मोफत फवारणी पंप योजना 2024– नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारत देश हा एक कृषिप्रधान देश असून शेती करत असताना शेतकऱ्यांना विविध अवजारांची किंवा उपकरणांची सतत गरज पडते. शेतकऱ्यांना अवजारांची पूर्तता होईल या अनुषंगाने महाराष्ट्र सरकार कृषि विभागांतर्गत शेतकऱ्यांसाठी वारंवार नवीन योजना राबवत असते.
याच धरतीवर महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण योजनेची सुरुवात केली आहे, या योजणे अंतर्गत शेतकऱ्यांना मोफत फवारणी पंप दिले जाणार आहेत ते ही 100% अनुदानावरती.
मोफत फवारणी पंप योजने बद्दल थोडक्यात.

मोफत फवारणी पंप या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये शेतात पिकाला फवारणी करण्यासाठी मोठा फायदा होणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील दुष्काळाची परिस्तिथी पाहता शेतकऱ्यांना मोफत 100% अनुदानावर्ती बॅटरी वरती चालणाऱ्या फवारणी पंपाचे वाटप या योजनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना कडे शेवटचे काही दिवस बाकी आहेत. तर सर्व शेकर्यांनी या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा आणि आपल्या जवळील शेतकऱ्यांना पर्यंत देखील ही माहिती पोहोचवा जेणेकरून ते देखील या योजनेमध्ये सहभागी होऊन लाभ घेतील.
हे नक्की वाचा : अशी करा ई पिक पाहणी घरबसल्या 2024.
मोफत फवारणी पंप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
या योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता शेतकऱ्यांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे जसे की,
- शेतकऱ्यांचे आधार कार्ड
- राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
- चालू सातबारा
- आठ अ उतारा
- कास्ट सर्टिफिकेट (लाभार्थी शेतकरी जर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती या प्रवर्गामध्ये मोडत असेल तर आवश्यक)
- उत्पन्न प्रमाणपत्र (अनुसूचित जाती आणि जमाती या प्रवर्गातील लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे, उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे आपला अर्ज मंजूर झाल्यानंतर लागेल अर्ज करत असताना उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही)
- पॅन कार्ड (असेल तर )
- अपंग प्रमाणपत्र (शेतकरी दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करत असेल तर आवश्यक)
| आधिकारिक वेबसाइट | येथे क्लिक करा |
| महिलांसाठी Private Group | येथे क्लिक करा |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 26 ऑगस्ट 2024. |
| हेल्पलाइन नं. | 022-61316429 |
पात्रता
- मोफत फवारणी पंप या योजनेचा लाभ घेण्याकरिता शेतकरी हा महाराष्ट्र राज्यातील नागरिक असावा.
- तसेच अर्जदार शेतकऱ्यांकडे त्यांची स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे. (सामायिक क्षेत्र असेल तर संमती पत्र आवश्यक)
- शेतकरी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती मध्ये अर्ज करत असेल तर जातीचा दाखला शेतकऱ्यांकडे असणे आवश्यक आहे.
जर शेतकऱ्याने या अगोदर योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याला पुढील दहा वर्ष या योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या घटकासाठी परत लाभ घेता येणार नाही, परंतु या योजनेअंतर्गत दुसऱ्या घटकाकरिता त्याला अर्ज करता येईल. म्हणजेच इतर अवजारासाठी अर्ज करता येईल. उदा. एखाद्या शेतकऱ्याने सण 2019-2020 या साली ट्रॅक्टर साठी लाभ घेतलेला आहे तर त्याला या पुढील 10 वर्ष या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर या घटकासाठी परत अर्ज करता येणार नाही, परंतु 2021 -2022 मध्ये शासनाच्या इतर अवजारासाठी लाभ असतो शेतकरी पात्र राहील.
हे देखील वाचा : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना विध्यार्थ्यांना मिळणार वार्षिक 60,000/- रुपये
अर्ज प्रक्रिया
मोफत फवारणी पंप या योजनेसाठी शेतकरी वर्ग घरबसल्या आपल्या मोबाईलच्या सहाय्याने किंवा लॅपटॉपच्या सहाय्याने स्वतः अर्ज करू शकतात तेही अगदी सोप्या पद्धतीने.
खाली दिलेली माहिती व्यवस्थित रित्या वाचून घ्या आणि सांगितलेल्या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या.
- मोफत फवारणी पंप या योजनेसाठी अर्ज करण्याकरिता सर्वप्रथम शासनाचा अधिकृत वेबसाईट वरती यावे लागेल. वेबसाईट ची लिंक खालील टेबला क्लिक करून तुम्ही अधिकृत वेबसाईट वरती येऊ शकाल.
- वरील लिंक वरती आल्यानंतर तुम्हाला अर्जदार लोगिन चे ऑप्शन दिसेल. जर आपण या योजनेअंतर्गत अगोदर अर्ज केला असेल तर या ऑप्शनच्या सहाय्याने तुम्ही लॉगिन करून घेऊ शकता.
- लॉगिन करण्या करिता आपल्यासमोर दोन ऑप्शन दिसतील जसे की, वापरकरता आयडी आणि आधार क्रमांक यापैकी कोणत्याही एका च्या सहाय्याने तुम्ही अर्जदार लॉगिन करू शकता.

