One Nation One Subscription 2024- वन नेशन वन सबस्क्रीप्शन या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना नवीन संशोधन लेख आणि जर्नल्स मध्ये प्रवेश घेण्या करिता सुरू करण्यात आलेली ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण योजना आहे. आजच्या या लेखामध्ये आपण या बद्दल अधिक माहिती घेणार आहोत.
वन नेशन वन सबस्क्रीप्शन योजना नक्की काय आहे ?
One Nation One Subscription हि एक केंद्र शासनामार्फत नव्याने सुरुवात करण्यात आलेली योजना असून, सरकारच्या म्हणण्यानुसार या योजनेसाठी पात्र असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ही एक पूर्णपणे डिजिटल आणि वापरण्यास एकदम सुलभ प्रक्रिया आहे.
देशभरातील संशोधन संस्था, प्रयोगशाळा तसेच विद्यापीठांना संशोधन पत्रिकांची मुक्त उपलब्धता करून देण्यासाठी ‘वन नेशन वन सबस्क्रिप्शन’ योजना सुरू करण्यात आलेली आहे.
उच्च शिक्षण संस्था आणि याद्वारे चालवल्या जाणाऱ्या संशोधन आणि (R & D) विकास प्रयोगशाळांसाठी वन नेशन वन सबस्क्रीप्शन सुविधा उपलब्ध करून देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन म्हणजेच ANRF अंतर्गत या प्रक्रियेचे पुनरावलोकन केले जाईल आणि या संस्थांच्या भारतीय लेखकांची प्रकाशाने देखील हाताने जातील.
अंमलबजावणी कधी पासून होणार?
या योजनेची अंमलबजावणी १ एप्रिलपासून करण्यात येणार आहे, नियोजन आणि अंमलबजावणी समितीच्या शिफारशीनुसार पहिल्या टप्प्यात ७० संशोधनपत्रिकांचा समावेश करण्यात येईल.
पुढील वर्षापासून सुरू होणाऱ्या आणि 2027 पर्यंत तीन कॅलेंडर वर्षासाठी या योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे.
हे नक्की वाचा : पोकरा योजना नोंदणी प्रक्रिया 2024.
फायदा
या योजनेअंतर्गत युवा विध्यार्थ्यांना रिसर्च मध्ये काम करण्या साठी उच्च प्रतीचे पब्लिकेशन ची उपलब्धता करण्यात येणार आहे.
देशातील सर्व विद्यापीठ या योजनेअंतर्गत आपले रिसर्च आपसात शेअर करू शकतील.
विद्यापीठांमध्ये under Graduate कोर्स देखील सुरू करण्यात येतील.
तसेच जगभरातील प्रसिद्ध जर्नल्स (Gernals) चे subscription देखील Education Institute ला पुरविले जाईल.
या योजने अंतर्गत मंजूर निधी
One Nation One Subscription योजनेसाठी येणाऱ्या 3 वर्षांमध्ये 6,000 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
One Nation One Subscription अंतर्गत कोणती प्रकाशाने उपलब्ध असतील.
वन नेशन वन सबस्क्रीप्शन मध्ये 30 प्रमुख आंतरराष्ट्रीय जर्नल प्रकाशकांचा समावेश करण्यात आलेला आहे. या प्रकाशकांनी प्रकाशित केलेल्या जवळपास 13,000 ई जर्नल या योजनेअंतर्गत पोर्टल वरती डिजिटल पद्धतीने उपलब्ध होतील.
- Gay Gotha Yojana Online Apply. गाय गोठा अनुदान योजना 2025.
- Agri Stack Registration Farmer ID 2025 असे बनवा शेतकरी ओळखपत्र शेतकरी आयडी
- Pik Vima New Update 2024 पिक विमा घोटाळा चौकशी
- Anudan E kyc Process अतिवृष्टी अनुदान ई केवायसी प्रक्रिया 2024
- Ladki bahin yojana status check maharashtra 2024 लाडकी बहिण योजना स्थिती