Ladki Bahin Yojana Sadi Vitaran 2025. मोफत साडी वितरण

Ladki Bahin Yojana Sadi Vitaran 2025- बीड जिल्ह्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना मोफत साडी वितरण.

राज्य शासनाच्या निर्णयानुसार, बीड जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबीयांना दरवर्षी एक मोफत साडी दिली जाणार आहे. यंदाही ३५,०४० महिलांना साड्या वितरित केली जाणार आहेत. या साड्यांचे वितरण होळीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

कोणत्या तालुक्यात किती महिलांना मिळणार साडी ?

साड्या वितरित करण्याचे नियोजन तालुकानिहाय खालीलप्रमाणे करण्यात आले आहे :

  • अंबाजोगाई – २,२७३ महिलांना
  • आष्टी – ३,५८९ महिलांना
  • बीड – ६,१०६ महिलांना
  • धारुर – २,०३४ महिलांना
  • गेवराई – 4642 महिलांना
  • केज – २,४७८ महिलांना
  • माजलगाव – २,९९६ महिलांना
  • परळी – ५,१३६ महिलांना
  • पाटोदा – १,६३६ महिलांना
  • शिरुर – २,०१४ महिलांना
  • वडवणी – १,१३६ महिलांना

एकूण – ३५,०४० महिलांना साडी मिळणार आहे.

योजना २०२३ ते २०२८ पर्यंत लागू

या मोफत साडी वितरण योजनेचा कालावधी २०२३ ते २०२८ असा पाच वर्षांसाठी निश्चित करण्यात आलेला आहे. वस्त्रोद्योग विभागाच्या या उपक्रमातून राज्यातील गरीब कुटुंबांना वस्त्रांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात येईल.

साड्यांचे वितरण लवकरच सुरू होईल, आणि त्या सर्व लाभार्थ्यांना होळीच्या सणाच्या निमित्ताने वितरित केल्या जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अंत्योदय कार्डधारकांना मोफत साडी

प्रत्येक वर्षी अंत्योदय कार्डधारकांना मोफत साडी वाटप दिली जात आहे. मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यास लवकरच साड्या प्राप्त होतील, त्यानंतर वाटपास सुरुवात केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले

नियोजित वितरण व भविष्यातील अपेक्षा

या योजनेला अधिक व्यापकपणे राबविण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाकडून साड्यांच्या वितरणासाठी नियोजन सुरू आहे. यामुळे गरीब कुटुंबांतील महिलांना एक अर्थपूर्ण भेट मिळेल, तसेच शासनाच्या योजनांचा लाभ त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.

Leave a Comment

× Whatsapp ग्रुप जॉईन करा 👉