Ration Card Ekyc Process 2024 राशन कार्ड ई केवाईसी प्रक्रिया

Ration Card Ekyc Process 2024 भारतीय नागरिकांसाठी राशन कार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र किंवा दस्तावेज असून याचा उपयोग भारतीय नागरिकांना स्वस्त धान्य खरेदी करिता होतो. तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याकरिता राशन कार्ड हे एक रहिवासी पुराव्याचे महत्त्वाचा दाखला मानला जातो.

आवश्यक कागदपत्रे

  • कुटुंबातील सर्व व्यक्तींचे आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • स्वतः व्यक्ती असणे आवश्यक.
  • चालू मोबाईल क्रमांक. Ration Card Ekyc Process 2024.

हे नक्की वाचा : ई श्रम कार्ड केवायसी करा घरबसल्या

राशन कार्ड ई केवायसी करणे का आवश्यक आहे?

सद्य परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातील नागरिकांची राशन वाटपातील वाढती फसवणूक लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या मार्फत आदेश काढण्यात आलेला आहे की प्रत्येक राज्यातील राशन कार्ड धारकांनी त्यांची रेशन कार्ड ई केवाईसी अद्ययावत करून घ्यावी.

रेशन कार्ड ई केवाईसी या योजनेअंतर्गत ज्या नागरिकांना आत्तापर्यंत रेशन कार्डचा लाभ घेता आलेला नाही अशा नागरिकांना देखील या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे म्हणून राशन कार्ड ई केवाईसी सर्व नागरिकांनी करणे महत्त्वाचे आहे.

राशन कार्ड ई केवाईसी केली तरच त्या कुटुंबांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल अन्यथा असे कुटुंब ज्यांनी ई केवाईसी केलेली नाही ते या योजनेपासून वंचित राहतील. राशन कार्ड ई केवाईसी प्रक्रिया.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
महिलांसाठी Private Whatsapp Group येथे क्लिक करा

राशन कार्ड ई केवाईसीचा उद्देश.

राशन कार्ड ई केवाईसी चा मुख्य उद्देश असा की या योजनेअंतर्गत फक्त खऱ्या लाभार्थ्यांनाच राशन मिळत आहे की नाही याची खात्री करणे हा आहे.

सत्य परिस्थितीमध्ये असे निदर्शनास आले आहे की अनेक रेशन कार्डधारकांच्या रेशन कार्ड मध्ये असलेल्या सदस्यांची संख्या बदललेली असून, कुटुंब संख्येपेक्षा जास्त संख्येचा लाभ ज्या कुटुंबांना मिळत आहे अशा कुटुंबांच्या राशन कार्ड मध्ये दुरुस्ती करून घेणे. जसे की एखाद्या सदस्याचे लग्न किंवा मृत्यू झाले असल्यास त्यांची संख्या कमी किंवा जास्त करून घेणे.

राशन कार्ड ई केवाईसी केल्यामुळे अशा सदस्यांचे नावे या योजनेअंतर्गत कमी केले जाणार आहेत. Ration Card Ekyc Process 2024.

Ration Card Ekyc
Ration Card Ekyc

रेशन कार्ड ई केवाईसी प्रक्रिया

राशन कार्ड ई केवाईसी करणे अगदी सोपे असून, राशन कार्ड केवायसी करण्याकरिता फक्त कुटुंबाचे राशन कार्ड आणि सर्वांचे आधार कार्ड तसेच व्यक्ती यांना स्वतः आपल्या गावच्या रेशन दुकानात जावे लागेल आणि तेथे तुमच्या अंगठ्याच्या सहाय्याने केवायसी करू शकता.

राशन कार्ड ई केवायसी ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे त्यामुळे राशन कार्ड दुकानदारास कोणत्याही प्रकारची आर्थिक देवाण-घेवाण करण्याची गरज नसून या योजनेचा लाभ तुम्ही मोफत घेऊ शकता.

राशन कार्ड ई केवाईसी केली तरच तुम्हाला पुढील राशन कोणत्याही अडचणी शिवाय मिळू शकेल.Ration Card Ekyc Process 2024.

हे नक्की वाचा : मागेल त्याला सौर कृषी पंप योजना असा करा स्वतः अर्ज

बाहेरगावी असणाऱ्या नागरिकांनी केवायसी कशी करावी

आपल्या देशातील असे अत्यंत रेशन कार्ड धारक आहे जे की आपली दैनंदिन उपजीविका भागविण्याकरिता परगावी गेल्यामुळे त्यांना राशन कार्ड ची ई केवाईसी करण्याकरिता आपल्या गावामध्ये परत येणे अवघड होते, तर अशा नागरिकांकरिता केवाईसी करण्यासाठी परत येण्याची आवश्यकता नसून तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणच्या राशन दुकानदाराकडे जाऊन तुम्ही तुमची राशन ई केवाईसी करू शकता. Ration Card Ekyc Process 2024.

अशाच नव-नवीन योजनेबद्दल अधिक माहिती करिता आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.

हा ग्रुप Private ग्रुप असल्यामुळे आपला नंबर फक्त ग्रुप admin लाच दिसेल तरी निश्चिंत ग्रुप join करा.

Leave a Comment