Kapus Soybean Anudan E Kyc Process 2024 – सन 2023 मध्ये कापूस आणि सोयाबीन या पिकांची लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या झालेल्या पिक नुकसानी बद्दल अनुदान देण्याचे ठरवले आहे.
खरीप अनुदान 2023 याबाबत शेतकऱ्यांची आवश्यक ती माहिती व सामाईक खातेदार असल्यास त्यांचाबाबत संमती पत्र देखील ग्राम लेवल वरती कृषी सेवक यांच्यामार्फत मागविण्यात आलेली आहे.
Kapus Soybean Anudan E Kyc Process थोडक्यात
महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन या पिकाचे अनुदान शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोचले पाहिजे याकरिता इ के वाय सी ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
या योजनेचा लाभ हा शेतकऱ्यांना कोणत्याही हस्तक्षेपा शिवाय लाभ हा या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांपर्यंत आधारशी संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये पोहोचवा याचीच खातिर जमा करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने ई केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे.
शेतकऱ्यांमार्फत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच शेतकरी या योजनेस पात्र ठरतील आणि त्यानंतरच खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस या पिकांच्या अनुदानाचा लाभ घेऊ शकतील.
त्यामुळेच शेतकऱ्यांनी स्वतःची केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे.
हे नक्की वाचा : मागेल त्याला सौर कृषी पंप योजना स्वतः अर्ज करा
आवश्यक कागदपत्रे
खरीप अनुदान 2023 केवायसी करण्याकरिता खालील कागदपत्रे शेतकऱ्यांकडे असणे आवश्यक आहे जसे की,
- शेतकऱ्याचे आधार कार्ड
- आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक
- शेतकऱ्याचा थंब (जर शेतकऱ्याच्या आधारशी मोबाईल नंबर लिंक नसेल तर स्वतः शेतकरी असणे आवश्यक असेल)
ई केवायसी प्रक्रिया
सोयाबीन आणि कापूस खरीप अनुदान 2023 यावर्षी च्या अनुदानाची केवायसी करण्याकरिता खालील सांगितलेल्या पद्धतीचा वापर करून तुम्ही स्वतः घरी बसल्या आणि स्वतःच्या मोबाईलच्या मदतीने केवायसी करू शकता आणि अनुदानाचा लाभ सुद्धा घेऊ शकता.
- सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या खरीप अनुदान 2030 या योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती यावे लागेल. या वेबसाईटची लिंक खाली दिलेली आहे.
वरील लिंक ला क्लिक केल्यानंतर तुम्ही खरीप अनुदान 2023 या योजनेचा अधिकृत वेबसाईट वरती याल.
वरील पेज वरती आल्यानंतर आपल्यासमोर महाराष्ट्र शासनाचे एक पेज ओपन होईल त्यामध्ये आपल्यासमोर दोन ऑप्शन दिसतील जसे की,
- Log In – हे ऑप्शन गावच्या कृषी सहाय्यका करिता दिलेले आहे या ऑप्शनच्या माध्यमातून जर तुम्हाला स्वतः केवायसी करण्याकरिता काही अडचण येत असेल तर तुम्ही तुमच्या गावच्या कृषी सहाय्यक च्या माध्यमातून देखील केवायसी करून शकता.
- Disbursement Status – शेतकऱ्यांना खरीप अनुदान या योजने करिता ई केवायसी करण्याकरिता याच ऑप्शनचा माध्यमातून करायची आहे.
सर्वप्रथम Disbursement स्टेटस या पर्यायावर क्लिक करून घ्या या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर खाली दिलेल्या पद्धतीने एक पेज ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांचा आधार क्रमांक टाकावा लागेल.
तुमचा आधार क्रमांक टाकल्यानंतर एक कॅपच्या कोड प्रविष्ट करावा लागेल आणि जर तुमच्या आदर्श मोबाईल लिंक असेल तर ओटीपी (OTP) हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्या अथवा बायोमेट्रिक Biomatric हे ऑप्शन निवडावे
हे ऑप्शन निवडल्यानंतर जर तुमचे आधार क्रमांक खरीप अनुदान 2023 या योजनेच्या पोर्टल वरती उपलब्ध असेल तर तुम्हाला तुमच्या आदर्श लिंक मोबाइल क्रमांक वरती एक ओटीपी पाठवला जाईल तो व्यवस्थित रित्या टाकून Get Data या ऑप्शन ला निवडा.
तुम्ही टाकलेला ओटीपी आणि तुमच्या मोबाईल क्रमांक वरती आलेला ओटीपी जर जुळला तर तुमचे आधार प्रमाणे करा म्हणजेच ई केवायसी अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल आणि या अर्जाची पावती तुम्हाला मिळून जाईल.
खरीप अनुदान 2023 या सालच्या अनुदानाची पावती नमुना खाली दिलेल्या आहे त्या पद्धतीने केवायसी पूर्ण झाले नंतर तुम्हाला देखील अर्जाची पावती प्राप्त होईल.
या योजनेअंतर्गत अर्ज करत असताना किंवा केवायसी करत असताना जर तुम्हाला काही अडचण असेल किंवा या योजनेबद्दल काही विचारपूस करायचे असेल तर खाली हेल्पलाइन नंबर दिलेला आहे या नंबरच्या सहाय्याने तुम्ही आपल्या प्रश्नाचे निराकरण करू शकता.
अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
हेल्पलाइन क्रमांक | ०२२- ६१३१ ६४०१ |
अशाच नव-नवीन योजनेबद्दल अधिक माहिती करिता आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.
हा ग्रुप Private ग्रुप असल्यामुळे आपला नंबर फक्त ग्रुप admin लाच दिसेल तरी निश्चिंत ग्रुप join करा.
- Pocra Yojana Maharashtra 2024 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा योजना
- Voter id Download मतदान कार्ड डाउनलोड महाराष्ट्र 2024
- Voter id Important Update 2024. मतदान करत असताना काळजी घ्या नाहीतर गुन्हा दाखल होणार
- Passport Application Process 2024.पासपोर्ट सेवा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- Google Pay App Personal Loan 2024 गुगल पे वरून मिळवा 1 लाख फक्त पाच मिनिटात.