Anudan E kyc Process अतिवृष्टी अनुदान ई केवायसी प्रक्रिया 2024

Anudan E kyc Process-अतिवृष्टी अनुदान 2024 आपल्या खात्यावर मिळवण्यासाठी ई केवायसी करणे आवश्यक आहे. ई केवायसी कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती येथे पाहू शकता.

आवश्यक कागदपत्रे

  • शेतकऱ्याचे आधार कार्ड
  • राष्ट्रीय प्रत बँकेचे बँक पासबुक
  • चालू मोबाईल क्रमांक
  • 8अ (शेतीचा गट क्रमांक आणि क्षेत्र माहिती असावे)

Anudan E kyc Process अतिवृष्टी अनुदान ई केवायसी प्रक्रिया.

अतिवृष्टी अनुदान 2024 ई केवायसी करण्याकरिता खालील पद्धतीने सांगितलेल्या माहितीचा व्यवस्थित रित्या वापर करून अनुदानाची ई केवायसी करू शकता. 👇👇

  • अतिवृष्टी 2024 ची केवायसी करण्याकरिता सर्वप्रथम आपल्याकडे महाऑनलाईन चा id असणे आवश्यक आहे म्हणजेच सेतू सुविधा केंद्र असावे तरच तुम्हाला अतिवृष्टी अनुदान ची ई केवायसी करता येईल.

जर आपल्या कोणालाही महा ऑनलाइन सेतू सुविधा केंद्र चा लॉगीन आयडी पाहिजे असेल तर संपर्क करू शकता.

महा ऑनलाईन आईड लॉग इन करण्यासाठी येथे क्लिक करा

  • अतिवृष्टी अनुदान केवायसी करण्याकरिता सर्वप्रथम आपल्याला आपला महा ऑनलाईन चा आयडी लॉगिन करून घ्यायचा आहे.
  • महाऑनलाईनचा आयडी लॉगिन केल्यानंतर आपल्यासमोर खालील दाखवलेल्या पद्धतीने डॅशबोर्ड ओपन होईल.
  • वापर करता आयडी लॉगिन झाल्यानंतर डाव्या बाजूला स्लाईड बार दिसेल त्यामध्ये आधार प्रमाणिकरण म्हणून एक ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करा आणि नैसर्गिक आपत्ती शेती पिके नुकसान मदत या पर्यायावर क्लिक करा.
Anudan E kyc Process
Anudan E kyc Process
  • या पेज वरती आल्यानंतर आपल्यासमोर वरील पद्धतीने एक पेज दिसेल त्यामध्ये शेतकऱ्याचा विशिष्ट क्रमांक टाकून सर्च बटनावरती क्लिक करा.

विशिष्ट क्रमांक टाकल्यानंतर शेतकऱ्याचा संपूर्ण डेटा आपल्याला दिसेल त्यापैकी,

  • शेतकऱ्याचे गाव
  • शेतीचा गट नंबर
  • बाधित क्षेत्र
  • शासनामार्फत अनुदानाची वितरित केलेली रक्कम
  • आधारनुसार शेतकऱ्याचे नाव

👉👉 अतिवृष्टीअनुदान ई केवायसी यादी येथे पहा बीड जिल्हा 👈👈

  • आधार क्रमांक
  • बँकेचे नाव
  • बचत खाते क्रमांक
  • बँकेचा आयएफसी कोड व
  • तुमचा मोबाईल क्रमांक

वरील सर्व माहिती व्यवस्थित रित्या आणि काळजीपूर्वक पडताळून घ्या आणि त्यानंतरच पुढील प्रक्रिया करा.

Anudan E kyc Process
Anudan E kyc Process

वरील सर्व माहिती पडताळणी केल्यानंतर आपल्यासमोर खाली काही ऑप्शन दिलेले आहे जसे की,

  • जर वरील सर्व माहिती बरोबर असेल तर एक नंबरचे ऑप्शन निवडावे. No Grievance.
  • जर आपल्या अर्जात दोन पेक्षा अधिक माहिती मध्ये तफावत असेल तर दोन नंबरचे ऑप्शन निवडावे.
  • जर आधार नंबर मध्ये तपवत असेल तर तीन नंबरचे ऑप्शन निवडा.
  • तुमच्या शेतीच्या गट क्रमांक मध्ये तफावत असेल तर चार नंबरचे ऑप्शन निवडा.
  • जर बँक खात्याचा तपशील चुकीचा असेल तर पाच नंबर निवडावे.

अशा पद्धतीने माहिती निवडून घ्या आणि केवायसी करू शकता.

वरील सर्व माहिती व्यवस्थितरित्या तपासणी  केल्यानंतर शेतकऱ्याची आधार प्रमाणीकरण करावे लागेल त्याकरिता दोन पद्धतीने आधार प्रमाणे करण होईल जसे की,

  • ओटीपी च्या साह्याने
  • बायोमेट्रिक (शेतकऱ्याचा अंगठा घेऊन)

बायोमेट्रिक पद्धतीने

अतिवृष्टी अनुदान 2024 ची केवायसी करण्याकरिता सोयीस्कर पद्धतीने म्हणजेच बायोमेट्रिक पद्धतीने ई केवायसी करू शकता.

खालील फोटोमध्ये दाखवलेल्या पद्धतीने बायोमेट्रिक पद्धतीने ई केवायसी अगदी सहज पद्धतीने होईल आणि ई केवायसी झाली याची प्रत देखील मिळेल.

Anudan E kyc Process
Anudan E kyc Process

ओटीपी च्या साह्याने

अतिवृष्टी 2024 अनुदान ही केवायसी करण्याकरिता ओटीपी हा एक पर्याय देखील दिलेला आहे, परंतु ओटीपी च्या साहाय्याने ई केवायसी प्रक्रिया सहजरीत्या होत नाही शेतकऱ्यांना त्यांचा मोबाईल वरती ओटीपी जाण्यास विलंब होतो किंवा ओटीपी जात देखील नाही.

तरी सर्व शेतकऱ्यांनी अतिवृष्टी अनुदान 2024 ची केवायसी करण्याकरिता बायोमेट्रिक पद्धतीचा वापर करून ई केवायसी करून घ्यावी आणि अनुदानाचा लाभ घ्यावा.

अतिवृष्टी अनुदान 2024 ई केवायसी करून घेणे बद्दल माहिती शेतकऱ्यांना पर्यंत पोहचविणे हा आमचा उद्धेश आहे जेणे करून कोणता हि शेतकरी या योजने पासून वंचित राहणार नाही.

तरी माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना आणि गरजू नागरिकांपर्यंत पाठवा. व अशाच माहिती करिता आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन करू शकता.

Leave a Comment

× Whatsapp ग्रुप जॉईन करा 👉