Pocra Yojana Maharashtra 2024–नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोकरा योजना होय. भारतरत्न नानाजी देशमुख यांचे नाव या प्रकल्पाला दिलेले आहे. या कृषी संजीवनी प्रकल्पाची संकल्पना ही कृषी विभाग, महाराष्ट्र शासन तसेच जागतिक बँकेने कृषी क्षेत्राकरिता दीर्घकालीन आणि शाश्वत उपाय म्हणून दुष्काळ निवारण आणि हवामान प्रतिरोधक धोरण विकसित करण्याकरिता बनवण्यात आलेली ही एक अत्यंत महत्त्वाचे आणि नाविन्यपूर्ण योजना ही शेतकऱ्यांकरिता ठरलेली आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी तांत्रिक तज्ञांच्या मदतीने शेतकर्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्यास शिकविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे जेणेकरून शेतकरी शेतीतून चांगल्या प्रतीचे उत्पादन करू शकतील व त्यांचे जीवनमान सुधारू शकतील.
शेतकऱ्यांना मिळणारा लाभ
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोकरा योजना या अंतर्गत शेतकऱ्यांना विविध प्रकारे लाभ होतो जसा की,
- शेतकऱ्यांना शेतीमध्ये लागणारे ठिबक सिंचन, तुषार सिंचन म्हणजेच स्प्रिंकलर, शेततळे, शेततळ्यामध्ये अस्तरी करण अशा विविध उपक्रमांकरीता या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान रुपी लाभ दिला जातो.
- अल्पभूधारक शेतकरी असेल तर त्यांना पाण्यासाठी विहिरीची योजना चा समावेश आहे.
- जर शेतकऱ्यांनी विहीर आणि शेतामध्ये शेततळे घेतले असेल तर अशा शेतकऱ्याला विहिरीपासून शेततळ्यामध्ये पाणी देण्याकरिता पाईपलाईन ही योजना देखील या प्रकल्पांतर्गत आहे.
हे नक्की वाचा : किसान ड्रोन योजना नोंदणी प्रक्रिया 2024.
- पॉलि हाऊस, पॉली बोगदे यांसारख्या संरक्षित लागवड तंत्रांकरिता देखील आर्थिक सहाय्य उपलब्ध आहे.
- हवामान प्रतिरोधक बियाणे उत्पादन समाविष्ट आहे.
- शेतकऱ्यांना उत्पादन काढल्यानंतर साठवणुकीची कुठलीच व्यवस्था नसल्यामुळे बाजार भाव कमी असतानाही शेतकऱ्यांना त्यांचे पीक विकावे लागतं त्याकरिता या योजनेमार्फत गोडाऊनची सुविधा देखील देण्यात आलेली आहे.
- शेतकरी उत्पादक संस्था किंवा कंपनीत आणि बचत गटांकरिता या योजनेअंतर्गत विशेष अर्थसहाय्य आहे.
- या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारा लाभ हा त्यांच्या आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या मार्फत दिला जातो.
- नानाजी देशमुख कृषी संजीवनी या योजनेअंतर्गत महिला, अपंग व्यक्ती व भूमिहीन मजुरांना विशेषाधिकार दिलेला आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा योजना 2024.
Pocra Yojana Maharashtra पात्रता
नानाजी देशमुख कृषी संजीवनी म्हणजेच पोकरा या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जदाराने खालील बाबींची पूर्तता करणे गरजेचे आहे.
- सर्वप्रथम अर्जदार हा शेतकरी असावा तसेच महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- अर्ज करत असणारा शेतकरी याची जमीन शेती कामाकरिता वापरात असणे गरजेचे आहे अशाच शेतकऱ्यांना पोकरा योजनेचा लाभ दिला जातो.
- या योजनेअंतर्गत 5 सेक्टर पेक्षा जास्त जमीन असलेले शेतकरी या योजनेस अपात्र ठरतील. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा योजना 2024.
हे नक्की वाचा : गुगल पे वरून मिळवा 1 लाख फक्त पाच मिनिटात.
आवश्यक कागदपत्रे
पोकरा योजनेचा लाभ घेण्याकरिता खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे,
- आधार कार्ड
- जमिनीचा तपशील जसे की, 712, 8अ उतारा
- जातीचे प्रमाणपत्र (SC आणि ST या प्रवर्गातील अर्जदारा करिता आवश्यक)
- भूमिहीन प्रमाणपत्र (भूमिहीन शेतकरी आणि मजुरांकरिता)
- विधवा महिलांकरिता पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
- घटस्फोटीत महिलांकरिता घटस्फोट प्रमाणपत्र
- राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा योजना 2024.