- जर तुमच्याकडे वापर करता आयडी आणि पासवर्ड उपलब्ध नसेल तर अर्जदाराच्या आधार क्रमांकाच्या सहाय्याने आधारशी संलग्न असलेल्या मोबाईल वर आलेल्या ओटीपीच्या माध्यमातून अर्जदार लॉगिन करू शकता.
- जर या अगोदर या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कोणत्याही घटकासाठी लाभ घेतलेला नसेल तर खाली दिलेल्या पद्धतीने नवीन अर्जदार नोंदणी या ऑप्शनच्या माध्यमातून तुम्ही तुमचे खाते तयार करू शकता.
- नवीन अर्जदार नोंदणी करण्याकरिता नवीन अर्जदार नोंदणी या ऑप्शन वरती क्लिक करा. त्यानंतर आपल्यासमोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये शेतकऱ्यांचे नाव हे त्यांच्या आधार कार्ड वरील नावाप्रमाणे टाकून घ्यावे.
- त्यानंतर वापर करता आयडी विचारला जाईल त्यामध्ये तुम्ही तुम्हाला जो वाटेल तो यूजर आयडी टाकू शकतात किंवा शेतकऱ्यांचा आधार क्रमांक हा युजर आयडी म्हणून देखील वापरू शकता.
- युजर आयडी टाकून झाल्यानंतर लॉगिन करण्याकरिता तुमच्या पद्धतीने पासवर्ड टाकावा लागेल. हा पासवर्ड आणि यूजर आयडी तुम्हाला वारंवार तुमचे खाते लॉगिन करण्याकरिता आवश्यक राहील त्याकरिता तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड हा जपून ठेवा.
- त्यानंतर तुमचा चालू मोबाईल नंबर टाकून घ्या आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर मोबाईल क्रमांकाची सत्यता तपासण्याकरिता ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी टाकून तुमचा मोबाईल क्रमांक पडताळून घ्या.

- आणि शेवटी पूर्ण माहिती भरून झाल्यानंतर नोंदणी जतन करा या ऑप्शनला क्लिक करून तुम्ही तुमची नोंदणी करू शकता.
- नोंदणी व्यवस्थितपणे झाल्यानंतर परत एकदा अर्जदार लॉगिन या ऑप्शनला क्लिक करून वापर करता आयडी म्हणजेच युजर आयडी या ऑप्शनला क्लिक करा आणि त्यामध्ये तुम्ही अर्ज करत असताना टाकलेला युजर आयडी आणि पासवर्ड हा टाकून अर्जदार लॉगिन करा.
- अर्जदार लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमचे आधार व्हेरिफिकेशन करून घ्यावे लागेल. त्यामध्ये तुमचे आधार क्रमांक टाकून तुमच्या आधार क्रमांकाची लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावरती एक ओटीपी पाठवला जाईल त्या ओटीपीच्या माध्यमातून तुम्ही तुमचे आधार प्रमाणीकरण करू शकता.
हे देखील वाचा : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्ज प्रक्रिया
या योजनेचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांच्या आधारची मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे जर आधारशी मोबाईल नंबर लिंक नसेल तर या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार नाही त्याकरिता सर्वप्रथम त्यांच्या आदर्श मोबाईल नंबर लिंक करून घ्यावा लागेल.
- तुमचे आधार वेरिफिकेशन झाल्यानंतर परत एकदा अर्जदार लॉगिन करून घ्यावे लागेल. अर्जदार लॉगिन झाल्यानंतर आपल्यासमोर मुख्य प्रष्ट ओपन होईल. त्यामध्ये डाव्या साईडला असलेल्या वैयक्तिक तपशील या पर्यायाला क्लिक करून तुमची वैयक्तिक माहिती भरून घ्यावी लागेल जसे की,
- शेतकऱ्याचे नाव,
- त्यांचा पॅन कार्ड क्रमांक,
- जातीचा प्रवर्ग जसे की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा ओपन यापैकी आपण ज्या कॅटेगिरी मध्ये मोडतात ती कॅटेगिरी किंवा जात वर्गवारी निवडून घ्या.

- त्यानंतर वैयक्तिक अपंगत्व तपशील विचारला जाईल त्यामध्ये जर अपंग असेल तर होय करून त्याबद्दल तपशील टाकून घ्यावा नसेल तर नाही म्हणून पुढील बँकेचा तपशील भरून घ्या.
- बँकेचा तपशील भरत असताना तुमचे आधार जोडलेले बँक खाते एक जनधन किंवा युवक खाते आहे का किंवा खात्यातून पैसे काढण्याची किंवा ठेवण्याची मर्यादा आहे का असे विचारले जाईल तर त्याला नाही हा पर्याय निवडून घ्या आणि त्यानंतर बँक खाते क्रमांक आणि बँकेचा असलेला आयएफसी कोड हा व्यवस्थित रित्या आणि काळजीपूर्वक टाकून घ्या.
- सर्व माहिती टाकून झाल्यानंतर जतन करा या पर्यायाला क्लिक करून आपल्यापुढे शेतकऱ्यांचा पत्ता याबद्दल माहिती विचारली जाईल त्यामध्ये शेतकऱ्याचा कायमचा पत्ता आणि पत्रव्यवहाराकरिता आणि कायमस्वरूपी पत्ता याबद्दल माहिती विचारली जाईल त्यामध्ये आवश्यक ती माहिती करून घ्या.
- आणि शेवटी शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती भरत असताना शेतजमिनीचा तपशील याबद्दल माहिती विचारली जाईल त्यामध्ये, शेतकऱ्यांच्या जमिनी बद्दल माहिती भरावी लागेल जसे की, शेतकऱ्याकडे एकापेक्षा अधिक गावांमध्ये जमीन आहे का? जर असेल तर होय करून माहिती करून घ्यावी अन्यथा नाही करून माहिती करून घ्या.

- शेतकऱ्यांच्या 8 अ खाते तपशील या पर्यायांमध्ये 8a खाते क्रमांक आणि त्या शेतकऱ्याच्या नावे असलेली एकूण जमीन हेक्टर आणि आर या स्वरूपामध्ये टाकून घ्या.
- आणि शेवटी तुम्हाला आपण वन हक्क अधिनियम 2006 नुसार वनपट्टे धारक आहात का असे विचारले जाईल तर त्याला नाही क्लिक करून जमिनीचा तपशील जतन करून घ्या.
हे देखील वाचा :आता प्रत्येक नागरिकाचे बनेल आयुष्मान भारत कार्ड.
अशा पद्धतीने तुम्ही शेतकऱ्यांच्या वैयक्तिक माहितीचा तपशील भरू शकतात. वैयक्तिक तपशील भरून झाल्यानंतर वैयक्तिक तपशील याच पर्यायाच्या खाली पिकांचा तपशील सादर करा या पर्यायांमध्ये क्लिक करून त्या ठिकाणी तुमच्या शेतात सध्या असणाऱ्या पिकाबद्दल माहिती भरून घ्या.
माहिती भरून झाल्यानंतर मुख्य पृष्ठ वरती या आणि त्यानंतर आपल्यासमोर अर्ज करा असे ऑप्शन दिसेल याला क्लिक करून कृषी यांत्रिकीकरण या योजनेच्या माध्यमातून आपल्याला मोफत फवारणी पंप करिता अर्ज दाखल करायचा आहे.

कृषी यांत्रिकीकरण निवडल्यानंतर मुख्य घटक या पर्यायांमध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या पर्यायाचा निवड करून घ्या.
त्यानंतर मनुष्य चलीत अवजारे आणि पीक संरक्षण अवजारे हा पर्याय निवडून त्यामध्ये फवारणी पंप हा पर्याय निवडा आणि आपला अर्ज व्यवस्तीत रित्या जतन करून घ्या.

आपली सर्व माहिती व्यवस्तीत रित्या भरून झाल्या नंतर परत एकदा मुख्य प्रष्टावर या आणि अर्ज करा या वरती क्लिक करा. त्यानंतर वरती दिलेल्या फोटो प्रमाणे अर्ज सादर करा या या वरती क्लिक करून आपला अर्ज अंतिम सबमिट होईल. अर्ज सबमिट झाल्या नंतर आपण निवडलेल्या बाबी दिसतील त्या बाबी करिता अर्जाची फीस भूरून घ्या.
अर्जाची फीस २३ रुपये आहे. फीस भरल्या नंतर आपण केलेल्या अर्जाची पावती प्रिंट करून घ्या.
आपण केलेल्या अर्जाला अर्ज केल्या पासून 15 दिवसाच्या आत मंजुरी येऊन जाईल.
आशा पद्धतीने आपण घरबसल्या मोफत फवारणी पंप या योजने करिता अर्ज करू शकता आणि मोफत फवारणी यंत्राचा लाभ घेऊ शकता.
अर्ज केल्या नंतर पुढील सर्व प्रक्रिया या पेज च्या माध्यमातून कळवली जाईल.
अशाच नव-नवीन योजनेबद्दल अधिक माहिती करिता आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.
हा ग्रुप Private ग्रुप असल्यामुळे आपला नंबर फक्त ग्रुप admin लाच दिसेल तरी निश्चिंत ग्रुप join करा.
- आई महिला केंद्रित पर्यटन धोरण 2026 : महिलांसाठी पर्यटन क्षेत्रात सुवर्णसंधी, ₹15 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य AAI tourism Loan
- Namo Shetkari Yojana Next Installment नमो शेतकरी योजनेचा ₹2000 हप्ता: शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी! संपूर्ण माहिती
- Maha ID Online Registration 2026 : महा आयडी ऑनलाईन नोंदणी कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण सोपी पद्धत | MahaDBT 2.0 Portal
- Deshi Bail Jodi Subsidy Yojana Apply Online बैल जोडी खरेदी अनुदान योजना 2026 – शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी
- Lek Ladki Yojana 2026 मुलींना मिळणार 110000 रुपये; ‘लेक लाडकी’ योजनेसाठी असा करा ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज!
Mu.po.warni tq.shirur kasar dist.beed stet.maharastra
Mu.po.warni ta.shirur ka. Dist.beed
Mu.po.warni tq.shirur ka.dist.beed
At nakalgaon Post belura ta majalgaon dist beed
At nakalgaon Post belura ta majalgaon dist y