Bandhkam Kamgar New Registration Start Date 2024: राज्यातील बांधकाम कामगारांचा तसेच त्यांच्या कुटुंबाचा सामाजिक तसेच आर्थिक विकास व्हावा व त्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी सतत प्रयत्नशील असते. आणि त्यासाठीच राज्य शासनाने महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजना कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. ज्यामध्ये विविध कामगार कल्याण योजना ची सुरुवात करण्यात आलेली आहे.
बांधकाम कामगार मंडळाची स्थापना कधी झाली?
बांधकाम कामगारांना त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी व त्यांच्या घरचा पूर्ण करण्यासाठी खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच काम करताना त्यांच्याजवळ सेफ्टी किट नसल्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या अपघातांचा देखील सामना करावा लागतो ज्यामध्ये त्यांना कायमस्वरूपी अपंगत्व येते व काही वेळेला त्यांचा मृत्यू देखील होत असतो. त्यामुळे राज्यातील बांधकाम कामगारांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाने 1 मे 2011 रोजी कामगारांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना केली.
या बांधकाम कामगार मंडळामार्फत विविध क्षेत्रातील बांधकाम काम करायची नोंद केली जाते तसेच त्यांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व तसेच आरोग्य विषयक सुविधा पुरविल्या जातात व अनेक योजनांचा लाभ देखील दिला जातो.
बांधकाम कामगार नवीन नोंदणी कधी सुरुवात होणार?Bandhkam Kamgar New Registration Start Date
बांधकाम कामगार नवीन नोंदणी 15 जून 2024 पासून मंडळाच्या अधिकृत वेबसाईट वरती ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करण्यास सुरुवात सुरुवात होणार आहे.
बांधकाम कामगार योजना उद्देश आणि उद्दिष्टे
- महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजना चा मुख्य उद्देश हा की विविध योजनांद्वारे इमारत व इतर बांधकाम कामगारांना सुरक्षा तसेच आरोग्य व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे हा आहे.
- महाराष्ट्रातील नोंदणी असलेल्या सर्व बांधकाम कामगार च्या हिताच्या विविध योजना राबवणे आणि कामगारांच्या कुटुंबीयांच्या कल्याणाच्या योजना राबवून सक्षम बनवणे. उच्च शिक्षणाची स्वप्न साकार करणे व त्यांचा आर्थिक विकास करणे होय.
- कामगारांना या योजनेमार्फत हक्काचे घर मिळवून देणे.
- तसेच नवीन बांधकाम कामगारांची सातत्यपूर्ण नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घेणे.
Bandhkam Kamgar New Registration फायदे
- या योजनेमार्फत सातत्यपूर्ण आणि कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध होतो.
- कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळते.
- तसेच बांधकाम कामगारांची शासनाकडे नोंदणी होते.
- कामगारांना आर्थिक सुरक्षा देखील मिळते.
- कामगारांसाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे की त्यांच्या पहिलीपासून ते उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार होते. त्यासाठी या योजनेमार्फत शैक्षणिक योजना राबवली जात आहे.
- कामगारांना ग्रह उपयोगी वस्तू मिळतात.
- कामासाठी लागणारे साहित्य मिळते.
- तसेच ज्यांना घर नाही त्यांना या योजनेमार्फत स्वतःचे हक्काचे घर मिळते.
पात्रता
- सर्वप्रथम या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- 18 ते 60 वयोगटातील बांधकाम कामगार नोंदणी करण्यास पात्र राहतील.
- ज्या कामगारांनी मागील एक वर्षांमध्ये कमीत कमी 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले आहे असे कामगार या योजने नोंदणी करण्यास पात्र आहेत.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
योजनेमध्ये नोंदणी करण्याकरिता फॉर्म-५ भरावा लागतो. आणि त्यासोबत खालील कागदपत्रे जोडावे लागतात.
- कामगाराचे आधार कार्ड
- वयाचा दाखला
- रहिवासी प्रमाणपत्र
- ओळखपत्र पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो
- किमान 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र.
- राशन कार्ड
- राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
- कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड.
