12th Board Exam Result Date 2024
12th Board Exam Result date 2024 : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेच्या निकालाच्या तारखा जाहीर केल्या आहेत, उद्या दिनांक 21 मे रोजी दुपारी 01 वाजता बारावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्यातील 9 विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या १२ वी परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून तुम्हाला पाहता येणार येईल .
या संकेतस्थळाच्या सहाय्याने पहा 12th Exam रिझल्ट
- http://hscresult.mkcl.org/
- https://www.mahahsscboard.in/mr
- https://results.targetpublications.org/
- https://results.digilocker.gov.in/
गुण पडताळणी व पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन प्रक्रिया विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयापैकी कोणत्याही एका विषयाच्या गुणाची करण्यासाठी किंवा त्या विषयाच्या उत्तर पत्रिकेच्या छाया प्राप्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची उपलब्धतता करून देण्यात आली आहे. 22 मे ते 5 जुनया कालावधीत दिलेल्या या http://verification.mh-hsc.ac.in/ संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत, आणि शुल्क डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून नेट बँकिंग द्वारे भरता येईल.
ज्या विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थिनींना आपल्या उत्तर पत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करायचे आहे, त्यांनी प्रथम उत्तर पत्रिकेचे छाया प्रत घेणे आवश्यक असेल, त्यानंतर छायाप्रत मिळाल्यानंतर पुढील पाच कार्यालयीन दिवसात, संबंधित विभागीय मंडळाकडे विहित शुल्क भरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल, अधिक माहितीसाठी विभागीय मंडळाचे विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा.
डीजीलॉकर ॲपच्या माध्यमातून गुणपत्रिका संग्रहित करता येणार आहे. पेपर निहाय विषयानुसार गुणांची माहिती या संकेतस्थळावरून उपलब्ध होईल आणि त्याची प्रिंटआऊटी घेता येईल. 12th Board Exam Result date 2024
विद्यार्थ्यांसाठी दोन संधी उपलब्ध फेब्रुवारी व मार्च 2024 च्या उच्च माध्यमिक परीक्षेत सर्व विषयांसह उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रेणी गुणसुधारासाठी लगेचच्या 2 संधी उपलब्ध राहतील. पहिली संधी ही जुलै व ऑगस्ट 2024 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी असेल. या परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधारासाठीच्या विद्यार्थ्यांना 27 मे पासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन आवेदन करता येईल. दुसरी संधी फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये मिळेल.
- Gay Gotha Yojana Online Apply. गाय गोठा अनुदान योजना 2025.
- Agri Stack Registration Farmer ID 2025 असे बनवा शेतकरी ओळखपत्र शेतकरी आयडी
- Pik Vima New Update 2024 पिक विमा घोटाळा चौकशी
- Anudan E kyc Process अतिवृष्टी अनुदान ई केवायसी प्रक्रिया 2024
- Ladki bahin yojana status check maharashtra 2024 लाडकी बहिण योजना स्थिती