Agri Stack Reistration 2025 Important Update For CSC. सेतू सुविधा केंद्र चालकांना महत्वाची सूचना आवश्य वाचा.

Agri Stack Reistration 2025 Important Update संदर्भ: मा. निवासी उपजिल्हाधिकारी, बीड यांचे आढावा दि. २४.०२.२०२५

उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, अॅग्रीस्टॅक प्रकल्पासाठी आपण CSC सेंटर अंतर्गत उर्वरीत Farmers ID तयार करावीत. सदरील ID तयार करताना ग्राम महसुल अधिकारी यांनी KYC साठी दिलेल्या यादीचा (ज्यात आधार क्र., गट क्र., नाव, मोबाईल क्र.) तपशिलांचा वापर करून तात्काळ उर्वरित Farmers ID तयार करावेत.

माझ्या असे निदर्शनास आले आहे की, सदरील कामकाज अत्यंत सावकाश सुरू असून, सदरचे कामकाज अधिक गतीने करणे आवश्यक आहे. ज्या सेतू केंद्र चालकाकडे दि. २७.०२.२०२५ अखेर २०% पेक्षा कमी काम दिसून येईल, त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.

आपणास या संदर्भात अधिक माहिती आवश्यक असल्यास, कृपया संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.

असे पत्र मा उप विभागीय अधिकारी माजलगाव यांनी दि 25 फेब 2025 रोजी निर्गमित केले आहे. तरी सर्व सेतू सुविधा केंद्र चालकांनी अग्री stack शेतकरी ओळखपत्र या कडे लक्ष द्यावे.

Leave a Comment

× Whatsapp ग्रुप जॉईन करा 👉