वसंतराव नाईक बिनव्याजी कर्ज योजना 2024 Vasantrao Naik Binvyaji karj Yojana 2024 registration process

वसंतराव नाईक बिनव्याजी कर्ज योजना 2024– या योजनेअंतर्गत मंडळामार्फत भटक्‍या जमाती, विमुक्त जाती आणि विशेष मागासवर्ग या प्रवर्गांच्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींना सामाजिक, आर्थिक व तसेच शैक्षणिक उन्नती करिता विविध योजनांची अंमलबजावणी या मंडळामार्फत केली जाते.

Table of Contents

वसंतराव नाईक बिनव्याजी कर्ज योजना उद्देश

  • नागरिकांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी वसंतराव नाईक कर्ज योजनेतून बिनव्याजी कर्ज उपलब्ध होते.
  • नागरिकांना स्वतःच्या पायावर उभे करून त्यांना आत्मनिर्भर बनवणे.
  • तसेच महाराष्ट्र राज्यातील भटक्या जमाती विशेष मागास वर्गीय  व विमुक्त जाती या प्रवर्गातील नागरिकांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे.
  • महाराष्ट्र राज्यातील बेरोजगारीला आळा घालून बेरोजगारी कमी  करून राज्यांमध्ये औद्योगिक विकास निर्माण करणे व नागरिकांना आत्मनिर्भर बनवणे.
  • महाराष्ट्रातील विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागासवर्गीय या प्रवर्गातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे.
  • व राज्यांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करणे.
  • नागरिकांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी आत्मनिर्भर व सशक्त बनवने.
  • बेरोजगार नागरिकांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये यासाठी या योजनेचा फायदा होतो.

हे नक्की वाचा : मोफत फवारणी पंप योजना 2024 

वसंतराव नाईक बिनव्याजी कर्ज योजनेचे वैशिष्ट्य

  • वसंतराव नाईक कर्ज योजना ही महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे.
  • ही योजना पूर्णतः ऑनलाइन स्वरूपामध्ये सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे या योजने अंतर्गत अर्ज करण्यापासून ते लाभधारकांना थेट कर्ज मिळेपर्यंत त्यांच्या अर्जाची सद्यस्थिती देखील ऑनलाईन स्वरूपामध्ये अर्जदाराला मिळणे शक्य आहे.
  • तसेच ही योजना ऑनलाइन स्वरूपामध्ये असल्यामुळे या योजनेमध्ये 100% पारदर्शकता आलेली आहे.
  • या योजनेची अंमलबजावणी पूर्णतः ऑनलाइन असल्यामुळे लाभ धारकाला वारंवार कार्यालयांमध्ये फेरफटका मारण्याची आवश्यकता ही नाही. त्यामुळे अर्जदार घरी बसून स्वतःच्या सहाय्याने मोबाईल वरून किंवा लॅपटॉपच्या साह्याने या योजनेसाठी थेट अर्ज करू शकतो त्यामुळे अर्जदाराच्या वेळेची आणि पैशांची बचत होते.
  • तसेच या योजनेअंतर्गत लाभ धारकाला दिली जाणारी रक्कम ही लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
  • या योजनेमध्ये शासनाचा सहभाग हा 100 टक्के आहे तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी सहजरीत्या याच्यामध्ये अर्ज देखील सादर करू शकतो व सोप्या पद्धतीने लाभ घेऊ शकतो तसेच काही शंका असेल तर जिल्हा कार्यालयाचे ऑनलाईन संपर्क किंवा तक्रार दाखल करू शकतो. वसंतराव नाईक बिनव्याजी कर्ज योजना
महिलांसाठी Private GroupJoin Free
आधिकारिक वेबसाइटयेथे क्लिक करा
कार्यालया ला संपर्क करण्यासाठीयेथे क्लिक करा

वसंतराव नाईक बिनव्याजी कर्ज योजनेचे लाभार्थी कोण?

  • महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती
  • भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील नागरिक जे की स्वतःचा लघुउद्योग सुरू करण्यासाठी इच्छुक असतील या प्रवर्गातील सर्व लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

वसंतराव नाईक बिनव्याजी कर्ज योजनेची पात्रता

  • सर्वप्रथम अर्जदार किंवा लाभार्थी हा मूळतः महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे बंधनकारक आहे
  • अर्जदार किंवा लाभार्थी विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागासवर्गीय या प्रवर्गातील असावा.
  • तसेच अर्जदाराचे वय हे कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 55 वर्ष यांच्या दरम्यान असने आवश्यक आहे.

वसंतराव नाईक बिनव्याजी कर्ज योजना नियम व अटी

  • सर्वप्रथम अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे जर अर्जदार महाराष्ट्र राज्याच्या बाहेरचा असेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • तसेच अर्जदाराने अगोदर या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • अर्जदाराकडे कोणत्याही बँकेची थकबाकी नसली पाहिजे.
  • या योजनेअंतर्गत एक लाखांपैकी 75 हजार रुपये हे पहिल्या हप्त्याच्या स्वरूपात दिला जाईल व उर्वरित 25 हजार रुपये हे प्रत्यक्ष उद्योग स्थापित झाल्यानंतर जिल्हा व्यवस्थापकांचा तपासणीनंतर साधारणतः तीन महिन्याच्या कालावधीमध्ये दिला जाईल.
  • अर्जदाराला नियमितपणे 48 महिने मुद्दल 2085 रुपये परतफेड करावी लागेल.
  • तसेच लाभार्थीला त्यांचा उद्योग फक्त महाराष्ट्रच सुरू करता येईल.
  • जर उद्योग महाराष्ट्र बाहेर करण्याचा असेल तर या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • 55 वर्ष वयाच्या वरील नागरिकांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही

हे देखील वाचा : ट्रॅक्टर अनुदान योजना.

  • एका वेळेस अर्जदारातील कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीस सदर योजनेचा लाभ घेता येईल.
  • तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाखापेक्षा जास्त नसावे एक लाखाच्या आत मध्ये असणे आवश्यक आहे व हे प्रमाणपत्र तहसीलदार यांच्या मार्फत भेटलेले असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थ्याच्या शेत जमिनीचे नोंदणी कृत गहाणखत करणे आवश्यक आहे शेत जमिनीचे मूल्यांकन व गहाणखत केल्यानंतर शेत जमिनीच्या सातबारा किंवा मिळकत उताऱ्यावरती महामंडळाचा कर्ज रकमेचा बोजा नोंद करणे आवश्यक राहील.
  • या योजनेसाठी दोन जामीनदार देखील आवश्यक असते त्यापैकी एक शासकीय निमशासकीय पगारी जामीनदार असावा तसेच शासकीय जामीनदाराची सेवा किमान आठ वर्ष शिल्लक असावी.
  • जामीनदार हा कायमस्वरूपी म्हणजेच पर्मनंट कर्मचारी असावा.
  • दुसऱ्या जामीनदाराकडे लाभार्थीला दिलेल्या कर्ज इतकी स्थावर मालमत्ता असणे आवश्यक आहे.
  • जर लाभार्थ्याच्या नावावरती सातबारा नसेल तर त्याच्याकडे असलेल्या मालमत्तेवर महामंडळाने दिलेल्या कर्जाचा बोजा उतरवण्याची नोंद करण्यात यावी.
  • तसेच दिलेले दोन्ही जामीनदार हे यापूर्वी कोणत्याही वित्तीय संस्थेत किंवा इतर कोठेही जामीनदार नसावे.
  • कर्ज परतफेड बाबत लाभार्थ्याकडून एक शपथपत्र देखील घेण्यात येईल.
  • लाभार्थ्यांनी स्थापन केलेल्या व्यवसायाचा विमा हे लाभार्थ्याने स्वखर्चाने उतरवणे बंधनकारक आहे व प्रत्येक वर्षी या विम्याचे नूतनीकरण करणे देखील लाभार्थ्याला बंधनकारक राहील.