अर्ज प्रक्रिया
पोकरा योजने मध्ये अर्ज करण्याकरिता सर्वप्रथम आपल्याला या योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती यावे लागेल. अधिकृत वेबसाईटची लिंक खाली दिलेली आहे तिच्या सहाय्याने तुम्ही अर्ज करू शकता.
वरील लिंक ला क्लिक करून आपण योजनेचा अधिकृत वेबसाईट वरती याल त्यानंतर तुम्हाला खालील प्रमाणे एक पेज ओपन होईल त्यामध्ये दिलेल्या पद्धतीने शेतकरी नवीन नोंदणी करण्याचा पर्याय दिलेला आहे.
शेतकरी नवीन नोंदणी या पर्यायाच्या माध्यमातून तुम्ही पोकरा योजने करिता अर्ज करू शकता व या योजनेचा लाभ घेऊ शकता.
पुढील लेखांमध्ये आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोकरा योजना करिता कशा पद्धतीने अर्ज करता याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा योजना 2024.
समाविष्ट असणारी जिल्हे
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोकरा योजनेअंतर्गत खालील जिल्हे समाविष्ट आहे,
- जळगाव, अकोला, वाशिम, बुलढाणा, वर्धा, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, परभणी, लातूर, बीड, अमरावती, जालना व उस्मानाबाद.
तसेच 155 ते 156 तालुक्यांचा व साधारणता 3755 एवढ्या ग्रामपंचायतीचा या योजनेमध्ये समावेश आहे. पोकरा योजना.
पोखरा योजनेमध्ये समाविष्ट घटक.
- हवामान अनुकूल कृषी पद्धती यामध्ये शंभर टक्के अनुदान दिले जाते.
- हवामान अनुकूल कृषी परिस्थिति प्रोत्साहनअनुदान देणे.यामध्ये शंभर टक्के अनुदान दिले जाते.
- जमिनीमध्ये कर्ब ग्रहणाचे प्रमाण वाढविणे यामध्ये शंभर टक्के अनुदान दिले जाते.
- एकात्मिक शेती पद्धती यामध्ये 50% अनुदान दिले जाते.
- क्षारपड व चोपण जमिनीचे व्यवस्थापन( खारपाणीग्रस्त गावे) संरक्षक शेती यामध्ये 100% व काही ठिकाणी 50% अनुदान दिले जाते. Pocra Yojana Maharashtra 2024.
- सूक्ष्म सिंचन यामध्ये 50% अनुदान दिले जाते.
- जमीन आरोग्य सुधारणे यामध्ये 50% अनुदान दिले जाते.
- पाणी साठवण संरचनांची निर्मिती यामध्ये 100 % व काही ठिकाणी 50% अनुदान दिले जाते.
- शेतमाल वृद्धी साठी हवामान अनुकूल उद्यानमुख मूल्य साखळ्यांचे बळकटीकरण यामध्ये 50 % अनुदान दिले जाते. हवामान अनुकूल बियाणे वितरण प्रणाली कार्यक्षमता वृद्धी त्यामध्ये 50% अनुदान दिले जाते. बियाणे हबसाठी पायाभूत सुविधांचा विकास करणे यामध्ये 50% अनुदान दिले जाते.
- काढणीपक्षात व्यवस्थापन व हवामान अनुकूल मूल्य साखळी प्रोत्साहन. यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन देणे. यामध्ये शेतकरी गटासाठी 100% अनुदान दिले जाते व भाडेतत्त्वावर कृषी अवजार केंद्र- सुविधा निर्मिती यासाठी 50 % अनुदान दिले जाते.
- पाण्याचा कार्यक्षम व शाश्वत पद्धतीने वापर करणे यामध्ये 50% अनुदान दिले जाते. Pocra Yojana Maharashtra 2024.
- Pocra Yojana Maharashtra 2024 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा योजना
- Voter id Download मतदान कार्ड डाउनलोड महाराष्ट्र 2024
- Voter id Important Update 2024. मतदान करत असताना काळजी घ्या नाहीतर गुन्हा दाखल होणार
- Passport Application Process 2024.पासपोर्ट सेवा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- Google Pay App Personal Loan 2024 गुगल पे वरून मिळवा 1 लाख फक्त पाच मिनिटात.