Agri Stack Registration Farmer ID 2025 असे बनवा शेतकरी ओळखपत्र शेतकरी आयडी

Agri Stack Registration Farmer ID 2025महाराष्ट्र शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वारंवार विविध योजनांची अंमलबजावणी करते याच योजनातील शेतकऱ्यांकरिता एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण योजना म्हणजे Agri Stack.

प्रत्येक शेतकऱ्याला शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या फार्मर आयडी म्हणजेच ऍग्री स्टॅक योजनाची सुरुवात करण्यात आलेली आहे.

शेतकरी आयडी का महत्त्वाचा ?

शेतकरी आयडी म्हणजेच ॲग्री स्टॅक Agri Stack हा एक शेतकऱ्यांना देण्यात येणारा विशिष्ट क्रमांक असून हे तुमचे शेतीतील ओळखपत्रासारखे काम करेल. या शेतकरी आयडीमुळे शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सहजपने घेता येणार जसे की,

  • पिक विमा – प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये पिकांची नुकसान झाल्यास विमा दाव्याची प्रक्रिया जलद प्रकारे केली जाणार.
  • सरळ लाभ हस्तांतरण (DBT)– शासकीय योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा होतील.
  • कर्ज सुविधा – बँकांकडून कर्ज घेणे सोपे होणार. (अन्य कागदपत्रांची आवश्यकता नाही)
  • बाजारपेठेची माहिती- तुमचा पिकांचे बाजारभाव मिळवने सोपे होणार.
  • उत्पादन साहित्य- बियाणे, खत यांसारखी साहित्य सहज उपलब्ध होणार.

👉👉शेतकरी आयडी बनवण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈

शेतकरी आयडी उद्देश

Agri Stack म्हणजेच शेतकरी ओळखपत्र शेतकऱ्यांना प्रदान करण्यात येणार असून, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना उच्च गुणवत्तेचा डेटा व ॲग्री स्टॅक द्वारे कृषी उत्पादने आणि सेवांमध्ये नवकल्पना वाढविण्याचा प्रयत्न या योजनेद्वारे करण्यात येणार आहे.

ॲग्री स्टॅक Agri Stack या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना एकमेव ओळख क्रमांक प्राप्त होईल ज्या क्रमांकामुळे शेतकऱ्यांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असून, वेगवेगळ्या कागदपत्रांची गरज पडणार नाही व शासकीय योजनांचा लाभ घेणे शेतकऱ्यांना सोयीस्कर होईल.

हे नक्की वाचा : अतिवृष्टी अनुदान ई केवायसी प्रक्रिया 2024

शेतकरी आयडी काढण्याचा फायदा

ॲग्री स्टॅक Agri Stack या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध पद्धतीने फायदा मिळणार आहे जसे की,

  • ॲग्री स्टॅक Agri Stack या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी आपली नोंदणी केल्यानंतर त्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी फायदा होईल.
  • पी एम किसान या योजनेमध्ये लाभार्थ्यांची निवड करण्याकरिता या आयडी चा वापर केला जाणार आहे.
  • पिकासाठी कर्ज, किसान क्रेडिट कार्ड आणि कृषी इन्फ्रास्ट्रक्चर आधी शेती विकासाची कर्जासाठी वापर होईल.
  • प्रधानमंत्री पिक विमा या योजनेमध्ये नोंदणी करत असताना देखील या आयडीचा वापर होणार आहे.
  • पिक विमा आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत होणाऱ्या पीक नुकसान भरपाईसाठी शेतकरी आयडीचा वापर केला जाईल.
  • तसेच किमान आधारभूत किमतीवर शेतमाल खरेदीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी फायदा होणार.
  • शेतकऱ्यांना बाजारपेठेची माहिती, कृषी निविष्ठा, तज्ञांचे मार्गदर्शन असा विविध शेतकरी योजनांबद्दल या आयडीचा शेतकऱ्यांना लाभ होणार.
Agri Stack Registration Farmer ID
Agri Stack Registration Farmer ID

आवश्यक कागदपत्रे

ॲग्री स्टॅक Agri Stack या योजनेअंतर्गत शेतकरी नोंदणी करण्याकरिता खालील आवश्यक कागदपत्रे शेतकऱ्यांकडे नोंदणी करतेवेळी आवश्यक असतील जसे की,

  • शेतकऱ्याचे आधार कार्ड
  • राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक
  • आधार लिंक असलेला मोबाईल
  • चालू वर्षातील सातबारा
  • 8अ

Agri Stack Registration अर्ज कोठे आणि कसा करावा ?

ॲग्री स्टॅक Agri Stack या योजनेमध्ये शेतकऱ्यांना नोंदणी करण्याकरिता दोन पर्याय उपलब्ध आहेत जसे की,

  • शेतकरी वैयक्तिक पद्धतीने नोंदणी
  • CSC सेंटर मार्फत.

ॲग्री स्टॅक Agri Stack या योजनेमध्ये नोंदणी करण्याकरिता शेतकऱ्यांना सध्य परिस्थितीमध्ये आपल्या जवळील सीएससी सेंटर मध्ये जाऊन नोंदणी करून घ्यावी. व नोंदणी करत असताना वरील सांगितलेल्या कागदपत्रे सोबत असावी त.

शेतकरी वैयक्तिक पद्धतीने देखील नोंदणी करू शकतात परंतु शासनामार्फत वैयक्तिक नोंदणीचा पर्याय दिलेला आहे परंतु अद्याप हा पर्याय चालू केलेला नाही.

ज्या शेतकऱ्यांना ॲग्री स्टॅक Agri Stack शेतकरी आयडी काढायचा असेल त्यांनी संपर्क करू शकता शेतकरी आयडी काढून दिला जाईल. शेतकऱ्यांच्या आधारला मोबाइल नंबर लिंक असणे आवश्यक आहे तरच आयडी निघेल अथवा आपल्याला थंब च्या सहाय्याने नोंदणी करावी लागेल.

ज्यांना कोणाला ॲग्री स्टॅक Agri Stack शेतकरी आयडी काढण्यासाठी csc सीएस सी आयडी ची आवश्यकता असेल त्यांनी संपर्क करावा.

× Whatsapp ग्रुप जॉईन करा 👉