व इतर बांधकाम कामगारांना सुरक्षा तसेच आरोग्य व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे हा आहे.
  • तसेच नवीन बांधकाम कामगारांची सातत्यपूर्ण नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घेणे.

पात्रता

  • 18 ते 60 वयोगटातील बांधकाम कामगार नोंदणी करण्यास पात्र राहतील.
  • सर्वप्रथम या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • ज्या कामगारांनी मागील एक वर्षांमध्ये कमीत कमी 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले आहे असे कामगार या योजने नोंदणी करण्यास पात्र आहेत.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

योजनेमध्ये नोंदणी करण्याकरिता फॉर्म-५ भरावा लागतो. आणि त्यासोबत खालील कागदपत्रे जोडावे लागतात.

  • कामगाराचे आधार कार्ड
  • वयाचा दाखला
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • ओळखपत्र पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • किमान 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र.
  • राशन कार्ड
  • राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
  • कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड.

What are the benefits of Mbocww? फायदे

  • या योजनेमार्फत सातत्यपूर्ण आणि कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध होतो.
  • कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळते.
  • तसेच बांधकाम कामगारांची शासनाकडे नोंदणी होते.
  • कामगारांना आर्थिक सुरक्षा देखील मिळते.
  • कामगारांसाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे की त्यांच्या पहिलीपासून ते उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार होते. त्यासाठी या योजनेमार्फत शैक्षणिक योजना राबवली जात आहे.
  • कामगारांना ग्रह उपयोगी वस्तू मिळतात.
  • कामासाठी लागणारे साहित्य मिळते.
  • तसेच ज्यांना घर नाही त्यांना या योजनेमार्फत स्वतःचे हक्काचे घर मिळते.

Bandhkam Kamgar Yojana Registration Process

नोंदणी प्रक्रिया २०२४

या योजने मध्ये आपण ONLINE OFFLINE या दोन्ही पद्धतीने १५ जून २०२४ पासून नोंदणी करू शकतो.

ऑफलाईन पद्धतीने

ऑफलाइन पद्धतीने जर अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला फॉर्म 5 हा प्रिंट आऊट करून व्यवस्थित रित्या भरून घ्यावा लागेल व तसेच वरती दिल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या आपल्या अर्जासोबत जोडून घ्यावे. आणि जवळील बांधकाम कामगार मंडळामध्ये जाऊन नोंदणी करू शकता.

ऑनलाइन पद्धतीने

बांधकाम कामगार योजना 2024 ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याकरिता सर्वप्रथम मंडळाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.

वेबसाईट वरती गेल्यानंतर आपल्यासमोर आपली पात्रता तपासा आणि नोंदणी करण्यासाठी पुढे जा या ऑप्शनला क्लिक करून सर्वप्रथम आपण या योजनेसाठी पात्र आहोत की नाही हेच चेक करून घ्यावे लागेल.

आपली पात्रता चेक करत असताना त्यामध्ये कामगाराचे वय प्रविष्ट करावे लागेल जसे की वय पात्रतेनुसार 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावे.

Bandhkam Kamgar Yojana
Bandhkam Kamgar Yojana

आपली पात्रता चेक करून,विचारलेली आवश्यक ती माहिती भरून आपला अर्ज दाखल करू शकता.

कामगारांना सक्षम आणि आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी या योजनेंतर्गत कामगारास आणि त्याच्या कुटुंबाला विविध प्रकारचे लाभ मिळतात त्याबाबत सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखात दिली आहे.तेंव्हा हि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या माहितीचा वापर सबंधित कामगाराला मदत करण्यासाठी करा .

अशाच नव-नवीन योजनेबद्दल अधिक माहिती करिता आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.

हा ग्रुप Private ग्रुप असल्यामुळे आपला नंबर फक्त ग्रुप admin लाच दिसेल तरी निश्चिंत ग्रुप join करा.

2 thoughts on “Bandhkam Kamgar Yojana Registration Process: बांधकाम कामगार नवीन अर्जदार नोंदणीस सुरुवात 2024.”

Leave a Comment