वसंतराव नाईक कर्ज योजनेसाठी आवश्यक असणारे कागदपत्र

  • लाभार्थ्याचे आधार कार्ड
  • लाभार्थ्याचा रहिवासी दाखला (रहिवासी दाखला हा तहसील कार्यालयातून भेटलेला असावा)
  • राशन कार्ड
  • पॅन कार्ड
  • जातीचे प्रमाणपत्र (कास्ट)
  • जन्म प्रमाणपत्र असेल तर
  • चालू मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • पासपोर्ट साईज फोटो
  • जो व्यवसाय करायचा आहे त्या व्यवसायासाठी लागणारे कोटीशन.
  • बँक खाते पुस्तक
  • शाळा सोडल्याचा दाखला (जन्म तारखेच्या पुराव्यासाठी)

हे नक्की वाचा : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घरबसल्या अर्ज करा 2024

Vasantrao Naik scheme या योजनेअंतर्गत सुरू करण्यात येणारे व्यवसाय –

  • सायबर कॅफे
  • स्टेशनरी शॉप
  • सलून
  • झेरॉक्स
  • संगणक प्रशिक्षण केंद्र
  • ब्युटी पार्लर
  • मसाला उद्योग
  • पापड उद्योग
  • वडापाव विक्री केंद्र
  • भाजी विक्रेते
  • ऑटो रिक्षा चालक
  • चहा विक्रेता
  • स्वीट मार्ट
  • ड्राय क्लीनिंग सेंटर
  • हॉटेल्स
  • टायपिंग इन्स्टिट्यूट
  • मोबाईल रिपेरिंग सेंटर
  • गॅरेज
  • फ्रिज दुरुस्ती केंद्र
  • एसी दुरुस्ती केंद्र
  • इलेक्ट्रिक शॉप
  • फळ विक्रेता
  • किराणा दुकान
  • आठवडी बाजार मध्ये छोटेसे दुकान.

 अशा विविध व्यवसायांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.

Vasantrao Naik Mahamandal Loan अंतर्गत दिले जाणारे प्राधान्य

  • निराधार व्यक्ती
  • विधवा महिला
  • शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत तसेच शासकीय/निमशासकीय संस्थांमधून तांत्रिक प्रशिक्षण घेतलेली तसेच अनुभवी तरुण मुले/मुली यांना प्राधान्य देण्यात येते.

Vasantrao Naik Vikas Mahamandal Online application Step by step Process

  • सर्वप्रथम आपल्याला वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ च्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
वसंतराव नाईक बिनव्याजी कर्ज योजना
वसंतराव नाईक बिनव्याजी कर्ज योजना
  • त्यानंतर नोंदणी करा या ऑप्शनला क्लिक करून पुढे जावे लागेल व समोर विचारलेली आवश्यक ती माहिती भरून घ्यावी लागेल.
  • जसे की योजनेचा प्रकार त्यामध्ये वैयक्तिक निवडावे त्यानंतर अर्जदाराचा एक पासपोर्ट साईज फोटो अपलोड करून घ्यावा व लाभार्थीची संपूर्ण नाव जसे की प्रथम नाव मधले नाव व आडनाव टाकून घ्यावे.
  • त्यानंतर अर्जदाराच्या वडीलाचे आईचे पूर्ण नाव टाकून घ्यावे लिंग सिलेक्ट करावे जन्मतारीख व वय प्रविष्ट करावे व चालू मोबाईल नंबर व इमर्जन्सी नंबर दाखल करून घ्यावा आणि ईमेल आयडी प्रविष्ट करा.
  • तसेच पुढे जातीची श्रेणी विचारली जाईल ज्यामध्ये आपली कास्ट निवडावी जसे की विमुक्त जाती फटक्या जमाती एसबीसी व नंतर उपजात निवडावी आणि आपली शैक्षणिक पात्रता प्रविष्ट करा.
  • त्यानंतर आपला पत्ता दाखल करावा नंतर उत्पन्नाचा तपशील विचारेल त्यामध्ये आपल्या कुटुंबाची एकूण वार्षिक उत्पन्न जसे की एक लाखाच्या आत असणे आवश्यक आहे ते रक्कम भरून घ्यावे त्यानंतर जर आपला व्यवसाय आधीची स्थापित असेल तर तिथे होय किंवा नाही सिलेक्ट करावे व व्यवसायाचे नाव टाकून घ्यावे. जर व्यवसाय आणि राहण्याचा पत्ता वेगवेगळा असेल तर व्यवसायाचा पत्ता प्रविष्ट करून घ्यावा आणि आपला व्यवसाय स्थापित झाल्यास सध्या गुंतवलेले ची भांडवल आहे ते दाखल करून घ्यावे जर हा व्यवसाय उभारण्यासाठी आपण कोणते बँकेचे कर्ज अथवा सरकारी अनुदान घेतले असेल तर तिथे होय नाही निवडावे आणि जर घेतले असेल तर बँकेचे नाव किंवा शाखेचे नाव व घेतलेली रक्कम प्रविष्ट करून द्यावी.

हे वाचा : अण्णाभाऊ साठे कर्ज योजना 2024

  • त्यानंतर व्यवसायाचा तपशील दाखल करावा जसे की आपल्या मालकीची जमीन आहे  का? इमारत किंवा दुकान हे आपल्या मालकीचे आहे का? व्यवसाय भागीदारी आहे का? व्यवसायाचा परवाना क्रमांक दाखल करावा.
  • व त्यानंतर आपले चालू बँक खाते क्रमांकाची माहिती दाखल करून घ्यावी आणि वसंतराव नाईक महामंडळाकडून आपल्याला अपेक्षित कर्जाची रक्कम ही आपण जे कोटेशन दाखल करत आहोत त्या कोटेशन प्रमाणे असणे आवश्यक आहे कोटेशन वरील रक्कम टाकून आपला फॉर्म जतन करावा.
  • सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपल्यासमोर कागदपत्र अपलोड करण्याचे ऑप्शन दिसेल त्यामध्ये अपलोड करून घ्यावे. त्यामध्ये जन्मतारखेचा पुराव्या मध्ये शक्यतो शाळा सोडल्याचा दाखला असेल तर तो अपलोड करावा.
  • व कोटेशन मध्ये कोटेशन आणि जर अगोदर व्यवसाय असेल तर व्यवसायाचे लायसन म्हणजे शॉप ॲक्ट किंवा उद्योग आधार हे दोन्ही एका पीडीएफ मध्ये अपलोड करावे.
  • व शेवटी सर्व माहिती भरून झाल्यानंतर एक डिक्लेरेशन चे पेज ओपन होईल त्याला क्लिक करून माहिती दाखल करून घ्या व अर्ज दाखल झाल्यानंतर अर्जाची प्रत काढून घ्यावी.
  • जर आपल्या अर्जामध्ये कोणतीही त्रुटी असेल तर आपण परत लॉगिन करून मोबाईल नंबर च्या साह्याने लॉगिन करून घ्यावे व आपण त्या अर्जामध्ये करेक्शन करू शकतो.

अशा पद्धतीने आपण या योजनेमध्ये सहभागी होऊन या योजनेचा लाभ घेऊ शकतो व आपला स्वतःचा व्यवसाय स्थापन करू शकतो.

अर्ज दाखल केल्या नंतर 15 दिवसाच्या आत अर्जाला मंजुरी मिळते. जर काही अडचण असेक तर कार्यालयाशी संपर्क करू शकता.

कार्यालयाशी संपर्क करण्यासाठी येथे क्लीक करा

अशाच नव-नवीन योजनेबद्दल अधिक माहिती करिता आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.

हा ग्रुप private ग्रुप असल्यामुळे आपला नंबर फक्त ग्रुप admin लाच दिसेल तरी निश्चिंत ग्रुप join करा.

5 thoughts on “वसंतराव नाईक बिनव्याजी कर्ज योजना 2024 Vasantrao Naik Binvyaji karj Yojana 2024 registration process”

Leave a Comment