कोण कोणते कामगार या योजनेत नोंदणी करू शकतात-
- इमारती
- रस्ते
- रस्त्यावर
- रेल्वे
- सिंचन
- रेडियो
- दूरदर्शन
- दूरध्वनी
- टेलिग्राम आणि ओव्हरसीज कम्युनिकेशन
- डॅम
- नद्या
- रक्षक
- पाणीपुरवठा
- ड्रेनेज
- ट्रामवेज
- एअरफिल्ड
- तटबंद आणि नेव्हिगेशन वर्क्स
- स्टॉर्म वॉटर ड्रेनेज वर्क्ससह
- निर्मिती
- पारेषण आणि पॉवर वितरण
- पाणी वितरणासाठी चॅनल समाविष्ट करणे
- तेल आणि गॅसची स्थापना
- इलेक्ट्रिक लाईन्स
- वायरलेस
- टनेल
- पुंल
- पदवीधर
- जल विदयुत
- पाईप लाईन
- टॉवर्स
- कुलिंग टॉवर्स
- ट्रान्समिशन टॉवर्स आणि अशे इतर कार्य ‘
- दगड कापणे ,फोडणे व दगडाचा बारीक चुरा करणे
- लादी किंवा टाईल्स कापणे व पॉलिश करणे
- रंग ,वार्निश लावणे इत्यादी सुता काम .
- गटार व नळ जोडणीची कामे
- वायरिंग, वितरण, तावदान बसविणे इत्यादी सहित विद्युत कामे,,
- अग्निशमन यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे ,
- वातानुकूलित यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे ,
- उद्दाहने ,स्वयंचलित जिने इत्यादी बसविणे .
- काच कापणे ,काचरोगगण लावणे व काचेची तावदाने बसविणे ,
- कारखाना अधिनियम ,१९४८ खाली समावेश नसलेल्या विटा , छपरावरील कौल इत्यादी तयार करणे ,
- सौर तावदाने इत्यादिसारखी ऊर्जाक्षम उपकरणे बसविणे,
- स्वयपाकखोली सारख्या ठिकाणी वापरण्यासाठी मोडूलर (आधुनिक)युनिट बसविणे .
- सिमेंट कॉंक्रीटच्या साचेबद्ध वस्तू इत्यादी तयार करणे व बसविणे .
- जलतरण तलाव ,गोल्फचे मैदान इत्यादीसह खेळ किंवा मनोरंजनाच्या सुविधांचे बाधकाम करणे ,
- माहिती फलक ,रोड फर्निचर ,प्रवाशी निवारे किंवा बस स्थानके ,सिग्नल यंत्रणा इत्यादी बांधणे किंवा उभारणे ,.
- लोखंडाच्या किंवा धातूच्या ग्रील्स ,खिडक्या ,दरवाजे तयार करणे व बसविणे .
- जलसंचय संरचनेचे बांधकाम करणे ,
- सुतारकाम करणे ,अभाशी छत , प्रकाश व्यवस्था ,प्लास्टर ऑफ पेरीस यांसहित अंतर्गत (सजावटीचे)काम ,
- सुरक्षा दरवाजे उपकरणे इत्यादी बसविणे ,
- रोटरीजचे बांधकाम करणे , कारंजे बसविणे इत्यादी ,
- सार्वजनिक उद्दाने ,पदपथ ,रमणीय भूप्रदेश इत्यादीचे बांधकाम.
इत्यादी प्रकारामध्ये काम करणारे कामगार या योजनेमध्ये नोंदणी करू शकतात व या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
नोंदणी प्रक्रिया २०२४
या योजने मध्ये आपण ONLINE व OFFLINE या दोन्ही पद्धतीने १५ जून २०२४ पासून नोंदणी करू शकतो.
ऑफलाईन पद्धतीने
ऑफलाइन पद्धतीने जर अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला फॉर्म 5 हा प्रिंट आऊट करून व्यवस्थित रित्या भरून घ्यावा लागेल व तसेच वरती दिल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या आपल्या अर्जासोबत जोडून घ्यावे. आणि जवळील बांधकाम कामगार मंडळामध्ये जाऊन नोंदणी करू शकता.
ऑनलाइन पद्धतीने
बांधकाम कामगार योजना 2024 ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याकरिता सर्वप्रथम मंडळाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
वेबसाईट वरती गेल्यानंतर आपल्यासमोर आपली पात्रता तपासा आणि नोंदणी करण्यासाठी पुढे जा या ऑप्शनला क्लिक करून सर्वप्रथम आपण या योजनेसाठी पात्र आहोत की नाही हेच चेक करून घ्यावे लागेल.
आपली पात्रता चेक करत असताना त्यामध्ये कामगाराचे वय प्रविष्ट करावे लागेल जसे की वय पात्रतेनुसार 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावे.
