Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana:बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजना 2024

उद्देश

Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana 2024-जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आदिवासी शेतकऱ्यांसाठी/अनुसूचित जमाती या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजना अंतर्गत नवीन विहीर बांधण्यासाठी, जुनी विहीर दुरुस्तीसाठी, इनवेल बोअरिंगसाठी, पंप संच बसविण्यासाठी, अनुदान देण्यात येते.

मिळणारे अनुदान

  • या योजनेअंतर्गत नवीन विहिर बांधणी करिता अडीच लाख रुपये (2.5 लाख) अनुदान दिले जाते.
  • तसेच जर शेतकऱ्यांना जुनी विहीर दुरुस्ती करायची असेल तर जुनी विहीर दुरुस्ती अंतर्गत 50 हजार रुपये अनुदान दिले जाते.
  • इन वेल बोरिंग करिता 20 हजार रुपये एवठी अनुदानित रक्कम दिली जाते.
  • तसेच जर शेतकऱ्यांना पूर्वी असलेल्या वीज जोडणी करायची असेल तर वीज जोडणी आकार अंतर्गत 10 हजार रुपये दिले जातात.

बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजना पात्रता

  • सर्वप्रथम लाभार्थी अनुसूचित जमाती या प्रवर्गातील असावा.
  • लाभार्थ्यांनी वैध जातीचा दाखला सादर करणे बंधन कारक आहे.
  • शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न दीड लाखाच्या आत असावे.
  • उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधन कारक आहे.
  • लाभार्थीची जमिनधारणा 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत (नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर) असणे बंधनकारक आहे.
  • एकदा संबंधित योजनेचा पूर्ण लाभ घेतल्यास पुढील ५ वर्षे त्याच लाभार्थ्यास किंवा कुटुंबास या योजनेचा लाभ देय नाही.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

1) नवीन विहीर याबाबीकरीता:

  • सर्वप्रथम शेतकऱ्यांकडे आधार कार्ड असले पाहिजे.
  • बँकेचे पासबुक
  • पॅन कार्ड
  • कास्ट सर्टिफिकेट/ जातीचे प्रमाणपत्र.
  • चालू सातबारा
  • 8a उतारा
  • उत्पन प्रमाणपत्र
  • अपंग असल्यास प्रमाणपत्र

अर्ज मंजूर झाल्या नंतर खालील कागदपत्राची आवश्यकता असेल.

  • तलाठी यांच्याकडे दाखला -सामायिक एकूण धारणा क्षेत्र बाबतचा दाखला. शेतकऱ्याकडे विहीर नसल्याबाबतचे प्रमाणपत्र. प्रस्तावित विहीर पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहिरीपासून 500 फुटापेक्षा जास्त अंतरावर असलेले चा दाखला.
  • प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
  • Self Declaration

2) जुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोअरिंग याबाबीकरीता:

1) सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र.
2) तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (र. रु. 1,50,000/- पर्यंत).
3) जमीन धारणेचा अदयावत 7/12 दाखला व 8अ उतारा.
4) ग्रामसभेचा ठराव.
5) तलाठी यांचेकडील दाखला – एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.20 ते 6 हेक्टर मर्यादेत); विहीर असल्याबाबत प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
6) लाभार्थीचे बंधपत्र (100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर).
7) कृषि अधिकारी (विघयो) यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
8) गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र
9) ज्या विहीरीवर जुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोअरिंगचे काम घ्यावयाचे आहे त्याविहिरीचा कामा सुरू होण्यापूर्वीचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह)
10) इनवेल बोअरींगसाठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील feasibility report.
11) अपंग असल्यास प्रमाणपत्र

3) शेततळ्यास अस्तरीकरण / वीज जोडणी आकार/ पंपसंच / सूक्ष्म सिंचनसंच याबाबीकरीता:

1) सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र.
2) तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र. (र. रु. 1,50,000/- पर्यंत ).
4) जमीन धारणेचा अदयावत 7/12 दाखला व 8अ उतारा.
5) तलाठी यांचेकडील एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला. (0.20 ते 6 हेक्टर मर्यादेत)
6) ग्रामसभेची शिफारस/मंजूरी
7) शेततळे अस्तरीकरण पुर्णत्वाबाबतचे हमीपत्र (100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर)
8) काम सुरू करण्यापूर्वीचा फोटो (महत्वाची खुणेसह)
9) विद्युत कनेक्शन व विद्युत पंपसंच नसलेबाबत हमीपत्र
10) प्रस्तावित शेततळ्याचे मापन पुस्तिकेच्या छायांकीत प्रत व मापन पुस्तकातील मोजमापाप्रमाणे संबंधित मंडळ कृषि अधिकारी यांचेकडून अंदाजपत्रक प्रति स्वाक्षरी करुन घ्यावे.

वरील सर्व कागदपत्र व्यवस्तीत रित्या स्कॅन (Scan) करून अर्जा सोबत अपलोड करून घ्यावीत.

Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana अर्ज प्रक्रिया

  • जर तुमच्याकडे लॅपटॉप किंवा PC असेल तर आपण या योजनेसाठी घरबसल्या अर्ज करू शकता.जर नसेल तर जवळील CSC सेंटर ला भेट देऊन अर्ज करू शकता.
  • सर्वप्रथम MahaDBT Farmer Scheme या योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
  • या योजनेच्या होम पेज वरती आल्या नंतर आपल्या समोर नवीन अर्जदार नोंदणी व अर्जदार लॉगइन असे दोन पर्याय दिसतील.
  • जर आपण या योजने अंतर्गत अगोदर नोंदणी केली असेल तर वापरकर्ता आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करू शकता अन्यथा नवीन अर्जदार नोंदणी पर्याया वरती जाऊन नोंदणी करून घ्या.
  • नोंदणी करत असताना अर्जदाराचे नाव टाकून घ्यावे नाव हे आधार कार्ड नुसार टाकावे.
  • त्यानंतर वापरकर्ता आयडी टाकावा व तुम्हाला वाटेल तसं पासवर्ड टाकून चालू mob नंबर टाकून OTP मिळवा वरती क्लिक करून OTP पडताळून घ्या व नोंदणी करून घ्यावे.
  • अर्जदार नोंदणी झाल्या नंतर लॉगिन करून घ्यावे लॉग इन केल्यानंतर आधार प्रमाणीकरण करून घ्यावे त्यामध्ये आधार कार्ड क्रमांक टाकून आधार ला लिंक असलेल्या मोबाईल वरती आलेला ओटीपी टाकून आधार व्हेरिफिकेशन करून घ्यावे.
  • आधार वेरिफिकेशन झाल्यानंतर परत अर्जदार लॉगिन करून घ्यावे. लॉगिन केल्यानंतर आपल्यासमोर महाडीबीटी चे मुख्य प्रश्न दिसेल त्यामध्ये वैयक्तिक तपशील या पर्यायाला क्लिक करून विचारली गेली सर्व माहिती व्यवस्थित रित्या टाकून घ्यावी.
  • वैयक्तिक तपशील यामध्ये अर्जदाराची वर्गवारी व्यवस्थित रित्या टाकावी व जात प्रमाणपत्र असेल तर होय करावे किंवा नाही करावे.
  • या योजनेसाठी ST प्रवर्गातील शेतकरी लाभ घेऊ शकतात.त्यासाठी जात प्रमाणपत्र नसेल तर काढून घ्यावे. व नंतर अर्ज करावा.
  • त्यानंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न टाकावे व अर्जदारास किंवा शेतकऱ्यास कोणते अपंग असेल तर अपंगाचा प्रकार निवडून घ्यावा.
  • त्यानंतर अर्जदाराचे बँक खाते क्रमांक व आयएफसी कोड प्रविष्ट करावा जर आपले खाते जनधन असेल तर एस करावे अन्यथा नाही या बटणावर क्लिक करून जतन करून घ्यावे.
  • वैयक्तिक तपशील माहिती भरल्यानंतर पुढील टॅब ओपन करावा व त्यामध्ये शेतकऱ्याचा कायमचा पत्ता व पत्र व्यवहाराचा पत्ता व्यवस्थित टाका व नंतर शेतजमिनीचा तपशील हा पर्याय ओपन होईल त्यामध्ये शेतकऱ्याच्या जमिनीबद्दल माहिती टाकून द्यावी जसे की कोणत्या जिल्ह्यामध्ये जमील आहे त्यानंतर तालुका व गाव एवढी माहिती टाकल्यानंतर आपल्या 8a उतारा वरती 8a चा खाते क्रमांक असतो तो टाकून घ्यावा व त्यानंतर शेतकऱ्याच्या नावावरती एकूण किती जमीन आहे ते हेक्टर आणि आर च्या स्वरूपामध्ये टाकून घ्यावे.
  • जर शेतकऱ्याच्या नावावरती एकापेक्षा अधिक गटांमध्ये जमीन असेल तर सेपरेट सेपरेट सर्वे क्रमांक किंवा गट क्रमांक टाकून त्या गटामधील क्षेत्र हेक्टर आर या प्रमाणामध्ये टाकून घ्यावे व माहिती जतन करून घ्यावी.
  • जर शेतकऱ्यांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत शासनाने जमीन वाटप केलेली असेल तर YES करावे अन्यथा नाही या ऑप्शनवर क्लिक करून जमिनीचा तपशील जतन करून घ्यावा.
  • जतन केल्या नंतर मुख्य पेज वरती आल्या नंतर इतर माहिती प्रविष्ट करा या पर्यायावरती येऊन शेतात असलेल्या सिंचन स्त्रोताचा तपशील दाखल करून घ्यावा, नसेल तर कोणताही स्त्रोत उपलब्ध नाही असे भरून जतन करून घ्यावे.
Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana
Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana
  • जतन केल्या नंतर परत मुख्य प्रष्टावरती येऊन अर्ज करा या पर्यायावर यावे.
Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana
Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana
  • त्यानंतर अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना निवडून घ्यावे आणि नवीन विहीरीचे बांधकाम हा पर्याय निवडावा आणि जतन करा.
Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana
Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana

अशा पद्धतीने तुम्ही बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजना अंतर्गत नवीन विहिरी साठी अर्ज करू शकता व अनुदानाचा लाभ घेऊ शकता.

अर्ज शुल्क

अर्ज शुल्क:- अर्ज सादर करतेवेळी शेतकऱ्यांनी रु. २०/- शुल्क व रु. ३.६०/- जी.एस.टी. मिळून एकूण रु.२३.६०/- शुल्क ऑनलाईन भरावा लागणार आहे.

अशा पद्धतीने वरील पायऱ्यांचा व्यवस्थितरित्या वापर करून सहज रित्या बिरसा मुंडा कृषी क्रांती नवीन विहीर या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता व 2.50 लाख रु अनुदान मिळऊ शकता.

तुमचे फॉर्म सबमिट झाल्यानंतर 25 ते 30 दिवसाच्या नंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम थेट डीबीटी/ DBT च्या मार्फत मिळून जाईल. तरी या योजनेचा सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा व गरजूवंता पर्यंत ही माहिती शेअर करा.

धन्यवाद !

Leave a Comment