Ladka Bhau Yojana 2024: माझा लाडका भाऊ योजना अर्ज प्रक्रिया

Ladka Bhau Yojana 2024
Ladka Bhau Yojana 2024

Ladka Bhau Yojana 2024-महाराष्ट्र शासन बेरोजगार युवान करिता एक अत्यंत महत्त्वाची आणि नाविन्यपूर्ण योजना राबवत आहे, ज्याचे नाव मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना 2024 असे आहे.

महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ या योजने च्या माध्यमातून युवा पिढीला आर्थिक मदत आणि त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी करत आहे.

योजनेबद्दल थोडक्यात माहिती

मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील युवांकरिता कौशल प्रशिक्षण च्या सोबतच रोजगार आणि वित्तीय सहायता महाराष्ट्र शासनाकडून बेरोजगार युवांकरिता दिले जाणार आहे.

या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील युवा करिता 10,000 रुपये एवढ्या रकमेची आर्थिक मदत शासनाकडून दिली जाणार आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश असा की राज्यातील युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे हा आहे. या योजनेच्या सहाय्याने त्यांना स्वयंरोजगाराची प्राप्ती होईल आणि त्याचबरोबर राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी होण्यास देखील मदत मिळेल.

या योजनेअंतर्गत राज्य सरकार

बारावी उत्तीर्ण तरुणांना दरमहा 6,000 रुपये

आयटीआय उत्तीर्ण तरुणांना 8,000 रुपये तसेच

पदवीधरांना 10,000 रुपये ची आर्थिक मदत केली जाणार आहे. लाडका भाऊ योजना 2024

हे नक्की वाचा : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घरबसल्या अर्ज करा 2024

Ladka Bhau Yojana पात्रता

या योजनेचा लाभ घेण्याकरिता सर्वप्रथम लाभार्थी अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असेल तरच त्याला या योजनेचा लाभ घेता येईल.

अर्जदाराचे वय हे 18 ते 35 वयोगटातील असते आवश्यक आहे.

या योजनेचा लाभ हा बारावी पास, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन अशी शिक्षणाची पात्रता असलेले बेरोजगार तरुण घेऊ शकतात.

या योजनेचा लाभ जे विद्यार्थी किंवा तरुण सद्यस्थितीत शिक्षण घेत आहे म्हणजेच ज्यांचे शिक्षण चालू आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असे विद्यार्थी या योजनेस अपात्र ठरतील.

लाडका भाऊ या योजनेचा लाभ तरुणांना थेट बँकेमध्ये डीबीटीच्या स्वरूपाने मिळणार असून त्याकरिता तरुणांचे बँक खाते त्यांच्या आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. (NPCI लिंक आवश्यक.)

मुख्य म्हणजे या योजनेचा लाभ घेण्याकरिता तरुणांनी कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावरून नोंदणी केलेली असली पाहिजे आणि रोजगार नोंदणी क्रमांक त्यांच्याकडे असावा तरच या योजनेत नोंदणी करू शकतील.

लाडका भाऊ योजना आवश्यक कागदपत्रे

योजनेचा लाभ घेण्यासाठी तरुणांकडे खालील पाच कागदपत्रे असणे अत्यंत महत्त्वाचे आहे जसे की,

  • स्वतःचे आधार कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • वय प्रमाणपत्र
  • चालक परवाना/ड्रायव्हिंग लायसन.
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
  • आधार शी संलग्न मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो
  • राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक.

हे नक्की वाचा : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना OBC विद्यार्थ्यांना मिळणार 60,000/- रुपये तत्काळ अर्ज करा

लाडका भाऊ योजनेचे स्वरूप

  • मुख्यमंत्री लाडका भाऊ या योजनेकरिता महाराष्ट्र शासनाकडून 5 हजार 500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
  • या योजनेअंतर्गत उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत बारावी उत्तीर्ण जर उमेदवार असेल तर त्याला 6000 रुपये दिले जाणार आहे.
  • जर उमेदवार आयटीआय किंवा पदविका धारक असेल तर 8000 हजार रुपये आणि पदवीधर किंवा पदवीधर उत्तीर्ण असेल तर 10000 रुपये दरमहा विद्या वेतन म्हणून दिले जाईल.
  • या योजनेचा कार्य प्रशिक्षण चा कालावधी म्हणजेच इंटर्नशिप हा 6 महिन्याचा आहे.
  • इंटरनॅशनल द्वारे पात्र उमेदवारांना रोजगार क्षम बनवून उद्योगांकरिता कुशल मनुष्यबळ तयार करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
  • तसेच शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय, महामंडळे आणि विविध क्षेत्रातील प्रकल्प तसेच उद्योग, स्टार्टप्स, यांनी आवश्यक मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदविणे गरजेचे राहील.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र उमेदवारांकडून कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन नोंदणी च्या माध्यमाने अर्ज मागविण्यात येणार आहेत.
  • या योजने करिता अर्ज करण्या करिता संकेतस्थळ सध्यस्थितीत आलेले नाही. लाडका भाऊ योजना 2024

लाडका भाऊ योजनेचा लाभ कसा दिला जाणार?

लाडका भाऊ या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना विविध लाभ दिले जाणार आहेत जसे की,

  • जर अर्जदार 10 वी पास असेल तर त्याला,महिन्याला 6,000/- रू आर्थिक मदत दिली जाणार आहे.
  • 12 वी पास किंवा आयटीआय पास असेल तर त्याला 8,000/- रू आणि
  • पदवीधर असेल तर 10,000/- रुपये देण्याचे आश्वासन शासनाने दिलेले आहे.

या योजनेच्या अंतर्गत वरील वेतन श्रेणी जे आहे ते लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी चा अंतर्गत जमा करण्यात येतील.

लाभार्थ्यांच्या प्रशिक्षणा दरम्यान त्यांची हजेरी ही ऑनलाईन पद्धतीने शासनाच्या अधिकृत पोर्टल वरती घेण्यात येईल, आणि या मिळालेल्या ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे शासन हे लाभार्थीच्या आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करेल.

प्रशिक्षणा दरम्यान जर अर्जदार किंवा लाभार्थी हा महिन्यातून 10 दिवसापेक्षा अधिक दिवस प्रशिक्षणासाठी गैरहजर असेल तर त्याला त्या महिन्यातील प्रशिक्षणाची रक्कम दिली जाणार नाही.

या योजनेचा लाभ हा एका विद्यार्थ्यास किंवा लाभार्थ्यास फक्त एक वेळेस घेता येईल.

तर अशा पद्धतीने युवा पिढीला या योजनेच्या सहाय्याने प्रत्येक महिन्याला 10 हजार रुपयापर्यंत विद्यावेतन मिळविण्याची संधी आहे परंतु हे विद्या वेतन जास्तीत जास्त सहा महिने एवढ्या कालावधीसाठीच राहणार आहे.

त्यासोबतच या योजनेच्या सहाय्याने आवश्यक ते प्रशिक्षण घेऊन ते प्रशिक्षण पूर्ण केल्या बद्दलचे प्रमाणपत्र देखील त्या लाभार्थ्याला दिले जाईल. लाडका भाऊ योजना 2024

लाडका भाऊ योजने करिता अर्ज कसा करायचा

या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे.

ऑनलाइन अर्ज

महाराष्ट्र सरकारने ऑनलाईन अर्ज सादर करण्या साठी अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिलेली आहे. खाली दिलेल्या लिंक वरती क्लीक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.

वरील लिंक वरती आल्यास डॅशबोर्ड वरती नवीन अर्जदार नोंदणी करा असे एक ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करून अर्जदाराची प्रोफाइल तयार करून घ्यावी लागेल.

प्रोफाइल तयार केल्यानंतर आपल्याला युजर आयडी आणि पासवर्ड दिला जाईल त्याच्या साह्याने आपले खाते लॉगिन करून घेतल्यानंतर अर्जाचा नमुना ओपन होईल त्यामध्ये विचारली आवश्यक ती सर्व माहिती काळजीपूर्वक भरून घ्यावी, आणि विचारलेली आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून आपण आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करू शकता. लाडका भाऊ योजना 2024

ऑफलाइन पद्धतीने

ऑफलाईन अर्ज सादर करण्याकरिता सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या लाडका भाऊ या योजनेच्या अधिकृत पेज वरती यावे लागेल त्यानंतर आपल्यासमोर अर्जाचा नमुना डाऊनलोड करून घ्या.

अर्जाचा नमुना प्रिंट आउट केल्यानंतर विचारलेली आवश्यकते माहिती व्यवस्थितरित्या भरून घ्या आणि अर्ज सोबत वरी दिलेली सर्व आवश्यक ती कागदपत्रे जोडून द्यावी.

आणि आपला अर्ज जवळील कार्यालयामध्ये जमा करावा अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. लाडका भाऊ योजना 2024

योजनेचे नावमुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
लाभार्थीराज्यातील युवा वर्ग
उद्देशयुवकांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे
योजना कोणी सुरू केलीमहाराष्ट्र शासन
अधिकृत वेबसाईटयेथे पहा
महिलांसाठी Private GroupJoin Free

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

Mukhymantri Yuva karya prashikshan Yojana internship scheme for unemployed students and youth.

सद्यस्थितीमध्ये राज्यातील युवावर्ग हा आपली शिक्षण पूर्ण करून प्रत्येक वर्षी मोठ्या संख्येने बाहेर पडत आहे. युवक वर्ग हा नोकरी, व्यवसाय आणि कामाच्या शोधामध्ये आहे.

युवांचा विचार केल्या प्रमाणे सर्वाधिक युवा हा 10 वी पास, 12 वी पास, आयटीआय उत्तीर्ण आणि पदवीधर या शाखेतील विद्यार्थी किंवा युवा आपल्याला पाहायला मिळतात. हा युवा नोकरी आणि व्यवसाय चा शोधत आहेत.

युवांच्या या परिस्थितीला आळा घालण्याकरिता महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ या योजनेत च्या माध्यमातून युवा पिढीला आर्थिक मदत आणि त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी करत आहे तसेच सन 2024 – 2025 या आर्थिक वर्षापासून या योजनेची सुरुवात करण्यास मान्यता देखील देण्यात येत आहे.

अशाच नव-नवीन योजनेबद्दल अधिक माहिती करिता आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.

हा ग्रुप private ग्रुप असल्यामुळे आपला नंबर फक्त ग्रुप admin लाच दिसेल तरी निश्चिंत ग्रुप join करा.

4 thoughts on “Ladka Bhau Yojana 2024: माझा लाडका भाऊ योजना अर्ज प्रक्रिया”

Leave a Comment

× Whatsapp ग्रुप जॉईन करा 👉