तसेच तुम्ही 90 दिवसांहून अधिक का महाराष्ट्रात काम करत आहात का असा प्रश्न विचारला जाईल त्यावरती टिक करून घ्यावे. त्यानंतर आपल्याकडे निवासी पत्त्याचा पुरावा आहे का त्या ठिकाणी होय करून आधार कार्ड उपलब्ध आहे असे टाकून आपली पात्रता तपासा यावरती क्लिक करावे जर आपण या योजनेसाठी पात्र असाल तर रजिस्ट्रेशन पोर्टल घेऊन जाईल.
त्यानंतर विचारलेल्या पद्धतीने सर्व आवश्यक माहिती टाकून घ्यावी आणि आपला अर्ज जतन करून घ्यावा. व मिळणारी पावती जपून ठेवा.
बांधकाम कामगारांसाठी मिळणाऱ्या कल्याणकारी योजना 2024.
बांधकाम कामगार यांना सरकारतर्फे सामाजिक सुरक्षा प्रधान करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना दिल्या जातात त्या योजना खालील प्रमाणे आहेत.
सामाजिक सुरक्षा प्रदान करणाऱ्या योजना
- पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या पूर्ती साठी रुपये 30 हजार रुपये दिले जातात.
- मध्यान्ह भोजन योजना.
- प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना
- नोंदणीकृत लाभार्थीस प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना.
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
- पात्र लाभार्थ्यास पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना मार्फत शिक्षण प्रशिक्षण दिले जाते.
शैक्षणिक योजना
या योजनेअंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन मुलांसाठीच लागू आहेत
- कामगारांच्या पहिल्या दोन मुलांसाठी 1 पहिली ते 7 वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष 2500 रू शैक्षणिक आर्थिक सहाय्य प्रोत्साहन म्हणून दिले जाते.
- इयत्ता 8 ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी रुपये 5 हजार प्रोत्साहन दिले जाते.
- नोंदणीकृत कामगाराच्या पहिल्या दोन पन्नास इयत्ता दहावी व बारावी मध्ये किमान 50 टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास 10 हजार रुपये शिक्षणासाठी प्रोत्साहन म्हणून दिले जाते.
- पदवी अभ्यास करिता प्रतिवर्षी 20 हजार रुपये दिले जाते.
- वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्षी 1 लाख रुपये नोंदणी कृत कामगाराच्या पाल्यास दिले जाते.
- तसेच अभियांत्रिकी पदवीकरिता प्रतिवर्षी 60 हजार रुपये दिले जातात.
- शासनमान्य पद्धतीसाठी प्रति वर्षी 20 हजार रुपये दिले जातात.
- तर शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्ष 25000 रुपये दिले जातात..
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यांना MS -CIT च्या शिक्षणासाठी अर्थसहाय्य केले जाते.
अशा विविध प्रकारच्या योजना बांधकाम कामगारांसाठी या मंडळामार्फत बांधकाम कामगार कल्याणकारी योजना या नावाने कामगारांसाठी राबवला जात आहेत.
निष्कर्ष
बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र सरकारने सुरु केलेली कामगारांसाठी अत्यंत महत्वपूर्ण, महत्वकांशी अशी योजना आहे . राज्यातील विविध बांधकाम प्रकल्पातील कामगाराच्या उज्ज्वल भाविष्यासाठी कल्याणकारी योजना राबवल्या जातात.या योजनेंतर्गत लाभार्थ्यास सामाजिक सुरक्षा ,शैक्षणिक सहाय्य , आरोग्यविषयक सहाय्य तसेच आर्थिक सहाय्य दिले जाते .
कामगारांना सक्षम आणि आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी योजनेंतर्गत कामगारास आणि त्याच्या कुटुंबाला विविध प्रकारचे लाभ मिळतात त्याबाबत सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखात दिली आहे.तेंव्हा हि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या माहितीचा वापर सबंधित कामगाराला मदत करण्यासाठी करा .
- jee mains 2024 Application Process And Last Date.
- Pocra Yojana Maharashtra 2024 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा योजना
- Voter id Download मतदान कार्ड डाउनलोड महाराष्ट्र 2024
- Voter id Important Update 2024. मतदान करत असताना काळजी घ्या नाहीतर गुन्हा दाखल होणार
- Passport Application Process 2024.पासपोर्ट सेवा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया