कडबा कुटी अनुदान राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना: Kadaba Kutti Machine Yojana 2024.

Kadaba Kutti Machine Yojana 2024
Kadaba Kutti Machine Yojana 2024

Kadaba Kutti Machine Yojana 2024– भारत देश हा एक कृषीप्रधान देश असून, महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामीण भागातील बहुतांशी नागरिकांचा शेती हा एक पारंपारिक आणि मुख्य व्यवसाय आहे त्यामुळे शेतीसोबतच ते पशुपालन व्यवसाय करतात तर काही शेतकऱ्यांकडे शेती करण्यासाठी कमी जागा असते त्यामुळे ते मोठ्या प्रमाणामध्ये पशुपालन व्यवसायास प्राधान्य देतात.

पशुपालन व्यवसाय करत असताना शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणी व समस्यांना वारंवार सामोरे जावे लागते. जसे की गाय, शेळी, म्हैस यांना दररोज मोठ्या प्रमाणामध्ये हिरवा चारा खायला द्यावा लागतो त्यासाठी तो चारा दररोज कापण्यासाठी व चाऱ्याची दररोज विल्हेवाट लावण्यासाठी त्यांच्याजवळ कुठल्याही प्रकारचे साधन ग्रामीण ठिकाणी उपलब्ध होत नाही किंवा त्यांच्याकडे उपलब्ध नसते, त्यामुळे त्यांना अशा समस्यांना वारंवार सामोरे जावे लागते.

त्यामुळे राज्यातील पशुपालकांच्या पशुपालन करताना त्यांना येणाऱ्या समस्यांचा विचार करून त्यांच्यासाठी कडबा कुटी मशीन योजना सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. ज्यामुळे गुरांना दररोज लागणारा हिरवा चारा कापण्यासाठी या योजनेतून कडबा कुट्टी च्या सहाय्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.

ही कडबा कुटी शेतकऱ्यांना व तसेच पशुपालकांना परवडेल यासाठी 2 HP एचपी पर्यंतच्या कडबा कुटी मशीन खरेदी करण्यासाठी या योजनेमार्फत लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्याचा दररोजचा वाया जाणारा वेळही वाचेल आणि त्याला शेतीतील इतर कामे जलद गतीने करण्यास मदत देखील होईल.

कडबा कुटी मशीन अनुदान योजना उद्देश

  • शेतकरी तसेच पशुपालकांना पशुपालनासाठी प्रोत्साहित करणे तसेच राज्यातील इतर नागरिकांना देखील पशुपालनासाठी प्रोत्साहन देणे.
  • राज्यातील शेतकरी आणि पशुपालक यांना अनुदानावरती कडबा कुट्टी मशीन चे वाटप करने.
  • तसेच पशुपालन क्षेत्रांमध्ये आधुनिकीकरण आणि तंत्रज्ञानाचा वापर करणे.
  • आणि शेतकऱ्यांना शेती सोबतच पशुपालन या जोडधंद्यामध्ये सहभागी करणे.

हे नक्की वाचा: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्ज प्रक्रिया 2024

कडबा कुटी अनुदान योजना मिळणारे अनुदान

  • राज्य कृषी यांत्रिकीकरण कडबा कुटी अनुदान योजना 2024 या योजनेअंतर्गत राज्य सरकार पशुपालकांना व शेतकऱ्यांना कडबा कुट्टी मशीन खरेदी करण्यासाठी दहा हजारांचे आर्थिक सहाय्य देते.
  • कडबा कुटी मशीन खरेदी करण्यासाठी साधारणतः 20000 रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना खर्च लागतो त्यामुळे अशा शेतकरी व पशुपालकांना या योजने अंतर्गत 10 हजार रुपयांचे अनुदान म्हणजे 50% सबसिडी च्या सहाय्याने कडबा कुट्टी मशीन खरेदी करता येणार आहे. म्हणजेच उर्वरित रक्कम ही शेतकऱ्यांना स्वतः जवळील भरणे आवश्यक राहील.

राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत विविध कृषी अवजारांसाठी मिळणारे अनुदान सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा…..

तरी सर्व शेतकरी व पशुपालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा तसेच तुमच्या परिसरात जे कोणी शेतकरी किंवा पशुपालन असतील तसेच ज्यांचा जवळ पशु आहेत तर त्यांना या योजनेची माहिती आवश्यक द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेअर करा जेणेकरून ते या योजनेअंतर्गत अर्ज करून कडबा कुट्टी मशीन चा मोफत लाभ घेऊ शकतील व त्यांनाही त्यांचा कामामध्ये व दैनंदिन जीवनामध्ये याचा उपयोग होईल.

कडबा कुटी अनुदान योजना पात्रता

  • शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे बंधनकारक आहे.
  • तसेच सातबारा उतारा व आठ उतारा असावा.
  • फक्त एकच अवजारासाठी अनुदान देय राहील म्हणजे ट्रॅक्टर किंवा यंत्र अवजार.
  • लाभार्थ्यांनी जातीचा दाखला सादर करणे बंधन कारक आहे. (अर्ज कास्ट मधून केला असेल तर.)
  • शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न दीड लाखाच्या आत असावे.
  • उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधन कारक आहे.
  • शेतकऱ्यांनी एखाद्या घटकासाठी/अवजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/अवजारासाठी पुढील दहा वर्ष अर्ज करता येणार नाही परंतु इतर अवजारासाठी अर्ज करता येईल.

कडबा कुटी अनुदान योजना नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

  • सर्वप्रथम शेतकऱ्यांकडे आधार कार्ड असले पाहिजे.
  • बँकेचे पासबुक
  • पॅन कार्ड
  • कास्ट सर्टिफिकेट/ जातीचे प्रमाणपत्र.
  • चालू सातबारा
  • 8a उतारा
  • उत्पन प्रमाणपत्र
  • अपंग असल्यास प्रमाणपत्र
  • खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
  • पूर्वसंमती पत्र.

वरील सर्व कागदपत्र व्यवस्तीत रित्या स्कॅन (Scan) करून अर्जा सोबत अपलोड करून घ्यावीत.

हे देखील वाचा : संजय गांधी निराधार योजना

खालील दिलेल्या कृषि यंत्र / अवजारे यांच्या खरेदीसाठी देखील अर्थसहाय्य देण्यात येईल:

1)ट्रॅक्टर
२) पॉवर टिलर
३) ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे
४) बैल चलित यंत्र/अवजारे
५) मनुष्य चलित यंत्र/अवजारे
६) प्रक्रिया संच
७) काढणी पश्च्यात तंत्रज्ञान
८) फलोत्पादन यंत्र/अवजारे
९) वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
१०) स्वयं चलित यंत्रे

शासनाची अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
कडबा कुटी अनुदान योजना GRयेथे क्लिक करा
महिलांसाठी Private Groupयेथे क्लिक करा 

कडबा कुटी अनुदान योजना अर्ज प्रक्रिया

  • जर तुमच्याकडे लॅपटॉप किंवा PC असेल तर आपण या योजनेसाठी घरबसल्या अर्ज करू शकता.जर नसेल तर जवळील CSC सेंटर ला भेट देऊन अर्ज करू शकता.
  • सर्वप्रथम MahaDBT Farmer Scheme या योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
  • या योजनेच्या होम पेज वरती आल्या नंतर आपल्या समोर नवीन अर्जदार नोंदणी व अर्जदार लॉगइन असे दोन पर्याय दिसतील.
  • जर आपण या योजने अंतर्गत अगोदर नोंदणी केली असेल तर वापरकर्ता आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करू शकता अन्यथा नवीन अर्जदार नोंदणी पर्याया वरती जाऊन नोंदणी करून घ्या.
  • नोंदणी करत असताना अर्जदाराचे नाव टाकून घ्यावे नाव हे आधार कार्ड नुसार टाकावे.
  • त्यानंतर वापरकर्ता आयडी टाकावा व तुम्हाला वाटेल तसं पासवर्ड टाकून चालू mob नंबर टाकून OTP मिळवा वरती क्लिक करून OTP पडताळून घ्या व नोंदणी करून घ्यावे.
  • अर्जदार नोंदणी झाल्या नंतर लॉगिन करून घ्यावे लॉग इन केल्यानंतर आधार प्रमाणीकरण करून घ्यावे त्यामध्ये आधार कार्ड क्रमांक टाकून आधार ला लिंक असलेल्या मोबाईल वरती आलेला ओटीपी टाकून आधार व्हेरिफिकेशन करून घ्यावे.
  • आधार वेरिफिकेशन झाल्यानंतर परत अर्जदार लॉगिन करून घ्यावे. लॉगिन केल्यानंतर आपल्यासमोर महाडीबीटी चे मुख्य प्रश्न दिसेल त्यामध्ये वैयक्तिक तपशील या पर्यायाला क्लिक करून विचारली गेली सर्व माहिती व्यवस्थित रित्या टाकून घ्यावी.
  • वैयक्तिक तपशील यामध्ये अर्जदाराची वर्गवारी व्यवस्थित रित्या टाकावी व जात प्रमाणपत्र असेल तर होय करावे किंवा नाही करावे.
  • या योजनेसाठी SC प्रवर्गातील शेतकरी लाभ घेऊ शकतात.त्यासाठी जात प्रमाणपत्र नसेल तर काढून घ्यावे. व नंतर अर्ज करावा.
  • त्यानंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न टाकावे व अर्जदारास किंवा शेतकऱ्यास कोणते अपंग असेल तर अपंगाचा प्रकार निवडून घ्यावा.
  • त्यानंतर अर्जदाराचे बँक खाते क्रमांक व आयएफसी कोड प्रविष्ट करावा जर आपले खाते जनधन असेल तर एस करावे अन्यथा नाही या बटणावर क्लिक करून जतन करून घ्यावे.
  • वैयक्तिक तपशील माहिती भरल्यानंतर पुढील टॅब ओपन करावा व त्यामध्ये शेतकऱ्याचा कायमचा पत्ता व पत्र व्यवहाराचा पत्ता व्यवस्थित टाका व नंतर शेतजमिनीचा तपशील हा पर्याय ओपन होईल त्यामध्ये शेतकऱ्याच्या जमिनीबद्दल माहिती टाकून द्यावी जसे की कोणत्या जिल्ह्यामध्ये जमील आहे त्यानंतर तालुका व गाव एवढी माहिती टाकल्यानंतर आपल्या 8a उतारा वरती 8a चा खाते क्रमांक असतो तो टाकून घ्यावा व त्यानंतर शेतकऱ्याच्या नावावरती एकूण किती जमीन आहे ते हेक्टर आणि आर च्या स्वरूपामध्ये टाकून घ्यावे.
  • जर शेतकऱ्याच्या नावावरती एकापेक्षा अधिक गटांमध्ये जमीन असेल तर सेपरेट सेपरेट सर्वे क्रमांक किंवा गट क्रमांक टाकून त्या गटामधील क्षेत्र हेक्टर आर या प्रमाणामध्ये टाकून घ्यावे व माहिती जतन करून घ्यावी.
  • जर शेतकऱ्यांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत शासनाने जमीन वाटप केलेली असेल तर YES करावे अन्यथा नाही या ऑप्शनवर क्लिक करून जमिनीचा तपशील जतन करून घ्यावा.
  • जतन केल्या नंतर मुख्य पेज वरती आल्या नंतर इतर माहिती प्रविष्ट करा या पर्यायावरती येऊन शेतात असलेल्या सिंचन स्त्रोताचा तपशील दाखल करून घ्यावा, नसेल तर कोणताही स्त्रोत उपलब्ध नाही असे भरून जतन करून घ्यावे.
Kadaba Kutti Machine Yojana 2024
Kadaba Kutti Machine Yojana 2024
  • जतन केल्या नंतर परत मुख्य प्रष्टावरती येऊन अर्ज करा या पर्यायावर यावे.
Kadaba Kutti Machine Yojana 2024
Kadaba Kutti Machine Yojana 2024
  • त्यानंतर कृषी यांत्रिकीकरण योजना निवडून घ्यावे आणि फॉरेज / ग्रास कटर हा पर्याय निवडा आणि विचारल्या प्रमाणे सर्व माहिती टाकून घ्या व जतन करा.
Kadaba Kutti Machine Yojana 2024
Kadaba Kutti Machine Yojana 2024

अशा पद्धतीने तुम्ही कृषी यांत्रिकीकरण कडबा कुट्टी या योजना साठी अर्ज करू शकता व अनुदानाचा लाभ घेऊ शकता.

कडबा कुटी अनुदान योजना अर्ज शुल्क

अर्ज शुल्क:- अर्ज सादर करतेवेळी शेतकऱ्यांनी रु. २०/- शुल्क व रु. ३.६०/- जी.एस.टी. मिळून एकूण रु.२३.६०/- शुल्क ऑनलाईन भरावा लागणार आहे.

अशा पद्धतीने वरील पायऱ्यांचा व्यवस्थितरित्या वापर करून सहज रित्या राज्य कृषी यांत्रिकीकरण कडबा कुट्टी या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता व 50% पर्यंत अनुदान मिळऊ शकता.

तुमचे फॉर्म सबमिट झाल्यानंतर 25 ते 30 दिवसाच्या नंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम थेट डीबीटी/ DBT च्या मार्फत मिळून जाईल. तरी या योजनेचा सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा व गरजूवंता पर्यंत ही माहिती शेअर करा.

जर तुम्हाला अर्ज करण्याकरिता काही अडचण येत असेल तर तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करून माहिती घेऊ शकता किंवा आपल्या जवळील सीएससी (CSC) सेंटरला भेट देऊ शकता. हा ग्रुप Private ग्रुप असल्या मुळे आपला मोबाईल नंबर फक्त ग्रुप अड्मीन लाच दिसेल.

2 thoughts on “कडबा कुटी अनुदान राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना: Kadaba Kutti Machine Yojana 2024.”

Leave a Comment