Pik Vima New Update 2024– पिकाचे दुष्काळ, अतिवृष्टी, पूर्व वादळ, गारपीट, अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास प्रधानमंत्री पिक विमा योजनाअंतर्गत शेतकऱ्याला भरपाई म्हणून नुकसान भरपाई दिली जाते. प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने ही करता येतो. कुठल्याही CSC केंद्रावर जाऊन शेतकरी आपला अर्ज भरू शकतो
पीक विमा भरताना 2024 साठी एक नवीन सूचना विमा कंपनी कडून शेतकऱ्यांसाठी आहे. खालील दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी व शेवटपर्यंत वाचून घ्यावी.
यावर्षी (2024 ) खरीप विमा भरतांनी नवीन नियम विमा कंपनी ने राबवला आहे. असे समजा ज्या शेतकऱ्याचे आधार कार्ड , पासबुक व सातबारा वर नाव सारखे नाहीत म्हणजे थोडा फरक आहे. त्यांना या वर्षी खरीप पिक विमा भरता येणार नाही.
Pik Vima New Update
नावामध्ये तफावत असणारे काही उदाहरण
खाली काही नावामध्ये तफावत असणारे नावे दिली आहेत-
- राम – रामराव,
- बालासाहेब – बाळू,
- ज्ञानेश्वर – ज्ञानदेव,
- प्रभू-प्रभाकर,
- सरुबाई-सरस्वती,
- चंपाबाई- चंफाबाई,
- महादू – महादेव,
- रौफ- रऊफ ,
- कासिम – काशिम ,
- बाबू – बाबुसाब
असे अनेक उदाहरण आहेत. काहींच्या साताबरा वर आडनाव नाहीत त्यांनी आडनाव टाकून घेणे जसे आधार पासबुक वर आहे तसे. आधार कार्ड पासबुक व सातबारा वर स्वतःचे नाव किंवा वडीलाचे नाव किंवा आडनाव मध्ये असे थोडेफार बदल असतील तर आताच त्यांनी आपले नाव दुरुस्त करून घेणे.
हे नक्की वाचा: बांधकाम कामगार नवीन अर्जदार नोंदणी
कारण या सर्वांमध्ये जर सारखा डाटा असेल तरच विम्यामध्ये फॉर्म अप्रुव्हल होनार आहेत . नाही तर तुमचे फॉर्म रिजेक्ट होतील त्यामध्ये वीमा भरणारा दुकानदार किंवा विमा तालुका प्रतिनिधी काहीही करू शकनार नाहीत.
कारण तुम्ही म्हणता अगोदर विमा आम्हाला येत होता. याच नावावर किंवा ह्याच आधारवर, ह्याच पासबुक वर पण आता नवीन नियमानुसार तुमचा सर्व डाटा सारखा असला तरच विमा येणार आहे नाहीतर तुमचे फॉर्म डिलीट होत आहेत.
यावर्षी विमा भरतानी असेच फार्म csc केंद्र चालक यांच्या कडून घेतले जातील ज्यांचा सर्व डाटा व्यवस्थित आहे म्हणजे सर्व नावे बरोबर आहेत.
थोडी ही चुकी असेल तर तुमचे फॉर्म रिजेक्ट होणार यासाठी कोणतेही सी एस सी केंद्र चालक जबाबदार राहणार नाहीत.
टिप – आजच आपले आधार पासबुक व सातबारा पाहून घेणे.थोडी ही चूक असेल तर आजच दुरुस्त करून घ्या. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी
Pik Vima New Update खरीप पिक विमा 2024 अर्ज भरण्याकरिता उपाय
सर्व प्रथम सर्व शेतकऱ्यांना दिलेल्या माहिती प्रमाणे आपली सर्व कागदपत्र व्यवस्थित रित्या तपासून आपले संपूर्ण नाव हे आपल्या आधार कार्ड , पासबुक व ७१२ उताऱ्या प्रमाणे करून घ्यावे.
जर खरीप पिक विमा 2024 शेवट तारखे पर्यंत शेतकऱ्यांना आपले कागदपत्र दुरुस्ती झाले नाही, तर शेतकऱ्यांनी 100 रुपयाच्या बॉंड पेपर वरती नोटरी करून त्यामाध्ये आपल्या नावामध्ये असलेल्या तफावती बद्दल मजकूर लिहून घ्यावा. आणि आपण आपला विमा अर्ज दाखल करू शकता.
खरीप पिक विमा 2024 नवीन अर्ज कधी सुरु होणार ?
Pradhanmantri Fasal Bima Yojana-राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या पिकांचा विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून नाममात्र एक रुपया घेऊन पिक विमाचा हप्ता महाराष्ट्र सरकार भरणार आहे. त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना एक रुपयात विमा काढता येत आहे.
राज्यातील एकही शेतकरी पिक विमा Pik Vima पासून वंचित राहू नये म्हणून राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पिक विमाचा हप्ता स्वतः भरणार आहे. शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात आपल्याजवळच्या सीएससी CSC केंद्रावर जाऊन आपल्या पिकाचा विमा काढता येणार आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे. तोही एक रुपयाचे नाममात्र शुल्क भरून. तरी या योजनेचा सार्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी खरीप पिक विमा २०२४ हा जून महिन्याच्या १५ तारखेला सुरु होणार आहेत. सर्व शेतकऱ्यांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता अर्ज करून घ्यावे.
खरीप पिक विमा २०२४ करिता आवश्यक कागदपत्र-
- शेतकर्याचे आधार कार्ड
- चालू बँक पासबुक
- मो नंबर
- ७१२
- ८अ (३ महिन्याच्या आतील असणे आवश्यक)
- पिक पेरा
- भाडे पत्रक
- 100 रु बॉंड (अर्जदाराच्या नावात तफावत असेल तर).
खरीप पीक विमा 2024 योजने बद्दल माहिती
योजनेचे नाव | प्रधानमंत्री पीक विमा योजना |
कोणी सुरू केली | केंद्र सरकार |
कधी सुरू केली | 13 जानेवारी 2016 |
पीक विमा शेतकरी भरणा रक्कम | 1 रुपया |
उद्देश | पिकाचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत देणे |
कोणाला मिळणार लाभ | सर्व शेतकरी |
अर्ज पद्धत | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाइट | http/:pmfby.gov.in |
- jee mains 2024 Application Process And Last Date.
- Pocra Yojana Maharashtra 2024 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा योजना
- Voter id Download मतदान कार्ड डाउनलोड महाराष्ट्र 2024
- Voter id Important Update 2024. मतदान करत असताना काळजी घ्या नाहीतर गुन्हा दाखल होणार
- Passport Application Process 2024.पासपोर्ट सेवा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया