Pik Vima Kharip 2024 Application : प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप.

Pik Vima Kharip 2024
Pik Vima Kharip 2024

Pik Vima Kharip 2024 Application -प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम ही 2016 पासून राज्यांमध्ये राबविण्यात आलेली एक शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण योजना आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2024 करिता अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे.

पिक विमा योजनेची उद्दिष्टे-

  • पिकांच्या नुकसानीचा अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक धैर्य अभाधित राखणे व आर्थिक लाभ मिळवून देणे.
  • नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.
  • शेतकऱ्यांसाठी नाविन्यपूर्ण आणि सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान आणि सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे.

Pik Vima Kharip 2024 पिक विमा योजनेची वैशिष्ट्ये

  • प्रधानमंत्री पिक विमा योजना ही ठरवून दिलेल्या प्रमाणे अधिसूचित केलेल्या पिकांसाठी केवळ अधिसूचित क्षेत्रासाठीच लागू आहे.
  • ही योजना कर्जदार शेतकरी तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक योजना आहे.
  • अधिसूचित पिकासाठी या क्षेत्रातील खातेदारांच्या व्यतिरिक्त जर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी असतील तर ते देखील या योजनेचा फायदा घेऊ शकतात किंवा ते या योजनेस पात्र असतील.
  • परंतु भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यास नोंदणीकृत (रजिस्टर) भाडेकरार पिक विमा संकेतस्थळावर अपलोड करून अर्ज करणे बंधनकारक राहील.
  • सन 2023-2024 पासून सर्व समावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला असून आता शेतकऱ्यांना प्रतिक अर्ज किंवा प्रतिक केवळ एक रुपया भरून पिक विमा पोर्टल वरती नोंदणी करू शकतात.
  • या अगोदर शेतकऱ्यांना विमा भरणाऱ्या कमी खरीप हंगामासाठी 2 टक्के, रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के, तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी 5 टक्के अशी मर्यादा ठेवण्यात आलेली होती.
  • या योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 2025- 2026 या तीन वर्षांकरिता सर्व अधिसूचित पिकांसाठी जोखीमिसतर 70 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे. खरीप पिक विमा 2024

हे नक्की वाचा: खरीप पीक विमा 2024 करिता नवीन अपडेट.

विमा भरत असताना या गोष्टीची विशेष काळजी घ्या

विमा रद्द होण्याची कारणे

  • जर अर्जदारांनी मृत शेतकऱ्यांच्या नावे जर विमा काढला असेल तर तो शासनाच्या प्रस्तावा अंतर्गत रद्द केला जाईल.
  • जर शेतकरी भाडे कराराने शेती वापरत असेल तर त्याला भाडेकरार पत्र आपल्या विमा अर्जासोबत सादर करणे बंधनकारक आहे जर भाडे करार पत्र जोडले नाहीत तर आपला अर्ज ना मंजूर होऊ शकतो. खरीप पिक विमा

तसेच जर शेतकऱ्यांचे बँक पासबुक प्रिंटेड नसेल तर पासबुक वरती

  1. शेतकऱ्याचे नाव (As Per Adhar)
  2. बँकेचा आय एफ एस सी (IFSC) कोड आणि
  3. बँकेचा सही आणि शिक्का
  4. व्यवस्थितरित्या असावा, जर असेल तर तुमचा अर्ज ना मंजूर होईल.

शेतकरी जर अज्ञान पालक पाल्याच्या नावे विमा उतरवत असेल तर शेतकऱ्यांना अर्जामध्ये जो कोणी अज्ञान पालक असेल त्याचे नाव हे अर्जदाराच्या वारसदारांमध्ये टाकावे लागेल आणि तरच तुमचा अर्ज हा मंजूर केला जाईल.

शेतकऱ्यांना विमा कधी दिला जातो

  • हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे जर पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यास होणारे नुकसान या योजनेअंतर्गत दिले जाते.
  • पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास या योजनेचा फायदा होतो.
  • पीक पेरणी पासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत जर नैसर्गिक आग, वीज कोसळले, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर येणे, पीक क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ पडणे, पावसातील खंड निर्माण होणे, पिकाला कीड व रोग येणे इत्यादी बाबीमुळे हंगामाच्या शेवटी उत्पन्नात येणारी घट या योजनेअंतर्गत भरून काढली जाते.
  • स्थानिक नैसर्गिक आपत्तीचा ही यामध्ये समावेश होतो
  • नैसर्गिक कारणामुळे पिकांचे होणारे कारणे पश्चात नुकसान देखील या योजनेमध्ये समाविष्ट आहे.

वरील कोणत्याही कारणास्तव जर शेतकऱ्यांचे पीक नुकसान झाले तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते.

या योजनेतील समाविष्ट पिके आणि शासन निर्णय पाहण्यासाठी क्लिक करा……

पिक विमा अर्जदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

  • सर्वप्रथम शेतकऱ्यांकडे त्यांचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
  • चालू बँकेचे खाते पुस्तक
  • सातबारा
  • 8अ उतारा
  • पिक पेरा
  • भाडे पत्रक जर भाडे करार केलेला असेल तर)

इत्यादी कागदपत्रे अर्ज करताना सोबत असावी. खरीप पिक विमा

पिक पेरा पाहण्यासाठी क्लिक करा.

पिक विमा भरण्याची केंद्र

शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा अर्ज दाखल करण्यासाठी त्यांना त्यांच्या जवळील सीएससी केंद्र मध्ये जाऊन अर्ज करू शकता किंवा आपल्या जवळील बँकेमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही अर्ज करून पिक विमा उतरवू शकता.

तसेच तुम्ही तुमचा स्वतः घरी बसून तुमचा मोबाईलचा सहाय्याने देखील पिक विमा करिता अर्ज करू शकता आणि प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ देखील घेऊ शकता.

प्रधानमंत्री पिक विमा योजना अर्ज प्रक्रिया

  • प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या योजनेचा अधिकृत वेबसाईट वरती यावे लागेल.
  • वरती दिलेल्या अधिकृत वेबसाईट वरती आल्यानंतर आपल्यासमोर फार्मर कॉर्नर (Farmer Corner) हे ऑप्शन दिसेल.
Pik Vima Kharip 2024
Pik Vima Kharip 2024
  • फार्मर लॉगिन वरती क्लिक करून आपल्या मोबाईल नंबर ने लॉगिन करून घ्या.
Pik Vima Kharip 2024
Pik Vima Kharip 2024
  • लॉगिन केल्यानंतर डॅशबोर्ड वरती अप्लाय फॉर इन्शुरन्स (apply for insurance) या पर्यायावर येऊन आपल्यासमोर पीक विमा करिता अर्ज प्रक्रिया दिसेल.
  • त्यामध्ये विचारलेल्या पद्धतीने व्यवस्थित रित्या अर्जदाराची  वैयक्तिक तपशील जसे की शेतकऱ्याचे नाव आणि शेतकऱ्याचे पासबुक वरील नाव हे दोन्ही सेम असावे त्यानंतर चालू मोबाईल नंबर शेतकऱ्याची जात, व फार्मर टाईप यामध्ये शेतकरी हा अल्पभूधारक आहे की बहुबधारक आहे सिलेक्ट करून घ्यावे. जसे की, small, marginal किंवा other टाका. तसेच फार्मर कॅटेगिरी मध्ये शेतकऱ्याची जमीन ही शेतकऱ्यांच्या नावावर आहे किंवा भाडे करारा वरती घेतलेली आहे तसे नमूद करावे.

त्यानंतर residential details मध्ये शेतकऱ्यांचा पत्रव्यवहाराचा पत्ता अचूक भरून घ्या. खरीप पिक विमा

  • पिक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांसाठी वारसदार निवडण्याकरिता पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे त्यामध्ये तुमच्या वारसाचे नाव व विचारलेली माहिती भरून घ्या.
  • आणि सर्व भरलेली माहिती व्यवस्थित रित्या जतन करून ठेवा.
  • सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपल्यासमोर बँक डिटेल्स चा नवीन पर्याय ओपन होईल त्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांचा बँकेचा तपशील भरून घ्यायचा आहे.

त्यामध्ये बँकेचा आयएफसी कोड बँकेचे नाव आणि शाखा व्यवस्थित सिलेक्ट करून घ्या आणि बँकेचा खाते क्रमांक टाकून सर्व माहिती जतन करून नेक्स्ट NEXT या पर्यायावर क्लिक करून शेतकऱ्याना भरायच्या असलेल्या पिकाची माहिती टाकावी लागेल.

Pik Vima Kharip 2024
Pik Vima Kharip 2024
  • क्रॉप डिटेल्स मध्ये खरीप हे ऑप्शन सिलेक्ट करून 2024 वर्ष टाकावे. त्यानंतर पिकांचा लागवडीचा दिनांक व लागवड केलेली क्षेत्र व्यवस्थित रित्या भरून घ्या आणि कागदपत्रे अपलोड करा या पर्यायावरती येऊन त्यामध्ये शेतकऱ्यांचे पासबुक सातबारा उतारा आणि पीक पेरा इत्यादी कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.

जर शेतकरी भाडे करारा वरती शेत जमीन वापरत असेल तर भाडेकरार हे आपल्याला अपलोड करावे लागेल.

सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपला अर्ज व्यवस्थित रित्या जतन करून घ्या आणि एक रुपया ची पेमेंट केल्यानंतर पीक विमा पावती प्रिंट करून घ्या. खरीप पिक विमा

अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या प्रधानमंत्री खरीप पिक विमा 2024 करिता घरबसल्या आणि सांगितलेल्या पद्धतीने व्यवस्थितरित्या अर्ज करू शकता.

जर तुम्हाला अर्ज करण्याकरिता काही अडचण येत असेल तर तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करून माहिती घेऊ शकता किंवा आपल्या जवळील सीएससी (CSC) सेंटरला भेट देऊन आपण आपला पिक विमा अर्ज करू शकता. खरीप पिक विमा

पिक विमा भरल्यानंतर ई पीक पाहणी का करावी, कधी करावी आणि कशी करावी याबद्दल पूर्ण माहिती अपडेट करिता आमचा खूप जॉईन करा.

तसेच पिक विमा भरल्यानंतर आपल्या पिकाची झालेली नुकसान करिता ऑनलाइन तक्रार कशी नोंदणी करावी अशा सर्व अपडेट करिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

2 thoughts on “Pik Vima Kharip 2024 Application : प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप.”

Leave a Comment

× Whatsapp ग्रुप जॉईन करा 👉